Gold ETF Information In Marathi, Gold ETF In Marathi, gold ETF meaning in Marathi, गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?
प्राचीन काळापासून सोने हे भारतीयांसाठी आकर्षण राहिले आहे. सोन्याचे दागिने, सोन्याचे सिक्के यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा देखील तिला माहेरून स्त्री धन दिले जाते. हे स्त्री धन म्हणजे सोने होय. साडे तीन मुहूर्त असो किंवा गुरुपुष अमृत आपल्याकडे एक ग्रॅम सोने घेणे शुभ मानले जाते. काळ बदल केला पण सोन्याचे आकर्षण कमी झाले नाही, उलट ते वाढतं आहे. सोने गुंतवणुकीमधील एक वेगळा प्रकार म्हणजे गोल्ड ईटीएफ. मागील लेखात आपण गोल्ड लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात आपण गोल्ड ईटीएफ विषयी जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
गोल्ड ईटीएफ म्हणजे काय? (What is Gold ETF?)
सोन्यामधील गुंतवणूक नेहमीच सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायला आवडते, त्यांच्यासाठी गोल्ड ईटीएफ एक उत्तम पर्याय आहे. गोल्ड ईटीएफ ही एक म्युच्युअल फंडाची एक योजना आहे. ज्यांना भौतिक रूपात सोने घेऊन संभाळणे शक्य नसते ते गोल्ड ईटीएफ खरेदी करू शकतात. गोल्ड ईटीएफ शेयर बाजारातील शेयर प्रमाणे खरेदी आणि विक्री केले जाऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर गोल्ड ईटीएफ म्हणजे डिजिटल सोने होय.
गोल्ड ईटीएफचे दर काय असतात (What are Gold ETF rates in Marathi?)
जेव्हा तुम्ही गोल्ड ईटीएफ मध्ये पैसे गुंतवता, तेव्हा ते तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातात. गोल्ड ईटीएफ फंड यांचे शेअर बाजाराच्या मूल्यांवर आधारित आहे. सोन्याच्या किंमतीच्या आधारावर गोल्ड ईटीएफचे दर कमी जास्त होत असतात. एकूणच काय तर सोन्याच्या बाजारातील किंमती यांच्यावर गोल्ड ईटीएफ चे दर आधारित असतात. एक ग्रॅम ते 10 ग्रॅम पर्यत किंवा त्याहून अधिक सोन्यावर तुम्ही गुंतवणूक करू शकता. भौतिक रूपात सोने तुमच्या हातात नसते पण गोल्ड ईटीएफ तुमच्याकडे असतात. तुम्हाला जेव्हा ते विकायचे असतात तेव्हा तुम्ही गोल्ड शेअर ब्रोकरद्वारे ते विकू शकतात. जर तुम्हाला सोने घ्यायचे असेल तुम्ही तुमचे हे ईटीएफ गोल्ड विकून सोने घेऊ शकतात.
गोल्ड ईटीएफमध्ये कशी गुंतवणूक केली जाते ( How to invest in Gold ETFs)
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने तुम्ही गोल्ड ईटीएफ बाजार किंमतीनुसार खरेदी करू शकता. गोल्ड ईटीएफ खरेदी विक्रीसाठी तुम्हाला डीमॅट खाते उघडणे गरजेचे आहे. शेअर ब्रोकरच्या मदतीने तुम्ही सिस्टमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅन करून गोल्ड ईटीएफ ऑनलाईन खरेदी करू शकता. अशा प्रकारे गोल्ड ईटीएफमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
ईटीएफ च्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक का करावी – ( Why invest in gold through ETFs )
- सर्वात आधी ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेंडड फंड होय.
- यामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला सोन्याच्या स्वरूपात मिळू शकतो.
- तुम्ही जेव्हा गोल्ड ईटीएफ खरेदी करता, तेव्हा तुमचे हे गोल्ड बॉन्ड आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात,त्यातून नफा मिळवला जातो.
- यामध्ये कोणताही घोटाळा होत नाही, सर्व काही तुमच्या समोर असते.
- अनेकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असते, पण त्यांना सोने खरेदी करायला आवडत नाही, ते सांभाळणे जोखीम वाटते अशा लोकांसाठी गोल्ड ईटीएफ उत्तम पर्याय आहे.
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी- (Invest in Gold ETFs)
- सर्वात आधी शेअर ब्रोकर च्या सहायाने ऑनलाइन डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा.
- ब्रोकरच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगइन करून गोल्ड ईटीएफ आणि फंडस हा पर्याय निवडा.
- तुम्हाला जितके ईटीएफ घ्यायचे आहेत, त्या नुसार त्यामध्ये पैसे गुंतवा.
- स्टॉक एक्सचेंज अंतर्गत गोल्ड ईटीएफच्या खरेदी तसेच विक्रीचा मेल तुम्हाला येईल.
- तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एका ठराविक काळानुसार ठराविक हप्त्यात नुसार नियमित स्वरूपात ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.
- दुसऱ्या दिवसा पासून तुम्ही खरेदी केलेले गोल्ड ईटीएफ तुमच्या खात्यात जमा होतात.
गोल्ड ईटीएफ खरेदीचे फायदे काय आहेत- ( Benefits of buying Gold ETFs in Marathi)
- गोल्ड ईटीएफ खरेदी तसेच विक्री करण्याची प्रक्रिया अतिशय सोप्पी आहे. तुम्ही स्वता किंवा ब्रोकरद्वारे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून ईटीएफची खरेदी करू शकता.
- गोल्ड ईटीएफ खरेदी केल्यानंतर तो लगेच विक्री करावा असे काही नसते. जितका अधिक वेळ गोल्ड ईटीएफ राहतो तितका अधिक फायदा तुम्हाला मिळतो.
- गोल्ड ईटीएफचा व्यवसाय हा सोन्याच्या वास्तविक किंमतीवर आधारित असतो. गोल्ड ईटीएफच्या किंमती सार्वजनिक रूपात उपलब्ध असतात.
- गोल्ड ईटीएफ डीमॅट खात्यात जमा असतात त्यामुळे त्यांची चोरी होण्याची शक्यता नसते. तसेच त्यासाठी वेगळी सुरक्षित जागा लागते असे काही नसते.
- गोल्ड ईटीएफ म्हणजे डिजिटल सोने होय, त्यामुळे त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता नसते. तसेच त्यांच्या वजनामध्ये घट येण्याची देखील शक्यता नसते. गोल्ड ईटीएफ अतिशय सुरक्षित असते.
- गोल्ड ईटीएफ मधून मिळणारे उत्पन्न हे अधिक काळासाठी लाभदायक असते.
- सिस्टमॅटिक इनवेस्टमेंट प्लॅन करून देखील प्रतिमहिना अगदी अर्ध्या ग्रॅम पासून तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात.
उत्तम गोल्ड ईटीएफ कोणते? (What is the Best Gold ETF?)
- इन्वेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ Invesco India Gold ETF
- केनरा रोबेको गोल्ड ईटीएफ Canara Robeco Gold ETF
- आईसीआईसीआई प्रूडेंशियल गोल्ड ईटीएफ ICICI Prudential Gold ETF
- युटीआई गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड स्कीम UTI Gold Exchange Traded Fund
- कोटक गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड स्कीम Kotak Gold Exchange Traded Fund
- एसबीआय गोल्ड ईटीएफ SBI Gold ETF
- एचडीएफसी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड HDFC Gold Exchange Traded Fund
- क्वांटम गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड स्कीम Quantum Gold Exchange Traded Scheme
- रीलायन्स ईटीएफ गोल्ड Reliance ETF Gold
योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा – How To Choose The Right Gold ETF in Marathi
शेअर बाजारात अनेक प्रकारचे गोल्ड ईटीएफ उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. भौतिक सोन्याच्या किंमतीमध्ये ज्या प्रमाणे चढ- उतार येतात त्यावर गोल्ड ईटीएफ आधारित असतो.त्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग एरर आणि ट्रेडिंग वॉल्युमवर लक्ष देणे गरजेचे असते. ज्या गोल्ड ईटीएफचा ट्रेकिंग एरर कमी आणि ट्रेडिंग वॉल्यूम अधिक असतो तो तुम्ही खरेदी करावा. यासाठी तुम्हाला 9.15 ते 3.30 पर्यतचा वेळ असतो ट्रेडिंग करण्यासाठी.
गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणुकीचे फायदे – Benefits of investing in Gold ETFs in Marathi
- गोल्ड ईटीएफ थेट तुमच्या डीमॅट खात्यामध्ये जमा होते.
- ते साठवून ठेवण्याची जोखीम देखील नसते.
- गोल्ड ईटीएफमध्ये तुम्हाला हवे तितके युनिट तुम्ही खरेदी करू शकता.
- अगदी 40 -50 रुपयांपासून तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी करू शकता.
- गोल्ड ईटीएफ द्वारे घेतलेले सोने 99.5 टक्के शुद्ध असते.
- या सोन्याचा संपूर्ण देशांत एकच भाव असतो.त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता नसते.
- गोल्ड ईटीएफ खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची मजुरी द्यावी लागत नाही.
- गोल्ड ईटीएफ खरेदी करताना कोणताही टॅक्स देखील लागत नाही.
- विक्री करताना कोणतीही घट येत नाही.
- तुटणे, खराब होणे अशा जोखीम देखील नसतात.
गोल्ड ईटीएफ चे तोटे – Disadvantages of Gold ETFs in Marathi
- गोल्ड ईटीएफ युनिट खरेदीसाठी तुम्हाला ते ब्रोकरकडून ते खरेदी करावे लागते.त्यासाठी तुमचे डीमॅट खाते असणे गरजेचे आहे.
- ईटीएफ व्यवस्थापन करणारी कंपनी एएमसी व्यवस्थापनाचे पैसे घेते.
- गोल्ड ईटीएफमध्ये एसजीबी प्रमाणे गुंतवणुकीच्या रककमेच्या अडीच टक्के व्याज मिळत नाही.
गोल्ड ईटीएफसाठी लागणारे डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे – Documents required to open a Demat account for Gold ETF in Marathi
- पॅन कार्ड
- ओळख पत्र जसे की आधार कार्ड
- रहिवासी दाखला जसे की लाइट बिल
गोल्ड आणि गोल्ड ईटीएफमधील फरक काय आहे – What is the difference between Gold and Gold ETF
गोल्ड म्हणजेच सोने आपण भौतिक स्वरूपात घेतो. म्हणजे सोने पैसे देऊन आपल्या हातात घेतो. पण जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा त्या सोन्याला सांभाळण्याची जोखीम देखील तिककीच असते. तसेच जेव्हा आपण सोने घेतो तेव्हा ते काही 100 टक्के शुद्ध नसते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते. गोल्ड ईटीएफ मध्ये डिजिटल सोने होय. गोल्ड ईटीएफ हा म्युचुअल फंडाचा एक प्रकार आहे. गोल्ड आणि गोल्ड ईटीएफमध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे ते खरेदी केल्यानंतर तुमच्या हातात न येता, तुमच्या डी मॅट खात्यामध्ये ते जमा होते. गोल्ड ईटीएफ मध्ये तुम्हाला 99. 5 टक्के शुद्ध डिजिटल सोने मिळते. येथे भेसळ आणि फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी असते.
निष्कर्ष
एकूणच काय जर तुम्हाला भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल पण सांभाळण्याची जोखीम वाटतं असेल तर गोल्ड ईटीएफ अतिशय उत्तम पर्याय आहे. भौतिक सोने घेणे आणि गोल्ड ईटीएफ घेणे या दोन्हीचे देखील फायदे आणि तोटे आहेत. गुंतवणूक करताना योग्य अभ्यास आणि गरजेचे असेल तर मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून अनेक नागरिक गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहे. गोल्ड असो किंवा गोल्ड ईटीएफ दोन्ही मधून मिळणारा परतावा उत्तम असतो. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुंतवणूक करताना मार्केटचा अभ्यास करणे गरजेचे आहे.