केवायसी (KYC) म्हणजे काय? | KYC Meaning in Marathi

साल 2004 पासून भारतीय रिझर्व बँक ने सर्व फायनान्शिअल कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांबद्दल ओळख पटवून घेण्यासाठी त्यांचा पत्ता त्यांची ओळख पडताळून घेणे अनिवार्य केले आहे. या माध्यमातून वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना जाणून घेऊ शकतात आणि त्यांच्या बद्दल हवी असणारी महत्त्वाची माहिती आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवू शकतात.

केवायसी काय आहे? | What is KYC in Marathi

केवायसी म्हणजे Know Your Customer (KYC). केवायसी म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणे. केवायसी च्या माध्यमातून कुठल्याही वित्तीय संस्था आपल्या ग्राहकाबाबत  पडताळणी करतात आणि त्याची पुष्टी करते.

आरबीआय ने सर्व बँक आणि वित्तीय संस्थाना केवायसी प्रोसेस अनिवार्य  केलेली आहे. ग्राहकांना त्यांचे केवायसी कागदपत्रे कंपन्यांकडे जमा करणे अनिवार्य आहे. कुठल्याही प्रकारचे व्यवहार करण्याअगोदर कंपन्या केवायसी डॉक्युमेंट ग्राहकांकडून जमा करतात त्याची पडताळणी करून मगच पुढचा पुढचे ट्रांजेक्शन किंवा व्यवहार त्या ग्राहकाशी करतात.

केवायसी साठी दोन मार्ग आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन आणि केवायसी प्रक्रिया फक्त सुरुवातीला ग्राहकांना करावी लागते जेणेकरून आरबीआय ने ठराव केलेल्या नियमांचे बँक किंवा वित्तीय संस्था पालन करतील. ही एक अत्यंत साधी सोपी प्रक्रिया आहे 

केवायसी का महत्त्वाचे आहे? | Imporatance of KYC in Marathi

केवायसी च्या माध्यमातून वित्तीय संस्था आणि बँकांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांवरती नजर ठेवता येते. काही बेकायदेशीर कंपन्या जसे की ट्रेडिंग शेअर मार्केट या वेगळ्या वित्तीय सेवांचा वापर करून बेकायदेशीर व्यवहार करतात त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवता येते. बँका त्यांच्या ग्राहकांचे केवायसी पडताळून पाहू शकता जेणेकरून काही बेकायदेशीर व्यवहारांवर लगाम लागू शकते. केवायसी मध्ये ग्राहकांचा पत्ता त्यांची ओळख पटवून घेणे त्याच प्रकारे त्यांची स्वाक्षरी पडताळणे अशा बाबींचा समावेश होतो. साधारणता केवायसी च्या माध्यमातून एक नोकरवर्ग व्यक्ती किंवा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे केवायसी डॉक्युमेंट पडताळणी करणे ज्यामुळे ती कंपनी किंवा व्यक्ती व्यवहार करण्यायोग्य आहे की नाही याची माहिती मिळते.

KYC Full Form in Marathi

केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर (Know Your Customer) म्हणजेच तुमचा ग्राहक जाणून घेणे.

केवायसी चे प्रकार | Types of KYC

केवायसी पडताळणीचे साधारण दोन प्रकार आहेत आणि त्यातला कुठला प्रकार आपल्यासाठी योग्य आहे हे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडी वरती अवलंबून आहे चला तर मग ते दोन प्रकार जाणून घेऊ 

1. आधार कार्ड द्वारे केवायसी

काही  बँक किंवा वित्तीय संस्था ह्या आधार कार्ड द्वारे केवायसी पडताळणी करतात ज्यामध्ये ते आधार कार्ड चे ओरिजनल स्कॅन कॉपी अपलोड करण्यासाठी ग्राहकांना सूचना देतात अशाप्रकारे त्यांची केवायसी पडताळली जाते या प्रकारात द्वारे ग्राहक फक्त पन्नास हजारापर्यंत आपली गुंतवणूक म्युचल फंड मध्ये करू शकता 

2. व्यक्तिगत केवायसी

या प्रकारामध्ये  ग्राहक राग आला जर जास्त रक्कम गुंतवायचे असल्यास ऑफलाइन केवायसी पडताळणी करावी लागते यामध्ये ग्राहकाला त्या बँक किंवा फायनान्शिअल इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आपले केवायसी डॉक्युमेंट द्यावे लागतात त्याच प्रकारे बायोमेट्रिक चेक केले जाते अशा प्रकारे ग्राहकांची ओळख योग्य प्रकारे पटवून घेतली जाते 

केवायसी मध्ये कोणत्या कागदपत्रांचा समावेश होतो | Document required for KYC

आरबीआय  ने दिलेल्या सूचनानुसार हे प्रमुख कागदपत्रे केवायसी पडताळणीसाठी योग्य आहेत आणि तुम्ही जर पहिल्यांदा केवायसी कागदपत्रे जमा केली असल्यास बँक किंवा फायनान्शिअल कंपन्या तुम्हाला पुन्हा केवायसी करण्यासाठी सांगू शकतात जेणेकरून त्यांच्याकडे असणारे रेकॉर्ड काही कालावधीनंतर अपडेटेड असतील  यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश होतो 

1. ओळखीचा पुरावा:

  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • फोटो  आयडी (ओळखपत्र)
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र

2. पत्त्याचा पुरावा:

  • मतदार ओळखपत्र
  • शिधापत्रिका
  • अत्यावश्यक सेवांची बिले
  •  रेंट एग्रीमेंट 
  • बँक स्टेटमेंट
  • राज्य/केंद्र सरकारने जारी केलेले ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स 

केवायसीचे फायदे | KYC Benefits

  • ग्राहकाची ओळख पटवून घेणे.
  • ग्राहकाच्या आर्थिक व्यवहारांचे  स्वरूप समजण्यास मदत करते.
  • मनी लॉन्ड्रिंगच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यात मदत करणाऱ्या ग्राहकाच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करते.
  • बेकायदेशीर व्यवहारांमुळे होणारे नुकसान आणि फसवणूक यापासून कर्ज देणाऱ्या  बँका किंवा वित्तीय संस्थाचे संरक्षण करते.
  • सखोल पडताळणी प्रक्रियेद्वारे ग्राहकाच्या महत्त्वाची माहिती बद्दल सुरक्षा प्रदान करते.
  • रोजच्या व्यवहारामध्ये होत असलेल्या कोणत्याही अनधिकृत क्रियाकलापांवर बारीक नजर ठेवण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात मदत करते.
  • वित्तीय संस्था आणि ग्राहक यांच्यात विश्वास निर्माण करते, ज्यामुळे ग्राहक आणि पुरवठादार संबंध सुधारतात.
  • वैयक्तिक डेटा सावधपणे हाताळून ओळख प्रक्रिया सुलभ करते.

निष्कर्ष

 केवायसी ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये फसवणूक, मनी लाँडरिंग रोखण्यासाठी ग्राहकांची ओळख, पत्ता आणि इतर तपशीलांची सखोल पडताळणी करणे आणि देशातील एक पारदर्शक आणि सुरक्षित आर्थिक परिसंस्थेला चालना देण्यासाठी अँटी मनी लाँडरिंग (AML) नियमांचे पालन सुनिश्चित करणे यासाठी मदत होते 

शेअर करा