बँक ऑफ इंडिया गृह कर्जाची मराठीत माहिती | Bank of India Home Loan Information in Marathi

Bank of India home loan information in Marathi आजकाल लोकांचे घर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साहाजिकच लोक गृहकर्जाच्या शोधात असतात. अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी सोयीस्कर अश्या सोयीसुविधांसमवेत वेगवेगळ्या प्रकारची गृहकर्ज उपलब्ध करून दिली आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्जाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे बँक ऑफ इंडिया कर्ज योजना याची पूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास हा लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका.

अनुक्रमणिका

बँक ऑफ इंडिया गृहकर्जाची वैशिष्ट्ये – Bank of India Home Loan Features

१. गृहकर्ज ग्राहकांसाठी माफक शुल्कात उपलब्ध 

२. ग्राहकांसाठी खालील कारणांसाठी गृहकर्ज उपलब्ध-

  • घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या Plot (जमीन) च्या खरेदीसाठी
  • घरखरेदीसाठी
  • सदनिका नूतनीकरण, डागडूजी, अंतर्गत सजावटीसाठी

३. जास्तीत जास्त ५०० लाखांपर्यंत गृहकर्ज उपलब्ध

४. परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त ३० वर्षाचा 

५. स्पर्धात्मक व्याजदर

६. EMI द्वारे गृहकर्ज परतफेडीसाठी वेगवेगळा कालावधी आणि वेगवेगळ्या रक्कमेचे पर्याय

७. सहजसोपी कार्यवाही आणि प्रक्रिया

८. योग्य व्याज आकारणी

९. जलद प्रक्रिया आणि मंजुरी

१०. आगाऊ हफ्ता भरल्यास त्यावर अधिक शुल्काची आकारणी Floating व्याजदर पर्यायामध्ये केली जात नाही.

११. रोजच्या शिल्लकीवर व्याजदर आकारला जात असल्यामुळे कमी व्याजदराचा फायदा

१२. NRI व्यक्तीला तसेच भारतीय वंशाच्या व्यक्तीला गृहकर्जाचा लाभ

१३. मोफत वैयक्तिक अपघात विमा

१४. कर्जदाराच्या संरक्षणासाठी एक जीवन विमा संरक्षणचा पर्याय

बँक ऑफ इंडिया गृहकर्जाच्या योजना – Bank of India Home Loan Schemes

१. बँक ऑफ इंडिया स्टार होम लोन

  • व्याजदर- ६.८५% ते ७.३५% वार्षिक
  • व्याजदर हा CIBIL Personal Score वरती अवलंबून 
  • प्रक्रिया शुल्क- १.Individuals साठी- गृहकर्जाच्या ०.२५%- कमीत कमी १५००/- आणि जास्तीत जास्त २००००/-, २. Partnership Firms आणि Corporates साठी- गृहकर्जाच्या ०.५०%- कमीत कमी ३०००/- आणि जास्तीत जास्त ४००००/-
  • ४.३ कोटीपर्यंत गृहकर्ज उपलब्ध
  • मोफत वैयक्तिक अपघात विमा आणि पर्यायी जीवन विमा संरक्षणचा पर्याय ६.स्त्रियांना व्याजदरात सवलत

२. बँक ऑफ इंडिया स्टार डायमंड होम लोन

  • व्याजदर- ६.८५% ते ७.३५% वार्षिक
  • प्रक्रिया शुल्क हे Bank of India स्टार होम लोनप्रमाणेच
  • ३.५ कोटीपर्यंत गृहकर्ज
  • ४.१ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना तसेच कंपन्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • हे गृहकर्ज मेट्रो तसेच मेजर मेट्रो शहरांसाठी उपलब्ध आहे. 

३. बँक ऑफ इंडिया स्टार स्मार्ट होम लोन

  • व्याजदर- ६.८५% ते ७.३५% वार्षिक 
  • प्रक्रिया शुल्क हे Bank of India स्टार होम लोनप्रमाणेच
  • Bank of India मध्ये बचत खाते आणि डिपॉझिट खाते असणाऱ्यांसाठी हे गृहकर्ज उपलब्ध
  • नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कमीत कमी ५ लाखापर्यंत तर इतर ग्राहकांसाठी कमीत कमी १०लाखापर्यंत गृहकर्ज उपलब्ध
  • ५.३० वर्षांपर्यंतचा परतफेडीचा कालावधी

४. बँक ऑफ इंडिया स्टार प्रवासी होम लोन

  • व्याजदर- ६.८५% ते ७.३५% वार्षिक 
  • प्रक्रिया शुल्क हे Bank of India स्टार होम लोनप्रमाणेच
  • हे गृहकर्ज वैध्य पासपोर्ट असणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
  • ह्या गृहकर्जाची मर्यादा ५ कोटीइतकी आहे.
  • ५.३० वर्षांपर्यंतचा परतफेडीचा कालावधी

५. प्रधानमंत्री आवास योजना

  • घरगुती उत्पन्न आणि जागेच्या मोजमापणीवरती गृहकर्जाची रक्कम अवलंबून असते.
  • या योजनेमधील काही पर्यायांमध्ये ज्या मालमत्तेवर तुम्हीगृहकर्ज घेत आहात त्या मालमत्तेची मालक स्त्री असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेमध्ये जास्तीत जास्त १२ लाखांपर्यंत गृहकर्ज उपलब्ध आहे.
  • अनुदान टक्केवारी ही कमीत कमी ३% ते जास्तीत जास्त ६.५०% एवढी आहे.
  • या योजनेमध्ये परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त २० वर्षे एवढा आहे.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठीची पात्रता – Bank of India Home Loan Eligibility

बँक ऑफ इंडियाने प्रत्येक ग्राहकांच्या पात्रतेप्रमाणे ग्राहकांसाठी गृहकर्ज उपलब्ध करून दिले आहे. कोणत्या योजनेमधील गृहकर्ज कोणत्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ह्याचा उल्लेख त्या योजनेअंतर्गत वरील मुद्द्यामध्ये केला आहे. शिवाय बँक ऑफ इंडिया गृहकर्ज हे कोणत्या कारणांसाठी किंवा कामांसाठी ग्राहकांना उपलब्ध करून देते ह्याचा उल्लेख देखील वैशिष्ट्यांच्या मुद्द्यामध्ये केला आहे.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जाची प्रक्रिया – Bank of India Home Loan Process

बँक ऑफ इंडियामधून गृहकर्ज घेतानाची सहजसोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे.

१. बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या अर्जासोबत बँकेला हवी असणारी कागदपत्रे त्यासोबत जोडून तो अर्ज बँकेत जमा करावा.

२. अर्ज बँकेत जमा करताना बँकेने ठरवलेले प्रक्रिया शुल्क देखील त्यासोबत जमा करावे लागते.

३. बँक यानंतर जमा केलेल्या अर्जाची, त्यामध्ये दिलेल्या माहितीची योग्य ती पडताळणी करते व गरज पडल्यास अर्जदाराला शाखेत बोलावून अधिक माहिती घेतली जाते.

४. ग्राहकाच्या पात्रतेनुसार कर्जाची योग्य ती रक्कम ठरवण्यात येते.

५. त्यानंतर ऑफर लेटर तयार केले जाते. त्या लेटर मध्ये कर्जाची रक्कम, नियम व अटी ही माहिती समाविष्ट असते आणि त्यावर अर्जदाराची सही घेतली जाते. 

६. अर्जामध्ये उल्लेख केलेल्या संबंधित घराची किंवा जमिनीच्या कागदपत्रांची योग्य ती कायदेशीर पडताळणी केली जाते.

७. शिवाय बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याकडून किंवा सिव्हिल इंजिनीअरकडून संबंधित जागेची पडताळणी आणि योग्य तो अंदाज घेतला जातो.

८. योग्य त्या तांत्रिक तपासणीनंतर अंतिम करार पत्र बनवले जाते आणि त्यावर अर्जदाराची सही घेण्यात येते.

या सगळ्या प्रक्रियेनंतर अर्जदाराला बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेल्या गृहकर्जाचा लाभ घेता येतो. 

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी वयाची मर्यादा – Bank of India Home Loan Age Limit

बँक ऑफ इंडिया गृहकर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही कमीत कमी २१ आणि जास्तीत जास्त ६० अशी आहे. या सगळ्या कारणांमुळे Bank of India अर्जाबरोबर जमा केलेल्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केल्यावरच अर्जदाराला गृहकर्ज उपलब्ध करून देते.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे – Bank of India Home Loan Documents

बँक ऑफ इंडिया गृहकर्ज घेताना चौकशी करायच्या वेळी हवी असणारी कागदपत्रे बँक तुम्हाला सांगतेच. पण सर्वसाधारणपणे गृहकर्ज घेताना जी कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे दिली आहेत.

१. ओळखपत्र

ओळखपत्र म्हणून खालील कागदपत्रे तुम्ही जमा करू शकता.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • वाहन चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट

२. रहिवासी पुरावा

रहिवासी पुरावा म्हणून खालील कागदपत्रे तुम्ही जमा करू शकता.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन चालक पुरावा
  • मतदार ओळखपत्र
  • वीज देयक किंवा दूरध्वनी देयक

३. उत्पन्नाचा पुरावा

नोकरी करणाऱ्या अर्जदाराला अर्जासोबत उत्पन्नाचा पुरावादेखील जमा करावा लागतो. त्यासाठी खालील कागदपत्रे तुम्ही बँकेसोबत जमा करू शकता.

  • बँक स्टेटमेंट
  • नफा आणि तोटा स्टेटमेंट
  • आयकर परतावा पत्र
  • सॅलरी स्लिप

४. संबंधित जमिनीची कागदपत्रे

संबंधित जमिनीची कागदपत्रे देखील बँकेसोबत जमा करावी लागतात. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे दिली आहेत.

  • विक्री करार
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • विक्री करार
  • मालमत्ता नोंदणी दस्तऐवज

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क – Bank of India Home Loan Processing Fee

Bank of India चे प्रक्रिया शुल्क हे कर्जाची रक्कम, रोजगार पद्धती म्हणजेच नोकरी की स्वयंरोजगार आणि ग्राहकाचा CIBIL Personal Score यावर अवलंबून असते. Bank of India च्या गृहकर्जासाठी प्रक्रिया शुल्क खालीलप्रमाणे आकारण्यात येते.

१. Individuals साठी- गृहकर्जाच्या ०.२५% म्हणजेच कमीत कमी १५००/- आणि जास्तीत जास्त २००००/- रुपयांची आकारणी करण्यात येते.

२. Partnership Firm आणि Corporates साठी- गृहकर्जाच्या ०.५०% म्हणजेच कमीत कमी ३०००/- आणि जास्तीत जास्त ४००००/- रुपयांची आकारणी करण्यात येते.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी व्याजदराची आकारणी – Bank of India Home Loan Interest rate

Bank of India गृहकर्जावरील व्याजदर हा अर्जदाराची रोजगार पद्धती म्हणजेच नोकरी की स्वयंरोजगार, अर्जदाराचा CIBIL Personal Score यावर अवलंबून असतो. शिवाय महिला अर्जदारांना व्याजदरामध्ये विशेष सवलत देण्यात येते. सर्वसाधारणपणे वार्षिकरित्या ६.८५% ते ७.३५% या व्याजदराची आकारणी Bank of India कडून करण्यात येते.

बँक ऑफ इंडिया कर्जाची परतफेड

१. कर्जाची परतफेड करण्यासाठी ३० वर्षांपर्यंतचा कालावधी ग्राहकांना देण्यात येतो.

२. शिवाय ३६ महिन्यांपर्यंतचा स्थगिती कालावधी देखील देण्यात येतो.

३. नोकरी करणाऱ्या अर्जदारांनी सेवा निवृत्त होण्याआधी आणि इतर अर्जदारांनी वयाच्या सत्तर वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करावी.

४. निवृत्तीनंतर खात्रीशीर असे उत्पन्नाचे साधन उपलब्ध असल्यास नोकरी करणारा अर्जदारदेखील वयाच्या सत्तर वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करू शकतो.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जाचे फायदे – Bank of India Home Loan Benefits

१. सहजसोपी व जलद प्रक्रिया 

२. कर्जाच्या परतफेडीसाठी ३० वर्षांपर्यंतचा कालावधी

३. योग्य व्याजदराची आकारणी

४. घर खरेदी, बांधकाम आणि नूतनीकरणासाठी ५०० लाखांपर्यंत कर्जाची उपलब्धता

५. दैनंदिन शिल्लकीवर व्याजदाराची आकारणी

६. आगाऊ हफ्ता भरल्यास Floating व्याजदर पर्यायामध्ये अधिक व्याजदराची आकारणी केली जात नाही.

७. भारतीय वंशाच्या तसेच NRI व्यक्तीला देखील Bank of India गृहकर्जाचा लाभ घेता येतो.

८. ग्राहकांना त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार विविध कालावधीसाठी विविध रक्कमेमध्ये मासिक हफ्ते भरण्याचा पर्याय उपलब्ध

९. Bank of India गृहकर्जासाठी नोकरी करणारी, स्वयंरोजगार करणारी, Partnership Firm, HUF, Corporates हे देखील अर्ज करू शकतात.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जामध्ये आगाऊ हफ्ता भरल्यास असलेले शुल्क – Bank of India Home Loan Foreclosure Charges

Bank of India Home Loan चे Prepayment किंवा Foreclosure शुल्क हे खालीलप्रमाणे दिले आहेत.

१. Floating व्याजदराच्या पर्यायामध्ये Prepayment किंवा Foreclosure शुल्क आकारण्यात येत नाही.

२. Fixed व्याजदराच्या पर्यायामध्ये गृहकर्जाच्या ०.६५% ते २.२५% Prepayment किंवा Foreclosure शुल्काची आकारणी करण्यात येते.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी कस्टमर केअर आणि हेल्पलाईन नंबर – Bank of India Home Loan Customer Care Number

१. टोल फ्री नंबर- १८००२२०२२९ किंवा १८००१०३१९०६

२. शुल्क आकारण्यात येतील असा भारतातील कॉन्टॅक्ट नंबर- ०२२४०९१९१९१

३. शुल्क आकारण्यात येतील असा भारताच्या बाहेरील कॉन्टॅक्ट नंबर- ९१२२४०९१९१९१

बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठीची वेबसाईट – Bank of India Home Loan Website

बँक ऑफ इंडिया गृहकर्जाच्या अधिक माहितीसाठी https://www.bankofindia.co.in/homeloan या वेबसाईट ला भेट दया.

बँक ऑफ इंडिया गृहकर्जामुळे होणारा कर लाभ – Bank of India Home Loan Tax Benefit

इन्कम टॅक्स Act च्या Section ३७ Subsection १ च्या अंतर्गत गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर तुम्हाला कर लाभ मिळतो.

शेअर करा