मॉर्गेज लोन म्हणजे काय? | Mortgage Loan Information In Marathi

मॉर्गेज लोन म्हणजे काय? Mortgage Loan In Marathi, मॉर्गेज लोनचे फायदे, मॉर्गेज लोनचे प्रकार, मॉर्गेज लोन पात्रता, मॉर्गेज लोन कसे मिळवायचे

Mortgage Loan Information In Marathi | मॉर्गेज लोन माहिती मराठीत
लोनचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे मॉर्गेज लोन. आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण मॉर्गेज लोनबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखामध्ये आपण खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.

अनुक्रमणिका

मॉर्गेज लोन म्हणजे काय? – Mortgage Loan Meaning in Marathi

मॉर्गेज लोन म्हणजे अगदी सहजसोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्वतःच्या मालकीची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून त्यासमोर कर्ज घेणे. त्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्या मालमत्तेची सगळी कागदपत्रे ही बँकेकडे जमा राहतात. बँकेने दिलेल्या कर्जाची योग्य वेळेत परतफेड न केल्यास किंवा कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यास नकार दिल्यास बँकेला त्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा अधिकार असतो. त्या मालमत्तेवर जप्ती आणून शिल्लक राहिलेले कर्ज बँक वसूल करून घेऊ शकते.

मॉर्गेज लोनची वैशिष्ट्ये – Features of Mortgage Loan

१. मॉर्गेज लोनमध्ये जो व्याजदर आकारला जातो तो बाकी लोन्सच्या तुलनेत खूप कमी असतो.

२. तुम्ही व्याजदराच्या अनेक पर्यायांमधून एक प्रकार निवडू शकतात. ते पर्याय म्हणजे Floating व्याजदर, Fixed व्याजदर, व्याजदर-फक्त मॉर्गेज आणि Payment Option ARMs, रजिस्ट्री मॉर्गेज लोन, Condition Sale Mortgage Loan, Usufructuary Mortgage, इत्यादी.

३. मॉर्गेज लोन हा एक गृहकर्ज मिळवण्याचा सोपा पर्याय आहे. तुमच्या कर्जाची परतफेड झाल्यावर तुम्हाला त्या घराचा मालकी हक्क देखील मिळू शकतो.

४. मॉर्गेज लोनचे कर्ज ते किंमत यामधले प्रमाण हे सर्वसाधारणपणे ६० ते ७०% एवढे आहे.

५. कर्ज देणारे मॉर्गेज लोन हे त्या मालमतेची मार्केटमधील किंमत किंवा त्या मालमत्तेची नोंदवलेली किंमत यापैकी जी लहान असेल त्यावर देतात.

६. तुम्ही मॉर्गेज लोन हे अनेक प्रकारच्या मालमत्तेवर घेऊ शकतात. जसं की बांधकामाधीन जागा, बांधकाम पूर्ण झालेली जागा, स्वतःच्या मालकीची निवासी किंवा व्यावसायिक जागा, इत्यादी. फक्त ज्या जागेवर तुम्ही कर्ज घेत आहात त्या जागेचा मालकी हक्क कायद्याने आणि कागदपत्रांनुसार तुमच्याकडे पाहिजे आणि त्या जागेच्या बाबतीत कायदेशीररित्या कोणत्याही तक्रारी किंवा कोर्ट केस चालू नसली पाहिजे.

७. मॉर्गेज लोन हे जास्त कालावधीसाठी उपलब्ध असते. 

८. बाकी लोन्सच्या तुलनेत जागेवरती जास्त रक्कमेचे मॉर्गेज लोन मिळू शकते.

९. जागेची निवड ही अट मॉर्गेज लोनमध्ये नाही आहे. जागेची निवड करण्याआधी देखील तुम्हाला मॉर्गेज लोन हे मिळू शकते.

१०. तुम्ही कर्जाची रक्कम तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक गरजांसाठी वापरू शकता.

११. जर तुम्ही स्वयंरोजगार असाल तर तुमच्या योग्यता आणि पात्रतेप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतात.

मॉर्गेज लोनचे प्रकार – Types of Mortgage Loan

१. Fixed मॉर्गेज लोन व्याजदर– या प्रकारामध्ये तुमचा कर्जावर भरावयाचा व्याजदर हा परतफेडीचा कालावधी संपेपर्यंत सारखाच असतो. याउलट जर तुम्ही Linear पेमेंटचा पर्याय निवडला तर दरमहा हफ्ता हा कमी कमी होत जातो. 

२. Adjustable व्याजदर मॉर्गेज– या मॉर्गेज लोनच्या प्रकारात व्याजदर हा सारखा बदलत असतो. काही कालावधीसाठी हा व्याजदर सारखा असतो पण काही कालावधीनंतर त्या व्याजदरात बदल होतो. व्याजदरामधील बदल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बदलत्या धोरणांवरती अवलंबून असतो.

३. व्याजदर- फक्त मॉर्गेज– या प्रकारामध्ये मॉर्गेज लोनवर आकारला जाणारा शिवाय ठरवलेला असा व्याजदर फक्त ठरलेल्या कालावधीमध्ये बँकेकडे भरला जातो. या लोनचा ठरलेला कालावधी संपल्यानंतर शेवटी मुद्दलाचे पैसे बँकेकडे जमा केले जातात.

४. रजिस्ट्री मॉर्गेज लोन– या प्रकारामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एक agreement बनवण्यात येते व त्याची कायदेशीररित्या रजिस्ट्रीमध्ये नोंद करण्यात येते. जर तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड योग्य त्या कालावधीमध्ये पूर्ण केलीत तर तुम्हाला तुमची मालमत्ता तुमच्या मालकी हक्कासह परत करण्यात येते. 

५. कंडिशन सेल मॉर्गेज लोन– या प्रकारामध्ये कर्ज परतफेडीची एक तारीख ठरवली जाते आणि त्या वेळात जर कर्जाची परतफेड झाली नाही तर बँकेकडे ती मालमत्ता विकण्याचा अधिकार असतो. या प्रकारामध्ये कर्ज देतानाच ही अट कर्जदाराला सांगितली जाते.

६.Usufructuary Mortgage– या प्रकारामध्ये जी मालमत्ता मॉर्गेज करायची आहे त्याचा मालकी हक्क हा ज्याच्याकडून आपण कर्ज घेत आहोत त्याला दिला जात नाही. तर या प्रकारामध्ये कर्जदार त्याची जागा ज्यांना भाड्याने देत आहे, ते भाडे त्याच्या ऐवजी ज्या व्यक्तीकडून त्याने कर्ज घेतले आहे त्याला द्यायला सांगितले जाते.

मॉर्गेज लोन प्राप्त करण्यासाठी लागणारी पात्रता – Eligibility for the Mortgage Loan

१. नोकरी करणाऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्न हे ४००००/- रुपये असावे लागते तर स्वयंरोजगार असणाऱ्यांसाठी वार्षिक उत्पन्न हे ३०००००/- असावे लागते. 

२. कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ६५ वर्षाची व्यक्ती मॉर्गेज लोनसाठी पात्र आहे.

३. नोकरी करणारी आणि स्वयंरोजगार असणारी व्यक्ती मॉर्गेज लोनसाठी पात्र आहे.

४. मॉर्गेज लोन घेताना तुमच्याकडे तुमचा मालकी हक्क असलेली मालमत्ता आणि त्याची योग्य ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

मॉर्गेज लोन कोणत्या केसेस मध्ये मिळते ? – Mortgage Loan will be available in which type of cases?

१.तुमच्याकडे तुमची स्वमालकीची मालमत्ता आणि त्याची योग्य ती कागदपत्रे असायला हवी.

२.योग्य त्या वयोमर्यादा व उत्पन्नाच्या अटींमध्ये तुम्ही पात्र असायला हवे.

३.तुमची कर्जपरतफेडीची देखील योग्य ती पात्रता असायला हवी.

मॉर्गेज लोन कसे मिळवायचे ? – How to get Mortgage Loan?

तुमची स्वतःची योग्य ती कागदपत्रे शिवाय मालमत्तेची कागदपत्रे, योग्य ती स्वतःबद्दलची माहिती बँकेसोबत अर्जाच्या स्वरूपात जमा करावी. त्याची योग्य ती शहानिशा बँकेकडून झाल्यावर बँक तुम्हाला ठरलेल्या कालावधीसाठी ठरलेल्या रकमेचे कर्ज देऊ करते.

मॉर्गेज लोनसाठी लागणारी कागदपत्रे – Required Documents for Mortgage Loan

१. ओळ्खपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पासपोर्ट इत्यादी

२. रहिवासी पुरावा- आधार कार्ड, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, वीज देयक, दूरध्वनी देयक, पासपोर्ट, इत्यादी

३. पासपोर्ट साइज फोटो

४. मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट

५. आपल्या मालमत्तेची कागदपत्रे

मॉर्गेज लोन कालावधी – Tenure of Mortgage Loan

मॉर्गेज लोन हे आपण कमीत कमी दोन वर्षे आणि जास्तीत जास्त वीस वर्षांसाठी घेऊ शकतो. शिवाय मॉर्गेज लोनचा कालावधी हा कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतो. जेवढी कमी रक्कम तेवढा कमी कालावधी आणि जेवढी जास्त रक्कम तेवढा जास्त कालावधी.

मॉर्गेज लोन व्याजदर – Rate of Interest for Mortgage Loan

मॉर्गेज लोनसाठी व्याजदर हा १०.५०% ते १४.५०% या दरम्यान असतो. प्रत्येक बँकेप्रमाणे ह्या व्याजदरामध्ये बदल होत असतो.

ऑनलाईन मॉर्गेज लोन प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करावा? – How to get Mortgage Loan through Online Mode? | Mortgage Loan Process in Marathi

१. ऑनलाईन मॉर्गेज लोन प्राप्त करण्यासाठी ज्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहेत त्या बँकेच्या साईटला भेट देऊन मॉर्गेज लोनसाठीचा अर्ज भरावा.

२. त्या अर्जामध्ये योग्य ती स्वतःची आणि मालमत्तेची माहिती भरावी.

३. त्या अर्जासोबत तुमची स्वतःची आणि मालमत्तेची कागदपत्रे जोडावीत.

४. त्या अर्जामध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नाची माहिती भरल्यावर तुम्हाला चांगले कर्जाचे Plans बँकेच्या साईटवर पाहायला मिळतील. तुम्ही त्यातील तुमच्या आवडीचा Plan निवडून मॉर्गेज लोनसाठी बँकेकडे अर्ज करू शकता.

मॉर्गेज वर किती लोन मिळते? – How much amount of Loan will get in case of Mortgage? 

कर्जाची रक्कम ही जमा करत असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर, कर्जाची रक्कम ही त्या मालमत्तेच्या समोर रजिस्ट्रीसोबत नोंदवलेल्या रक्कमेच्या ६०% असते. काही बँका मॉर्गेज लोन १० करोड रुपयांपर्यंत देतात.

रिव्हर्स मॉर्गेज – Reverse Mortgage Loan in Marathi

रिव्हर्स मॉर्गेजमध्ये मालमत्ता ही तुमच्या मालकीची राहते. बँकेकडे ती मालमत्ता रिव्हर्स मॉर्गेज म्हणून जमा करून त्यावर कर्ज घेतले जाते. हे कर्ज आपण आपल्या गरजेप्रमाणे म्हणजे एकरकमी, मासिक, त्रैमासिक, वार्षिक हप्त्याने घेऊ शकतो.

मॉर्गेज लोनचे फायदे – Advantages of Mortgage Loan 

१. मॉर्गेज लोन हे एक सुरक्षित कर्ज आहे. या कर्जामध्ये तुम्ही जास्त रकमेच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

२. कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा इतर प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत जास्त असतो.

३. प्रक्रिया शुल्काच्या बाबतीत इतर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत मॉर्गेज लोनमध्ये प्रक्रिया शुल्क कमी आहे.

४. मॉर्गेज लोनमध्ये गहाण ठेवण्यासाठी कमी कागदपत्रांची गरज असल्यामुळे त्याची मंजुरी जलद होते.

मॉर्गेज लोनचे तोटे – Disadvantages of Mortgage Loan

१. मॉर्गेज लोन हे तुमची मालमत्ता आणि उत्पन्न या आधारावर दिले जाते. म्हणून जेवढे कर्ज हवे आहे तेवढेच घ्या. अनेक लोकांनी नोकऱ्या गमावल्यामुळे त्यांना बँकेच्या वसुली प्रक्रियेला सामोरे जावे लागते.

२. हे कर्ज घेताना बँकेने उपलब्ध करुन दिलेला विमा नक्की घ्या. त्याचा तुम्हाला कर्ज फेडताना उपयोग होईल.

३. हे कर्ज घेताना संयुक्तपणे घेतल्यास कर्जाचा हफ्ता कमी भरावा लागेल आणि अधिक डाऊन पेमेंट केल्यास नंतर व्याज कमी भरावे लागेल. त्यामुळे बँकेचे कर्ज तुम्ही लवकर फेडू शकता.

४. बँकेने दिलेल्या मॉर्गेज लोनची परतफेड करण्यास तुम्ही अयशस्वी झाल्यास तुमच्या सिबील स्कोरवरती परिणाम होतो.

निष्कर्ष – Conclusion 

मॉर्गेज लोनबद्दल योग्य ती माहिती करून कर्ज घेतल्यास हे कर्जदेखील तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी मॉर्गेज लोनबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे खूप महत्वाचे आहे.

शेअर करा