कॅन्सल चेक म्हणजे काय | Cancelled Cheque in Marathi
बँकिंग क्षेत्र दिवसेंदिवस सर्वानसाठी अधिक जवळचं होत चाललं आहे. प्रत्येक व्यक्ती हा बँकेशी जोडलेला आहे.पण आज देखील बँकेशी निगडीत अनेक गोष्टी आहेत, ज्या बद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते. गोष्ट छोटी असते पण महत्वाची असते.चेक हा शब्द देखील तसाच आहे. चेक मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक हा काय प्रकार आहे, हे आपल्याला माहीत नसते.
शेयर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करायचे असतील तर त्यासाठी डी- मॅट खाते उघडावे लागते. डी- मॅट खाते उघडण्यासाठी देखील तुम्हाला कॅन्सल केलेल्या चेकचा एक स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागतो. या बरोबरच अनेक वेबसाईटवर आपण काही नोंदणी करत असू तर तेव्हा देखील आपल्याला स्कॅन केलेल्या चेकची कॉपी जोडावी लागते.पण आपल्या मनात हा प्रश्न उभा राहतोच रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेकच का? सर्वात आधी आपण चेक म्हणजे काय ते समजून घेऊ.
अनुक्रमणिका
चेक म्हणजे काय? (What is a check?)
चेकला मराठीत धनादेश म्हणतात. पण चेक हा शब्दच वापरला जातो.चेक हा असा कागद आहे, ज्याचे मूल्य नोटा इतकेच आहे, किंवा त्याहून अधिक आहे.चेकद्वारे बँक खातेदार त्यांच्या खात्यातून थेट पैसे देऊ शकतो.चेक म्हणजेच काय तर रोख रक्कमेशिवाय पेमेंट करणे होय.
कॅन्सल चेक, रद्द चेक म्हणजे काय – (Cancel Cheque, What is Canceled Cheque)
कॅन्सल चेक हा काही वेगळा प्रकार नसतो. तो आपला नेहमीचा चेक असतो, फक्त आपल्या नेहमीच्या चेकवर कॅन्सल असे पेनाने लिहिलेले असते. आता तुम्ही विचार कराल मग या चेकचा उपयोग काय?जेव्हा एखाद्या चेकवर पेनाने कॅन्सल लिहलेले असते तेव्हा तो चेक रद्द झालेला असतो.त्या रद्द झालेल्या चेकवरुन फक्त त्या व्यक्तीच्या खात्यांची माहिती घेतली जाते,रोख रक्कम काढता येत नाही.त्या चेकद्वारे त्या व्यक्तीचा खाते नंबर,बँक, आयएफसी कोड, एमआयसीआर कोड, चेक क्रमांक तपासता येतो.
रद्द केलेला चेक कुठे वापरतात -(Where a canceled check is used )
रद्द केलेला चेक का वापरतात ही आपण वरती पहिले, पण रद्द केलेल्या चेकची नक्की कोठे गरज लागते हा देखील मोठा प्रश्न आहे. आता आपण पाहूया रद्द केलेला चेक नेमका कोठे वापरतात.
१. केवायसी अपडेट करताना तुम्हाला रद्द चेकची गरज लागू शकते.
२. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असते, तेव्हा त्यासाठी डी- मॅट खाते असणे गरजेचे असते. डी- मॅट खाते उघडण्यासाठी देखील तुम्हाला कॅन्सल किंवा रद्द केलेल्या चेकची गरज भासू शकते.
३. डी-मॅट खाते ऑनलाइन उघडले जाते, तेव्हा इतर कागदपत्रासोबत तुम्हाला कॅन्सल केलेला चेक देखील लागतो.
४. व्यवसायात गुंतवणूक करताना तेव्हा इतर काही खाती उघडायची असतील तर तुम्हाला कॅन्सलचेक लागतो.
५. काही ठिकाणी जर तुम्हाला पेमेंट येणार असेल तर तुम्हाला ते कॅन्सलचेक मागू शकतात. अनेकदा मोठी रक्कम असेल तर सर्व बाबीची तपासणी करण्यासाठी, अचूक खाते क्रमांक आणि इतर बँक खत्याविषयी माहितीसाठी कॅन्सलचेक लागतो.
६. जर तुम्ही एखादी पॉलिसी किंवा इतर बचत करत असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला कॅन्सल चेक लागू शकतो.
७. तुम्ही काही कर्ज घेत असाल, किंवा कोणती वस्तु ईएमआयवर घेत असाल तर तुम्हाला कॅन्सल चेक लागतो. जसे की पर्सनल लोन, मॉर्टगेज लोन, शैक्षणिक कर्ज, गोल्ड लोण, इत्यादी.
कॅन्सल चेक तयार कसा करायचा? How to create a canceled cheque?
- कॅन्सलचेक तयार करणे अतिशय सोप्पे आहे. कोणीही अगदी सहज कॅन्सल चेक तयार करू शकतात.कॅन्सल चेक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- रद्द केलेला चेक करण्यासाठी तुम्ही प्रथम एक पेन घ्या.पेनने चेकवर वरील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे पेनने रेषा काढा. रेषा काढताना काळजी घ्या. रेषा अशा काढा की त्या रबर इत्यादीने पुसल्या जाणार नाहीत.
- रेषा काढल्यानंतर तुम्हाला दोन ओळीमध्ये CANCELED लिहावे लागेल.फक्त तुमचा रद्द केलेला चेक पूर्ण झाला आणि आणि आता तुम्ही हा चेक कोणालाही देऊ शकता.तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
- सर्वात महत्वाची काळजी ही घ्यावी की चेक कॅन्सल करताना तो अगदी व्यवस्थित कॅन्सल झालेला असावा.नाहीतर त्यांचा गैरवापर होऊ शकतो.
- जर तुम्ही कोणाला कॅन्सल चेक देत असाल तर त्यांची सर्व नोंद चेक नंबरसह सर्व करून ठेवावी.कारण बँकेचे कोणतेही व्यवहार असो ते काळजीपूर्वक करायला हवेत. कारण त्यामध्ये आर्थिक धोका अधिक असतो.
तर आशा आहे कि तुम्हाला cancelled cheque कसा वापरतात आणि त्याचा उपयोग कुठे होतो याची संपूर्ण माहिती मिळाली असेल. तुम्हाला cancelled cheque बनवताना काही प्रश्न पडल्यास आमचा या पोस्ट ला नक्की भेट द्या आणि अशा महत्वाचा विषयांवर माहिती मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग ला व्हिसिट करा. धन्यवाद !