RTGS म्हणजे काय ?| RTGS Meaning in Marathi

RTGS Information in Marathi | RTGS विषयी सर्व काही

आपण अनेकदा बँकेत जातो. तेथील व्यवहार करतो, पण अनेकदा आपल्याला त्यातील अनेक गोष्टी बारकाईने जाणून घेत नाहीत. आजच्या लेखात आपण बँकेत अगदी नेहमी वापरत असलेल्या RTGS विषयी जाणून घेणार आहोत.

RTGS म्हणजे काय?

NEFT प्रमाणे RTGS ही भारतातील एक लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आता हे सर्व काम करण्यासाठी वेगळा वेळ काढणे कोणालाही शक्य नाही.तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही कुठेही पेमेंट ट्रान्सफर , बिल भरणे,इतर व्यवहार यासारख्या सुविधा अगदी सहजपणे करू शकता.अशा सुविधा सहजपणे करू शकता.अशा वेगळ्या सुविधा प्रधान करण्यासाठी बँकेकडून आधुनिक सोल्यूशन्स प्रधान केले जात आहेत,त्या पैकी एक म्हणजे RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सुविधेचा समावेश आहे.

पैसे हस्तांतरित करण्याचा किंवा तातत्काळ पाठवण्याचा मार्गामधील हा सुद्धा एक जलद मार्ग आहे.यामुळे पेमेंट प्रक्रिया देखील खूप सोपी आणि सुरक्षित होते.सर्व बँका किंवा त्यांच्या सर्व शाखांमध्ये RTGS सुविधा उपलब्ध नसते.इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे RTGS मध्ये ऑनलाइन निधी हस्तांतरण करता येते.

आजकाल रीयल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रोनिक फंड्स ट्रॉन्सफर म्हणजेच एनईएफटी आणि इमिडेट म्हणजेच आयएमपीएस यासारख्या आधुनिक बँकिंग व्यवस्था उपलब्ध आहेत. या सर्व प्रक्रिया अतिशय सोप्या आणि अतिशय सुलभ आहेत.

RTGS मध्ये पैसे हे वास्तविक आणि वैयक्तिकआधारावर पाठवले जातात.आरटीजीएसच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात एकाच वेळी जास्त पैसे पाठवू शकता.

RTGS चा फूल फॉर्म काय आहे?

Real time gross settlement म्हणजेच रियल टाइम ग्रोस सेटलमेंट किंवा रियल टाइम पेमेंट म्हणजेच रिअल टाइम आणि ग्रोस व्हॅल्यूच्या आधारावर एका बँकेतून दूरऱ्यां बँकेत निधी हस्तांतरित करण्याची सुविधा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या मते रिअल टाइम हा शब्द असे सूचित करतो की ही प्रक्रिया सर्व सुचनांना सोबत प्रोसेस करत असते,म्हणजेच जशी एखाद्या व्यक्तीने पेमेंटसाठी काही रिक्वेस्ट केली की त्या पेमेंटची प्रोसेस तात्काळ सुरू होणार असे नाही की बाकीच्याचे झाल्यावर मग नवीन transaction चा नंबर लागेल. आणि दुसरी व्याख्या ग्रोस सेटलमेंट म्हणजेच फंड्स ट्रान्सफर इन्सट्रक्शन चे सेटलमेंट वैयक्तिकरित्या केले जाते.

RTGS म्हणजे काय | What is RTGS in Marathi

RTGS चे पूर्ण रूप म्हणजेच रिअल टाइम फंड सेटलमेंट आहे,आपण पाहिले RTGS ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.ज्यामध्ये वैयक्तिक किंवा ऑर्डरच्या आधारावर नेटिंग न करता एका खात्यातून दुसऱ्या खात्यात फंड ट्रान्सफर केला जातो.यासाठी तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या सुविधेत तुम्हाला निधी हस्तांतरणांसाठी इतर कोणत्याही बँकेच्या अपरुवल ची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसते.म्हणून कोणत्याही वेटिंग पीरियड शिवाय तुम्ही RTGS द्वारे निधी इतर बँकामध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था आरबीआयने संभाळली आहे. त्यामुळे आरटीजीएद्वारे केलेल्या सर्व सेटलमेंटची नोंद केली जाते.त्यामुळे जलद आणि सुरक्षित फंड ट्रान्सफर सेवा मानली जाते.RTGS द्वारे कमीत कमी व्यवहार मर्यादा निश्चित केली जाते आणि कमाल मर्यादा म्हणजेच जास्तीत जास्त फंड ट्रान्सफर हे बँकांच्या धोरणांवर आधारित आहे.या सर्व व्यतिरिक्त, ही प्रणाली आरबीआयद्वारे राखली जात असल्याने निधीचे सर्व सेटलमेंट त्यांच्या वहीत किंवा रेकॉर्डमध्ये प्रविष्ट केले जातात,ज्यामुळे RTGS देयके अंतिम आणि आपरिवर्तनीय असतात, म्हणजेच ते पुन्हा करता येत नाहीत.एकदा झाले की झाले.

तुम्ही RTGS द्वारे किमान २,००, ००० हस्तांतरित करू शकता आणि कमाल मर्यादा नाही,तुमची बँक शाखा तुमच्यासाठी मर्यादा सेट करेपर्यत तुम्ही तुम्हाला पाहिजे तितका निधी हस्तांतरित करू शकता.त्यामुळे RTGS चा वापर या अधिक पैशाच्या व्यवहारासाठी केला जातो.या व्यतिरिक्त इतर निधी हस्तांतरण पद्धतीपेक्षा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे हे सर्व आंतरबँक हस्तांतरणाच्या सेटमेंट जोखमीना दूर करते आणि ते आरबीआद्वारे चालविले जाते त्यामुळे सुरक्षित आहे.

RTGS Payment कसे करावे | How to make RTGS Payment in Marathi

आपण RTGS चा फूल फॉर्म आणि RTGS म्हणजे काय ? जाणून घेतले आहे,आता आपण RTGS पेमेंट सेवा कशी वापरली जाते हे माहीत करून घेऊ.RTGS द्वारे आपण एका खात्यातून दुसऱ्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सहजपणे हस्तांतरित करू शकतो.हे मुख्यत बिझनेस मध्ये वापरले जाते.जर तुम्हाला RTGS च्या मदतीने पैसे पाठवायचे असतील तर तुमच्यासाठी RTGS कसे करावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे

RTGS करण्याचे तीन मार्ग आहेत

. ऑनलाइन RTGS कसे करावे | How to RTGS Online in Marathi

ऑनलाइन RTGS करण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे.घर बसल्या तुम्ही कोठेही
पैसे RTGS करू शकतात. ऑनलाइन RTGS करण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग आवश्यक आहे,तुम्ही आरटीजीएस करण्यासाठी तुमच्या बँकेत RTGS सक्षम असणे सर्वात महत्वाचे आहे.

ऑनलाइन RTGS करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ज्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे आहेत,त्या व्यक्तीचे खाते तुमच्याशी जोडणे आवश्यक आहे. म्हणजेच ती व्यक्ती प्राप्तकर्ता किंवा लाभार्थी म्हणून जोडलेली असावी.
ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत,त्या व्यक्तीचा अकाऊंट नंबर, बँक शाखा, आयएफसी कोड,
इत्यादी सर्व माहिती लागते. यानंतर ही सर्व माहिती बँकेद्वारे एक दिवसांत तपासली जाते. तपासणी केल्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी जोडला जातो.मग तुम्ही पैसे पाठवू शकता. एकदा ला लाभार्थी म्हणजेच ज्यांच्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत,तो व्यक्ती जोडला गेला की तुम्हाला त्या व्यक्तीला पुन्हा – पुन्हा जोडावे लागत नाही.

जर तुमच्याकडे ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे नाव म्हणजेच बँक खातेधारकाचे नाव,खाते क्रमांक,बँक शाखा आणि आयएफसी कोड नसेल तर तुम्ही पैसे पाठवू शकत नाही.

. Offline RTGS कसे करावे | How to do Offline RTGS in Marathi

ऑफलाइन आरटीजीएस करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागते,यासाठी तुम्हाला खालील
काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँक शाखेत जावा.तुम्हाला तेथे एक स्लिप भरावी लागेल.पैसे जमा करताना
    तुम्ही ज्याप्रमाणे कोणतीही स्लिप भरता त्याच पद्धतीने ही स्लिप भरावी लागते.
  • या स्लिपमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत,त्या व्यक्तीचे बँक खाते नंबर, बँक शाखा
    आणि बँकेचा IFSC कोड भरावा लागेल त्या नंतर बँक हे सर्व डीटेल आरबीआयकडे प्रोसेसिंगसाठी पाठविले
    जातात.
  • आरबीआयकडून एकदा का प्रोसेसिंग झाले की मग तुमच्या अकाऊंट मधून पैसे डेबिट केले जातात आणि
    समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पाठविळे जातात.

. चेकद्वारे RTGS कसे करावे | How to RTGS by Check in Marathi

चेकद्वारे देखील आरटीजीएस करणे अतिशय सोप्पे आहे,यासाठी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे एक
फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्म सोबत तुम्हाला ज्या चेकद्वारे पैसे द्यायचे आहेत. तो चेक त्या फॉर्म सोबत
जोडा.चेकवर आठवणीने सही करा.RTGS ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पाठवण्यासाठी 30 मिनिटे
लागतात.

आरटीजीएस Transaction ची वैशिष्ट्ये | Features of RTGS Transaction

  • यामध्ये रिअलटाइम ऑनलाइन फंड ट्रान्सफर केले जाते.
  • हे प्रमुख्याने उच्च मूल्यांच्या व्यवहारासाठी वापरले जाते.
  • हे अतिशय सुरक्षित आणि सोप्पे आहे.
  • हे खूप विश्वसनीय आहे कारण यामागे आरबीआय आहे.
  • यामध्ये त्वरित क्लिअरिंग होते.

आरटीजीएस व्यवहारासाठी फी किती आणि चार्जस किती | What are the fees and charges for RTGS transactions?

या प्रक्रियेत प्राप्तकर्त्या बँकेला, आरटीजीएस व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.परंतु प्रेषक जे पैसे हस्तांतरित करण्यासाठी काही शुल्क आकारते जे असे काहीतरी आहे.

रक्कम फीस
2.लाख ते रु 5 लाख रु 30 प्रती व्यवहार
5 लाखांच्या वरील रक्कमरु 55 प्रती व्यवहार

RTGS व्यवहार करण्याची वेळ काय असते – What is RTGS Transaction Time?

RTGS तुम्ही बँकेच्या कामकाजाच्या दिवसात बँक उघडल्यावर कधीही करू शकता.

दिवस वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी 9 ते 4.30
शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2

RTGS अतिशय फास्ट आणि कमी खर्चात पैसे पाठविण्याचे माध्यम आहे.RTGS ऑनलाइन करणे तर
अतिशय सोप्पे आहे.

निष्कर्ष

जर तुम्हाला खात्रीशीर पैसे आणि जलद पैसे पाठवायचे असतील तर तुमच्यासाठी आरटीजीएस हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

शेअर करा

Leave a Comment