ऑनलाइन बँकिंग आल्यापसून बँकेचे व्यवहार आता बरेच एका क्लिकवर होतात.पण अजून देखील मोठे व्यवहार करताना,अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना डी.डी वापरला जातो. आजच्या लेखात आपण डी.डी.म्हणजेच डिमांड ड्राफ्ट काय आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय असते ? | Demand Draft Marathi Meaning
डिमांड ड्राफ्ट हे बँकेचे व्यवहार करण्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. डिमांड ड्राफ्ट हा बँकेद्वारे उपलब्ध करून दिलेली एक सुविधा असते. याद्वारे एक व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीकडे पैसे सुरक्षित पाठवू शकतो.डिमांड ड्राफ्ट द्वारे फक्त दोन व्यक्तीमध्येच नव्हे तर संस्था,दोन व्यवसायिक यांच्यामध्ये देवाण- घेवाण केली जाते.डिमांड ड्राफ्ट मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर हा ड्राफ्ट जारी केला आहे,त्या व्यक्तीला तो मिळतो.
डिमांड ड्राफ्टमध्ये सुरक्षितता अधिक असते,त्यामुळे दोन अनोळखी व्यक्ती देखील डिमांड ड्राफ्टद्वारे व्यवहार करतात.डिमांड ड्राफ्ट हा ट्रान्सफर देखील केला जात नाही.म्हणजे काय ज्या व्यक्तीच्या नावावर आहे,तोच हा ड्राफ्ट वापरू शकतो.
डिमांड ड्राफ्टला मराठीमध्ये मागणी धनाकर्ष देखील म्हणतात.डिमांड ड्राफ्ट हा एक महत्वाचा दस्तऐवज समजला जातो.एक संस्था दुसऱ्या संस्थेकडून तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून व्यवहार पूर्ण करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट द्वारे पैशांची मागणी करतो.
व्यापारी वर्गामध्ये डिमांड ड्राफ्ट मोठ्या प्रमाणात वापरला जातो.उदा.दोन अनोळखी व्यापारी आहे,वेगवेगळ्या राज्यांतून एकमेकांना माल पाठवत आहेत.अशा वेळेस रोखीने व्यवहार करणे शक्य नसते.अशा वेळेस माल विकणारा व्यापारी,खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडे डिमांड ड्राफ्टद्वारे व्यवहार पूर्ण करण्याची मागणी करतो. अनेकदा सरकारी कंत्राटदार किंवा खाजगी कंत्राटदार कामाचे टेंडर भरताना बयाण रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट भरतात. काही शाळा आणि महाविद्यालयात किंवा अगदी राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा असतात.आशावेळेस देखील डिमांड ड्राफ्ट द्वारे फी स्वीकारली जाते.
डिमांड ड्राफ्ट आणि चेक यामध्ये नेमका काय फरक आहे | Difference between cheque and Demand Draft in Marathi
चेक आणि डिमांड ड्राफ्ट हे दोन्ही पर्याय देखील पैसे पाठविण्यासाठी वापरले जातात. डिमांड ड्राफ्ट हे एक प्रिपेड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. डिमांड ड्राफ्ट हा फक्त बँकेत मिळतो. चेक मात्र तुम्हाला तुमच्या स्वताजवळ बाळगता येतो.डिमांड ड्राफ्टमध्ये बँकेमध्ये तुम्हाला आधी भरावी लागते.चेकसाठी मात्र तसे नसते. तुमच्या खात्यात पैसे जरी नसले तरी तुम्ही समोरच्या व्यक्तीला चेक देऊ शकता.डिमांड ड्राफ्टसाठी एखाद्या बँकेत तुमचे खाते असावे असे नसते. बँक खाते नसले तरी तुम्ही हवी ती रक्कम बँकेत जमा करून डिमांड ड्राफ्ट काढू शकता.बँकेत जर खाते असेल तरच तुम्हाला चेक देता येतो. डिमांड ड्राफ्ट काढताना तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत,त्या व्यक्तीचे नाव,गाव इतर माहिती भरणे अनिवार्य असते.
चेक देताना समोरच्या व्यक्तीच्या सर्व डिटेल्स असावेत असे काही नसते.पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर पॅन कार्ड नंबरचा उल्लेख करावा लागतो.चेकसाठी मात्र अशी कोणतीही अट नाही. चेक देताना अनेकजण चेकवर समोरच्या व्यक्तीचे नाव लिहीत नाहीत.फक्त रक्कम टाकून चेक देतात. अशावेळेस जर चेक हरवला आणि तो दुसऱ्या व्यक्तीच्या हाती सापडला तर त्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो.डिमांड ड्राफ्टचे मात्र असे नसते. ज्या व्यक्तीच्या नावे डिमांड ड्राफ्ट असतो,त्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा होतात. इतर कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात ते पैसे जमा होत नाहीत.
खात्यात पैसे नसल्यामुळे अनेकदा चेक बाऊन्स देखील होतो.डिमांड ड्राफ्टमध्ये मात्र बाऊन्स होण्याची शक्यता फार कमी असते.डिमांड ड्राफ्ट बाऊन्स होत नाही.कारण पैसे जमा केल्याशिवाय डिमांड ड्राफ्ट निघतच नाही. चेकचा वापर नियमित केला जातो.दररोजचे पेमेंट करण्यासाठी देखील चेक वापरतात, पण डिमांड ड्राफ्ट मात्र विशेष कारणासाठी वापरतात.सरकारी संस्थेत तर डिमांड ड्राफ्टचा वापर विशेष केला जातो.
डिमांड ड्राफ्ट कसं तयार करावा, ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत | Preparing Demand Draft In Marathi
डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो.ऑफलाइन पद्धतीसाठी बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्टचा फॉर्म घ्यावा लागतो.या फॉर्मवर पेमेंट करण्याची पद्धत कोणती आहे.लाभार्थीचे नाव,डिमांड ड्राफ्टसाठी जर तुम्ही रोख रक्कम जमा करणार असाल तर त्यांचे स्थान. चेक जमा करून डिमांड ड्राफ्ट बनवत असाल तर चेक नंबर.तुमचा बँक अकाऊंट नंबर इत्यादी माहिती भरणे गरजेचे असते.जर तुम्ही ५० हजारापेक्षा अधिकचा डिमांड ड्राफ्ट काढत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर यांची देखील माहिती भरावी लागते.
ऑनलाइन डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंग असावे लागते.नेट बँकिंग खात्यावर लॉग इन आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तेथे तुम्हाला पेमेंट आणि ट्रान्सफर यावर क्लिक करा.तेथे तुम्हाला पेमेंट करण्याचे अनेक पर्याय दिसतील.त्यामधील इश्यू अ डिमांड ड्राफ्ट हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही येथून डिमांड ड्राफ्ट काढू शकता.ऑनलाइन तुम्ही जास्तीत जास्त पाच लाखापर्यतचा डिमांड ड्राफ्ट काढू शकता.एकदा का तुम्ही रक्कम सिलेक्ट केली की,ज्या बँक खात्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ती बँक सिलेक्ट करा.त्या नंतर अकाऊंट सिलेक्ट करा.रक्कम त्या खात्यावर भरा.
ऑनलाइन डिमांड ड्राफ्ट काढताना,ज्या व्यक्तीच्या खात्यासाठी ड्राफ्ट काढत आहात,त्याची माहिती नीट भरा.कारण डिमांड ड्राफ्ट त्या व्यक्तीच्या खात्यात थेट जातो.ऑनलाइन तुम्हाला हा ड्राफ्ट का काढत आहात? हे कारण देखील भरावे लागते.गिफ्ट, मदत, डोनेशन की कोणती फी भरत आहत. हे देखील लिहावे लागते.ज्या बँकेतून तुम्ही हा डिमांड ड्राफ्ट काढत आहेत,त्या बँकेचा कोड आणि नाव देखील लिहावे.यानंतर डिमांड ड्राफ्ट कसा पाठवायचा ते देखील सिलेक्ट करा.यामध्ये हँड टू हँड आणि कुरियर असे दोन पर्याय असतात.यामधील एक पर्याय सिलेक्ट करा.सर्व माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा आणि त्या नंतर कन्फर्मवर क्लिक करा.हे सर्व झाल्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येतो तो ओटीपी टाकला की तुमचा डिमांड ड्राफ्ट जारी होतो.
डिमांड ड्राफ्ट कशाप्रकारे काम करतो | How Demand Draft Works in Marathi
डिमांड ड्राफ्ट हा प्रत्येक व्यक्ती वापरू शकतो.एखाद्या व्यक्तीकडे बँक खाते असू किंवा नसो.जर एखाद्या व्यक्तीने योग्य पुरावे सादर केले की त्या व्यक्तीला निश्चित रक्कमेचा पेमेंट ड्राफ्ट करता येतो.तुम्ही बँकेत जाऊन योग्य रीतीन फॉर्म भरून डिमांड ड्राफ्ट काढू शकता.डिमांड ड्राफ्ट हा ऑनलाइन देखील काढता येतो.
डिमांड ड्राफ्ट चे किती प्रकार आहेत | Types of Demand Draft In Marathi
डिमांड ड्राफ्टचे मुख्य दोन प्रकार येतात.
१ ) साईट डिमांड ड्राफ्ट – साईट डिमांड ड्राफ्टसाठी काही कागदपत्रे यांचे व्हेरीफिकेशन केले जाते,त्या नंतर तो ड्राफ्ट मंजूर केला जातो.जर कागद पत्रे योग्य वाटली नाहीतर तुम्हाला तुमची रक्कम मिळत नाही.
२) टाइम डिमांड ड्राफ्ट – म्हणजेच वेळेची मर्यादा असलेला ड्राफ्ट. एका विशिष्ट कालावधीसाठी हा डिमांड ड्राफ्ट बनवला जातो.तो कालावधी उलटून गेला की तो ड्राफ्ट चालत नाही.
डिमांड ड्राफ्ट कॅन्सल करता येतो का? | How To Cancel Demand Draft information in Marathi
डिमांड ड्राफ्ट जेव्हा तुम्ही काढता तेव्हा लगेच तो जारी होत असतो.अशावेळेस डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.डिमांड ड्राफ्ट ऑनलाइन रद्द करता येत नाही.जर ड्राफ्ट तुम्ही रोख रक्कम भरून करून घेतला असेल तर तुम्हाला,तो मूळ डिमांड ड्राफ्ट त्या बरोबरच पावती जमा करावी लागेल.या नंतर बँक १०० ते १५० रुपये इतकी रक्कम वजा करून तुमचा डिमांड ड्राफ्ट रद्द केला जातो.
डिमांड ड्राफ्ट एक्सपायर झाला तर काय करावे ,तो पुन्हा वापरता येतो का? | What To Do If Demand Draft Expires information In Marathi
डिमांड ड्राफ्ट हा तीन महिन्यासाठी चालू शकतो.तीन महिन्यानंतर तो एक्सपायर होतो.जर तीन महिन्यात तुम्ही तो वापरला नाही तर तो चालत नाही.पण ज्यांनी डिमांड ड्राफ्टसाठी पैसे भरले आहेत.ते परत केले जात नाहीत.भुगतान करणाऱ्या व्यक्तीने जर बँकेत पुन्हा संपर्क केला तर तो डिमांड ड्राफ्ट पुन्हा वापरता येतो.