कार इन्शूरन्स म्हणजे काय ? वाहन विमा म्हणजे काय ? | मोटार (कार) विमा माहिती | Car insurance in Marathi
Car Insurance Information In Marathi – घरातील व्यक्तीसाठी ज्या प्रमाणे विमा काढतो, त्या प्रमाणे चार चाकी वाहनांचा देखील विमा काढला जातो. चार चाकी वाहन हे अतिशय महागडे येते. त्यामुळे त्यांचा विमा काढणे अतिशय गरजेचे आहे. सध्या अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे कार इन्शुरन्स ही सर्वात महत्वाची गरज आहे. तुम्ही जेव्हा एखादे वाहन घेता तेव्हा त्या वाहनांचा काळजीने इन्शुरन्स काढा.
अनुक्रमणिका
कार इन्शूरन्स म्हणजे काय ?| What is car insurance in Marathi
कार इन्शूरन्स किंवा वाहन विमा,मोटार इन्शूरन्स आणि ऑटो कार इन्शूरन्स देखील म्हणतात. कार इन्शूरन्स हे एक विमा कवच आहे, ज्यामुळे वाहन धारकाला आर्थिक संरक्षण देते. आपल्याकडे असलेल्या महागड्या वाहनाला काही अनपेक्षित आणि अपघात झाला तर धोक्यापासून सरक्षण मिळते.यामध्ये चोरी असो किंवा काही महत्वाचे गाडीचे पार्टस किंवा अनेकदा पाण्यापासून देखील नुकसान होते.या सर्वांचा समावेश कार इन्शुरन्समध्ये होतो. वाहनाला असलेला धोका आणि त्या पासून होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी कार विमा उपयुक्त आहे.
प्रत्येक व्यक्तीने कार इन्शुरन्स का घ्यावा?(Why Should Every Person Get Car Insurance?)
- आपल्या कारचा अपघात झाला तर कारची झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी वाहन धारक कार इन्शुरन्स काढतात.
- प्रत्येक व्यक्तीचे कार घेण्याचे स्वप्न असते, पण त्या बरोबरच कार इन्शुरन्स ही असलाच पाहिजे, ज्यामुळे तुमचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठी मदत होते.
- या बरोबरच इन्शुरन्स हा TPA (Third Party Insurance )असेल तर दुर्दवाने अपघात झालाच तर होणारी जीवितहानी आणि मालमत्ता नुकसानीसाठी सुद्धा आपल्याला संरक्षण मिळते.तसेच मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक संकट त्यातून आपल्याला वित्तीय संरक्षण मिळते.
- कार इन्शुरन्स असला की बरेच धोके त्यामध्ये कव्हर होतात.कार इन्शुरन्स मुळे एक प्रकारची काळजी दूर होते.
कार इन्शुरन्सचे प्रकार कोणते? | Types of car insurance in Marathi
- अन्यपक्ष समाविष्ट असलेला विमा | Third-Party Insurance
- सर्वसमावेशक विमा | Comprehensive Insurance
- पूरक किंवा अधिक विमा | Add-on Insurance Covers
1. अन्यपक्ष समाविष्ट असलेला विमा | Third-Party Insurance
नावातच अधिक माहिती येते, जसे की मोजकच विमा कव्हर केलेला असतो, यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या जीवित आणि मालमत्ता हानी करता सरक्षण मिळते, झालेल्या नुकसांनाची भरपाई दिली जाते. लक्षात घ्या या प्रकारच्या विम्यात स्वताच्या वाहनं किंवा जीवित हानीला आर्थिक संरक्षण मिळत नसतं.
2. सर्वसमावेशक विमा | Comprehensive Insurance
ह्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर असतात. अपघातात अन्य पक्षांना होणाऱ्या नुकसानीला देखील गरजेपुरते संरक्षण मिळते.या बरोबरच अपघात झालेल्या कारची नुकसान भरपाई, अपघात जखमी झालेल्या व्यक्तीचा दवाखान्याचा खर्च, यामध्ये नैसर्गिक आपत्ती जसे की पुर, भूकंप, सुनामी ,दंगल, जाळपोळ यांची देखील भरपाई मिळते.कारघेताना सर्व समावेशक भरपाई उपयुक्त ठरते.
सर्वसमावेशक इन्शुरन्सचे फायदे
- ह्यामध्ये आर्थिक सुरक्षितता कव्हर केली जाते.
- काही कायदेशीर बाबी जर उद्धभवल्या तर त्यांचा देखील खर्च यामध्ये मिळतो.
- ह्यामध्ये अपघातात झालेल्या कारची व वाहन मालकाला झालेल्या नुकसानाची देखील भरपाई मिळते.
- मानव निर्मित आपत्ती जसे की कारला आग लागणे,यांची देखील नुकसान भरपाई कव्हर केली जाते.
- शक्यतो सर्वसमावेशक विमा घेणे फायदेशीर ठरते.
3. पूरक किंवा अधिक विमा | Add-on Insurance Covers
वरील दोन्ही प्रकाराव्यतिरीक्त आपण अॅड ऑन या प्रकारचा विमा देखील काढू शकतो.अॅड ऑन विम्याला रायडर विमा देखील म्हणतात.
समजा तुमची कार रस्त्याच्या मध्येच बंद पडली तर तुम्ही जर हा कव्हर अॅड केला असेल तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुमची बंद पडलेली कार त्या ठिकाणी येऊन गाडी दुरुस्त करून देते.
इंजिन खराब असेल तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्या गाडीचे इंजिन बदलते.यासाठी तुम्हाला इंजिन रिप्लेसमेंट अॅड – ऑन कव्हरेज घेतले पाहिजे.
- नो क्लेम बोनस
- की प्रोटेक्शन कव्हर
- पर्सनल अपघात कव्हर
- डेली अलोवन्स बेनिफिट
- कारचे काही पार्टस
कार इन्शुरन्स काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for car insurance
कार इन्शुरन्स काढण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो,ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड,रहिवासी पुरावा,तुमच्या गाडीचे आरसी बुक देखील लागते.
कार इन्शुरन्समध्ये काय – काय मिळत नाही | What is not covered in car insurance
- जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची गाडी चालवत असाल आणि त्या गाडीचा कार इन्शुरन्स नसेल, आणि तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असेल तर तो इन्शुरन्स चालणार नाही.
- दारु किंवा ड्रग्स घेऊन जर व्यक्ती गाडी चालवत असेल तर कार इन्शुरन्स चालत नाही.
- कार चालवत असलेल्या व्यक्तीकडे जर गाडी चालविण्याचा परवाना म्हणजेच लाईसेन्स नसेल तरी देखील कार इन्शुरन्स चालत नाही.
कार इन्शुरन्स क्लेम कसा करावा ?( How to make a car insurance claim)
- दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही ऑनलाइन कार इन्शुरन्स क्लेम करू शकता.सध्या अनेक लोक ऑनलाइन कार इन्शुरन्स खरेदी करतात. तुम्ही ज्या कंपनीचा विमा खरेदी केला आहे, त्यांच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही विमा क्लेम करू शकता.
- अपघात झाल्यास किंवा गाडीचे नुकसान झाल्यास लवकरात- लवकर कार इन्शुरन्ससाठी तुम्ही कंपनीला कळवा अन्यथा तुमचा दावा फेटाळला जाऊ शकतो. शक्यतो 24-48 तासात दावा करावा.
- अनेक विमा कंपन्या ह्या कंपनी गॅरेज नेटवर्क देतात.याद्वारे कॅशलेस सुविधाद्वारे तुम्ही क्लेम करू शकता.जर तुम्ही ज्या परिसरात आहात तेथे जर हे कंपनी गॅरेज नेटवर्क नसेल तर तुम्ही कंपनी तुम्हाला भरपाई देखील देते.
कार विमा वापरताना ह्या गोष्टीकडे लक्ष दया( Pay attention to this when using car insurance)
1) नो क्लेम बोनस पूर्णपणे वापरा – जर वर्षभर तुम्ही क्लेम वापरला नसेल तर तुम्हाला पुढील वर्षात क्लेममध्ये काही विशेष सूट दिली जाते. तुम्ही हे आठवणीने पहा की तुम्हाला नो क्लेम बोनस मिळाला आहे का?
2) दावा सेलमेन्ट रेशो – कार इन्शुरन्स घेताना हे देखील पहा की तुम्ही ज्या कंपनीचा कार इन्शुरन्स घेत आहात त्यांनी किती दावे सेटल केले आहेत. ज्यांनी अधिक दावे सेटल केले आहेत,ती कंपनी तुमच्यासाठी योग्य आहे.
3) इन्शुरन्स वेळोवेळी नूतनीकरण करा – अनेकदा आप कार इन्शुरन्स पहिल्यांदा मोठ्या काळजीने काढतो, पण पुढील वर्षी त्यांचे नूतनीकरण करतच नाही.त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
कार इन्शुरन्स घेताना खालीलबाबीची काळजी घ्या | Points to consider while buying car insurance
- तुम्हाला जो कार इन्शुरन्स आवडला आहे,तो घ्या त्यांची इतर कार इन्शुरन्स सोबत तुलना करू नका.
- तुमची आर्थिक स्थिति कशी आहे, या नुसार कार इन्शुरन्स निवडा. तुमची आर्थिक स्थिति जर उत्तम नसेल तर फार महागडा कार इन्शुरन्स खरेदी करू नका. जर तुमची आर्थिक स्थिति उत्तम असेल तर मग तुम्ही जास्त कव्हरेज होणारा इन्शुरन्स निवडा.
- इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्यामध्ये काय -काय कव्हर होत आहे,यांची व्यवस्थित माहिती घ्या.
- क्लेम रेशो आणि क्लेम सेटलमेंट रेशो नक्की पहा.
- इन्शुरन्स असा निवडा ज्यामध्ये रोड साईट असिस्टंट, पर्सनल अकॅसिडेंट कव्हर केला जाईल.
कार इन्शुरन्स संदर्भात सतत विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions Regarding Car Insurance (FAQ)
कार इन्शुरन्स काढणे बंधनकारक आहे का?
कार इन्शुरन्स बंधनकारक नाही, पण काढणे अतिशय गरजेचे आहे.
कार इन्शुररन्स कार डीलरकडूनच काढावा का?
कार इन्शुरन्स कार डीलरकडून काढणे जरूरी नाही, तुम्ही बाहेरून देखील काढू शकता.
दर वर्षी वेगवेगळ्या कंपनीचे कार इन्शुरन्स घेऊ शकतो का?
हो आपण दरवर्षी वेगवेगळ्या कंपनीचे इन्शुरन्स घेऊ शकतो पण शक्यतो तसे करू नये. अधिक फायदे मिळत नाहीत.
कार इन्शुरन्स कसा काढावा
कार इन्शुरन्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने काढला जातो.
कार विमा काढताना काय पहावे ?
कार विमा काढताना तुमचे बजेट आणि तुमची गरज पाहून कार विमा काढा.