फिनटेक मराठी माहिती | FinTech Marathi Information
तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे.व्यवहार करणे सोप्पे जाते. आपण डिजी लॉकर अशा संकल्पना जेव्हा समजून घेतो,तेव्हा फिनटेक शब्द आपल्या समोर येतो.फिनटेक या शब्दाचा जर आपण शब्दशा अर्थ घेतला तर,वित्तीय तंत्रज्ञान कंपन्या होय,असा अर्थ होतो.आजच्या लेखात आपण फिनटेक विषयी सविस्तर जाणून घेऊया.
अनुक्रमणिका
फिनटेक या शब्दाचा नेमका अर्थ काय?| What exactly does the term fintech mean?
फिनटेक हा शब्द एक इंग्रजी शब्द आहे.फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही शब्दांना एकत्र करून फिनटेक शब्द तयार होतो.इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत, जे दोन शब्द एकत्र करून बनविलेले आहेत.त्यातील एक आहे फिनटेक.
फायनान्स म्हणजेच वित्तीय सेवा होय.आता या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान वापरले जाऊन लागले आहे.यामुळे काम सोपे झाले आहे.पी २ पी सेवा म्हणजे व्यक्ती ते व्यक्ती थेट व्यवहार करणे देखील टेक्नॉलॉजीमुळे सोप्पे झाले आहे.पी२ पी व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी देखील खास अॅपलिकेशन बनविले जाते.हे सर्व फिनटेक मध्ये येते
कोविड काळानंतर पेमेंटसाठी देखील मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार केले जाऊ लागले.काही डिजिटल व्यवहार हे मोफत असतात तर काही अगदी नाम मात्र शुल्क घेतात.पेमेंट करण्याची सोप्पी पद्धत,अतिशय जलद आणि सुरक्षित यामुळे आजकाल प्रत्येकजण कोणत्या तरी किमान एका अॅप्लिकेशनद्वारे पेमेंट करतो.
ग्राहकांच्या प्रतिसादामळे अनेक मोठं -मोठ्या फिनटेक कंपन्या बाजारात दाखल होत आहेत.उत्तम सेवा देखील देत आहेत.फिनटेक कंपन्याच्या अॅप्लिकेशनमुळे आर्थिक व्यवहार करणे अधिक सोप्पे झाले आहे.फिनटेकमुळे व्यवहार जलद,सुरक्षित आणि अधिक पारदर्शक बनले आहेत.
गुगलपे, फोन पे,भारत पे यासारखे अॅप सध्या भारतातील बाजारपेठ काबिज करत आहेत.या बरोबरच अनेक नवीन फिनटेक अॅप येत आहेत.यासाठी सरकारी धोरण देखील अनुकूल आहे.अनेक नवीन फिनटेक स्टार्टअप यशस्वी होत आहेत.
फिनटेक द्वारे कोणत्या सुविधा मिळतात? | Benefits of Fintech in Marathi
- सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला पेमेंट देवाण -घेवाण करणे अतिशय सोयीचे होते.फिनटेकद्वारे पैशांची देवाण -घेवाण करणे सोयीचे आहे.या सेवेसाठी सर्वाधिक फिनटेक सेवा वापरली जाते.
- मोबाईल बँकिंग,ई बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट करणे सोप्पे झाले आहे.
- पी टू पी म्हणजेच पर्सन टू पर्सन व्यवहार करता येतात.
- अनेक नवीन अॅप्लिकेशन निर्माण होत आहेत.
- उत्तम वित्तीय सेवा दिल्या जातात.
फिनटेक कंपन्यामुळे भारतातील अनेक वर्षा पासून चालत असलेली व्यवहारांची पद्धत बदल चालली आहे.आजच्या घडीला भारतामध्ये सर्वाधिक फिनटेक कंपन्या उदयाला येत आहेत.पुढील काही वर्ष हे अशा अनेक कंपन्या बाजारात येत राहतील.फिनटेक कंपन्यामुळे अर्थ व्यवस्था देखील अपडेट होत आहे.
फिनटेकची काही महत्वाची स्टार्टअप असलेली उदाहरणे
लेंडिंगकार्ट – पूर्वी कर्ज घेण्यासाठी दोनच पर्याय होते.बँक आणि सावकारी कर्ज.पण आता ऑनलाइन कर्ज देखील अगदी सहज मिळते.लेंडिंगकार्ट ही अशीच एक फिनटेक कंपनी आहे,जी लघु आणि मध्यम स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देते. या कंपनीची स्थापना २०१४ साली करण्यात आली. ही कंपनी मुख्यत्वे कर्ज देते. ग्राहकांना जलद कर्ज देणे हा या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे.
कमीत कमी अगदी मोजके कागदपत्रे घेऊन ऑनलाइन पद्धतीने अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला कर्ज मिळते. मुख्य म्हणजे संपूर्ण भारतात या अॅपचे कार्यक्षेत्र आहे.जेव्हा आपण उद्योग उभा करतो तेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा लागतो.खेळते भांडवल व्यापारासाठी उपलब्ध व्हावे यासाठी हे अॅप मदत करते.
मनीटॅप – मनीटॅप देखील एक आघाडीचे फिनटेक अॅप आहे.या अॅपच्या माध्यमातून देखील छोटी -मोठी म्हणजेच लघु आणि मध्यम कर्ज दिली जातात.२०१५ साली मनीटॅप या स्टार्टअप फिनटेक कंपनीची सुरुवात झाली.या कंपनीची एक विशेषता आहे,ती म्हणजे तुम्ही स्मार्टफोन आणि पॅन कार्ड दिले की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन तुम्हाला किती कर्ज द्यावे, किती हप्ते असावेत तसेच व्याजदर तुम्हाला शक्य आहे का? हे तपासले जाते.हे सर्व केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला कर्ज मिळते.हे अॅप तुम्हाला कर्ज देताना ऑनलाइन सर्व तपासणी करते आणि मग कर्ज मंजूर करते.या अॅपला
रिजर्व बँकची परवानगी आहे.बिगर बँकिंग फायनान्स अशी त्यांची नोंद आहे.
इंस्टामोजो – सन २०१२ साली या कंपनीची स्थापना झाली होती.छोटे-मोठे व्यवसाय यांना वाढविण्यासाठी तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही कंपनी वेब आणि मोबाईल याद्वारे प्लॅटफॉर्म निर्माण करून देते.व्यक्तिगत व्यवसाय वाढीसाठी मदत देखील करते.
रझोर पे – अगदी नाममात्र फी घेऊन या अॅपच्या माध्यमातून तुम्ही पैशांची -देवाण घेवाण करू शकता.छोट्या व्यवसाईकांना त्यांच्या ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
पाईन लॅब्स – ही कंपनी छोट्या व्यवसायिकासाठी अतिशय उत्तम रीतने टॅप अँड पे अशा प्रकारची पैसे स्वीकारण्याची सेवा उपलब्ध करून देते.या कंपनीने मागील काही वर्षात ३७०० शहरात साडेतीन लाखांहून अधिक व्यापाऱ्यांना वेगळ्या प्रकारेचे पीओए टर्मिनल उपलब्ध करून दिले आहेत. या मुळे व्यापारमध्ये देवाण -घेवाण करणे सोप्पे तर होतेच पण व्यवसाय देखील वाढतो.
पॉलिसीबाजार – पूर्वीच्याकाळी विमा काढणे थोडे अवघड होते.चांगला एजंट मिळाला तर तुम्हाला उत्तम पॉलिसी मिळत पण आता मात्र पॉलिसीबाजार या सारख्या अॅप आणि वेबसाईट यांच्यामुळे आपण एका वेळी विविध ब्रॅंडच्या पॉलिसी यांची तुलना करू शकतो.पॉलिसी बाजार ही भारतातील सर्वात मोठी विम्याची तुलना करणारी कंपनी आहे. या वेबसाईटवर तुम्ही गाडी, कोणतीही महागडी वस्तु,घर,दुकान आणि स्वताची देखील पॉलिसी काढू शकता.ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या प्रीमियमची देखील आठवण करून देते.येथे तुम्ही प्रीमियम देखील भरू शकता.
शिक्षा फायनान्स – जेव्हा आपले मुलं मोठे होत असते तेव्हा पालक त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जाच्या चिंतेत असतात.शिक्षा फायनान्स पालकांना शैक्षणिक पात्रतेनुसार कर्ज देते.या बरोबरच काही शिक्षण देणाऱ्या संस्था असतात यांना त्यांच्या संस्था वाढविण्यासाठी भांडवल लागते ते देखील उपलब्ध करून देतात.
सिम्पल पे – 2015 साली नित्यानंद शर्मा या व्यक्तीने सिम्पल पे हे फिनटेक अॅप सुरू केले.ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे.यामध्ये ग्राहक खरेदी केल्यानंतर 1 महिन्यानंतर पैसे देऊ शकतो. पूर्वी क्रेडिट कार्ड साठी हे पर्याय उपलब्ध होते, पण आता छोट्या व्यवसायिकांसाठी हे अॅप उपयुक्त ठरत आहे.
ई पे लेटर – तुम्ही आज खरेदी करा आणि 14 दिवसानंतर तुम्ही पैसे परत करा.हे या फिनटेक कंपनीचे घोषवाक्य आहे.अनेकदा आपल्याकडे पैसे नसतात पण खरेदी करण्याची इच्छा असते.अशा वेळी हे ई पेटर ग्राहकांना 14 दिवसांनंतर पैसे परत करण्याची सुविधा देते.छोटे व्यवसायिक आणि छोटे ग्राहक यांच्यासाठी अतिशय उपूयुक्त असे अॅप आहे. ‘
फिनटेक तंत्रज्ञान वापरताना घ्या ही काळजी- Take care when using fintech technology
आज भारतात अनेक फिनटेक अॅप बाजारात येत आहेत. प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तर काही तोटे देखील असतात.फिनटेक अॅपचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. जेव्हा तुम्ही असे काही फिनटेक अॅप वापरता तेव्हा तुम्हाला हे अॅप तुमच्या फोन मधील फोटो आणि इतर महत्वपूर्ण डेटा वापरण्याची परवानगी मागतात.हे अॅप तुमच्या खाजगी माहितीचा गैरवापर करू शकतात. आर्थिक व्यवहार करताना जर कोणतेही अॅप वापरत असाल तर आधी सर्व माहिती करून घ्या नंतर मग वापरा.