आयपीओ म्हणजे काय? | IPO INFORMATION IN MARATHI

आयपीओ म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?, IPO चा मराठीतील फूल फॉर्म, आयपीओ कसे काम करते,IPO अलॉटमेंट प्रोसेस, IPO mhanje kay

IPO INFORMATION IN MARATHI – शेअर बाजार आणि त्यांच्याशी निगडीत गुंतवणूक हा सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा विषय आहे. आजच्या तरुणपिढीतील जवळपास प्रत्येक तरुण हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. मागील तीन वर्षांचा विचार करता शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. शेअर मार्केट फक्त शेअर्स या शब्दांशी निगडीत नसून यामध्ये अनेक प्रकार येतात. यातील सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रकार म्हणजे आयपीओ होय.आज आपण आयपीओ विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आजच्या लेखात आयपीओ म्हणजे काय? त्याची आवश्यकता का आहे आणि आयपीओ बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत.आयपीओमध्ये कशी गुंतवणूक करायची. या अशा अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.

आयपीओ म्हणजे काय? (IPO meaning in Marathi)

आयपीओ म्हणजे अशी एक प्रकिया असते, ज्याद्वारे एक खाजगी कंपनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या कंपनीचे शेअर्स ऑफर करते. कंपनी सर्वांसाठी सार्वजनिक करते म्हणजेच कोणताही सामान्य माणूस शेअर्स घेऊ शकतो. जी कंपनी आपले आयपीओ बाजारात आणते त्या बदल्यात निधी गोळा करते.

IPO चा मराठीतील फूल फॉर्म (IPO full form in Marathi)

IPO long form in Marathi – आयपीओ चा मराठी फूल फॉर्म असा आहे, इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा होतो. परंतु सर्वजण आयपीओ या नावानेच ओळखतात.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे फार अवघड नाही. ही अतिशय सोप्पी आणि सहज होणारी प्रकिया आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे मुख्य दोन प्रकार आहेत (Two main types of investing in the stock market)

१. प्रायमरी मार्केट – प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजार या मध्ये तुम्ही आयपीओ द्वारे गुंतवणूक करू शकता.

२. सेकंड्री मार्केट – या प्रकारेद्वारे तुम्ही थेट शेअर बाजरात गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही शेअर बाजारातील सूचीबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.

आयपीओ कसे काम करते (How IPO works) –

आधी आपण पाहिल्याप्रमाणे आयपीओ म्हणजे जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स पहिल्यांदा बाजारात आणते तेव्हा ते जनतेला ऑफर केले जातात. तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात. आयपीओच्या माध्यमातून कंपनी काही निधी गोळा करते. हा निधी कंपनीच्या वाढीसाठी वापरला जातो. त्या बदल्यात कंपनी जे लोक त्या कंपनीचा आयपीओ खरेदी करत आहेत त्यांना कंपनीमध्ये हिस्सा दिला जातो.

समजा तुम्ही एका कंपनीचे आयपीओ म्हणजेच शेअर्स घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या खरेदी केलेल्या भागाचे मालक असतात. एक कंपनी एका पेक्षा अधिक वेळा आयपीओ आणते. आयपीओ बाजारात आणण्याचीपण अनेक कारणे आहेत, ती आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आयपीओचे प्रकार (Types of IPOs)

आपण आधी आयपीओ म्हणजे काय हे जाणून घेतले पण आता आपण आयपीओचे प्रकार जाणून घेणार आहोत. आयपीओचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात.
१. फिक्स प्राईज इश्यू किंवा फिक्स प्राईज आयपीओ – (Fixed price issue or fixed price IPO)
२. बुक बिल्डिंग इश्यू किंवा बुक बिल्डिंग आयपीओ – (Book Building Issue or Book Building IPO)

. फिक्स प्राईज इश्यू किंवा फिक्स प्राईज आयपीओ – फिक्स प्राईज आयपीओ आणणारी कंपनी आयपीओ जारी करण्यापूर्वी त्यांची जी गुंतवणूक केलेली बँक आहे त्यासोबत आयपीओच्या किंमतीवर चर्चा करते. गुंतवणूक करणाऱ्या बँकेबरोबर बैठकीत कंपनी आयपीओच्या किंमती ठरविते. त्या ठरलेल्या किंमती कोणताही गुंतवणूकदार आयपीओची सदस्यता घेऊ शकतो. कंपनीने निश्चित केलेल्या दरात आयपीओ खरेदी करू शकता. यालाच फिक्स प्राइज आयपीओ म्हणतात.

. बुक बिल्डिंग इश्यू किंवा बुक बिल्डिंग आयपीओ– बुक बिल्डिंग आयपीओ मध्ये आयपीओची प्राइज बॅंड ठरवल्यानंतर तो जारी केला जातो, त्यानंतर गुंतवणूकदार ठरवलेल्या प्राइज बॅंडमधून सदस्यता घेऊ शकतात.

बुक बिल्डिंग आयपीओ चे दोन प्रकार पडतात-
जर आयपीओची किंमत बॅंडमध्ये कमी असेल तर त्याला फ्लोवर प्राइज म्हणतात. जर आयपीओची किंमत जास्त असेल तर त्याला कॅप प्राइस म्हणतात.

आयपीओ आण्याचे कारण काय (Reason for bringing IPO)-

. भांडवल उभारण्यासाठी – जेव्हा एखाद्या कंपनीला त्यांचा व्यवसाय वाढवायचा असतो तेव्हा त्यांना भांडवलाची गरज असते. अशा वेळेस अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ बाजारात आणतात आणि त्यातून उत्तम पैसे कमवतात. आयपीओ आणल्या नंतर कंपन्या त्यांचे शेअर्स सामान्य नागरिकांना देतात.

. दीर्घ मुदतीचे फायदे – जेव्हा एखादी कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार केलेली कंपनी भविष्यात इतर कोणत्याही कंपनीशी कोणत्याही प्रकारच्या करारात प्रवेश करते तेव्हा त्यांना स्टॉक द्वारे देखील पैसे मिळू शकतात. जर तुमच्याकडे स्टॉक नसतील तर तुम्हाला कंपनीला संपूर्ण रक्कम रोख भरावी लागते. रोख रक्कम भरणे फार अवघड असते.

. प्रतिष्ठा – जेव्हा एखादी कंपनी त्यांचा आयपीओ बाजारात आणते तेव्हा त्यांच्या कंपनीला एक वेगळीच प्रतिष्ठा मिळते. ती कंपनी एक चांगली कंपनी समजली जाते. त्यांची बाजारातील किंमत

IPO आयपीओ बद्दल काही महत्वाच्या गोष्टी – (Some important things about IPO IPO)

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात SEBI ही सरकारी संस्था आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी भाग पाडले. कोणत्याही कंपनीला आयपीओ बाजारात आणण्या अगोदर सेबीला सर्व प्रकारची माहिती देणे बंधनकारक असते. ही एक प्रकारची अनिवार्य अट असते. आयपीओ आणल्यानंतर सेबी पुन्हा चौकशी करते, तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे की नाही.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीचा आयपीओ बाजारात येतो तेव्हा असे समजावे की शेअर बाजरांची स्थिती योग्य आहे. अर्थव्यवस्था ठीक आहे. जेव्हा आर्थिक संकटे येतात तेव्हा आयपीओचे लिस्टिंग कमी कमी होऊन जाते , कारण बाजारात आधीच मंदी असते. पण काही काळा नंतर जर पुन्हा आयपीओ येण्यास सुरुवात झाली तर तुम्ही असा अंदाज लावू शकता की आता शेअर बाजार सुधारत आहे.अर्थव्यवस्था पुन्हा जागेवर येत आहे, ती सुधारत आहे.

आयपीओचा अर्थव्यवस्थेशी संबंध ( IPO relation with the Economy )

आयपीओ आणि बाजारपेठ यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा बाजारात आयपीओ येतो तेव्हा समजावे की बाजारात तेजी आहे, बाजार उत्तम चालू आहे, पण अचानक आयपीओ येणे कमी झाले तर समजावे की बाजार आता ढासळणार आहे. म्हणजे बाजारात थोडी मंदी येणार आहे. शेअर बाजरात मंदी , तेजी चालू असते. जेव्हा बाजारात पुन्हा आयपीओ येण्यास सुरुवात होते तेव्हा समजावे बाजार आता पुन्हा जागेवर येत आहे, म्हणजेच काय आर्थिक घटी पुन्हा बसणार आहे.

IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी (IPO Investment Process)-

जेव्हा एखादी कंपनी आयपीओ जाहीर करतेतेव्हा ती एक तारीख जाहीर करते त्या तारखेला आयपीओ बाजारात येतो त्या नंतर किमान 3 ते 10 दिवसांसाठी तो आयपीओ उघडा असतो. म्हणजेच कोणताही गुंतवणूकदार 3 ते 10 दिवसांच्या आत तो खरेदी करू शकतो. काही कंपन्या आयपीओ जारी करण्याचा कलावधी फक्त 3 दिवस थेटे तर काही त्याहून अधिक.

तुम्ही कंपनीच्या अधिकृत साईटवर भेट देऊन किंवा नोंदणीकृत ब्रोकरेजद्वारे तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. जर फिक्स प्राइज आयपीओ असेल तर त्यांची ठरलेली किंमत याला अनुसरून अर्ज करावा लागतो. आणि जर बुक बिल्डिंग असेल तर तुम्हाला बोली लावावी लागते. आयपीओ घेण्याअगोदर सर्व मुद्दे समजून घ्यावे. त्यामुळे तुमचे नुकसान कमी होते.

आयपीओ घेताना जर तुम्ही ब्रोकरद्वारे घेणार असाल तर तुमचा ब्रोकर उत्तम असावा. तो तुम्हाला उत्तम कंपनी निवडण्यास मदत करेल. तुम्ही जेव्हा एखादी कंपनी निवडता तेव्हा त्यांची इतर दोन- तीन कंपन्या सोबत तुलना करा. तुम्ही जी कंपनी निवडता तेव्हा त्या कंपनीची मागील काही दिवसांची कामगिरी पहा. काही ब्रोकर एजन्सी देखील आहेत त्या काय रेटिंग देतात ते देखील तपासा.

IPO अलॉटमेंट प्रोसेस (Allotment Process)

जेव्हा आयपीओची गुंतवणूक करण्याची तारीख संपते तेव्हा कंपनी आयपीओ चे वाटप करते. या प्रक्रियेत कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आयपीओचे वाटप करते. अनेकदा असे देखील होते की अनेक गुंतवणूकदार त्या शेअरमध्ये रस दाखवतात पण शेअर्सची संख्या मात्र ठरविक असते, अशा वेळेस ज्यांनी सर्वात आधी आयपीओसाठी अर्ज केला आहे, त्यांना दिला जातो. शेअरचे वाटप केल्यानंतर ते स्टॉक मार्केटवर सूचीबद्द होतात. एकदा का त्यांचे लिस्टिंग झाले की मग ते शेअर्स दुय्यम विक्रीसाठी खुले होतात. जो पर्यत शेअयर्स सूचीबद्ध होत नाहीत तो पर्यत, त्यांची विक्री केली जात नाही.

IPO मध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे का? (Is It Better to Invest In an IPO?)

तुम्ही शेअर बाजरत जर नवखे असाल तर तुमच्यासाठी आयपीओ हा सर्वात उत्तम मार्ग आहे. या मार्गामुळे गुंतवणूकदाराला दीर्घकाळ उत्तम मोबदला मिळू शकतो. यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करणार असाल तर तुमचा प्रवास आशादायी होऊ शकतो.

IPO मध्ये कंपनी पैसे कसे कमावते (How a company makes money in an IPO)

एखादी कंपनी मुख्यत्वे दोन कारणांसाठी आयपीओ बाजारात आणते एक म्हणजे जेव्हा कंपनीला त्यांचा व्यवसाय वाढवायचा असतो, त्यासाठी त्यांना भांडवल लागणार असते. अनेक बँका कर्ज देखील देत असतात पण जेव्हा बँकेकडून कर्ज घेतले जाते तेव्हा त्यावर व्याज भरावे लागते. पण जेव्हा एखादी आयपीओ बाजरात आणला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते. याबरोबरच व्यवसाय वाढविण्यासाठी आयपीओ मध्ये मिळालेली रक्कम उपयुक्त ठरते. या बरोबरच अनेक कंपन्यावर कर्जाचा बोजा वाढतो, अशा वेळी त्या कंपनीला कर्ज फेडणे शक्य नसते, अशा वेळेस कंपनी आपले आयपीओ बाजारात आणून त्यातून पैसे कमावते.

IPO चे फायदे (Benefits of IPO)

आयपीओ चे फायदे आणि तोटे हे दोन्ही देखील आहेत. सर्वप्रथम आपण आयपीओ चे फायदे पाहूयात.

  • आयपीओद्वारे सूचना केली जाते कंपनी चांगली कामगिरी करत आहे, यामाध्यमातून कंपनीला निधी आणखी नवीन प्रकल्पावर काम करता येते. व्यवसाय वाढविण्यासाठी आयपीओ हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
  • आयपीओच्या मदतीने कोणतीही कंपनी चांगले कर्मचारी कामावर ठेऊ शकते. कर्मचाऱ्यांना शेअर्स ऑफर करून कंपनी कमी पगारात नवीन लोकांना कामावर ठेऊ शकते.
  • जर बाजारात शेअर्सची किंमत वाढते तेव्हा प्रमोटर्सला निव्वळ किंमत देखील वाढते, तेव्हा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते.

आयपीओचे तोटे (Disadvantages of IPO)

आयपीओ चे तोटे खालील प्रमाणे आहेत.

  • आयपीओची प्रक्रिया एखाद्या कंपनीसाठी खूप महाग असते. कंपनीचे लीडर्स आयपीओकडे अधिक लक्ष देतात, त्यामुळे कंपनीच्या इतर कामावर त्यांचा परिणाम होऊ शकतो. ज्या बँका गुंतवणूक करतात त्या भरमसाठ शुल्क आकारतात.
  • एकदा आयपीओ लॉंच झाला की कंपनीचे मालक शेअर्स विकू शकत नाहीत. कारण असे केल्यास कंपनीच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात. कंपनीला सेबीच्या नियमानुसार काम करावे लागते.
  • आयपीओ नंतर कंपनीबद्दल बरेच काही कळते.

निष्कर्ष

जेव्हा जेव्हा एखादी कंपनी आयपीओ बाजारात येणार आहे असे जाहीर करते तेव्हा लोकांना कंपनीबद्दल प्रचंड उत्सुकता असते. सामान्य लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो . कारण त्यांना वाटते कमी काळात जास्त नफा मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु काहीवेळा मात्र गुंतवणूकदारांची मात्र निराशा होते. गुंतवणूकदारांना पैसे देखील गमवावे लागतात त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि आयपीओ खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्याबद्दल आधी अभ्यास करा.ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहात, त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल कसे आहे यांचा देखील अभ्यास करा. अगदी विचार पूर्वक गुंतवणूक करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

आयपीओ (IPO) काय आहे?

आयपीओ म्हणजे Initial Public Offerings. आयपीओ ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खाजगी मालकीच्या कंपनी प्रथमच आपली इक्विटी (हिस्सेदारी) लोकांना देऊन सार्वजनिक कंपनीत रूपांतरित केली जाते

आयपीओ (IPO) ला कसे Apply करावे?

तुमचं ट्रेडिंग अकाउंट आणि बँक खातं असेल तर त्या माध्यमातून तुम्ही आयपीओसाठी अर्ज करू शकता.

शेअर करा