शेअर मार्केट म्हणजे थोडक्यात कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची विक्री होणारे ठिकाण ज्याची विक्री स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून केली जाते शेअर मार्केट मध्ये प्रामुख्याने स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी विक्री केली जाते. भारतामध्ये प्रमुख दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ज्यांच्या मार्फत मार्केट चालवले जातात खरेदी विक्री केली जाते.
- BSE (Bombay Stock Exchange)
- NSE (National Stock Exchange)
अनुक्रमणिका
BSE
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याचा इंडेक्स हा सेन्सेक्स (sensex) असतो ज्यामध्ये तीस कंपन्यांचे पडताळणी केली जाते ज्यामध्ये तीस कंपन्यांच्या मार्केट रेट शेअर्स मार्केट रेट ठरवला जातो.
NSE
नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स हा निफ्टी (Nifty) असा ठरवला गेलेला आहे ज्यामध्ये 50 कंपन्यांचे नॉमिनेशन करण्यात आलेले आहे या निफ्टी चा आधार घेऊन या 50 कंपन्यांचा शेअर्सचा मार्केट रेट आपल्यासमोर येतो किंवा ठरवला जातो.
Types of Shares market trading | शेअर्स मार्केट ट्रेडिंग चे प्रकार
शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ट्रेडिंग केले जाते. ट्रेडिंग चे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया.
1) इंट्रा डे ट्रेडिंग (Intraday Trading)
इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी करून त्याच दिवशी मार्केट बंद होण्यापूर्वी ते विकावे लागतात हा प्रकार प्रामुख्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या एक्सपर्ट लोकांसाठी असतो जर तुम्ही नवीन शेअर मार्केट गुंतवणूकदार असाल तर इंट्राडे ट्रेडिंग ही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
2) स्कॅलपर ट्रेडिंग (Scalper Trading)
हा स्केल पर ट्रेडिंग हा प्रकार प्रामुख्याने शेअर विकत घेण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये शेअर विकत घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटाच्या आत मध्ये ते शेअर परत विकून टाकले पाहिजेत शेअर मार्केट मधला हा सर्वात जास्त जोखमीचा प्रकार आहे या पद्धतीची ट्रेडिंग प्रामुख्याने देशात एखादा नवीन कायदा अमलात आला किंवा आर्थिक क्षेत्रात एखादी मोठी बातमी पसरली गेली तर या पद्धतीची ट्रेडिंग केली जाते.
3) स्विंग ट्रेडिंग (swing Trading)/ शॉर्ट टर्म ट्रेडिंग (short term)
स्विंग ट्रेडिंग ही थोड्या वेळासाठी करण्यात येणारे ट्रेडिंग आहे ज्यामध्ये शेअर विकत घेतल्यानंतर त्याची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये करण्यात येते यानंतर काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी शेअरची किंमत वाढल्यानंतर आपण योग्य किमतीत ते स्टॉक विकून नफा मिळवतो या ट्रेडिंग प्रकारात जोखीम कमी असते आणि नफा सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळू शकतो
4) Long term Trading (लॉंग टर्म ट्रेडिंग)
एकदा शेअर खरेदी केल्यानंतर जास्त काळ ते शेअर आपल्या अकाउंट मध्ये सेफ ठेवण्याच्या पद्धतीला लॉंग टर्म ट्रेडिंग असे म्हटले जाते यात गुंतवणूकदार विकत घेतलेले शेअर्स सहा महिने ते एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हे शेअर्स आपल्याजवळ सेफ ठेवतो आणि या कालावधीमध्ये जर विकत घेतलेला शेअर्सच्या कंपनी ज्या व्यवसायात वाढ झाल्यानंतर लॉंग टर्म ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदाराला मोठा नफा मिळतो अशाप्रकारे लॉन्ग टर्म ट्रेडिंग या ट्रेडिंग प्रकारात गुंतवणूकदाराला होणारी जोखीम ही अतिशय कमी असते त्यामुळे जे नवीन गुंतवणूकदार असतात त्यांना लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवण्याचा सर्वजण सल्ला देत असतात
Types of Shares | शेअर्स चे प्रकार
1. Equity Share
स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असणारे एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स जारी करत असते तेव्हा त्या शेअर्सला इक्विटी शेअर्स असे म्हटले जाते इतर शेअर्सच्या प्रकारांच्या तुलनेमध्ये या इक्विटी शेअर्सचे सर्वात जास्त विक्री केली जाते कारण या प्रकारचे शेअर्स सर्वच कंपन्यांनी सूचीबद्ध केलेले असतात
स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूकदार फक्त इक्विटी शेअर्स या शेअर प्रकारामध्येच गुंतवणूक करत असतात आणि व्यापार करत असतात याच कारणामुळे गुंतवणूकदार या प्रकारच्या शेअर्सला इक्विटी शेअर्स म्हणण्या ऐवजी फक्त शेअर्स असे म्हणणे पसंत करत असतात
2. Preference Share
प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर मध्ये असा काही फारसा फरक नसतो परंतु इक्विटी शेअर नंतर प्रेफरंट शेअर्सचे हमखास नाव घेतले जाते पण प्रेफरन्स शेअर होल्डर कंपनीच्या बैठकीत वोटिंग करू शकत नसल्यामुळे प्रेफरन्स शेअर होल्डर ला जास्त हक्क नसतो असे म्हणता येईल
प्रेफरन्स शेअर होल्डर व्यक्तीला जो नफा मिळणार असतो तो आधी पण पासूनच निश्चित केलेला असतो जो त्याला वर्षाच्या अखेरीस कंपनीद्वारे मिळतो हा एवढाच एक फरक प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअर मध्ये आहे
3. डीव्हीआर शेअर
डीव्हीआर शेर हा इक्विटी शेयर आणि प्रेफरन्स शेअर्स पेक्षा अतिशय वेगळा प्रकारचा शेर आहे कारण जो व्यक्ती डीव्हीआर शेअर होल्डर असतो त्याला इक्विटी शेअर होल्डर सारखे फायदे मिळतात पण त्यांना इक्विटी शेअर सारखे मतदानाचे हक्क मिळत नाहीत
या प्रकारचे शेअरचे धारक मतदान करू शकत नाहीत परंतु जर मतदान करायचे असल्यास त्याचे मतदानाचे हक्क हे निश्चित केले गेले आहेत ज्या ठिकाणी डीव्हीआर शेअर होल्डरला मतदान करण्याचा हक्क दिला जातो किंवा निश्चित केलेल्या ठिकाणीच या शेअर होल्डरला मतदान करता येऊ शकते
शेअर्स खरेदी करणे याचा अर्थ काय? | What Does is means to buy Shares?
सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुमचा एक मित्र आहे ज्याचा एक चांगला व्यवसाय आहे परंतु आता त्याला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे त्यासाठी त्याला अजून जास्त पैशांची गरज भासणार आहे त्यासाठी त्यांनी त्याच्या मित्रांकडे पार्टनरशिप साठी विचारलं म्हणजेच त्याने स्वतःच्या व्यवसायाचा ipo लॉन्च केला असे आपण म्हणू शकतो मग तुम्ही मित्राच्या व्यवसायाचा व्यवस्थितरित्या पाठपुरावा कराल आणि तुम्हाला कळेल की यात आपण जर पैसा इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला फायदा होणार आहे का त्यातच तुमच्या मित्रावर आधी काही कर्ज आहे का आणि सध्याच्या चालू मार्केट नुसार तो चालवतो तो व्यवसाय यापुढेही साथ देईल का? या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळत असतील तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याचे ठरवू शकता मग त्यामध्ये तुमच्यात आणि तुमच्या मित्रामध्ये एखादी डील होऊ शकते त्यानुसार 20 80 ची डील होऊ शकते म्हणजेच त्या पूर्ण व्यवसायामध्ये तुम्ही पैसा लावाल आणि तुम्हाला कोणत्याही काम न करता होणाऱ्या प्रॉफिट मधून 20% पैसा मिळू शकतो आणि तुमचा मित्र या सर्व तुमच्या अटींना मान्य करतो यालाच शेअर मार्केट असं म्हणता येईल
यावरील प्रक्रियेला आपण शेअर मार्केट म्हणू शकतो म्हणजेच तुम्ही एखाद्या व्यवसायाचे काही शेअर्स विकत घेता आणि तेवढ्या टक्क्यांमध्ये त्या व्यवसायाचे भागीदार होता याचा अर्थ असा होतो
समोरच्या कंपनीमध्ये एखादा व्यक्ती किती पैसे गुंतवतो त्यानुसार तो व्यक्ती त्या कंपनीच्या काही टक्के भागाचा मालक बनतो याचा अर्थ असा की भविष्यामध्ये जर तुम्ही शेअर होल्डर असलेली कंपनी जास्त नफा कमवत असेल तर आपल्याला गुंतवलेल्या पैसा नुसार दुप्पट पैसे आपल्याला मिळू शकतात आणि जर तुम्ही शेअर होल्डर असलेली कंपनी तोट्यात जात असेल तर तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाही आणि तो पैसे तुम्ही गमावले असे तुम्हाला समजून चालावे लागते
समजा एखादी सूचीबद्ध कंपनी आपले शेअर्स आपले एकूण दहा लाख शेअर्स आहेत असे स्पष्ट करते त्या कंपनीच्या ऑफरनुसार आपण सदर कंपनीचे जेवढे शेअर्स विकत घेत असतो तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे मालक बनत असतात आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचा वाटा इतर कोणत्याही खरेदी दारास कोणत्याही वेळी विकू शकता
जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स जाळी करते त्यावेळी कोणत्या व्यक्तीला किंवा एखाद्या विशिष्ट गटाला किती शेअर्स द्यायचे म्हणजे त्या गटाला किती शेअर्स विकायचे हे सदर कंपनीच्या निर्णयावर ही अवलंबून असू शकते तुम्हाला शेअर मार्केट मध्ये खरेदी अथवा विक्री करण्यासाठी विशिष्ट ब्रोकरची मदत घ्यावी लागते हे ब्रोकर्स म्हणजेच दलाल त्यांच्या कस्टमर कडून खरेदी विक्रीवर विशिष्ट कमिशन आकारात असतात
When one should buy Shares? | शेअर्स केव्हा खरेदी करावे?
शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला वरील माहिती मधून थोडक्यात कळालेच असेल परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक केव्हा करावी हे आपण आता या विभागामध्ये पाहूया
शेअर मार्केट मध्ये केव्हा आणि कशी गुंतवणूक करावी हे गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण याचे ज्ञान मिळाल्याशिवाय किंवा या गोष्टी चा शोध घेतल्याशिवाय जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही तुमच्या कष्टाने उभा केलेला पैसा अर्ध ज्ञानामुळे संपूर्णतः गमावून बसू शकता शेअर मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचा शेअर्सची रक्कम किंवा शेअर वाढला आहे किंवा घसरला आहे याची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे जिथे तुम्हाला याबाबत सर्व माहिती मिळू शकते
- Economic Times(News Paper)
- NDTV Business (TV Channel)
या वर्तमानपत्रामधून आणि टीव्ही चॅनल च्या मार्फत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता आणि रोजच्या रोज शेअर मार्केटची स्थिती जाणून घेऊ शकतो
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी | How to invest In share Market
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डिमॅट खाते तयार करावे लागते यासाठी दोन प्रकारे तुम्ही तुमचे डिमॅट खाते उघडू शकता
- एखाद्या तुम्ही ओळखीच्या ब्रोकर कडे जाऊन तुमचे डिमॅट खाते उघडू शकता
- आपण जवळच्या बँकेत जाऊन सुद्धा डिमॅट खाते उघडू शकतो
जसे आपण आपले पैसे बँक मध्ये साठवून ठेवत असतो त्याच प्रकारे आपल्या शेअरचे पैसे डिमॅट खात्यामध्ये जमा केलेले असतात जर एखाद्या व्यक्ती शेअर बाजारामध्ये कायम गुंतवणूक करत असेल तर त्याचे डिमॅट खाते चालू असणे हे खूप महत्त्वाचे आहे.
कारण तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेत असतात त्या कंपनीने अगर नफा कमवला तर त्या नफ्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात न जाता ते तुमच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतात आणि नंतर ते डिमॅट खाते हे तुमच्या सेविंग अकाउंट ला जोडलेले असते जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही ते डिमॅट खात्यावरील पैसे तुमच्या सेविंग खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता
डिमॅट खाते चालू करण्यासाठी तुमचे कोणत्याही एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सेविंग खाते उघडलेले असणे अतिशय महत्त्वाचे असते तसेच डिमॅट खाते उघडण्यासाठी पुरावा म्हणून तुमचा पॅन कार्ड आणि ऍड्रेस प्रूफ ची प्रत अतिशय महत्त्वाची मानली जाते
याबरोबरच तुम्ही तुमचे खाते एखाद्या स्टॉक ब्रोकर करून उघडवून घेतलेले असले तर त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो कारण गुंतवणूक करताना तुम्हाला त्यावेळी चांगला सपोर्ट मिळतो आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीनुसार तो तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर सुचवू शकतो ज्यामुळे तुम्ही चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवता आणि त्यामधून नफाही कमवू शकता परंतु हे स्टॉक ब्रोकर या कामासाठी कमिशन म्हणजेच ब्रोकरेज अमाऊंट आपल्याकडून घेत असतात
शेअर मार्केट डाऊन का होते?
शेअर मार्केट डाऊन होण्याचे सध्याच्या काळात अनेक कारणे आहेत त्यामधील काही कारणे आपण आता पाहूया
– तुम्हाला कदाचित माहित असेल की एखाद्या मोठ्या आपत्तीमुळे शेअर मार्केट डाउन होऊ शकते. मागच्याच काळात आलेल्या कोरोनामुळे बरेचसे व्यवसाय हे धुळीस मिळाले त्यामुळे ग्राहकांच्या वागणी कितीही मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि व्यवसायांच्याही बरेचसे नुकसान झाले यामुळे शेअर होल्डर्सनी मोठ्या प्रमाणावर आपले शेअर्स विकण्यास सुरुवात केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाले होते
– याबरोबरच एखाद्या ठिकाणी नवीन सरकार आले किंवा सरकारने नवीन आर्थिक धोरण आपल्यासमोर मांडले त्यावेळीही शेअर मार्केट डाऊन होऊ शकते
– आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर पुन्हा व्यवसाय थोडे फार सुरळीत झाल्यानंतर लोकांनी गुंतवणूक सुरुवात केली त्यामुळे शेअर मार्केटमध्ये चढता क्रम सुरू झाला होता
– परंतु पुन्हा एकदा सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे शेअर मार्केट पुन्हा ढासळले
या प्रकारे चालू असलेल्या घडामोडींवर शेअर मार्केट मुख्यत्वे अवलंबून असते आणि याच कारणामुळे शेअर मार्केटमध्ये चढ-उतार आपल्याला दिसून येतात
शेअर मार्केट टिप्स | Share market tips in Marathi
1) सर्वात प्रथम शेअर मार्केट बद्दल सर्व गोष्टी जाणून घ्या आणि मगच स्टॉक मध्ये invest करा..
जीवनात कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण त्या गोष्टीबद्दल सर्व अभ्यास करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वीही तुम्हाला मार्केटचा संपूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे अशा वेळी तुम्हाला प्रथम शेअर बाजार शिकायला हवे जर तुम्ही ते व्यवस्थितपणे समजून घेतले तरच तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित रित्या गुंतवू शकाल आणि शेअर मार्केटचे संपूर्णपणे व्यवस्थित ज्ञान घेतल्याशिवाय तुम्ही गुंतवणूक करू नयेत.
2) market research करणे
– मार्केट रिसर्च किंवा एखाद्या गोष्टीचे संशोधन ही गोष्ट ऐकल्यास काही लोक त्या गोष्टीतून पळवाट शोधण्यास प्रयत्न करत असतात ती गोष्ट शिकण्याचा कंटाळा करतात तसेच त्यामुळेच लोक फसतातही परंतु शेअर मार्केटच्या विचार केल्यास हे या ठिकाणी अजिबात करू नये कारण शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर मार्केट बद्दल रिसर्च करण्यात सक्षम असाल तरच तुम्ही यामध्ये यशस्वी होऊ शकता त्यामुळे प्रॉपर मार्केट रिसर्च ही गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
– आपण बऱ्याच वेळा एखाद्या टीव्ही चॅनेल वर किंवा बाजारपेठेतील एखाद्या ठिकाणी स्वतःला तज्ञ म्हणून घेणारे लोक पाहत असतो जे लोकांना शेअर मार्केट बद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न करू करत असतात आणि त्यांच्या मते ते अतिशय सहजतेने शेअर्सच्या किमतीचे अंदाज लावतात आणि एवढ्या सहजतेने अंदाज लावू शकत असतील तर ते घरी बसून पैसे कमवत असते टीव्ही चॅनल्सला पैसे देऊन त्यांनी स्वतःच्या क्लासेसची जाहिरात केली नसती त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः शिकण्याचा प्रयत्न करावा
– एखादा सामान्य माणूस अतिशय सहजतेने पैसे मिळतील म्हणून कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता किंवा कसलीही माहिती जाणून न घेता सरळ शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो आणि स्वतःचे मोठे नुकसान करून घेतो
– त्यामुळे आपण आपले मार्केट रिसर्च व्यवस्थित रित्या करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे ज्यामुळे प्रॉफिट झाला तर तुमचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि जर तुम्हाला नुकसान झाले तर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव मिळेल आणि ती चूक तुम्ही पुन्हा करू शकणार नाही आणि चूक सुधरवून पैसे कमवू शकाल आणि दुसरीकडे एखाद्या दुसऱ्याचा ऐकून तुम्हाला लॉस होऊ शकतो आणि मग पश्चाताप करत तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे सोडून द्याल
3) जोखीम समजून घेणे. (Risk Tolerance)
– यामध्ये जोखीम समजून घेणे अतिशय गरजेचे आहे म्हणजेच प्रत्येकाची स्वतःची जोखीम सहन करण्याची एक मर्यादा असते म्हण त्याचप्रमाणे तुम्ही किती पैशांपर्यंत इन्व्हेस्टमेंट मध्ये तोटा किंवा नफा घेऊ शकता या प्रकारचा तुम्ही रिस्क टॉलरन्स ठरवणे गरजेचे आहे.
4) long term goals सेट करा
– सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट कोणतीही असेल परंतु ती इन्व्हेस्टमेंट लॉन्ग टर्म कालावधीसाठी तुम्ही सेट करत असाल तरच तुम्हाला चांगल्या प्रकारात प्रॉफिट मिळेल त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना लॉन्ग टर्म गोल सेट करायला हवा.
5) भावनांवर नियंत्रण ठेवा
तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला तोटा होऊ शकतो आणि जर तुम्ही भावनांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवले तर तुम्ही लोकांसमोर बेस्ट इन्वेस्टर म्हणून तुमचा स्वतःचा ठसा उमटवू शकता
6) गुंतवणूक
– कोणाचेही ऐकून त्या भ्रमात जाऊ नका नेहमी त्याच कंपनीमध्ये पैसे गुंतवा ज्या कंपनीला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता आणि तुम्ही त्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात
Share market Books | शेअर मार्केट पुस्तके.
पुस्तकांचा वापर करून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची केव्हा करायची हे तुम्ही शिकू शकता आम्ही काही पुस्तकांची नावे खाली टाकत आहोत त्यामधून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता.
- The intelligent Invester
- Stock To reaches
- How to make Profit in Share Market?
- One up on wall street
- The Warren Buffet Way
तर तुम्हाला आजचा आमचा हा लेख कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या प्रकारच्या लेखांसाठी आमच्या ब्लॉगवर पुन्हा एकदा भेट देण्यास विसरू नका.
धन्यवाद…!