ग्रॅच्युइटी काय आहे? | Gratuity Meaning In Marathi

जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता आणि दीर्घकाळ त्या कंपनीसाठी आपला वेळ समर्पित करता मला बदल्यात एक  कर्मचारी म्हणून काही मोबदल्याची अपेक्षा तुम्हाला असते एक असा मार्ग आहे ज्यातून कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पाच वर्ष काम केल्याबद्दल एक रक्कम देतात जे की ग्रॅच्युईटी स्वरूपात असते.

ग्रॅच्युइटी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युरिटी अमाऊंट देतात ग्रॅच्युइटी रक्कम पाच किंवा अधिक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली जाते. ग्रॅच्युरिटी हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग असतो. ग्रॅच्युइटी अमाऊंट कर्मचाऱ्याला रिटायरमेंट किंवा कंपनी किंवा संस्था सोडून जाताना दिली जाते फक्त कर्मचाऱ्याने कमीत कमी पाच वर्ष त्या कंपनीत काम केले असावे. 

ग्रॅच्युइटी म्हणजे काय? | What is Gratuity in Marathi

ग्रॅच्युइटी  ही  रक्कम कर्मचाऱ्याला पाच किंवा अधिक वर्ष कंपनीत काम केले असल्यास कर्मचाऱ्याला दिली जाते ग्रॅच्युइटी हा कर्मचाऱ्याच्या पगाराचा भाग असतो  जो की  रिटायरमेंट  किंवा कंपनी सोडताना दिली जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना एक आर्थिक समर्थन देता येईल याप्रकारे ग्रॅच्युइटी हा कायदा डिझाईन केलेला आहे.

ग्रॅच्युइटी कोणाला दिली जाते? | To Which Employees Gratuity will be given?

ग्रॅच्युइटी साठी खालील दिलेल्या काही मुद्दे  लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून आपण यासाठी पात्र आहात का हे पडताळून  पाहता येईल.

  • कर्मचारी त्याच्या/तिच्या सेवेतून निवृत्त झाला पाहिजे.
  • कर्मचाऱ्याने कोणत्याही एका कंपनीत संस्थेत 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला असेल तर.
  • कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी पात्र असावा.
  • जर कर्मचाऱ्याचे निधन झाले किंवा आजार किंवा अपघातामुळे अपंगत्व आले.

ग्रॅच्युइटी देण्यास कंपनीने नकार  केल्यास काय करावे ? | What to do if Gratuity is denied by Employer?

तुमची ग्रेट शेवटी 30 दिवसाच्या कालावधीत दिली गेली नाही तर तुम्ही सर त्याबद्दल कंप्लेंट रजिस्टर करू शकता ही तक्रार तुम्ही नियंत्रक प्राधिकरणाकडे लेखी नोंदवावी.

भारतीय दंड संहितेनुसार ग्रॅच्युइटी न देणे हा दंडनीय गुन्हा आहे मोहिनी एक त्याला तीन महिने कारावास किंवा दहा हजार ते वीस हजार दंड भरावा लागू शकतो.

ग्रॅच्युइटीचे नियम | Gratuity Rules in Marathi

ग्रॅच्युइटीचे नियम पेमेंट्स ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत तयार केले आहेत.

  • साधारणता एका कंपनीत 10च्या वरती कर्मचारी काम करत असल्यास त्या कंपनीला ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक असते पण जर 10 च्या खाली कर्मचारी असतील तरी तरीही हे लागू होते.
  • ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीत कमीत कमी पाच वर्षे काम केले पाहिजे.
  • कर्मचारी ग्रॅज्युएटीची मागणी रिटायरमेंटच्या आधीही करू शकतो फक्त त्याला पाच वर्षे त्या कंपनीमध्ये पूर्ण करावी लागतात.
  • कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युईटी दिली जाते आणि त्यामध्ये टॅक्स मधून सूट मिळते.
  • कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास ग्रॅच्युईटी मिळवण्याचा अधिकार असतो.
  • गैरवताना फसवणूक मारहाण या प्रकारामुळे जर कर्मचाऱ्यांची नोकरी गेली असल्यास त्याला ग्रॅच्युइटी मिळवण्याचा अधिकार नसतो.
  • दिवाळखोरीच्या बाबतीतही कंपनीला ग्रॅच्युईटी नाकारण्याचा अधिकार नसतो.

ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन | Gratuity Calculation

ग्रॅच्युएटी कॅल्क्युलेशन करण्यासाठी  कर्मचाऱ्याला  शेवटच्या  महिन्यात किती पगार मिळाला आणि त्याने किती वर्ष सर्विस केली  यापासून काढता येतो.

ग्रॅच्युएटी =  शेवटच्या महिन्यात मिळालेला पगार * (15/26) * सर्विस केलेली वर्ष

इथे 26 म्हणजे महिन्यातील काम केलेल्या दिवसांची संख्या आणि ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन 15 दिवसांसाठी  काढले जाते.

समजा तुमचा शेवटचा काढलेला मूळ पगार रु. 80,000 ज्या संस्थेसाठी तुम्ही 10 वर्षे आणि 4 महिने काम केले. आता, अशा परिस्थितीत तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल-

ग्रॅच्युएटी = शेवटच्या महिन्यात मिळालेला पगार * (15/26) * सर्विस केलेली वर्ष

ग्रॅच्युइटी = 80,000 * (15/26) * 10

ग्रॅच्युइटी = रु. 4.62 लाख

निष्कर्ष

पेमेंट्स ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 नुसार, दिली जाते कमीत कमी 5 वर्षे सर्विस केली असल्यास ग्रॅच्युईटी प्रदान केली जाते.  ही ग्रॅच्युईटी  रक्कम कर्मचाऱ्याला  रिटायरमेंट नंतर किंवा कंपनी सोडताना अपंगत्व आल्यास अथवा निधन झाल्यास नॉमिनीला दिली जाते. ही एक लाभ योजना मानली जाते जी कर्मचाऱ्याला त्याच्या/तिच्या सेवानिवृत्तीदरम्यान मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

शेअर करा

Leave a Comment