चारचाकी वाहन कर्ज माहिती मराठी | Car Loan Information in Marathi

Car Loan म्हणजे काय ? Car Loan in Marathi , कार लोन व्याजदर, Car loan Documents in Marathi, गाडी लोन, वाहन कर्ज योजना

Car Loan Information in Marathi (चारचाकी वाहन कर्ज माहिती मराठी) –  प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपले स्वताचे एक सुंदर घर असावे, त्या घरासमोर एक छोटी-मोठी कार म्हणजेच एखादी चार चाकी असावी. चार चाकी वाहनामुळे माणसाचे आयुष्य सुखवाह बनते. अनेकजण चार चाकी वाहनाला घरातील सदस्याप्रमाणे मानतात. आदीच्या काळात कार घेणे अतिशय खर्चीक मानले जात कारण,कार घेण्यासाठी एक रक्कमी पैसे लागत मात्र आता तसे राहिले नाही, कार लोनमुळे कार घेणे सोप्पे झाले आहे. आता अनेक बँका आणि फायन्यास कंपन्या अतिशय सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देतात. जर तुमचे कर्ज सुलभ असेल तर तुम्हाला त्यांचा ताण जाणवत नाही.

अनुक्रमणिका

कार लोन (चारचाकी वाहन कर्ज) म्हणजे काय | What is a Car Loan?

ज्या प्रमाणे घर घेण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी आपल्याला कर्ज मिळते,त्या प्रमाणे चार चाकी वाहन घेण्यासाठी देखील कर्ज मिळते. कार घेण्यासाठी कंपन्या नवीन आणि जुन्या म्हणजेच सेकंड हँड अशा दोन्ही कार वर कर्ज उपलब्ध करून देतात. या दोन्हीसाठी व्याजदर वेगळा असतो, जसे की नवीन कार घेण्यासाठी 9.25 -13.75 तर जुन्या चार चाकी वाहनांसाठी 12.50 ते 17.50 इतका व्याजदर असतो.

कार लोन कोणाला मिळू शकते? | Who can get a car loan?

 कार लोन घेण्यासाठी काही बाबी स्पष्ट आहेत , जसे की तुमचे वय, तुमचे उत्पन्न, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची नोकरी कोणत्या पद्धतीची आहे, तुमचा पगार किती आहे या बाबीवरुन कार लोन मिळते. तुम्हाला स्वताला किंवा व्यवसायासाठी जर कर घ्यायची असेल तर दोन्हीसाठी तुम्हाला कर्ज मिळते.  तुमचे वय हे 18 ते 65 यामध्ये असावे.

कार लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for a car loan

  • ओळख पत्र ( आधार कार्ड, पासपोर्ट, ड्राईविंग लायसन्स इत्यादी)
  • मतदान ओळख पात्र
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • गाडीचे कागद पत्रे
  • मागील तीन महिन्याचे सॅंलरी स्लिप
  • मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • आयकर भरलेली पावती

हाइपोथेकेशन म्हणजे काय? | What is hypothecation?

जेव्हा तुम्ही कार घेता आणि ती कार घेताना जर तुम्ही लोन घेतलेले असेल तर ती कार त्या लोन देणाऱ्या बँकेची किंवा कंपनीची असते, जेव्हा तुम्ही त्या कारचे संपूर्ण लोन फेडता तेव्हा ती कार पूर्णपणे तुमची असते, जर काही कारणास्तव तुम्हाला कर्ज फेडणे शक्य झाले नाही तर ती कार जप्त करण्याचे अधिकार त्या बँकेकडे किंवा लोन देणाऱ्या कंपनीचे असतात. जर कर्ज फेडण्यास तुम्ही असमर्थ झाला तर ती बँक किंवा कंपनी तुमची गाडी पुन्हा घेऊन जातात.  या सर्व प्रोसेससाठी हाइपोथेकेशन लेटर लागते, हाइपोथेकेशन लेटर हे कार रजिस्टर करण्याच्या प्रोसेस मधील अतिशय महत्वाचा भाग आहे. एकदा तुम्ही कर्ज फेडले की तुमच्या रजिस्टर पेपर्सवरन कर्ज देणाऱ्या बँकेचे हायपोथिकेशन हटविले जाते. हाइपोथेकेशन हटवण्यासाठी तुम्हाला संबंधित रजिस्टेशन  ट्रांसपोर्ट ऑफिस मधून एनओसी घ्यावे लागते. यासाठी तुम्हाला कार इन्शुरन्स पेपर आणि अॅड्रेस प्रूफ लागतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कर्ज देणाऱ्या कंपनी कडून तुम्हाला एनओसी घेणे गरजेचे आहे. एनओसी इन्शुरन्स कंपनीला देऊन तुम्हाला नवीन मालकांच्या नवे इन्शुरन्स पेपर करावे लागतात.

कार लोनची रक्कम कशी मिळते | How to get a car loan

कार लोन घेण्यासाठी तुमचे वय, तुमचे उत्पन्न यावर तुम्हाला कार लोन दिले जाते . हे सर्व कार लोन देणारी कंपनी ठरविते, यासर्व गोष्ट तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे यावर ठरविले जाते. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार ते सहा टक्के तुम्हाला कार लोन मिळते.  कार च्या किंमतीच्या 80-90 टक्के लोन तुम्हाला मिळते. काही बँका आणि कंपन्या 100 टक्के फायन्यास देतात. यासाठी कारची एक्स शोरूम प्राइज आणि ऑन रोड प्राइज ठरविली जाते.

कार लोनसाठी असणारे व्याजदर | Interest rates for Car Loans

कार लोनची रक्कम कर्ज देणाऱ्या कंपन्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजेच एमसीएलआर या शिवाय काही इतर चार्जस देखील लावले जातात. बऱ्याचदा हे दर निर्धारित असतात. त्यामुळे कर्ज फेडणे सोप्पे होते.

जर तुम्हाला वाटतं असेल की भविष्यात कार लोनचे व्याज दर कमी होणार आहेत,तेव्हा तुम्ही फ्लोटिंग रेट देखील घेऊ शकतात. सध्या व्याज दर हा 10.30 ते 15.25 टक्के इतका आहे. काही कंपन्या महिलांना कार लोनसाठी व्याजदरात सूट देखील देते.  कर्ज घेताना कधीही नवीन कारसाठीच घ्यावे, जुन्या गाडीसाठी कर्ज काढू नये. सेकंड हँड गाड्यांवर कर्ज घेणे परवडत नाही. कारण त्यासाठी अधिक व्याजदर असतो.

कार लोन करताना कोणते खर्च असतात | What are the costs involved in getting a Car Loan?

  • जेव्हा तुम्ही बँकेकडून लोन घेता तेव्हा तुम्हाला बँक अनेक चार्जस लावते.
  • जेव्हा तुम्ही आवेदन करता तेव्हा आवेदन फी म्हणजेच प्रोसेसिंग फीस
  • जेवढे तुम्ही कर्ज घेता त्यांच्या 0.4 -1 टक्के ही फी असते.
  • जर तुम्ही मुदतीपूर्व लोन फेडणार असाल तर बँक त्यांची देखील वेगळी फी लावते.
  • काही बँक ही फी पाच ते सहा टक्के अधिक लावतात तर काही बँका याबाबत काहीच चार्ज लावत नाहीत.
  • काही बँक कार लोन फेडण्यासाठी पार्ट पेमेंट ही सुविधा उपलब्ध करून देतात, म्हणजेच काय तर तुमच्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हा लोनचा काही हिस्सा फेडू शकता. काही बँक प्रीपेमेंटवरती देखील वेगळे चार्ज लावतात जसे की पहिल्या छहा महिन्याच्या आत तुम्ही प्रीपेमेंट करू शकत नाहीत.

लोन परतावा – Car Loan Repayment

कार लोन शक्यतो एक ते सात वर्षा पर्यत दिले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळे पूर्वी देखील लोन फेडू शकता.

कार लोन घेताना ही काळजी घ्या | Precautions while taking a Car Loan

  • अधिक बँका या एसयूवी आणि एमयुवी या सारख्या गाड्यांना फायनान्स करतात.  कार लोन घेताना आदी कोणत्या गाडीवर बँक किती कर्ज देते हे तपासून पहा.
  • कार तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या नावावर घेतलेली असेल तर त्या व्यक्तीला इनकम टॅक्स मधून कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही. कारण कारसाठी कोणतेही टॅक्स बेनिफिटस नाहीत.
  • लोन फेडतान तुम्हाला लोनवर दिलेले व्याज देखील पकडावे लागते.
  • कार लोनसाठी किती वेळ लागतो- कार लोन मिळणे अतिशय सोप्पे आहे. जर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्हाला केवळ  एक आठवड्यांमध्ये कार लोन मिळते.
  • कार लोन घेताना सर्वात आधी तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे, त्यांची सर्व माहिती काढावी. त्या गाडीची किंमत  आहे, त्या गाडीसाठी किती कर्ज मिळते. या सर्व बाबीची माहिती काढावी.
  • अनेकदा बँक देखील कार लोन घेण्यासाठी काही विशेष ऑफर ठेवत असतात, अशा काही ऑफर असतील तर त्यांची देखील माहिती काढावी. यामुळे प्रोसेसिंग फीस देखील कमी होऊ शकते.
  • कार लोन घेताना दोन- तीन बँका यांची तुलना करावी.

अनेकदा अनेक कार शो रूम आणि बँका यांचे देखील टायअप केलेले असते. त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळणे सोप्पे होते.

मी जुन्या कारसाठी कर्ज घेऊ शकतो का? – Car Loan on Old Cars

हा प्रश्न अनेकदा लोकांकडून विचारला जातो. जुनी गाडी विकत घेण्यासाठी तो कर्जही घेऊ शकतो की नाही, येथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आता अनेक बँकांनी जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठीही कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. SBI सारख्या बँकेतून तुम्हाला 5 वर्ष जुनी कार खरेदी केल्यावर कर्जही दिलं जातं. परंतु येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे. की जुनी कार खरेदी केल्यावर मिळालेल्या कर्जावरील व्याजाचा दर नवीन कार खरेदी करण्यापेक्षा जास्त असेल.

माझे कार कर्ज फेडण्यापूर्वी मी माझी कार बेंच करू शकतो का?

अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते. की आम्हाला आमच्या मौल्यवान वस्तूही विकाव्या लागतात. हा प्रश्नही तुमच्या मनात असेल तर कार लोन फेडण्यापूर्वी तुम्ही तुमची कार विकू शकत नाही. कारचं कर्ज भरल्यानंतरच तुम्ही तुमची कार विकू शकता. कार लोन घेताना कार बँकेच्या नावाने गृहीत धरली जाते.

निष्कर्ष (Conclusion)

कार लोन मिळेन इतके अवघड राहिलेले नाही. अनेक बँका अगदी सहज कार लोन देतात पण कार लोन घेताना सर्वात आधी तुम्हाला चार चाकी वाहन घेणे गरजेचे आहे का? हे देखील तपासून पाहावे. कारण कार लोन घेऊन विषय संपत नाही. कारसाठी पेट्रोल,डिझेल लागते. या बरोबरच कर्जाचे हप्ते फेडणे शक्य आहे का? कारचा विमा काढणे देखील जमणार आहे का हे देखील तपासावे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

कार लोन कोणाकडून मिळू शकेल?

कोणत्याही सरकारी बँकेकडून किंवा खासगी कंपनीकडून तुम्ही कमी व्याजात कार लोन सहज मिळवू शकता.

कार लोन घेण्यासाठी तुमचे वय किती असावे?

कार लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान २१ वर्षे आणि ४० वर्षांपेक्षा जास्त असावे.

कार लोन भरल्यावर करात सूट आहे का?

कार कर्ज भरल्यास कोणत्याही प्रकारची करसवलत मिळत नाही.

शेअर करा