क्रेडिट कार्ड विषयी माहिती, Credit Card Information In Marathi, क्रेडिट कार्ड म्हणजे काय? Credit Card in Marathi, Credit Card uses in Marathi
Credit Card Information In Marathi – आधी काही काळापूर्वी आपण अजिबात वापरत नसलेले क्रेडिट कार्ड आता आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात आले आहे. यामुळेच प्रत्येक व्यक्तीला क्रेडिट कार्डबद्दलची माहिती असणे ही काळाची गरज आहे. आज आपण आपल्या या लेखात क्रेडिट कार्डबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ती माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.
अनुक्रमणिका
क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | Credit Card Meaning In Marathi | Credit card mhanje kay in marathi
क्रेडिट कार्ड हे एक डेबिट कार्डप्रमाणेच असून ते एका वित्तीय कंपनीने बनवलेले असते. तुमच्या खात्यात जर सध्या पैसे नसतील, पण तुम्हाला एखादी वस्तू सध्या खरेदी करायची आहे, तर ती तुम्ही क्रेडिट कार्डच्या सहाय्याने सध्या खरेदी करू शकता व महिन्याच्या शेवटी तुम्हाला क्रेडिट कार्डने केलेले सर्व व्यवहारांचे एकत्रित एक बिल देण्यात येईल. क्रेडिट कार्डमुळे व्यवहार करणे हे आजकाल सोपे झाले आहे. फक्त क्रेडिट कार्डला प्रति महिना किती वापर करावा यावर एक मर्यादा ठरवलेली असते, ती मर्यादा व्यवहार करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
उदारणार्थ, जर तुमचा क्रेडिट कार्ड ची लिमिट दर महा १,००,००० रुपये असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला १,००,००० रुपयां पर्यंत वापरू शकता. तुम्ही चालू महिन्यात जेवढे पैसे वापराल त्याचे बिल तुम्हाला महिन्याचा शेवटी मिळेल. साधारणता ४५ दिवसाचा कालावधी बँकांकडून दिला जातो म्हणजे जर तुम्ही चालू महिन्याचा १ ते महिना अखेरीस पर्यंत जो खर्च क्रेडिट कार्ड वर केला आहे त्याचे बिल पुढील महिन्याचा १५ पर्यंत भरण्याची बँक मुभा देते तोपर्यंत बँक कुठले जास्त असे चार्जेस तुमचा बिलात समाविष्ट करत नाही.
क्रेडिट कार्डचा उपयोग काय? | Credit Card Uses In Marathi
- क्रेडिट कार्डने पैसे भरताना मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा
- वारंवार येणारी पेमेंट्स करणे सोपे जाते.
- रिचार्ज किंवा तिकीट बुकिंग करणे सोपे जाते.
- व्याज आकारणी नसल्याने क्रेडिटचा फायदा
- रिवॉर्ड्सचा मिळणारा फायदा
- कॅशबॅक आणि डिस्काउंट
- महिन्याच्या खर्चाचा हिशोब ठेवणे सोपे जाते.
- कॅशपेक्षा क्रेडिट कार्ड ठेवणे जास्त सुरक्षित
- क्रेडिट कार्डचा चांगला उपयोग केल्यास क्रेडिट स्कोर मजबूत होण्यास मदत होते.
- अधिक मिळणारे फायदे जसं की टर्म इन्शुरन्स, अपघाती मृत्यू विमा, इत्यादी.
क्रेडिट कार्ड का गरजेचे आहे? | Why the Credit Card is necessary?
क्रेडिट कार्डशिवाय आर्थिक व्यवहार करणे शक्य आहे. पण एखादं दुसरे क्रेडिट कार्ड तुमच्या खिशात असेल, तर ती एक उत्तम कल्पना आहे. क्रेडिट कार्ड्समुळे तुम्हाला आपतकालीन काळात पैसे उभे करणे सोपे जाते. शिवाय मोठी खरेदी करताना मदत होते आणि फसवणूकीपासून तुमचे संरक्षण होते. जबाबदारीने क्रेडिट कार्ड वापरणे हा एक क्रेडिट जमा करण्याचा उत्तम मार्ग आहे.
क्रेडिट कार्डचा वापर कोणी करावा? | Who should use Credit Card?
- १८ वर्षे पूर्ण असलेली व्यक्ती
- नेहमी उत्पन्नाचे योग्य ते साधन असलेली व्यक्ती
- तुमच्यासोबत सामूहिकरीत्या क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करायला सोबत असलेली एखादी व्यक्ती
- प्रत्येक बँकांनी क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी उत्पन्नाचा पात्रता निकष ठरवलेला असतो.
योग्य क्रेडिट कार्ड कसे निवडावे? | How to select right Credit Card?
क्रेडिट कार्ड निवडताना खालील मुद्दे लक्षात ठेवून क्रेडिट कार्ड ची निवड करावी.
- वार्षिक टक्केवारी दर – जर तुम्ही एखाद्या महिन्यात क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास त्या रक्कमेवर आकारण्यात येणारा हा दर असतो. हा दर प्रत्येक बँकेप्रमाणे बदलतो. ज्या बँकेचा हा दर कमी असेल त्यांचे क्रेडिट कार्ड तुम्ही निवडू शकता.
- कमीत कमी परतफेड – जर तुम्ही दर महिन्याला पेमेंट करत नसाल, तर तुम्हाला कमीत कमी रक्कम भरायला सांगण्यात येते. ती रक्कम साधारणपणे देय रक्कमेच्या ३% एवढी असते.
- वार्षिक शुल्क – काही कार्डसाठी दरवर्षी कार्डचा वापर केल्याबद्दल वार्षिक शुल्क आकारण्यात येते. साधारणपणे ते शुल्क देय रक्कमेमध्ये ऍड करण्यात येते.
- इतर शुल्क – क्रेडिट कार्ड करारामध्ये इतर कोणते शुल्क आकारण्यात येईल ते लिहिलेले असते.
- प्रास्ताविक व्याज दर – हा व्याज दर एका ठराविक वेळेनंतर बदलत असतो. ह्या दराची तुलना इतर बँकांच्या दरासोबत करायला हवी.
- लॉयलटी पॉईंट आणि रिवॉर्ड – एखादे कार्ड तुम्ही किती काळासाठी वापरता त्यावर लॉयलटी पॉईंट वरअवलंबून असतात. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रिवॉर्ड देखील खरेदीच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी क्रेडिट कार्डमुळे मिळत असतात.
- कॅश बॅक – तुम्ही किती खरेदी क्रेडिट कार्डचा वापर करून करता त्यावर हा कॅश बॅक अवलंबून असतो.
क्रेडिट कार्डचे प्रदाता | Credit Card Providers
- HDFC बँक
- SBI कार्ड
- अमेरिकन एक्स्प्रेस
- ICICI बँक
- सिटी बँक
- येस बँक
- स्टँडर्ड चार्टर्ड बँक
- इंडसिंड बँक
- RBL बँक
- अलाहाबाद बँक
- आंध्र बँक
- ऍक्सिस बँक
- बजाज फिनसर्व
- बँक ऑफ बरोडा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- कॉर्पोरेशन बँक
- DCB बँक
- धनलक्ष्मी बँक
- फेडरल बँक
- HSBC बँक
- IDBI बँक
- इंडियन बँक
- जम्मू अँड कश्मिर बँक
- करुर वैश्य
- कोटक महिंद्रा बँक
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- पंजाब नॅशनल बँक
- तमिलनाड मर्कन्टाईल बँक
- टाटा कॅपिटल
- युको बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- विजया बँक
क्रेडिट कार्डसाठी कोण अर्ज करू शकतं? | Who can apply for Credit Card?
ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे आणि जी व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या साधनाचा पुरावा सिद्ध करू शकते अशी व्यक्ती क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकते. एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डसाठी सामूहिकरीत्या देखील अर्ज करू शकते.
क्रेडिट कार्ड कोणत्या प्रकारचे आहेत? | Types of Credit Card
- प्रवासी क्रेडिट कार्ड – या क्रेडिट कार्डने तुम्ही विमानप्रवास, रेल्वेप्रवास किंवा बसप्रवासाच्या तिकिटाचे बुकिंग करू शकता. ते बुकिंग या क्रेडिट कार्डने करताना तुम्हाला वेगवेगळे रिवॉर्ड्स पॉईंट्स मिळत असतात. ज्यांचा लाभ तुम्ही पुढच्या बुकिंगसाठी घेऊ शकता.
- फ्युएल क्रेडिट कार्ड – फ्युएल क्रेडिट कार्डचा वापर फ्युएलवर लागणाऱ्या अधिक सरचार्जवरती सूट मिळवण्यासाठी करण्यात येतो. या कार्डचा वापर करून फ्युएल भरल्यास अधिक रिवॉर्ड्स पॉईंट्स देखील मिळतात व त्यांचा उपयोग तुम्हाला फ्युएलचा खर्च करताना करता येतो.
- रिवॉर्ड क्रेडिट कार्ड – रिवॉर्ड क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही मोठ्या खरेदी करताना करू शकता. मोठी खरेदी केल्यावर तुम्हाला चांगले रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात आणि त्यांचा उपयोग तुम्ही महिन्याची बिल भरण्यासाठी करू शकता.
- शॉपिंग क्रेडिट कार्ड – शॉपिंग क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही पार्टनर स्टोर किंवा पार्टनर ऑनलाइन स्टोरवर शॉपिंग करण्यासाठी करू शकता. यातून जे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, त्याचा उपयोग तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग करताना डिस्काउंट मिळवण्यासाठी होऊ शकतो.
- सिक्युर्ड क्रेडिट कार्ड – फिक्स्ड डिपॉझिट वरती तुम्हाला सिक्युर्ड क्रेडिट कार्ड उपलब्ध होते. यामुळे तुम्हाला आकर्षक व्याजदरात लाभ मिळू शकतो. या प्रकारच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर चांगला करू शकता.
- एंटरटेनमेंट क्रेडिट कार्ड – या कार्डचा उपयोग तुम्ही कोणताही ऑनलाइन सिनेमा बघण्यासाठी किंवा सबस्क्रिप्शन घेण्यासाठी करू शकता. यातून जे रिवॉर्ड पॉईंट्स तुम्हाला मिळतील त्याचा वापर तुम्ही भविष्यात करू शकता.
- शून्य वार्षिक शुल्क क्रेडिट कार्ड – हे असे क्रेडिट कार्ड आहे, ज्यामध्ये वार्षिक शुल्क आकारण्यातयेत नाही आणि ग्राहक या क्रेडिट कार्डचा वापर करून काही रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकतात.
- प्रीमियम क्रेडिट कार्ड – प्रीमियम क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही विमानप्रवासासाठी व्हीआयपी बुकिंग करताना सूट मिळवण्यासाठी करू शकता. शिवाय या क्रेडिट कार्डचा वापर वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करण्यासाठी करून त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
क्रेडिट कार्ड कसे काढावे? (प्रक्रिया) | How to apply for a Credit Card?
- तुम्हाला ज्या बँक किंवा प्रदात्याकडून क्रेडिट कार्ड हवे आहे, त्यांच्या जवळच्या शाखेला भेट देऊन तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
- ज्या बँक किंवा प्रदात्याकडून क्रेडिट कार्ड हवे आहे, त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
- सर्वोत्तम क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही third party वेबसाईटवरून देखील अर्ज करू शकता.
क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Required Documents for getting a Credit Card
- ओळखपत्राचा पुरावा
- निवासी पुरावा
- फोटोग्राफ
- उत्पन्नाचा पुरावा
- आयकर परतावा
क्रेडिट कार्ड कसे काम करते? | How the Credit Card works?
१. अपेक्षित खरेदी करणे
२. व्यवहार दाखवणे
३. माहिती प्रसारित करणे.
४. माहिती अधिकृत करणे.
५. प्रोसेसर आणि व्यापाऱ्याला प्रतिसाद देणे.
६. व्यवहार पूर्ण करणे.
७. बॅच बंद करून जमा करणे.
८. निधी जमा करणे.
क्रेडिट कार्डची मर्यादा किती असते? | Credit Card Limit
क्रेडिट कार्डची मर्यादा ही प्रत्येक कार्डप्रमाणे बदलत असते. तुमच्या उत्पन्नावर हि मर्यादा ठरवली जाते. जर तुम्ही चांगला क्रेडिट स्कोर बनवून ठेवलात आणि तुमचे इनकम वाढले तर बँका ही मर्यादा वाढवतात.
क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट कसे कराल? | How to make the Bill Payment of Credit Card?
तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल पयमेन्ट खालील मार्गांचा अवलंब करून करू शकता.
१. इंटरनेट बँकिंग
२. NEFT/RTGS/ECS पेमेंट्स
३. IMPS
४. बिल डेस्क
५. मोबाइल अँप पेमेंट्स
६. ऑटो डेबिट सेवा
यातील एखाद्या मार्गाचा अवलंब करून तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी लॉगिन करावे. तेथे कार्ड सेक्शनमधील तुमचे नोंदणीकृत क्रेडिट कार्ड निवडावे आणि ‘पे’ या पर्यायावरती क्लिक करावे. रक्कमेबद्दलची माहिती लिहिल्यानंतर ‘Complete Payment’ या पर्यायावरती क्लिक करावे.
क्रेडिट कार्ड व्याज देयके आणि शुल्क | Credit Card Interest Payments and Fees In Marathi
जेवढे महिने तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरणार नाही, तेवढ्या महिन्यांचे व्याज देय रक्कमेसोबत आकारण्यात येते. हा दर वेगवेगळ्या बँकांप्रमाणे बदलत असतो. सरासरी बघता हा दर महिन्याला ३ ते ४ ℅ च्या दरम्यान असतो.
आपले क्रेडिट कार्ड ऑनलाइन संरक्षित करण्याचे मार्ग | How to protect your Credit Card Online?
- तुमचे क्रेडिट कार्ड सुरक्षित ठिकाणी ठेवणे
- तुमचा क्रेडिट कार्ड पिन कोणाशीही शेअर करू नका
- मोबाईल मेसेज अलर्ट आणि तुमचे मासिक क्रेडिट कार्ड स्टेटमेंट काळजीपूर्वक तपासा
- क्रेडिट कार्ड चा विशिष्ट सुरक्षित पासवर्ड तयार करणे.
- संशयास्पद वेबसाइट किंवा ऍप्स वर तुमचे कार्ड वापरणे टाळा.
- सुरक्षित वेबसाइट वरती खरेदी व्यवहार करा.
- तुमचा क्रेडिट कार्ड पिन नियमितपणे बदला.
- संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
- सुरक्षित राहण्यासाठी बँक ऍपचे अपडेटेड व्हर्जन वापरावे.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधील फरक | Credit Card and Debit Card Difference In Marathi
१. रिवॉर्ड पॉईंट – रिवॉर्ड पॉईंट हे डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डमध्ये अधिक मिळतात.
२. EMI पर्याय – EMI चा पर्याय क्रेडिट कार्डसाठी उपलब्ध असतो. तर डेबिट कार्डमध्ये तुम्ही संपूर्ण रक्कम भरण्यासाठी जबाबदार असता.
३. सुरक्षा आणि संरक्षण– क्रेडिट कार्ड हे बाकी मिळणाऱ्या सेवांमुळे सुरक्षित असते. तश्या सेवा डेबिट कार्डसाठी मिळत नाहीत.
४. व्याज शुल्क – क्रेडिट कार्ड बिल न भरल्यास व्याज शुल्क आकारण्यात येते. ही वैशिष्ट्ये डेबिट कार्डमध्ये उपलब्ध नसल्याने तश्या प्रकारच्या व्याजाची आकारणी करण्यात येत नाही.
५. क्रेडिट स्कोर – जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला होतो. तर डेबिट कार्डचा क्रेडिट स्कोरशी काही संबंध नसतो.
क्रेडिट कार्डचे फायदे | Advantages of Credit Card Credit card che fayde in marathi
१. खरेदीची सोय
२. एक चांगली क्रेडिट हिस्टरी तयार करू शकता.
३. क्रेडिट कार्ड खरेदीवर रिवॉर्ड पॉईंट मिळतात.
४. क्रेडिट कार्ड वापरण्यास सोयीस्कर
५. क्रेडिट कार्ड निवडण्यासाठी विविध पर्याय
क्रेडिट कार्डचे तोटे किंवा नुकसान | Disadvantages of Credit Card, Credit card che tote in marathi
१. जर क्रेडिट कार्ड चा वापर योग्य प्रकारे नाही केला तर तुम्हाला त्यातुन कर्जाची शक्यता असते.
२. क्रेडिट कार्ड वर जास्त खरेदी करून तुम्ही आर्थिक भर वाढवू शकता.
३. जर तुम्ही क्रेडिट कार्ड चे बिल योग्य तारखे पर्यंत भरले नाही तर तुम्हाला जास्ती चार्जेस, व्याज आकारले जातात. त्याच बरोबर तुमचा क्रेडिट स्कोर वर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions
सगळ्या क्रेडिट कार्डना वार्षिक किंवा सामील शुल्क लागू होते का?
नाही. सगळ्या क्रेडिट कार्डना वार्षिक शुल्क लागू होत नाही. जर बघायला गेलं तर नवीन कार्ड घेताना सामील शुल्क देखील आकरण्यात येत नाही. क्रेडिट कार्ड घेताना तुम्ही हा एक मुद्दा नक्कीच पाहायला हवा.
क्रेडिट कार्डचा वापर करून मी ATM मधून पैसे काढू शकतो का?
ह्या सेवेला कॅश ऍडव्हान्सच्या रुपात ओळखले जाते. जर क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क लागू होते व त्यावर व्याज देखील आकारण्यात येते.
मी माझ्या क्रेडिट कार्डची लिमिट नंतर वाढवू शकतो का?
कार्ड देणाऱ्या संस्था ह्या क्रेडिट कार्डच्या लिमिटमध्ये अधूनमधून बदल करत असतात. यासाठी साधारणपणे तुमचा मागील पेमेंटचा आणि क्रेडिटचा इतिहास हा पाहण्यात येतो.
निष्कर्ष | Conclusion
क्रेडिट कार्ड हे व्यवहार करण्यासाठी महत्वाचे साधन असून रोख रक्कमेसाठी हा एक उत्तम पर्यायही असू शकतो. परंतु तुम्हाला त्याचा वापर करताना त्यातील जोखीम आणि अनिश्चितता माहीत असणे हे खूप गरजेचे आहे. पूर्ण माहिती घेऊन क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तो फायदेशीर नक्कीच ठरू शकेल.