लीव्ह अँड लायन्स अग्रीमेंट मराठी माहिती | Leave and license Agreement in Marathi
घर घेताना आपण जितकी काळजी घेतो,त्याहून अधिक काळजी ही घर भाड्याने देताना घ्यावी.आजच्या लेखात आपण लीव्ह अँड लायन्स अॅग्रीमेंट विषयी जाणून घेणार आहोत.अनेकजण भाडेकरार करताना नोटरी मार्फत करतात.असा करार केल्यानंतर करार असल्याचे समाधान लाभते.परंतु कायदेशीर तरतुदीनुसार रीतसर मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्यूटी न भरता नोंदविलेला १२ महिन्याहून अधिक कालावधीचा करार मान्य केला जात नाही.
अनुक्रमणिका
Leave and license Agreement मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी)
- भारतीय मुद्रांक कायदा सन १८९९ चा आधार घेत मुद्रांक शुल्क रचना ठरविलेली आहे.
- मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या अखत्यारीतीत येणारा विषय असल्याने राज्य सरकार आपल्या जरूरीप्रमाणे त्यात बदल करू शकते.त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वेगवगळी आहे.
- महाराष्ट्र मुद्रांक शुल्क आणि नोंदणी दर ठरविण्यास महाराष्ट्र शासनाने मुंबई मुद्रांक कायदा ( बॉम्बे स्टॅम्प अॅक्ट ) सं १९५८ साली मान्य केला आहे.वेळोवेळी त्यातील दरात दुरुस्ती केली जाते.या कायद्यातील अनुच्छेद आर्टिकल ३६ ए नुसार मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात येते.
भारतीय सुविधाकार कायदा १८८२
- भारतीय सुविधाकार कायदा ( Indian Easements Act) सन १८८२ च्या प्रभाग ( सेक्शन ५२( मध्ये संमती आणि परवानगी करार (लीव्ह अँड लाईसन्स अॅग्रीमेंट) म्हणजे काय? यांची व्याख्या स्पष्ट केली आहे.
- आपण यास भाडेकरार असे सरसकट म्हणतो तो खरा भाडेकरार नसतोच.आपली मालमत्ता मोबदला घेऊन वापरण्याची संमती परवानगी दिली की त्यास करारांव्यये काही अधिकारी मिळतात जे रद्द करण्याचा मालकास अधिकार आहे.त्यामुळे भाडेकरू म्हणून त्यास मिळणारे संरक्षण मर्यादित आहे.
- हा करार जागा मालकांच्या हक्काचे जतन करतो.जर मालकास जागा खाली करून हवी असल्यास घ्यावी लागते न दिल्यास करारातील अटीप्रमाणे त्यांची आर्थिक भरपाई घ्यावी लागते.
- *सध्या करार काळात होणारी एकूण मोबदला रक्कम त्याप्रमाणे घेतलेल्या अनामत रक्कमेवर वार्षिक १० टक्के परतावा मिळाला असे समजून येणाऱ्या व्याज रकमेची बेरीज करून येणाऱ्या रक्कमेवर ०.२५ टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागते.अनामत रक्कम १० महिन्याच्या मोबदला रक्कमेतून अधिक घेता येणार नाही.
- भारतीय नोंदणी कायद्यानुसार १ वर्षाहून अधिक काळच्या कराराची नोंदणी करणे आवश्यक असून असा करार केल्यास रु ५००० दंड आणि किंवा तीन महीने कैद अशी शिक्षा होऊ शकते.
- महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास असा करार अस्तित्वात आल्यास तीन महिन्यात नोंदवावा लागतो.
- एका वर्षाहून कमी कालावधीच्या कराराची नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी पालिका क्षेत्रात असलेल्या जागेच्याबाबतच्या कराराची नोंदणी फी १००० असून ग्रामीण भागासाठी रुपये ५०० आहे.
- करारात जर स्पष्टपणे उल्लेख नसल्यास यासाठी येणारा खर्च हा उपभोग घेणाऱ्याने करायचा आहे.
- या कराराच्या धर्तीवर भाडेकरार कायद्यात बदल करणे प्रस्तावित असून असे झाल्यास अनेक घरे भाडयाने उपलब्ध होतील.मालकांना आपल्या मालमत्तेवर हक्क कायम ठेवून नियमित उत्पन्न मिळेल.या उत्पन्नातून कोणत्याही मर्यादेशिवाय ३० टक्के रक्कमेवर प्रामाणीत खर्च वजावत मिळते.
Leave and license Agreement करार कसा असावा
- हा करार कसा असावा यांचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर समंतीने काही बदल करता येतात.खालील गोष्टीचा उल्लेख असणे गरजेचे आहे.
- मालकांचे नाव
- जागेचे तपशीलवार वर्णन.
- कराराचा कालावधी कायद्यात या कराराचा कमाल कालावधी निश्चित केलेला नसल्याने तो १ वर्षाहून अधिक काळापासून कितीही वर्षांचा करता येणे शक्य असून त्यात मासिक मोबदला तो देण्याची पद्धत,यात निश्चित कालावधीत होणारी वाढ अपेक्षित असल्यास त्यांचा खुलासा करणे आवश्यक आहे.
- अनामत रक्कम ती स्वीकारण्याची आणि परत करण्याची पद्धत.
- सोसायटीचा मासिक देखभाल शुल्क,सिकिंग फंड,स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पालिका अथवा पंचायत यांच्याकडील कर,आकस्मित येणारा दुरुस्ती खर्च, लाइटबील करारास येणारा खर्च कोणी करायचा यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
- सर्वसाधारणपणे लाईटबील अंतर्गत दुरुस्ती, कराराचा खर्च हा उपभोगकर्त्याने करायचा व अन्य खर्च मालकाने करायचे असे संकेत असले तरी सोयीनुसार किरकोळ बदल करता येतात जसे -कराराचा खर्च मालक व उपभोगकर्ता यांनी विभागून घेतील याप्रमाणे.
- करार कालावधीपूर्वी कोणालाही मुदतपूर्व बाहेर पडायचे असल्यास करार रद्द करण्याचे नियम.
- करार संपल्यावर जागेचा ताबा मालकाकडे न दिल्यास द्यायची प्रतिदिन भरपाई रक्कम.
Leave and license Agreement नोंदणी
- वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन केलेला करार दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जाऊन नोंदविता येतो.
- वरील कराराचा दस्त,फोटो,पॅन , आधार साखरे फोटो ओळखपत्र २ साक्षीदार त्यांचे फोटो व ओळखपत्र ई घेऊन दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करता येते.
- अलीकडे आधारकार्डद्वारे स्वताची ओळख पटवून अधिकृत परवानाधारक व्यक्तीकडून कराराची ऑनलाइन नोंदणी करता येते.
- ही अतिशय सुलभ प्रकिया असून त्यात १० मिनिटांत अधिक कालावधीत लागत नाही.हा करार सर्वांच्या सोयीने योग्य ठिकाणी एकत्र करता येतो.
- तुमच्या घरी किंवा अगदी कार्यालयात येऊन करार करून देण्याची सेवा काहीजण देतात.
- यासाठी परवानाधारक त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सेवेनुसार काही आकार घेतात.तो किती असेल ते आधीच ठरवून द्यावे.
- सर्वसाधारण १००० रुपये इतके सेवाशुल्क घरी येऊन सेवा दिल्यास वाजवी वाटते.वयोवृद्ध व अपंग व्यक्तीसाठी ही सेवा अतिशय सोयीस्कर आहे.यासाठी मात्र आधारकार्डची पतडताळणी होणे अतिशय गरजेचे आहे.
- अशा प्रकारे करार करण्यासाठी बोटांचे ठसे आणि नेत्रपटल यावरून पडताळणी करता येते परंतु ऑनलाइन करार करणाऱ्या प्रत्येकाकडे बोटांचे ओळख पटवण्याप्रमाणे नेत्रपटलांची ओळख पटवणारी यंत्रसामुग्री असेल असे नाही.
- जर तुमची ऑनलाइन नोंदणी झाली नाही तर मात्र तुम्हाला दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.तेथे अन्य पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख मान्य करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
- नियमित जे असे ऑनलाइन करार करून देतात त्यांच्या मार्फतच असे करार करावेत.
Leave and license Agreement महाराष्ट्रात भाडेकरार फी किती आहे?
तुम्हाला एखादे घर भाड्याने घ्यायचे असेल तर त्यासाठी घरमालक आणि भाडेकरू याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जी मालमत्ता भाड्याने घ्यायची असेल त्यांचे लाइटबील अशी महत्वाची कंग पत्रे लागतात.
महाराष्ट्रात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशी नोंदणी कराल ?| Leave and licence agreement online in Marathi
ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी तुमच्याकडे थंब स्कॅनर आणि वेबकॅम असणे आवश्यक आहे.
- नोंदणी मुद्रांक विभागाच्या https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ या वेबसाइटवर जाऊन करावी.
- तुमची मालमत्ता कोणत्या जिल्ह्यात आहे ते निवडा थंब स्कॅनर वापरुन अंगठ्याचा ठसा घ्या आणि पासवर्ड तयार करा.
- जी मालमत्ता भाड्याने द्यायची आहे त्यांचा तपशील प्रविष्ट करा.
- मालक आणि ज्याला ती मालमत्ता भाड्याने घ्यायची आहे त्यांचा सर्व तपशील प्रविष्ट करा.
- ओळखकर्त्याचे तपशील म्हणजेच साक्षीदार प्रविष्ट करा.
- भाड्याचे तपशील आणि इतर सर्व अटी व शर्ती प्रविष्ट करा.
- मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क ऑनलाइन भरा.
- पूर्ण भाडेकरार झाल्यानंतर तो पाहता येतो आणि काही बदल हवे असतील तर ते देखील करता येतात.
- तयार केलेला सर्व माहिती या सर्व तपशील यांची पडताळणी करा आणि एक्झिक्युट वर क्लिक करा.
- पक्ष कारांचे फोटो आणि अंगठ्यांचे ठसे कॅपचऱ् करा.आणि सेव्ह क्लिक करा.