डाक जीवन विमा मराठी । Postal Life Insurance Marathi
रोजच्या आयुष्यात आपण कायमच आपल्या तब्येतीची काळजी घेत असतो परंतु त्या सोबतच संरक्षण म्हणून आपल्यासोबत विमा पॉलीसी (Insurance Policy) असणे गरजेचे आहे. कारण या धकाधकीच्या जीवनात केव्हा कोणती गोष्टी आपल्या शरीरावर आघात करेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या सोबत विमा संरक्षण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. भारतामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ग्राहकांना विमा प्रदान करत असतात. त्यामध्येच सर्वात महत्वाची विमा कंपनी म्हणजे भारतीय डाक जी भारतीय डाक विभागांतर्गत चालते आणि ग्राहकांना सोयीस्कर असा जीवन विमा प्रदान करते. याच भारतीय डाक विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या जीवन विमा पॉलिसी बद्दल आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
डाक जीवन विमा म्हणजे काय? | What is postal life insurance plan details in marathi
मुख्यत्वे पोस्टल लाइफ इन्शुरन्स किंवा डाक जीवन विमा हा भारतीय डाक विभाग कडून प्रदान करण्यात येतो. हा भारतातील सर्वात जुना लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे जो इंग्रजांच्या पूर्वी म्हणजेच 1884 साली सुरू करण्यात आला होता.
या आर्टिकल मध्ये आपण पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजेच डाक जीवन विमा याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच त्यातील plans आणि features या विषयांच्या बाबतीतही सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
पोस्टल जीवन विमा चे प्रकार | Types of Postal Life Insurance
प्रामुख्याने डाक जीवन विम्याचे दोन प्रकार पडतात त्या प्रकारांबद्दल आपण आता जाणून घेऊया
१) Postal life Insurance
डाक जीवन विमा हा प्रामुख्याने नोकरवर्गासाठी आहे म्हणजेच सामान्यतः तो नोकर वर्गासाठी बनवला गेलेला आहे त्यामध्ये फक्त केंद्र सरकार (Central Government) किंवा राज्य सरकार (State government) मध्ये जे नोकरी करतात त्यांच्यासाठी तसेच इतर कोणत्याही पब्लिक सेक्टर ते काम करणारे नोकरदार यासोबतच डॉक्टर(doctor), इंजिनियर(Engineer), प्रोफेसर(Professor) यांसारखे व्यक्ती डाक जीवन विमा साठी अर्ज(apply) करू शकतात.
२) Rural Life Insurance
जे लोक ग्रामीण भागात राहतात तसेच कोणत्याही प्रकारची नोकरी करत नाही परंतु त्यांना पोस्टाच्या अंतर्गत विमा खरेदी करायचा आहे, अशा लोकांसाठी रुरल लाइफ इन्शुरन्स ही योजना पोस्टने सुरू केलेले आहे.
पोस्टल लाईफ इन्शुरन्स साठी बोनस योजना
पोस्टमार्फत देण्यात येणाऱ्या विमा पॉलिसी सोबतच ग्राहकांना बोनस योजना ही बहाल केली जाते. त्यामध्ये आश्वासित रकमेनुसार ग्राहकांना ठराविक रक्कम बोनस म्हणून प्रदान करण्यात येते, ती बोनस रक्कम ही ही वेगवेगळ्या पॉलिसीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात ठरवून दिली गेली आहे, त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
◆ एन्डोवमेंट पॉलिसी मध्ये ग्राहकांना आश्वासित रकमेच्या प्रत्येक 1000 रुपयांवर 50 रुपये बोनस दर प्रदान केला जातो.
◆ संपूर्ण जीवन विम्यामध्ये विमाधारकाच्या प्रति 1000 रुपयांमध्ये 65 रुपये हे बोनस दर म्हणून प्रदान करण्यात येतात.
◆ परिवर्तनीय संपूर्ण जीवन धोरणे या पॉलिसी मध्ये लागू होणारे दर हे एन्डोवमेंट पॉलिसी नुसार किंवा त्यासारखेच असतात.
◆ अपेक्षित बंदोबस्त हमी मध्ये हे दर विमाधारकाच्या प्रति 1000 रुपयांवर 47 रुपये इतका असतो.
तुम्ही PLI विमा का घ्यावा? | Why should you buy PLI policy?
● डाक डाक जीवन विम्यामध्ये तुम्ही पॉलिसीधारक म्हणून तुमच्या वारस दाराची नियुक्ती करू शकता तसेच त्यामध्ये प्रसंगी बदलही करू शकता.
● एखाद्या वेळी तुम्ही तुमचा प्रीमियम भरण्यास विसरला किंवा यशस्वी झालात तर तुम्ही अशावेळी तुमची पॉलिसी पुन्हा एकदा चालू करू शकता
● पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी किंवा पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने त्यामध्ये दोन अटी ठरवले आहेत त्या खालील प्रमाणे आहेत.
१) जर तुम्ही तुमचा विमा विकत घेतल्यानंतर पहिल्या तीन वर्षांमध्ये प्रीमियम भरण्यात सहा वेळा विसरलात किंवा अयशस्वी झालात तर
२) जर तुम्ही तुमचा विमा खरेदी केल्यापासून पहिल्या तीन वर्षांमध्ये तुमच्या विम्याचा प्रीमियम भरण्यात बारा वेळा यशस्वी झाला तर
● तुमची विम्याची कागदपत्रे जळाली असतील फाटली असतील हरवले असतील किंवा गाळ झाली असती तर तुम्हाला याची पर्वा करावी लागणार नाही कारण तुम्हाला कधीही मूळ विमा कागदपत्रांची प्रत मिळते.
● तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवन विम्याला अतिशय सहजतेने इंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी मध्ये परावर्तित करू शकता
● या विम्याचे प्रीमियम हे सर्वसामान्य परवडणारे आहेत
● त्यासोबतच तुम्हाला डाक विभागामार्फत आकर्षक बोनस प्रदान केले जातात
पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी असणारे फॉर्म
◆ ग्रामीण पोस्टल जीवन विमा
◆ बाल प्रस्ताव फॉर्म
◆ RPLI वैद्यकीय फॉर्म
◆ एंडामेंट इन्शुरन्स फॉर्म
◆ संपूर्ण जीवन विमा
◆ कर्ज लागू फॉर्म
◆ परिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा
◆ लॅप्स पॉलिसी च्या पुनरूज्जीवन करण्यासाठी फॉर्म
◆ दावे फॉर्म
◆ नुकसानभरपाई चा वैयक्तिक बॉण्ड
◆ मॅच्युरिटी क्लेम फॉर्म
पोस्टल लाईफ इन्शुरन्स साठी apply कसे करावे | How to apply for postal life insurance?
आपण तीन प्रकारांमध्ये आपला डाक जीवन विमा खरेदी करू शकता, ते खालील प्रमाणे:
1. डाक जीवन विमा खरेदी करण्यासाठी तुम्ही प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.
2. आपण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे डिजिटल आवृत्ती देखील अधिकृत वेबसाईटवर जाऊन मिळवू शकता त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरून डीजी लॉकर (Digi locker) डाऊनलोड करावे लागेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड वापरून लॉगिन करावे लागेल व त्यानंतर तिचे तुमचा पॉलिसी क्रमांक, नाव तसेच जन्म तिथीचा तपशील भरावा लागेल एवढे सगळे झाल्यानंतर ELPI बॉण्ड डाउनलोड करून आपली डिजिटल आवृत्ती मिळवू शकता.
3. तसेच पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्लॅन मिळवण्यासाठी तुम्ही ( India Post) इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज करू शकता.
डाक जीवन विमा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Postal Life Insurance in Marathi
डाक जीवन विमा खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असतात ते आपण पाहूया.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रीमियमची गणना कशी करावी?
तुम्ही कोणताही प्रीमियम कॅल्क्युलेटर चा आधार घेऊन त्यामध्ये तुमचा वैध डेटा भरल्यास तुम्हाला तुमच्या प्रीमियमची गणना करता येऊ शकते. तसेच प्रीमियम कॅल्क्युलेटर चा वापर केल्यास तुम्ही तुमच्या आदर्श गुंतवणुकीच्या तुलनेत तुमची एकूण प्रेम रक्कम अतिशय सहजतेने शोधू शकता. त्यामुळे तुमची गुंतवणूक आणि तुमची प्रीमियम रक्कम वेळेमुळे प्रभावित होण्यास मदत होईल. तुम्ही जेव्हा पॉलिसी खरेदी करत असता तेव्हा तुमचे वय, पॉलिसी चा प्रकार, जन्मतारीख, जोडीदाराची जन्मतारीख तसेच विम्याची रक्कम यांसारखे सर्व तपशील भरावे लागते तसेच प्रत्येकाच्या विमा पॉलिसीच्या आधारे सर्वांचे तपशील वेगळी असू शकतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently asked Questions
पीएलआय नेमकं कोण खरेदी करू शकतो?
प्रामुख्याने जो व्यक्ती सरकारी नोकर आहे तो पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजेच डाक जीवन विमा खरेदी करू शकतो.
पी एल आय विमा पॉलिसीची हमी कोण घेते?
पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीची हमी स्वतः भारत सरकार घेत असते
पी एल आय विमा मी निवृत्तीनंतर सुद्धा सुरू ठेवू शकतो का?
होय तुम्ही तुमच्या प्रीमियमची रक्कम नियमितपणे भरत असाल तर निवृत्तीनंतरही तुम्ही पोस्टल लाइफ इन्शुरन्स सुरू ठेवू शकता.
निष्कर्ष | Conclusion
Postal Life Insurance Information In Marathi या आर्टिकल मध्ये आपण डाक जीवन विमा पॉलिसी बद्दल सर्व काही जाणून घेतले. त्यामध्ये यासाठी अप्लाय कसे करायचे तसेच त्याचे प्रकार आणि अप्लाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणते कागदपत्रे लागतात याबद्दल आपण या लेखांमधून जाणून घेतले.
जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर ब्लॉगला नवनवीन माहितीसाठी पुन्हा भेट द्या. तसेच तुम्हाला याबद्दल कसल्याही माहितीची गरज असेल किंवा शंका वाटत असेल, तर तुम्ही कमेंट करून तुमच्या शंका विचारू शकता आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.
धन्यवाद…!