कधी क्रेडिट आणि डेबिट म्हटल्यावर तुम्हाला संभ्रम निर्माण होतो का? चला तर मग सोप्या भाषेत समजूया क्रेडिट आणि डेबिट बद्दल.
क्रेडिट आणि डेबिट हे आपल्या बँक संबंधित व्यवहाराशी निगडित शब्द आहेत जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरता किंवा बँकेतून पैसे काढता तुम्हाला बँक एसएमएस द्वारे नोटिफिकेशन पाठवते. एसएमएस मध्ये डेबिट किंवा क्रेडिट या शब्दाचा उल्लेख असतो त्याचबरोबर बँका किंवा पेमेंट कंपनी ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रदान करतात.
काही लोकांना क्रेडिट आणि डेबिट या संकल्पना माहित असतील आणि काहींना याचे अर्थ माहित नसतील पण कोणत्याही प्रकारच्या फसवणुकी आणि घोटाळ्याला बळी पडू नये त्यासाठी क्रेडिट आणि डेबिट शब्द जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. क्रेडिट आणि डेबिट हे शब्द जर आपल्याला समजले तर आपण आपल्या बँकेतून पैसे जमा केले आहेत किंवा बँक खात्यातून पैसे काढले आहेत हे लगेच समजते.
अनुक्रमणिका
डेबिट म्हणजे काय? | Debit meaning in Marathi
डेबिट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणे खात्यातून पैसे काढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत जसे की कॅश काढणे, चेक द्वारे किंवा आपण पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यावर आपल्या अकाउंट मधून पैसे डेबिट होतात. त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही शॉप मध्ये डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर तुम्हाला डेबिट चा एसएमएस मिळतो. तुम्हाला असा SMS आला आहे ज्यामध्ये नमूद केले आहे की तुमच्या अकाउंट मधून 50 हजार रुपये डेबिट झाले आहेत याचा अर्थ असा होतो की तुमच्या खात्यातून पन्नास हजार रुपये काढले आहेत
क्रेडिट म्हणजे काय? | Credit meaning in Marathi
क्रेडिट म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणे. तुम्ही तुमच्या बँक खात्यात कॅश जमा करता किंवा तुम्हाला कोणी पैसे ट्रान्सफर केले की तुम्हाला मेसेज येतो की पैसे क्रेडिट झाले आहेत. क्रेडिट ला आपण डिपॉझिट असेही म्हणू शकता.
क्रेडिट आणि डेबिट या शब्दाचा बँकांमध्ये उपयोग
क्रेडिट आणि डेबिट या शब्दांचा वापर बँकांमध्ये होतो जेव्हा तुमच्या अकाउंट मधून काही पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होतात किंवा तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड वरती पैसे खर्च करतात किंवा तुम्ही दुसऱ्या व्यक्ती किंवा कंपनीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात तेव्हा डेबिट शब्द वापरला जातो. दुसऱ्या बाजूला जेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये सॅलरी किंवा रिफंड किंवा दुसऱ्या कोणत्याही अकाउंट मधून पैसे जमा होतात त्याला आपण क्रेडिट म्हणतो क्रेडिट व्यवहार हे तुम्हाला क्रेडिटेड असा SMS दिसतो याचा अर्थ तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात.
डेबिट आणि क्रेडिट मधला फरक
डेबिट | क्रेडिट |
बँक खात्यातून पैसे काढता किंवा खर्च करता. | तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करता किंवा तुमच्या बँक खात्यात दुसऱ्या अकाउंट मधून पैसे जमा होतात. |
तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणे. | चेक किंवा कॅश या स्वरूपात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणे. |
उदाहरणार्थ – कॅश काढणे, पेमेंट करणे, ट्रान्सफर करणे. | उदाहरणार्थ – सॅलरी डिपॉझिट, रिफंड मिळणे. |
डेबिट आणि क्रेडिट बद्दल वापरले जाणारे दुसरे शब्द
काही वेळेला डेबिटे ला ट्रान्सफर किंवा विड्रॉ असेही म्हटलं जातं पण त्याचा अर्थ डेबिटेड असाच होतो म्हणजेच तुमच्या खात्यातून पैसे काढता तसेच क्रेडिटेड ला कधी कधी डिपॉझिटेड असेही संबोधले जाते.
डेबिट कार्ड
डेबिट कार्ड हे तुमच्या बँक खात्याला जोडलेले असते ज्यामधून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील जमा असलेली रक्कम कार्डद्वारे वापरू शकता. त्याकरता तुम्हाला एक पिन किंवा पासवर्ड दिला दिला जातो तो तुम्हाला कॅश काढण्यासाठी किंवा कुठल्याही स्टोअर मध्ये डेबिट कार्ड वापरण्यासाठी वापर करावा लागतो. याचाच अर्थ तुमच्याकडे जी रक्कम बँक खात्यात जमा आहे तेवढी रक्कम वापरण्याची मुभा डेबिट कार्ड द्वारे मिळते.
आजच्या तारखेला सर्वच कार्ड हे कुठल्याही एटीएम मशीन मधून पैसे काढण्यास परवानगी देतात आणि त्यावर कुठल्याही प्रकारचा वार्षिक खर्च नसतो. डेबिट कार्ड घेताना तुम्ही बँकेकडून याबद्दल विचारपूस करणे गरजेचे आहे आणि डेबिट कार्डचा रकमेवर तुम्हाला कोणताही प्रकारचा इंटरेस्ट द्यावा लागत नाही कारण ती रक्कम तुमची स्वतःची असते.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड मध्ये तुमच्या इन्कम प्रमाणे बँका तुम्हाला एक लिमिट(मर्यादा) देतात उदाहरणार्थ तुम्हाला बँकांनी क्रेडिट कार्ड वरती एक लाखाची लिमिट दिली असेल तर तुम्हाला एका महिन्यात एक लाख खर्च करण्याची मुभा मिळते आणि याचे पेमेंट तुम्हाला 45 दिवसांनी करावे लागते.
तुम्ही 1 ते 30 या दरम्यान जे काही पैसे खर्च कराल ते तुम्हाला पुढील महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत भरण्यास मुभा असते पण या तारखा तुम्ही क्रेडिट कार्ड बँके मधून तपासा जर तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट योग्य वेळेत केला नाहीत तर तुम्हाला 40% पर्यंत व्याज द्यावे लागते जे की खूप जास्त असते त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर अगदी व्यवस्थित आणि लागेल तिथेच करावा काही कंपन्या तुम्ही केलेल्या खरेदी वरती EMI चा पर्यायही देतात त्यामुळे तुम्हाला काही मोठे खर्च असल्यास तुम्ही ते EMI द्वारे क्रेडिट कार्ड मध्ये जमा करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
क्रेडिट कार्ड तुम्हाला पहिल्यांदा पैसे खर्च करण्याची मुभा देते आणि त्यानंतर त्याचा पेमेंट करावा लागतो.
डेबिट कार्ड म्हणजे काय?
डेबिट कार्ड तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्यास मदत करतात जे तुम्ही कुठल्याही एटीएम मधून काढू शकता त्याच बरोबर तुम्ही बँक खात्यातील असलेल्या रकमेवरती डेबिट कार्डच्या माध्यमातून खरीदारी करू शकता
डेबिट म्हणजे काय?
सोप्या भाषेत डेबिट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणे किंवा बँक खात्यातील पैसे खर्च करणे
क्रेडिट म्हणजे काय?
कुठल्याही माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणे म्हणजेच क्रेडिट