वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? | Personal Loan Information in Marathi

Personal Loan Information in Marathi, वैयक्तिक कर्जाचे प्रकार, वैयक्तिक कर्ज पात्रता, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर,वैयक्तिक कर्जाचे फायदे, वैयक्तिक कर्जाचे तोटे, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज प्रक्रिया, पर्सनल लोन विषयी माहिती (Personal Loan Marathi Mahiti)

वैयक्तिक कर्ज माहिती (Personal Loan Marathi) – कर्ज हा शब्द जेव्हा आपण पाहतो किंवा वाचतो तेव्हा अनेक प्रश्न आणि शंका- कुशंका मनात येतात. सर्वात प्रथम आपण विचार करतो, कर्ज मला घेणे गरजेचे आहे का ? ते कर्ज मी फेडू शकेल का? कर्ज मिळण्यासाठी मी पात्र आहे का? या बरोबरच कर्ज कोणत्या बँकेकडून घ्यावे? कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा? असे असंख्य प्रश्न मनात येतात. सर्वाधिक लोक दोन कारणांसाठी कर्ज घेतात एक म्हणजे गृहकर्ज किंवा व्यवसायिक कर्ज. पण इतर कारणांसाठी देखील कर्ज तुम्हाला मिळू शकते, आज आपण अशाच वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

अनुक्रमणिका

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? (पर्सनल लोन) | Personal Loan in Marathi-

प्रत्येक बँकेमध्ये  अनेक प्रकारची  कर्ज दिली जातात. जशी तुमची गरज असते त्याप्रमाणे कर्ज मिळतात .कर्जाच्या प्रत्येक प्रकारात त्या त्या कारणांसाठीच ते कर्ज वापरता येते. जसे की तुम्ही गृहकर्ज काढले तर ते तुम्ही त्यासाठीच वापरू शकता. पण  वैयक्तिक कर्ज हा असा प्रकार आहे यासाठी तुम्हाला कारण सांगावे लागत नाही. व्याजाने पैसे पाहिजे असल्यास तुम्ही बँकेत यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला हे कर्ज काढण्यासाठी विशेष असे काही कारण द्यावे लागत नाही.

तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यात अगदी कोणत्याही कारणांसाठी हे कर्ज काढू शकतात. तुमच्या घरात कोणी आजारी असेल, तुम्हाला अगदी कोठे फिरायला जरी जायचे असेल तरी देखील तुम्ही हे कर्ज काढू शकता. कर्ज घेणाऱ्यावर सर्व काही अवलंबून आहे,की कर्ज कशासाठी घ्यायचे आहे. तुम्ही यापूर्वी जर अशा प्रकारचे कर्ज काढले नसेल तर तुमच्यासाठी हे आणखी सोप्पे आहे.

वैयक्तिक कर्जाचे प्रकार | Personal Loan Type

आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक  कर्ज  काढण्यासाठी तुम्हाला विशेष असे कारण बँकेला द्यावे लागत नाही. हे कर्ज सहज उपलब्ध होते. पण ग्राहकांना अधिक सोयीची व्हावे यासाठी वैयक्तिक कर्जाचे देखील काही प्रकार आहेत.

. वैवाहिक कर्ज (Matrimonial Debt) – घरात जेव्हा लग्नकार्य असते तेव्हा मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण जाणवतो. विवाह करताना अनेक खर्च होतात. जसे उत्तम कार्यालय, उत्तम केटरिंग, सजावट, कपडे, सोने इत्यादी गोष्टीसाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागते. त्यामुळे तुम्ही इतर नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याकडून मदत मागण्यापेक्षा  वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. कारण  चांगले लग्न करणे, हौस करणे हे देखील अनेकांचे स्वप्न असते. सर्वात आधी तुम्ही तुमच्या लग्नाचे बजेट काढून त्याप्रमाणे कर्ज काढू शकता.

२. पर्यटन कर्ज (हॉलिडे लोन) Holiday Loan – अनेकांना भटकंती करण्याची भारी हौस असते. अशाच हौशी लोकांसाठी अनेक बँका पर्यटन कर्ज देखील देतात. आता तुम्ही विचार कराल पर्यटन कर्ज काढण्याची का गरज? जेव्हा तुम्ही परदेशात फिरण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला फार मोठी रक्कम त्यासाठी खर्च करावी लागते, अनेकदा आपण कितीही बचत केली तरी आपण परदेश फिरून येऊ इतकी बचत करू शकत नाही. अशा वेळेस पर्यटन कर्ज तुम्हाला उत्तम पर्याय ठरू शकतो. पर्यटन कर्ज काढून तुम्ही विनाचिंता जग फिरू शकता. तुम्ही कर्ज काढून सुलभ हप्त्यामध्ये ते फेडू शकता. भारतात आणखी पर्यटन कर्ज जास्त काढले जात नाही. मात्र परदेशात लोक सर्रास असे पर्यटन कर्ज काढतात आणि जग फिरतात. 

 ३. फ्रेशर फंडिंग  कर्ज (Fresher Funding Loan) – नवीन नोकरी मिळाल्यानंतर लगेच तुमचे सर्वकाही व्यवस्थित नसते. तुम्हाला अनेक गोष्टी नवीन घ्याव्या लागतात. उत्पन्न अधिक नसते पण खर्च मात्र अनेक असतात अशा वेळेस अनेक बँका तुम्हाला फ्रेशर फंडिंग कर्ज देतात. यामुळे नोकरीच्या सुरवातीच्या काळात तुम्हाला मोठा आधार मिळतो. तुम्ही हे कर्ज अगदी सुलभ हप्ता भरून तुम्ही फेडू शकता. हे कर्ज सर्व बँका देतात असे नाही. काही मोजक्याच बँका हे कर्ज देतात. 

४. उच्च शिक्षणासाठी कर्ज (Education Loans)– तुमच्या मुलांना जर उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर अनेक बँका  वैयक्तिक कर्ज  या प्रकारात तुम्हाला कर्ज  देतात. या कर्जातून तुम्ही तेथील कॉलेजची फी, विमानाचे तिकीट यासारखे खर्च  भागवू शकता.

 ५. गृह सजावटीसाठी कर्ज (Home Renovation Loan) – अनेकदा आपण घर घेतो, त्या घरासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते देखील फेडतो, पण त्या नंतर आपल्या घराची उत्तम सजावट देखील करायची असते, किंवा घरांमध्ये काही बदल करायचे असेल तरी देखील मोठा खर्च होतो अशावेळेस अलीकडे अनेकजण   गृह सजावटीसाठी कर्ज  काढतात. तुम्हाला हे कर्ज काढण्यासाठी कोणतीच सीमा नाही. तुम्ही हे कर्ज सुलभ हप्त्यामध्ये फेडू शकता.

वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी पात्रता काय आहे? | Eligibility for Personal Loan

सामान्यता कर्ज घेण्यासाठी वय वर्ष २१ ते ६० वर्ष वय असावे. या बरोबरच भारतीय नागरिक असणे देखील गरजेचे आहे. या बरोबरच तुमचे मासिक उत्पन्न देखील चालू असावे. तुमचे मासिक उत्पन्न १८००० हजारांहून अधिक असावे. तसेच व्यवसायिक उत्पन्न १५००० हजारापेक्षा अधिक असावे.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअरची भूमिका | Credit score Role in Personal Loan

तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे असलयास क्रेडिट स्कोअर उत्तम असणे गरजेचे आहे. एखाद्या बँकेत जेव्हा तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा सर्वात आधी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. बऱ्याचदा  वैयक्तिक कर्ज घेताना व्याजदर देखील  क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. कर्जदारांची बँक प्रोफाइल कशी आहे यावर क्रेडीट स्कोअर अवलंबून असतो.

क्रेडीट स्कोअर हा तीन अंकी असतो. जो कर्ज मंजूर करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर चांगला मानला जातो. अथवा त्यापेक्षा कमी असेल तर तो खराब मानला जातो. क्रेडिट स्कोअर जर कमी असेल तर  कर्ज  मिळवण्यासाठी अडचणी येतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला लवकर कर्ज मिळेल.

वैयक्तिक कर्ज कुठे वापरले जाते? | Use of Personal Loan

जेव्हा तुमच्या मासिक कमाईमध्ये तुमचे खर्च  भागत नाहीत अशा वेळेस तो व्यक्ती कर्ज काढतो. कर्ज काढताना अनेक अडचणी येतात, अशा वेळेस वैयक्तिक कर्ज  हा एक उत्तम पर्याय ठरतो. वैयक्तिक कर्ज  म्हणजेच काय तर तुमच्या अतिशय महत्वाच्या गरजा भागविण्यासाठी काढलेले कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज  होय, यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाची शालेय फी भरायची आहे. औषधे घ्यायची आहेत,एखाद्या महागडी भेटवस्तू द्यायची आहे.काही घरगुती वस्तु घ्यायची आहे. शिक्षण, लग्न, प्रवास, वैद्यकीय खर्च, गॅझेटची खरेदी या सर्वांनासाठी वैयक्तिक कर्ज  वापरता येते.

वैयक्तिक कर्ज घेताना या गोष्टी माहिती करून घ्या | Things to consider while taking Personal Loan

सर्वप्रथम ज्या बँकेमध्ये तुमचे चांगले संबंध आहेत. जसे की तुमचे आधीपासून अथवा आहे. कर्ज घेण्यासाठी नेहमी भारत शासन मान्यता प्राप्त बँक अथवा संस्था मार्फत कर्ज घेण्यासाठी विचार करा.कारण केवायसी प्रक्रिया सुलभ होऊन कर्ज मिळण्यासाठीची प्रक्रिया जलद होऊन जाते. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी नेहमी भारत शासन मान्यता प्राप्त बँक व संस्था मार्फत कर्ज घेण्याचा प्रयत्न करा.

प्रायव्हेट लिमिटेड व पंतसंस्था मधून कर्ज घेत असाल तर पूर्ण खबरदारी घ्या. वैयक्तिक कर्जाचे व्याज दर, प्रक्रिया शुल्क दंड आणि बरेच काही तुलना करून ठरवा. कारण या सर्व गोष्टीचा तुमच्या बजेटवर परिणाम होतो. काही बँका कमी व्याजदर दाखवतात त्या नंतर प्रक्रियाशुल्क किंवा दंड या नावाखाली जादा रक्कम आकारू शकतात. अनेक बँका झीरो इंटरेस्ट, झीरो इएमआय, आकर्षक गिफ्ट्स या नावाखाली लोन देणाऱ्या बँकावर विश्वास ठेऊ नका. कारण या बँका छुपे अतिरिक्त पैसे घेतात. बँक कर्ज देताना तुम्हाला काही जाचक अटी तर घालत नाही ना हे तपासा.

वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम करणारे घटक | Factors affecting Personal Loan interest rates

जेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा  व्याजाचा दर हा मुद्दा देखील फार महत्वपूर्ण असतो.वैयक्तिक व्याजाचा दर हा प्रत्येक बँकेचा वेगळा असतो. उदा. जसे एसबीआय सध्या वैयक्तिक  कर्जासाठी ९.६० टक्के ते १५.६५ टक्के व्याज दर आकारत आहे. बँक ऑफ इंडिया १२.१५ टक्के इतका व्याजदर आकारते. जर तुम्ही नीट पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचा व्याजदर अधिक असतो.

वैयक्तिक कर्ज देताना बँका तुम्हाला तुमच्या पगारावर कर्ज देते. वैयक्तिक कर्ज घेताना ते अल्प काळासाठी घ्यावे. म्हणजेच काय अल्प मुदतीत ते फेडावे. जास्तीत जास्त चार वर्षा पर्यत ते परत करावे. जेव्हा तुम्हाला एखादी बँक कर्ज देते तेव्हा तुमच्या कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम करणारे काही घटक असतात जसे की तुमचा क्रेडिट स्कोअर फार महत्वाची भूमिका बजावतो तुमचा  क्रेडिट स्कोअर व्यवस्थित असावा. फार कमी नसावा. तुमचा  क्रेडिट स्कोअर हा 750 च्या वर असावा. तुम्ही मासिक उत्पन्न  देखील वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. जर तुमचे मासिक उत्पन्न चांगले असेल तर तुम्हाला बँक लवकर कर्ज देते तसेच बँकेला देखील तुम्ही लवकर कर्ज फेडाल ही खात्री असते.या बरोबरच तुम्हाला व्याजदर देखील कमी लागू होतो.

वैयक्तिक कर्ज का आणि केव्हा निवडावे? | Why and when to choose a Personal Loan

वैयक्तिक कर्ज मिळणे फार सोप्पे जरी असले तरी वैयक्तिक कर्ज घेताना ते घेणे गरजेचे आहेच का? यांचा देखील विचार करावा. उगाच गरज नसेल तर कर्ज घेऊ नये. कारण इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जावर अधिक व्याजदर असतो. त्यामुळे तुमची गरज आणि इतर बाबी तपासून वैयक्तिक कर्ज काढावे.

वैयक्तिक कर्जामध्ये किती कर्जाची रक्कम घेता येईल | Personal Loan eligible Amount

वैयक्तिक कर्ज तुम्हाला ४० लाखा पर्यत मिळू शकते. पण कर्ज किती देणे हे त्या बँकेवर अवलंबून असते. तुमची बँक तुम्हाला किती कर्ज देऊ शकते, तसेच तुम्ही  तुमच्या मासिक कमाईवर किती कर्ज काढू शकता हे देखील ठरलेले असते. त्यामुळे तुमचे मासिक उत्पन्न कर्ज घेताना अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण वैयक्तिक कर्ज देताना फक्त तुमचे मासिक उत्पन्न पाहिले जाते. ज्या प्रमाणे तुमचे मासिक उत्पन्न तेवढी रक्कम तुम्हाला बँक देते.

वैयक्तिक कर्जाचे फायदे | Benefits of Personal Loans

  • वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला काहीही तारण करावे लागत नाही.
  • वैयक्तिक कर्जासाठी कारण सांगणे गरजेचे नाही
  • कर्ज परत करण्यासाठी ६० महिन्यांचा कालावधी मिळतो.
  • कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता

वैयक्तिक कर्जाचे तोटे | Disadvantages of Personal Loan

  • वैयक्तिक कर्ज हे विनातारण असल्यामुळे ते असुरक्षित कर्ज आहे.
  • वैयक्तिक कर्जाचा व्याजदर अधिक असतो.
  • वैयक्तिक कर्जामध्ये जोखीम अधिक असते.

वैयक्तिक कर्ज अर्ज प्रक्रिया | Personal Loan application process

वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे असा प्रश्न बहुतेकांना पडतो. वैयक्तिक लोन पाहिजे असल्यास अर्ज करण्याचा दोन पद्धती आहेत, एक  ऑनलाइन पद्धती आणि दुसरी ऑफलाइन पद्धती.

१. वैयक्तिक कर्ज ऑफलाइन अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकता. तुम्ही जमा केलेली कागदपत्रे आणि तुमचा अर्ज हे  सादर केल्यानंतर बँक तुम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुमचे कर्ज सुनिश्चित करते.

२. वैयक्तिक कर्ज ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – जर तुम्हाला झटपट वैयक्तिक कर्ज पाहिजे तर ऑनलाइन अर्ज पद्धती ही सर्वात सोपी व जलद वैयक्तिक कर्ज मिळवण्याची पद्धत आहे. आता अनेक बँका अगदी घर बसल्या तुम्हाला काही मिनिटांत कर्ज उपलब्ध करून देतात. तुम्हाला ज्या बँकेचे कर्ज घ्यायचे आहे, त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक कर्ज हा पर्याय निवडून तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरून सबमिट करू शकता.

भारतातील पर्सनल लोन साठी सर्वोत्तम बँक | Best Bank for Personal Loans in India

  • एसबीआय बँक
  • एचडीएफसी बँक
  • आयसीआय बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ इंडिया

वैयक्तिक कर्ज अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for a Personal Loan

  • पत्यचा पुरवठा – लाईट बिल, पासपोर्ट, लायसन्स एग्रीमेंट
  • ओळखीचा पुरवठा – आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हीइंग लायसन्स, मतदार ओळखपत्र
  • उत्पन्नाचा पुरवठा
  • क्रेडिट स्कोअर
  • मागील तीन महिन्यांचे पगार स्लिप
  • मागील ३-६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

निष्कर्ष | Conclusion

वैयक्तिक कर्ज एकूणच संकटकाळात अतिशय उपयुक्त कर्ज पद्धती आहे. यांचे काही फायदे आणि तोटे आहेत. एकूण आपली गरज ओळखून कर्ज घ्यावे. तर मित्रांनो तुम्हाला Personal Loan Information in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल आशा करतो. काही प्रश्न असलयास कॉन्टॅक्ट पेज वरून आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद !!

शेअर करा