कॅश बॅक म्हणजे काय? | Cashback meaning in Marathi

भारतात मागील पाच वर्षात जे सर्वात मोठे बदल झाले त्यातील एक महत्वाचा बदल म्हणजे,ऑनलाइन शॉपिंग.इंटरनेटच्या २ जी नेटवर्कला सुरुवात झाली आणि खरेदीची व्याख्या बदलून गेली.पूर्वी दुकानात जाऊन पारखून घेणारे भारतीय आता घरबसल्या काही मिनिटांत शॉपिंग करतात.यामध्ये अनेकजण हे स्मार्ट शॉपर असतात.आता तुम्ही म्हणाल स्मार्ट शॉपर हा काय प्रकार? तर ऑनलाइन खरेदी करताना जे अधिका -अधिक पैशांची बचत करतात त्यांना आपण स्मार्ट शॉपर म्हणतो.

ऑनलाइन शॉपिंग जे सतत करतात त्यांच्या तोंडी, डिस्काऊंट कूपन,कॅश बॅक असे शब्द नेहमी आपण ऐकत असतो.आजच्या लेखात आपण कॅश बॅक ही संकल्पना काय आहे. हे जाणून घेणार आहोत.

कॅश बॅक म्हणजे काय? | Cashback meaning in Marathi

कॅश बॅक म्हणजे तुम्ही दिलेले पैसे परत मिळणे म्हणजे कॅश बॅक होय.आपण एखादी वस्तु जेव्हा खरेदी करतो,तेव्हा आपण त्या वस्तूचे मूल्य देत असतो.आपण जे मूल्य म्हणजेच जे पैसे दिले आहेत,त्यातील काही पैसे सूट म्हणून पुन्हा येतात.याला कॅश बॅक म्हणतात.जेव्हा आपण ऑनलाइन पैसे देतो तेव्हा त्यातील काही पैसे पुन्हा येतात याला देखील कॅशबॅक म्हणतात. परदेशांत ही संकल्पना फार जूनी आहे पण आपल्याकडे अलीकडे रुजत आहे.

कॅशबॅक कोण देतात? | Who offers Cashback?

गुगल पे, फोन पे,पेटीएम या बरोबरच काही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कंपन्या देखील कॅश बॅक देतात.काही कंपन्या तुम्हाला थेट पैसे देतात.तर काही कूपन स्वरूपात. प्रत्येक कंपनी आणि त्यांची कॅश बॅक देण्याची पद्धती वेगळी असते.अनेक कंपन्या फक्त त्यांच्या वॉलेटमध्ये कॅश बॅक देतात.अमेझोन, फ्लिपकार्ड,पेटीयम , फ्री चार्ज अशा काही कंपन्या कॅश बॅक देतात.

कॅशबॅक मिळवायचा कसा | How to get cashback

जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असता तेव्हा काही अॅप किंवा वेबसाईट तुम्हाला विशिष्ट खरेदी केल्यानंतर काही ठराविक पैसे परत देतात.यासाठी अनेकदा कॅश बॅक मिळवण्यासाठी तुम्हाला अॅप डाउनलोड करावे लागते.जेव्हा तुम्ही ते अॅप डाऊनलोड करता तेव्हा तुम्हाला तेथून कॅशबॅक मिळते.सिनेमाची तिकिटे,वीजबिल,मोबाइल रीचार्ज केल्यानंतर अनेकदा तुम्हाला कॅश बॅक मिळतो .

कॅशबॅक म्हणजे फायदा का? | Why is cashback a benefit?

अनेकदा कॅशबॅक मुळे उत्तम फायदा होतो. पण कॅशबॅक मिळणे तितके सोप्पे देखील नाही. कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्ही अपडेट असावे लागते.कूपन कोड आणि अनेक प्रकार कॅशबॅकसाठी असतात. कॅशबॅक मध्ये पॉइंट जमा करून किंवा कूपन कोड वापरुन तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. कॅशबॅकच्या विविध ऑफर जाणून घेण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा उत्तम वापर करू शकता.प्रत्येक ब्रॅंड आणि कंपनी यांचे सोशल मीडिया पेजेस असतात. त्यावर ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत ऑफर देत असतात.येथून तुम्हाला अनेक उत्तम कॅशबॅक पर्याय मिळू शकतात. कॅशबॅक मुळे नक्कीच उत्तम फायदा होतो.किमान तुम्ही भरलेला टॅक्स तर तुम्हाला वाचवता येतो.

कंपन्या कॅशबॅक का देतात? | Why do companies offer cashback?

समजा तुम्ही १०० रुपयांची एखादी वस्तु खरेदी केली त्यावर तुम्हाला २० रुपये कॅशबॅक आला तर? तुम्ही अधिक खुश व्हाल.तुम्ही विचार कराल? की यांनी मला २० रुपयांचा कॅश बॅक का दिला आहे? त्यांना कसं काय परवडत.
नवीन ग्राहकांना अधिकाअधिक आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या कॅशबॅक देतात. जेव्हा एखादी कंपनी कॅशबॅक देते तेव्हा त्यांना नवीन ग्राहक मिळतात आणि ग्राहकांना देखील कॅशबॅक मिळते.ग्राहक आणि कंपनी या दोन्हीसाठी कॅशबॅक अतिशय उपयुक्त आहे.

कॅशबॅक आणि डिस्काउंट यामध्ये काही फरक आहे का? Is there any difference between cashback and discount?

  • कॅशबॅक आणि डिस्काउंट या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत.जर एखाद्या वस्तुवर ५० टक्के डिस्काउंट असेल तर ती वस्तु तुम्हाला असलेल्या किंमतीपेक्षा ५० टक्के किंमत करून देते.कॅशबॅकमध्ये मात्र तसे नसते.येथे तुम्ही जेव्हा एखादी वस्तु खरेदी करतो,तेव्हा त्या वस्तूचे पूर्ण पैसे देतो.त्यातून आपल्याला काही रक्कम परत मिळते.ही रक्कम टक्केवारीवर आधारित असते.
  • सध्या आपल्या येथील ऑनलाइनमध्ये आघाडीवर व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या एखादी ठराविक रक्कमेची खरेदी केल्यावर कॅश बॅक देतात.जसे की १०० हजार रुपयांची खरेदी केली की तुम्हाला २०० रुपये कॅशबॅक मिळतात.
  • ऑनलाइन खरेदी करणाऱ्या सर्व वेबसाईट दरवेळेस तुम्हाला कॅशबॅक देतात असे नसते.
  • अनेक कंपन्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मोफत लॉग इन करून देतात आणि त्यांचे नॉटिफिकेशन पाठवत राहतात.पहिल्या खरेदीवर सूट देतात.

कॅशबॅकचे फायदे | Benefits of Cashback in Marathi

  • कॅशबॅक पद्धतीमुळे आपल्याला आपण खर्च केलेले पैसे काही प्रमाणात पुन्हा मिळतात.
  • जेव्हा आपल्याला कॅश बॅक मिळतो तेव्हा ग्राहकासोबत त्या कंपनीला देखील या गोष्टीचा फायदा होतो.
  • कॅशबॅकमुळे लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदी करतात.ऑनलाइन पैशांची देवाण -घेवाण होते. यामुळे सरकारला देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळतो.
  • कॅशबॅक मधून मिळालेले पैसे तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतात.

कोणत्या अॅपद्वारे कॅशबॅक प्राप्त होतो? | Which app earns cashback?

कॅशबॅक हा एक प्रकारचा रिवार्ड प्रोग्राम आहे.ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या ऑनलाइन खरेदीवर काही टक्के मिळवू शकतात. कॅशबॅक पूर्वी फक्त क्रेडिट कार्डसाठी होते.आता मात्र ऑफलाइन आणि ऑनलाइन सर्वजण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे फीचर वापरतात.पेटीयम हे अॅप सर्वाधिक ऑफर आणि कॅशबॅक त्यांच्या ग्राहकांना देतात.यामध्ये रिवार्ड पॉइंट्स किंवा स्क्रॅच मिळतात.जे पेटीयमचे नियमित ग्राहक आहेत.त्यांच्यासाठी विशेष ऑफर आणि कॅशबॅक देखील असतो.जसे की जर तुम्ही पेटीयम द्वारे नियमित लाइट बिल भरत असाल तर तुम्हाला बिलवार काही कॅश बॅक दिला जातो.या बरोबरच अॅमेझोन,पेटीएम,गुगलपे ,फोन पे,फ्री चार्ज,मोबीक्विक,करेड, कॅश करो यासारखे अनेक अॅप मोठ्या प्रमाणात कॅश बॅक देतात.

कॅशबॅक तुम्हाला कोणत्या स्वरूपात मिळतो | Through which form you get cashback.

कॅश बॅक प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्या अॅपवर काही खरेदी करावी लागते. किंवा काही देवाण -घेवाण करावी लागते.त्यानंतर तुम्हाला कॅश बॅक मिळतो.ऑनलाइन शॉपिंग,मोबाइल रीचार्ज,तिकीट बुकिंग,वीज बिल इत्यादी देवाण -घेवाण यावर मोठ्या प्रमाणात तुम्हाला कॅश बॅक मिळतो.गुगल पे द्वारे जर तुम्ही पैसे पाठविले तर तुम्हाला गुगलपे एक कार्ड देते.त्यामध्ये काही वेळेस कॅश बॅक मिळतो.हा कॅशबॅक लगेच तुमच्या खात्यावर जमा होतो.या बरोबरच गुगलपे तुम्हाला विविध ब्रॅंडचे काही सूट असेलेले कुपन्स देखील देतात.हे कूपन तुम्ही खरेदी करताना वापरू शकता. काही अॅप तुम्हाला कॅशबॅक देतात पण तो कॅशबॅक तुम्हाला त्या अॅपवरकच वापरता येतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently asked Questions

कॅशबॅक कधी जमा होतो?

जेव्हा आपण एखादी वस्तु खरेदी करतो तेव्हा त्या वस्तुवर कॅशबॅक जमा होतो.जर वस्तूची किंमत २०० रुपये असेल तर किमान ५० रुपये मिळाला तर आधी तुम्हाला पूर्ण पैसे म्हणजेच २०० रुपये द्यावे लागतात.त्यानंतर तुम्हाला ५० रुपये कॅशबॅक येतो. जर तुम्ही एकावेळेस अनेक वस्तूची खरेदी केली तर,प्रत्येक वस्तूचा कॅशबॅक तुम्हाला वेगवेगळा मिळतो

कॅशबॅक मिळाला आहे हे कसे समजते?

जेव्हा तुम्हाला कॅशबॅक मिळतो तेव्हा त्या वेबसाईटवर नोटिफिकेशन येते की तुम्हाला कॅशबॅक मिळाला आहे.अनेकदा तुम्हाला लिंक देखील मिळते.त्यावर देखील तुम्हाला समजते की कॅशबॅक मिळाला आहे.

कॅशबॅक किती वेळा मिळू शकतो,त्यावर काही लिमिट असतात का?

कॅशबॅक मिळण्यासाठी काही मर्यादा नसतात. पण शक्यतो पहिल्यांदा कॅश बॅक मिळतो.त्या नंतर तुम्हाला कूपन मिळतात. प्रत्येक कॅशबॅक ऑफरवर काही मर्यादा देखील घातलेल्या असतात. जर तुम्ही एखाद्या वस्तूचा कॅश बॅक घेत असाल तर त्यापूर्वी त्यावर असलेले सर्व नियम आणि अटी वाचून घ्या.


शेअर करा

Leave a Comment