म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual Fund Information In Marathi

म्युचल फंड काय आहे, म्युचल फंड मराठी माहिती (Mutual Fund Information In Marathi / Mutual funds marathi mahiti), mutual fund mhanje kay in marathi, म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी, म्युच्युअल फंड फायदे मराठी, म्युच्युअल फंडाचे प्रकार

Mutual Fund Information In Marathi – अजूनही म्युच्युअल फंड संदर्भात बऱ्याचश्या लोकांच्या मनात संभ्रम आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे हे गरजेचे आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल माहिती हवी असल्यास हा लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका. म्युच्युअल फंडबद्दल जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.

अनुक्रमणिका

म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Mutual Funds Meaning In Marathi

म्युच्युअल फंड हे एक आर्थिक गुंतवणुकीचे साधन आहे. म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी मोठी रक्कम जमा होते, त्या रक्कमेची एकत्रितपणे स्टॉक, बॉण्ड्स, सिक्युरिटीज आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. म्युच्युअल फंड कंपन्या ह्या आर्थिक व्यवस्थापकाद्वारे चालवण्यात येतात. म्युच्युअल फंड कंपन्यांचे व्यवस्थापक विविध कंपन्यात गुंतवणूक करून त्यांच्या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भांडवली नफा किंवा उपन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.

म्युच्युअल फंडाचे प्रकार | Types of Mutual Funds In Marathi

म्युच्युअल फंडाचे प्रकार हे दोन आधारावरती असतात. एक म्हणजे मालमत्तेच्या (Assets) आधारावर आणि दुसरं म्हणजे संरचनेच्या (Structure) आधारावर.

१. मालमत्तेच्या आधारावर

यामध्ये एकूण चार प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे-

१. इक्विटी म्युच्युअल फंड – या प्रकारात जास्त प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. जर तुम्हाला तुमच्या पैशांची चांगला नफा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक व्हावी असे वाटत असल्यास या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. या प्रकाराचे देखील सहा प्रकार आहेत.

  • लार्ज कॅप फंड – कॅपचा अर्थ कॅपिटल असा आहे. त्या कंपनीचा मार्केटमधील आकार आणि मूल्य हे जास्त असते. ह्या कंपन्या परतावा कमी प्रमाणात देत असल्या तरी यांच्याकडून येणारे उत्पन्न हे नियमित असते व त्यामुळे यामध्ये संभाव्य धोका हा कमी प्रमाणात असतो. 
  • मिड कॅप फंड – या कंपनीचा मार्केटमधील आकार आणि मूल्य हे मध्यम स्वरूपाचे असते. त्यामुळे या कंपन्यांकडून येणारा परतावा देखील मध्यम स्वरूपाचा असतो. या कारणामुळे संभाव्य धोका देखील मध्यम स्वरूपाचा असतो. 
  • स्मॉल कॅप फंड – या प्रकारच्या कंपन्या ह्या मार्केटमध्ये नवीन असून स्थिरावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्या कंपन्यांच्या फंडला स्मॉल कॅप फंड असे म्हटले जाते. यामध्ये सर्वाधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता असली तरी देखील सर्वाधिक संभाव्य धोकादेखील याच प्रकारात असतो. 
  • मल्टी कॅप फंड – या फंडमधील कंपन्या या लार्ज, मिड, स्मॉल कॅप फंड असलेल्या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. या प्रकारात संभाव्य धोका हा मध्यम स्वरूपाचा असतो. बरेच लोक इतर फंडपेक्षा या प्रकाराला जास्त पसंती दर्शवताना दिसतात.
  • फ्लेक्सी कॅप फंड – हा प्रकार मल्टी कॅप फंडच्या आधारावरच काढला गेला आहे. या प्रकारात त्याच्या नावाप्रमाणेच हवे ते फंड निवडण्याचे स्वातंत्र्य असते. या प्रकारातील ६५% हिस्सा हा इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये ठेवला जातो. 
  • ELSS म्युच्युअल फंड – ELSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम. या प्रकारातील म्युच्युअल फंड हे इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असतात. शिवाय या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने त्याचा तुमचा आयकर परतावा भरताना सेक्शन ८०C च्या अंतर्गत फायदा होतो.

२. डेब्ट म्युच्युअल फंड – या प्रकारातले म्युच्युअल फंड हे सरकारी हमीपत्र (Government Securities), बंधपत्रे आणि कर्जरोखे (Bonds And Debentures) यामध्ये गुंतवणूक करत असतात. ज्या गुंतवणूकदारांना सरकारी हमीपत्र, बंधपत्रे आणि कर्जरोखे यामध्ये गुंतवणूक करायची असेल, ते या प्रकाराला पसंती देताना दिसतात. या प्रकारात संभाव्य धोका आणि परतावा हा दोन्ही कमी प्रमाणात असतो.

३. लिक्विड फंड – या फंडमध्ये नावाप्रमाणेच लिक्विडीटी असते. गुंतवणूकदार हवं तेव्हा त्याने केलेली गुंतवणूक काढू शकतो. सगळ्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यावर अवघ्या २४ तासात गुंतवणूकदाराचे पैसे त्याच्या खात्यामध्ये जमा होतात. या प्रकारात कमीत कमी ३ दिवसांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे फंड ज्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात त्यांचा परिपक्वतेचा कालावधी हा किमान ९१ दिवसांचा असतो. यामध्ये असलेला संभाव्य धोका आणि परतावा हा दोन्ही कमी प्रमाणात असतो.

. हायब्रीड म्युच्युअल फंड – या प्रकारातील म्युच्युअल फंड हे इक्विटी म्युच्युअल फंड आणि डेब्ट म्युच्युअल फंड जेथे गुंतवणूक करतात त्या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करत असतात. जर एखाद्याला स्टॉक मार्केट आणि सरकारी बंधपत्रे अश्या दोन्हीमध्ये गुंतवणूक करायची असल्यास हा एक चांगला पर्याय असू शकतो. या म्युच्युअल फंडाचे देखील ५ प्रकार आहेत. ते म्हणजे इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंड, डेब्ट ओरिएंटेड हायब्रीड फंड, बॅलन्स म्युच्युअल फंड, मंथली इन्कम प्लॅन, आर्बिट्रेज म्युच्युअल फंड, इत्यादी.

२. संरचनेच्या आधारावर

या प्रकारात एकूण ५ प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे-

१. ओपन एंडेड म्युच्युअल फंड – या प्रकारातील म्युच्युअल फंड हे नावाप्रमाणेच ओपन असतात. या प्रकारामधील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदार कधीही पैसे गुंतवू शकतात किंवा कधीही पैसे काढू शकतात. गुंतवणूकदार यामधून ठराविक मुदतीच्या आधी बाहेर पडू नये म्हणून Exit Load च्या स्वरूपात काही शुल्क आकारले जाते. बाजारामधील उपलब्ध असलेले बरेचसे फंड हे या प्रकारातील असतात.

२. क्लोस एंडेड म्युच्युअल फंड – या प्रकारात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार हवं तेव्हा एन्ट्री किंवा एक्झिट नाही करू शकतं. गुंतवणूकदार यामधून ठराविक कालावधीनंतरच बाहेर पडू शकतो. तोपर्यंत तो यातून आपले पैसे काढूही शकत नाही आणि अजून गुंतवणूक देखील करू शकत नाही.

३. इंटर्व्हल म्युच्युअल फंड – या प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदार ठराविक वेळेतच गुंतवणूक करू शकतो. ही ठराविक वेळ म्युच्युअल फंड कंपन्याचं ठरवत असतात. 

४. इंडेक्स फंड – या प्रकारातील म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांच्या पैशांची थेट स्टॉक मार्केटच्या इंडेक्समध्येच गुंतवणूक करत असतात. जसे की BSE (Bombay Stock Exchange) चे सेन्सेक्स, NSE (National Stock Exchange) चे निफ्टी, बँक निफ्टी, इत्यादी. यामध्ये मोठी योजना आखावी लागत नसल्यामुळे या फंडसाठी लागणारा खर्च हा कमी असतो. 

५. सेक्टर फंड – हे म्युच्युअल फंडदेखील इंडेक्स फंड प्रमाणेच काम करतात. फक्त या प्रकारात इंडेक्समध्ये गुंतवणूक न करता सध्या जे क्षेत्र चांगली कामगिरी दाखवत आहे किंवा ज्या क्षेत्रात सध्या गुंतवणूक केल्याने चांगला नफा मिळेल, जस की, बँकिंग, आयटी, फार्मा, इत्यादी, त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येते.

म्युच्युअल फंड कसा निवडावा? | How to choose Mutual Funds?

म्युच्युअल फंड निवडताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

१. म्युच्युअल फंडचे लक्ष्य आणि त्यामध्ये असलेला संभाव्य धोका

२. म्युच्युअल फंड स्टाइल आणि प्रकार

३. एकूण शुल्क आकारणी

४. निष्क्रिय विरुद्ध सक्रिय व्यवस्थापन

५. फंड व्यवस्थापकाची माहिती आणि आधीच्या काळातील निकाल

६. फंडचा आकार

७. इतिहासाची नेहमीच पुनरावृत्ती होत नसते हे लक्षात ठेवणे.

८. अपेक्षेप्रमाणे निवड करणे.

म्युच्युअल फंड कसे कार्य करते? | How Mutual Fund works?

म्युच्युअल फंड ही गुंतवणूक स्वीकारणारी आणि रिअल कंपनी अशी दोन्ही असते. जेव्हा एखादा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो तेव्हा तो अप्रत्यक्षपणे त्या कंपनीच्या मालमत्तेपैकी एक भाग खरेदी करत असतो. म्युच्युअल फंड कंपनी ही गुंतवणूकीसाठी ओळखली जाते.

म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | How to invest in Mutual Funds Information in Marathi

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक तुम्ही खालीलप्रकारे करू शकतात.

१. तुम्ही ऑफलाइन गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या जवळच्या शाखेला भेट देऊन करू शकतात. त्यांनी दिलेला फॉर्म भरून शिवाय सांगितलेली कागदपत्रे त्यासोबत जोडून फॉर्म त्यांच्या शाखेमध्ये जमा करावा.

२. ब्रोकरच्या मार्फत देखील तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ऑफलाइन गुंतवणूक करू शकतात. ब्रोकर तुम्हाला कोणता म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगला आहे याची माहिती देईल. त्या बदल्यात तो तुम्हाला ठराविक शुल्क आकारेल.

३. तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक करू शकता. 

४. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या ऍप्लिकेशनचा वापर करुनदेखील तुम्ही म्युच्युअल फंडची खरेदी किंवा विक्री करू शकता.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धती

म्युच्युअल फंड मध्ये आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो.

१ .सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) – या प्रकारामध्ये एक ठराविक ठराविक रक्कम आपण दर आठवडा, दर महिना किंवा दर तीन महिने अशा पर्यायातून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो . जर तुम्ही पगारातून मधून एक ठराविक रक्कम गुंतवता तर दर महिन्याचा पर्याय निवडू शकता.

लंप सम (Lump Sum) – या प्रकारामध्ये एक एकत्रित रक्कम म्युच्युअल फंड मधे गुंतवू शकतो. जर तुम्हाला एकदम रक्कम गुंतवायची असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता.

म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधील फरक

शेअर मार्केट मध्ये तुम्ही थेट एखाद्या कंपनी चे शेअर विकत घेता , तेच म्युच्युअल फंड चा बाबतीत आपण ते पैसे म्युच्युअल फंड कंपनी ला गुंतवायला देतो. म्युच्युअल फंड कंपनी ते पैसे वेग वेगळ्या कंपनी गुंतवतात जेणेकरून तुम्हाला शेअर निवडताना जो अभ्यास करावा लागतो तो म्युच्युअल फंड स्वतः करून पैसे गुंतवते. तुम्हाला जर स्वतःला थेट शेअर मध्ये गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड मधून गुंतवणूक करू शकता.

म्युच्युअल फंडचा परतावा | Returns from Mutual Funds

म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा हा सिक्युरिटीजच्या किंमतीवरती अवलंबून असतो. जर फंडाच्या किंमतीत वाढलेल्या सिक्युरिटीज विकल्या गेल्या तर त्या फंडातून होणाऱ्या नफ्याला भांडवली नफा असे म्हणतात. म्युच्युअल फंडमधल्या या गुंतवणूकदारांच्या पैशांमधून घेतलेल्या सिक्युरिटीजची वेळच्यावेळी खरेदीविक्री करण्याचे व्यवस्थापन हे फंड व्यवस्थापकाकडून केले जाते. या फंड व्यवस्थापकाची नियुक्ती ही संचालक मंडळाद्वारे केली जाते. फंडाच्या NAV ची गणना करण्यासाठी फंड अकाऊंटंट कर्मचारी ठेवले जातात, जे स्टॉकच्या दैनिक मूल्यावरती लक्ष ठेवून असतात. म्युच्युअल फंडांना सरकारी नियम पाळण्यासाठी एक अनुपालन अधिकारी आणि वकिलाची आवश्यकता असते. बहुतेक म्युच्युअल फंड हे मोठ्या गुंतवणुकीच्या कंपनीचे भाग असतात.

म्युच्युअल फंडमध्ये संभाव्य धोका काय आहे? | Risk factor in Mutual Funds

म्युच्युअल फंडमध्ये असणारा संभाव्य धोका हा क्रेडिट, व्यावसायिक, बाजार, किंमत, लिक्विडीटी या सगळ्याशी संबंधित असतो. कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा व्यवस्थित अभ्यास केला तर हा संभाव्य धोका कमी करण्यास मदत होते.

म्युच्युअल फंडचे फायदे | Advantages of Mutual Funds

१. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला गुंतवणूक करताना सिक्युरिटीज मध्ये विविधता मिळते.

२. परदेशी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असल्याने परदेशी बाजारात आपला सुलभ प्रवेश होऊ शकतो.

३. म्युच्युअल फंडमुळे आर्थिक बचत होण्यास मदत होते.

म्युच्युअल फंडाचे तोटे | Disadvantages of Mutual Funds

१. म्युच्युअल फंडचा विमा नसल्यामुळे चढउतार परतावा हा एक यामधील तोटा आहे. 

२. म्युच्युअल फंडमधील कोणत्याही रोखीसमोर उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्या रोख रक्कमेला ‘कॅश ड्रॅग’ असे म्हटले जाते.

३. म्युच्युअल फंडमध्ये इतर खर्चावर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लक्ष न दिल्यास तुम्हाला भरावा लागणारा यासाठीचा दर हा वाढत जातो.

निष्कर्ष | Conclusion

म्युच्युअल फंड हे लाभदायक तेव्हाच ठरते जेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यामध्ये गुंतवणूक करता. म्हणूनच कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना त्या संबंधित सगळ्या कागदपत्रांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. तुम्हाला वरील दिलेली सर्व माहिती समजली असेल अशी आशा करतो. Mutual Fund Information In Marathi या विषया वर काही प्रश्न असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions (FAQs)

पगारातून किती टक्के रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी?

एखाद्या व्यक्तीने त्याच्या पगाराच्या २०% रक्कम ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी. भविष्यात जेव्हा शक्य होईल तेव्हा ह्या रक्कमेत वाढ करत जावी. गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी घेऊन पैसे गुंतवावे.

ELSS म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचे काय फायदे आहेत?

ELSS म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमचा आयकर परतावा भरताना सेक्शन ८०C च्या अंतर्गत Deduction मिळते. शिवाय या फंडमधून मिळणाऱ्या Dividend किंवा भांडवली नफ्यावर कर आकारण्यात येत नाही.

म्युच्युअल फंड घ्यावा की शेअर्स?

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन असाल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला नसेल, तर त्यातून होणारे नुकसान हे जास्त असते.

इंडेक्स फंड म्हणजे काय?

इंडेक्स फंड या प्रकारामध्ये असणारे म्युच्युअल फंड हे थेट तुमच्या पैशांची गुंतवणूक ही स्टॉक मार्केटच्या इंडेक्समध्येच करतात. जस की, BSE चे सेन्सेक्स, NSE चे निफ्टी, बँक निफ्टी, इत्यादी. यामध्ये योजनेसाठी लागणारा खर्च कमी असतो. शिवाय संभाव्य धोका देखील कमी असतो.

म्युच्युअल फंड मध्ये कमीत कमी किती पैसे गुंतवू शकतो?

बरेच म्युच्युअल फंड schemes कमीत कमी ५०० रुपयांपासून गुंतवण्याचा पर्याय देतात. तुम्ही आपल्याला शक्य होईल त्या प्रमाणे पैसे गुंतवू शकता.

SIP म्हणजे काय? ते म्युच्युअल फंडशी कसे संबंधित आहे?

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही सेवा म्युच्युअल फंड कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना पुरवण्यात येते. SIP ही सेवा गुंतवणूकदारांना ठराविक रक्कम ठरलेल्या खंडित कालावधीमध्ये त्यांनी निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये भरण्यास परवानगी देते.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का? जास्त नफा किती वर्षांनी मिळेल?

प्रत्येक गुंतवणूकीमध्ये संभाव्य धोका हा असतोच. पण इतर स्टॉकच्या तुलनेत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते. कारण ते विविध कंपन्याचे स्टॉक एका गुंतवणूकीमध्ये करतात. ते स्टॉकमध्ये देखील गुंतवणूकदारांना विविधता पुरवतात. तुम्ही ज्या आर्थिक लक्ष्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहात, ते लक्ष साध्य झाल्यावर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक तुम्ही काढून घेऊ शकता.

शेअर करा