गृह कर्जाविषयी संपूर्ण माहिती | Home Loan Information in Marathi

Home Loan in Marathi, Home Loan Marathi Mahiti, होम लोन विषयी मराठी माहिती, होम लोन म्हणजे काय, होम लोनचे प्रकार, होम लोनचे फायदे, विविध शुल्क आणि फीस,बँकेकडून घरासाठी कर्ज कसे घ्यायचे, Home Loan Documents, Home Loan application in Marathi

अनुक्रमणिका

होम लोन विषयी मराठी माहिती | Home Loan Information in Marathi

प्रत्येकाच्या स्वप्नातील एक घर असते.घर बांधण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य पणाला लावतो. तरी देखील अनेकांना घर घेणे शक्य होत नाही.घर घेणे सोप्पे व्हावे यासाठी होम लोन हा उत्तम पर्याय आहे. होम लोन मुळे घर घेणे सुखकर होते.

अनेकजण अगदी सहज म्हणतात होम लोनमुळे माझं घर शक्य झालं. होम लोन मुळे सर्वसामान्य माणसांना  घर घेणं शक्य झालं आहे. अनेकांना होम लोन म्हणजे दरमहिन्याला असलेली कटकट वाटते. पण तसा विचार केला तर होम लोन ही अतिशय उत्तम पद्धत आहे. कारण सामान्य माणूस जेव्हा स्वताच्या पायावर उभा राहतो,उत्तम कमावू लागतो.त्या नंतर तो ठरवतो की आता त्याला स्वताचं घर घ्यायचं आहे. पण घर घेणं तितकं सोप्पं नसतं. कारण त्यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते. अशा वेळेस होम लोन हा पर्याय योग्य ठरतो.

होम लोन म्हणजे काय? | What is Home Loan in Marathi

होम लोन म्हणजे असे पैसे जे बँक किंवा एखादी संस्था  तुम्हाला  तुमची आर्थिक स्थिती पाहून घर घेण्यासाठी किंवा बनविण्यासाठी आर्थिक मदत करते. या रक्कमेवर एक ठराविक व्याज असते.हे पैसे बँक तुमच्याकडून व्याजासह ठरवून दिलेल्या ईएमआय मध्ये परत घेते.

होम लोन हे फक्त नवीन घरासाठी घेतले जाते असे नाही. होम लोन हे अनेक कारणांसाठी घेतले जाते. इमारत पुन्हा दुरुस्त करण्यासाठी किंवा आधी बांधलेल्या इमारतीची डागडुजी आणि विस्तार करण्यासाठी. होम लोन मिळते. होम लोन हा पर्याय यासाठी असतो, ज्यामुळे तुम्हाला तुमची बचत आणि गुंतवणूक मोडावी लागत नाही. होम लोनमध्ये जो पर्यत लोन आहे तो पर्यत ती मालमत्ता बँकेकडे गहाण असते. जर तुम्ही वेळेवर व्याज आणि मुद्दल भरले नाही तर बँक तुमची मालमत्ता जप्त करते.

होम लोनचा व्याजदर हा ६.६५ पासून पुढे सुरू होतो.

कर्ज  देणारी बँक किंवा संस्था ही कर्जाच्या रककमेच्या ७५ ते ९० टक्के कर्ज देते.कर्ज दिलेली रक्कम जी ३० वर्षांच्या आत सहज सुलभ हप्त्यात परतफेड करता येते.

होम लोनचे प्रकार कोणते | Types of Home Loans in Marathi

  • घर खरेदी कर्ज
  • घर बांधण्यासाठी कर्ज
  • जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज
  • घर दुरुस्तीसाठी कर्ज
  • गृह विस्तार कर्ज
  • जुन्या कर्जावर अतिरिक्त कर्ज जोडून
  • नवीन घरासाठी कमी पडत असणारी रक्कम
  • नवीन घर बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी
  • नवीन जमीन खरेदीसाठी आणि त्यावर घर बांधण्यासाठी
  • परदेशांत असलेल्या स्थायिक भारतीयांसाठी घर घेण्यासाठी कर्ज
  • एका बँकेच्या कर्जाच्या दुसऱ्या बँकेच्या हस्तांतरणासाठी

होम लोनचे फायदे | Home Loan Benefits in Marathi

१. होम लोन घेण्याचे काही महत्वाचे फायदे आहेत. जसे की होम लोनचा व्याज दर अतिशय कमी असतो. ज्या संस्था आणि बँका होम लोन देतात,त्या होम लोनचे अतिशय कमी व्याज दर ठेवतात. कारण होम लोन घेणाऱ्याला देखील परवडायला हवे. मासिक हप्त्याचा ताण येता कामा नये.मासिक हप्त्या जर सुरळीत असेल तर कर्ज लवकर व वेळेत फेडले जाते.

२. या बरोबरच अनेक बँका आणि संस्था यांच्यामध्ये होम लोन देण्यासाठी स्पर्धा सुरू असते.त्यासाठी देखील व्याजदर कमी ठेवला जातो. जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित व्हावेत यासाठी व्याज दर कमी ठेवले जातात.

३. मुद्दलेच्या परतफेडीवर कपात – जेव्हा तुम्ही होम घेता तेव्हा तेव्हा तुम्हाला सुरुवातीला मूळ रक्कम परत करावी लागते.आर्थिकवर्ष कोणतेही असो कलम ८० अंतर्गत तुम्हाला मूळ रककमेवर १.५ लाखापर्यत आयकर कपात होते. परंतु यासाठी काही नियम आहेत, जसे की घराचे बांधकाम हे पाच वर्षात पूर्ण झालेले असावे.काही कारणास्तव जर तुम्ही घर पाच वर्षांच्या आत विकले तर ही कपात मागे घेतली जाते.

४. रजिस्टेशन आणि स्टॅम्प ड्यूटी – तुम्ही कलम ८० सी अंतर्गत मुंद्राक शुल्क आणि नोंदणी शुल्क यासाठी देखील तुम्ही दावा करू शकता.या सर्व खर्चासाठी तुम्ही ज्यावर्षी पैसे भरले आहेत,त्यावर्षी तुम्ही कपातीचा दावा करू शकता.तुम्ही होम घेतलेले असो किंवा नसो तुम्ही कपातीसाठी दावा करू शकता.आयकर कायद्याच्या कमल ८० सी या नुसार तुम्हाला १.५ लाखांची कपात क्लेम करू शकता.

५. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यासाठी – जर तुम्ही पाहिल्यांदाचं घर घेत असाल आणि तुमच्या नावावर इतर कोणतीच मालमत्ता नसेल तर तुमहाल कलम ८० ईई अंतर्गत कर्जावर भरलेल्या व्याजावर ५० हजार रुपयांपर्यतचा कपातीचा दावा करू शकता.ज्यांनी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या दरम्यान घर खरेदी केले आहे. तेच या कपातीचा दावा करू शकतात.या बरोबरच तुमच्या मालमत्तेची किंमत ३५ लाख ते ५० लाखादरम्यान असावी.

६. संयुक्त होम लोन – जर दोन लोकांनी  मिळून कर्ज घेतले तर सरकार त्या दोघांना २ लाखापर्यत व्याज आणि दीड लाखा पर्यत वेगळी कपात देते,पण हे दोघे देखील घराचे समान भागीदार असावेत.

होम लोन घेताना लागणारे विविध शुल्क आणि फीस | Fees for a Home Loan

जेव्हा आपण होम लोन घेतो, तेव्हा आपण व्याजदर आणि मासिक हप्ता यावर सर्वाधिक लक्ष देतो. पण या बरोबरच होम लोन घेताना अनेक फीस घेतल्या जातात. आपणास या विषयी देखील माहीत असावे.१. अर्ज शुल्क – जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अर्ज करता,तेव्हा त्या अर्जाची सर्व पडताळणी आणि सुरुवातीला होणारी इतर सर्व खर्च हा सर्व बँक किंवा संस्था आपल्याकडून आकारतात.

२. प्रकिया शुल्क – जेव्हा एखादा व्यक्ती कर्ज घेतो तेव्हा सर्वात आधी त्यांचा क्रेडिट स्कोर तपासतात. यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे क्रेडिट प्रोफाइल, मासिक उत्पन्न  यावर होम लोन आधारित असते. परंतु सर्व बँका वित्तीय संस्था या प्रक्रिया शुल्क आकारात नाही.

३. प्रशासकीय शुल्क – जेव्हा आपण होम लोन बँकाकडून घेतो,तेव्हा आपण प्रशासकीय शुल्क आकारत नाहीत. पण संस्था मात्र प्रशासकीय शुल्क आकारतात. प्रक्रिया शुल्काचे दोन भाग करतात. कर्जाच्या मंजूरीवर आकारलेला भाग प्रशासकीय शुल्क म्हणून घेतात.

४. फोरक्लोझर फी – जेव्हा आपण होम लोन कालावधीपूर्वी भरतो तेव्हा जे शुल्क भरले जाते, त्याला फोरक्लोजर शुल्क म्हणतात. पूर्वीच्या बँका आणि संस्था एनबीएफसी होमलोनवर प्रीपेमेंट पेनल्टी किंवा फोरक्लोजर फी आकारात पण आता आरबीआयने आता हे सर्व बंद केले आहे.जो पर्यत फिक्स रेट होम लोन आहे तो पर्यत प्रीपेमेंट पेनल्टी घेतली जाणार नाही.

५. पेमेंट मोडफीमध्ये बदल – जेव्हा कर्ज घेणारा व्यक्ती कर्ज कालावधीत फेडत असताना,चालू पेमेंट मोडमध्ये बदल करतो तेव्हा देखील फी आकारली जाते. ही फी ५०० रुपये इतकी असते.ही फी प्रत्येक बँकेप्रमाणे वेगळी असते.

६. व्याज दर कमी करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी शुल्क – जेव्हा एखादा कर्जदार कर्ज घेतो आणि त्याला व्याजदर अधिक वाटू लागतो, किंवा त्याला तो व्याजदर परवडत नाही.अशावेळेस तो कर्जदार बँकेला व्याज दर कमी करण्याची विनंती करतो. ही रक्कम मूळ रक्कमेच्या किंवा थकीत बाकीच्या २ टक्के इतकी असते.

७. CERSAI -CERSAI ही एक शासनाची संस्था आहे. बँक किंवा एनबीएफ  या CERSAI या संस्थेच्या वेबसाईटवर जातात. जेथे आधी ज्या मालमत्तेवर कोणत्या कोणत्या बँकेने कर्ज दिले आहे का हे दिसते. मालमत्तेची पडताळणी येथे केली जाते. इतर कोणत्या बँकेने दावा केला आहे? हे तपासतात. यासाठी अतिशय कमी शुल्क घेतले जाते.

८. ईएमआय वर अतिरिक्त फी – जेव्हा कर्जदाराला ईएमआय भरायला उशीर होती तेव्हा बँक यासाठी देखील अतिरिक्त शुल्क घेते. हे शुल्क तुमचा ईएमआय किती आहे यावर अवलंबून असते.

९. ईएमआय बाऊन्स फी– जेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये ईएमआय रक्कमेपेक्षा कमी रक्कम असते तेव्हा तुमचा होम लोनच्या ईएमआयचा चेक बाऊन्स होतो तेव्हा देखील बाऊन्स फी ५०० रुपये भरावी लागते.

१०. कायदेशीर शुल्क – अनेकदा बँक होम लोन देताना काही सल्लागारांची मदत घेतात,तेव्हा देखील कायदेशीर शुल्क भरावे लागते.यांमध्ये वकिलांची फी यांचा समावेश असतो.

होम लोनचा अर्ज नाकारण्याची कारणे कोणती ?- (What are the reasons for rejection of home loan application?)

१. कमी क्रेडिट स्कोअर

२. क्रेडिट अहवालात चुकीची माहिती

३. इतर बँकानी देखील कर्जाचे अर्ज नाकारणे ‘

४.अस्थिर आणि कमी उत्पन्न

होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे /अटी  (Documents / Terms Required for Home Loan)

  • राष्ट्रीयत्व,अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. अनिवासी भारतीय देखील ठीक आहे.
  • वंशाचा व्यक्ती असणे गरजेचे
  • ७५० किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोर असावा
  • वयोमर्यादा १८ ते ७० वर्ष
  • नोकरीच्या ठिकाणी किमान २ वर्ष
  • व्यवसाय ३ वर्षाहून अधिक जुना असावा.
  • किमान वेतन २५००० हजार असावे. प्रत्येक संस्था आणि बँक यांचे वेगळे नियम असतात.

होम लोनसाठी कागदपत्रे कोणती लागतात – (Home Loan documents Marathi)

  • होम लोनसाठीचा अर्ज
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखीचा पुरावा – पॅन कार्ड, व्हिसा किंवा पासपोर्ट,आधार कार्ड,मतदार ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसन्स यांची कोणाची ही एक प्रत
  • वयाचा पुरावा – आधार कार्ड, पॅन कार्ड,पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र,दहावीचे मार्कशीट, बँक पासबुक, यांची कोणाची ही एक प्रत
  • निवासाचा पत्ता – बँक पासबुक,मतदार ओळखपत्र,रेशन कार्ड, पासपोर्ट युटीलिटी बिल,एल आयसी पॉलिसी कोणतीही स्लिप. वरील कागदपत्रे पैकी कोणतेही एक
  • उत्पन्नाचा पुरावा – मागील तीन वर्षांपासून आयकर परतावा असलेला ताळेबंद फर्म नफा, तोट्याची माहिती.
  • मालमत्तेच्या संबंधित कागदपत्रे – बिल्डर कडून एनओसी, बांधकाम खर्चाचा तपशील, नोंदणीकृत विक्री करार,इमारत योजना मंजूर प्रत

होम लोनसाठी अर्ज कसा करावा( How to apply for a home loan in Marathi) 

सध्याच्या काळात होम लोन घेणे अतिशय सोप्पे झाले आहे. होम लोन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण किती ईएमआय भरू शकतो. यांचा संपूर्ण विचार करावा. ज्या बँकेचे होम लोन घेणार आहात ती बँक किती व्याजदेते हे देखील तपासा. यासाठी सर्व बँका आणि संस्था यांचे होमलोनचे दर तपासून आणि तुलना करून पहा.

तुम्ही ज्यांच्याकडून तुमचे घर विकत घेणार आहात. त्या व्यक्तीची देखील नीट चौकशी करावी. कारण अनेकदा फसविले जाण्याची देखील शक्यता असते. होम लोनला अर्ज करताना सर्व कागदपत्रे जमा करून त्यांची उत्तम फाइल बनवा. पूर्वीच्या काळी बँकेत जाऊन होम लोनचा फॉर्म आणून तो भरावा लागतो. तो फॉर्म आणि सर्व कागदपत्रे  जोडून तो फॉर्म बँकेत जमा करावा. आता घर बसल्या देखील तुम्ही होम लोन काढू शकता. तुम्ही जेव्हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन सबमीट करता त्या नंतर काही दिवसांत बँक तुमच्या कागदपत्राचा अभ्यास करून मग तुम्हाला लोन द्यायचे की नाही, हे ठरवितात.

निष्कर्ष 

प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वताचे एक तरी घर असावे. जगात फार कमी लोक असे आहेत जे एकदाच पैसे भरून घर घेऊ शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एका वेळेस पैसे भरून घर घेणे शक्य होत नाही.अशावेळेस होम लोन हा उत्तम पर्याय ठरतो.होम लोनमुळे आर्थिकताण बराच कमी होते. स्वताचे घर घेण्याचे स्वप्न होम लोनमुळे शक्य होते. होम लोन सर्व सामान्य नागरिकांसाठी स्वताचा घर होण्यासाठी आशेचा किरण आहे.

होम लोन विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

होम लोनमध्ये एकूण मालमत्तेच्या किती टक्के रक्कम मिळते.

होम लोनमध्ये एकूण मालमत्तेच्या ८० ते ९० टक्के कर्ज रक्कम मिळते.

होम लोनसाठी वयाची अट असते का?

होम लोनसाठी वय वर्ष १८ ते ७० असावे.

होम लोनसाठी किती प्रकारच्या फी आकारल्या जातात.

होम लोनसाठी अनेक प्रकारच्या फी आकारल्या जातात. प्रत्येक बँकेप्रमाणे या फी वेगळ्या असतात.

होम लोनसाठी सर्वात उत्तम बँक कोणती?

होम लोनसाठी सर्व बँका होम लोन देतात  यामध्ये प्रामुख्याने एबीआय, एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया, पीएनबी,आयसीआयसी, बँक ऑफ बडोदा,कॅनरा बँक, या बँका उत्तम होम लं देतात.

होम लोनसाठी किती क्रेडिट स्कोअर असावा

जेव्हा तुमचा स्कोअर ७५० किंवा त्या पेक्षा अधिक असतो तेव्हा बँका तुम्हाला सहज होम लोन देतात.तुमचा स्कोअर हा ८०० पेक्षा जास्त असावा.

होम लोनमध्ये किती सह कर्जदार असू शकतात.

होम लोनमध्ये किमान ७ सहकर्जदार असू शकतात. पण ते तुमचे नातेवाईक असावेत. तुमच्या रक्त संबंधातील असावेत.

शेअर करा