डिमॅट खाते माहिती मराठी | Demat Account Information in Marathi

Demat Account Information in Marathi | Demat account Marathi | डिमॅट अकाउंट म्हणजे काय ? डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे, opening process, benefits, What is demat account in marathi | Demat meaning in Marathi

Demat Account Mahiti Marathi – आजकाल Shares मध्ये व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जसे की पैशाच्या व्यवहारासाठी बँक खाते असजे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे Shares मध्ये व्यवहार करण्यासाठी तुमचे डिमॅट खाते असणे हे खूप गरजेचे आहे. पण अजूनही बऱ्याच जणांना डिमॅट खात्याबद्दल पुरेसे असे ज्ञान नसते. तुम्हाला डिमॅट खात्याविषयी संपूर्ण माहिती हवी असल्यास हा लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका. डिमॅट खात्याबद्दल जाणून घेण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे दिले आहेत.

अनुक्रमणिका

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? | Demat Account Meaning in Marathi?

डिमॅट खाते हे एक प्रकारचे बँक खाते आहे. Shares आणि Securities इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षितरित्या जमा करण्याचे एक खाते.. या खात्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या Shares आणि Securities मध्ये व्यवहार करायला सोपे जाते. शिवाय डिमॅट खात्यामुळे Shares आणि Securities बद्दलची महत्वाची कागदपत्रे आपण सुरक्षितरित्या जपून ठेवू शकतो. डिमॅट ह्या शब्दाचे विस्तारित रुप हे Dematerialisation असे आहे आणि Dematerialisation म्हणजेच Shares आणि Securitues चे रूपांतर भौतिक स्वरूपात करण्याची प्रक्रिया.

डिमॅट खात्याचा उपयोग काय? | What is the use of Demat Account in Marathi?

डिमॅट खात्याचा वापर हा तुमचे Shares आणि Securities इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना तुमचे डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. या खात्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या विविध कंपन्यांनी ऑफर केलेल्या Shares, Securities, Bonds, Mutual Funds, सरकारी Securities, विमा या सगळ्यामध्ये व्यवहार करू शकता. हे खाते तुम्ही केलेल्या ह्या सगळ्या व्यवहाराची माहिती अगदी सुरक्षितरित्या सांभाळून ठेवते.

डिमॅट खात्याचे प्रकार | Types of Demat Account

१. Regular डिमॅट खाते –

१. जे भारताचे नागरिक आहेत, भारताचे रहिवासी आहेत ते ह्या प्रकाराचे डिमॅट खाते वापरतात. 

२. या प्रकारच्या खात्याची सेवा ही NSDL (National Securities Depository Limited) आणि CDSL (Central Depository Services Limited) कडून Intermediaries, Depository Participants आणि Stock Brokers च्या सहाय्याने पुरवण्यात येते. 

३. हे खाते उघडण्यासाठीचे शुल्क त्या खात्यामध्ये केल्या जाणाऱ्या व्यवहाराची संख्या, तुम्ही कोणत्या प्रकाराला subscribe केले आहे, Depository आणि Depository Participant कडून घातल्या जाणाऱ्या अटी आणि शर्थींवरती अवलंबून असते. 

४. या खात्याच्या सहाय्याने तुम्ही Shares आणि Securities मधील व्यवहार हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 

५. या खात्याच्या साहाय्याने तुम्ही Shares हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवत असल्यामुळे नुकसान, चोरी आणि ते गहाळ होण्याचा धोका नसतो. 

६. या प्रकारचे खाते तुम्ही Joint holders मिळून देखील उघडू शकता.

२. Repatriable डिमॅट खाते –

१. Repatriable डिमॅट खात्याच्या साहाय्याने NRI (Non Resident Indian) व्यक्ती भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकते. ह्या प्रकारचे डिमॅट खाते हे NRI व्यक्तीसाठी खूप उपयुक्त असे आहे. 

२. या डिमॅट खात्याचा वापर करून NRI व्यक्ती विदेशी देशांमध्ये fund transfer करू शकते. Repatriable डिमॅट खाते open करण्यासाठी तुमचे अधिकृत NRE (Non-Residential External) बँक खाते असणे गरजेचे आहे. 

३. या प्रकारचे खातेदेखील तुम्ही Regular डिमॅट खात्याप्रमाणे joint holders मिळून उघडू शकता.

४. तुमच्या राहण्याच्या ठिकाणाचा काहीही फरक त्यावर पडत नाही. 

५. या प्रकारच्या खात्यासाठी नावनिर्देशन करण्याची सेवा असते.

६.NRI व्यक्तीला Repatriable डिमॅट खाते उघडायचे असल्यास त्या व्यक्तीला Foreign Exchange Management Act (FEMA) या कायद्याचे नियम पाळणे अनिवार्य आहे.

३. Non-Repatriable डिमॅट खाते

१. Non-Repatriable डिमॅट खाते हे सुद्धा NRI (Non-Resident Indian) व्यक्तींसाठी असते. 

२. पण या प्रकारामध्ये funds हे विदेशी खात्यामध्ये परस्पर transfer करता येत नाहीत. त्यासाठी अधिकृत NRO (Non Resident Ordinary) बँक खाते असणे गरजेचे आहे.

३. NRI व्यक्तीला ज्याचे उत्पन्न भारतामध्ये शिवाय विदेशामध्ये देखील आहे, अश्या व्यक्तीला त्यांच्या उत्पन्नाची नोंद ठेवण्यास कठीण जाते. त्यांना विविध देशांमधील बँक खाते सांभाळणे कठीण होऊन बसते. NRE आणि NRO बँक खात्यांमुळे त्यांचे हे कठीण काम सोपे होण्यास मदत होते.

डिमॅट खाते कोण Open करू शकतं? | Eligibility for opening Demat Account

१. भारतामध्ये २ Depositories अंतर्गत तुम्ही तुमचे डिमॅट खाते open करू शकता. त्या २ Depositories म्हणजे CDSL (Central Depository Services Limited) आणि NSDL (National Securities Depository Limited) 

२. डिमॅट खाते open करण्यासाठी तुमचे वय १८ पूर्ण असण्याची गरज नाही आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी वय असण्याचा कोणताही निर्बंध नाही आहे.

३. तुमचे Original पॅन कार्ड हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक महत्वाचे कागदपत्र आहे.

डिमॅट खाते Open करण्यासाठी लागणारी वयोमर्यादा | Age Limit for opening Demat Account

डिमॅट खाते open करण्यासाठी कमीत कमी वयाचे बंधन नाही आहे. प्रौढ आणि minor अश्या दोन्ही व्यक्ती या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. १८ वर्षाखालील व्यक्तीच्या नावावर त्या व्यक्तीचे डिमॅट खाते हे त्यांच्या पालकांकडून योग्य ती कागदपत्रे जमा केल्यानंतर open करता येते.

डिमॅट खाते Open करण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Required Documents for opening Demat Account

डिमॅट खाते open करण्यासाठी सर्वात महत्वाचे कागदपत्र हे तुमचं पॅन कार्ड आहे. त्या आधारावरच तुमचे डिमॅट खाते open केले जाते. या व्यतिरिक्त अजून काही कागदपत्रे डिमॅट खाते open करण्यासाठी लागतात. ती म्हणजे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, वाहन चालक परवाना, दूरध्वनी देयक, वीज देयक, आधार कार्ड, तुमच्या बँक खात्याच्या माहितीसाठी Cancelled Cheque. शिवाय डिमॅट खाते open करताना तुमचा email id असणे खूप महत्वाचे आहे.

डिमॅट खाते open करण्यासाठी किती शुल्क आकारण्यात येते? | Required Charges for opening Demat Account

आधीच्या काळात बऱ्याचश्या बँका डिमॅट खाते open करण्यासाठी ७०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान शुल्क आकारायच्या. आजकाल डिमॅट खाते open करण्यासाठीचे शुल्क हे Depository Participant (DP) कडून आकारण्यात येते. ते शुल्क एकतर कमी असते किंवा काहीच नसते. Broking Firms कडून आकारले जाणारे अधिक शुल्क जसे की stamp  duty, Goods and Services Tax (GST) आणि बाकी इतर कायदेशीर शुल्क हे SEBI नुसार आकारले जाते.

डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे | Demat Account Opening in Marathi

Demat Account Opening Process in Marathi – डिमॅट खाते उघडणे अगदी सोपे आहे. खालील दोन पर्याय वापरून आपण डिमॅट खाते उघडू शकतो.

१. डिमॅट खाते opening ऑफलाइन – डिमॅट खाते ऑफलाइन open करण्यासाठीच्या steps खालीलप्रमाणे-

१. ज्या Share Broker कडून तुम्हाला डिमॅट खाते open करून घ्यायचे आहे त्याने दिलेला Demat Account Opening Form भरावा. त्या Form सोबत तुमची लागणारी कागदपत्रे जोडावीत.

२. तो Form आणि ती कागदपत्रे त्या Share Broker कडे जमा करावीत.

३. त्यानंतर तुम्हाला Depository Participant (DP) सोबत एक करार करावा लागतो. त्या करारामध्ये सगळ्या अटी आणि शर्थींबद्दलची माहिती दिलेली असते. त्याला काळजीपूर्वक वाचून मगच त्या करारावर तुमची सही करावी.

४. डिमॅट खाते open झाल्यानंतर तुम्हाला एक Unique Client ID देण्यात येतो. शिवाय अजून काही माहिती दिली जाते, ज्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमचे डिमॅट खाते ऑनलाइनरित्या वापरू शकता.

२. डिमॅट खाते Opening ऑनलाइन

डिमॅट खाते तुम्ही ऑनलाइनरित्या Open करण्यासाठी Steps खालीलप्रमाणे- 

१. ज्या Depository Participant (DP) कडे तुम्हाला तुमचे डिमॅट खाते open करायचे आहे त्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ‘Open Demat Account’ या टॅबवर click करावे. 

२. त्यानंतर तिथे हवी असलेली संपूर्ण माहिती भरावी आणि हवी ती कागदपत्रे त्या वेबसाईटवर जमा करावीत. 

३. ही सगळी प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला तुमच्या DP कडून तुमचे डिमॅट खाते open झाल्याचा एक confirmation email registered email id वरती मिळेल.

४. त्यानंतर तुम्हाला तुमच्या DP कडून DP ID, Beneficiary ID किंवा डिमॅट खाता क्रमांक, Power of Attorney (POA) नंबर ही सगळी माहिती पुरवण्यात येईल. ही सगळी माहिती तुम्हाला IPO (Initial Public Offer) साठी अर्ज करताना उपयुक्त ठरते.

डिमॅट खाते कसे कार्य करते? | Demat Account working in Marathi

आधीच्या काळात शेअर्स तुमच्या नावावर transfer झाले की, तुम्हाला त्याची कागदोपत्री नोंद म्हणून शेअर सर्टिफिकेट बनवावे लागायचे. जेवढे जास्त शेअर्स तुमच्या नावावर तेवढीच कागदपत्रांची संख्या जास्त.. ही कागदपत्रांची संख्या आणि गोंधळ कमी करण्यासाठी भारतामध्ये १९९६ साली NSE (National Stock Exchange) मधील व्यवहारांसाठी डिमॅट खाते open करण्याची पद्धत सुरू झाली. तुम्हाला Shares आणि Securities मध्ये व्यवहार करण्यासाठी तुमचे स्वतःचे डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. डिमॅट खात्याशी निगडित व्यवहार इलेक्टरीनिकरित्या सांभाळण्यासाठी तुमच्याजवळ तुमचा डिमॅट खाते क्रमांक असणे महत्वाचे आहे. तुमच्या डिमॅट खात्यामध्ये Login करण्यासाठी संकेतशब्द (password) आवश्यक असतो आणि कोणताही व्यवहार करताना व्यवहार संकेतशब्द (transaction password) हा आवश्यक असतो.

डिमॅट खात्याचे फायदे | Demat Account Benefits in Marathi

१. डिमॅट खात्यामुळे Physical शेअर सर्टिफिकेट हाताळणे आता बंद झाले आहे. डिमॅट खाते हाताळणे हे सोयीस्कर आणि सहजसोपे असे आहे.

२. डिमॅट खात्यामार्फत होणारे व्यवहार हे कागदोपत्री व्यवहार बंद झाल्यामुळे परलेस असतात.

३. Physical शेअर सर्टिफिकेट सांभाळत राहावी लागत नसल्यामुळे ती गहाळ होण्याचा किंवा चोरीला जाण्याचा प्रश्न नसतो.

४. Physical शेअर सर्टिफिकेट हाताळावी लागत नसल्यामुळे ती हरवण्याचा किंवा खराब होण्याचा धोका नसतो.

५. शेअर सर्टिफिकेट हे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असल्यामुळे ती कोणीही Duplicate म्हणून वापरून तुमची फसवणूक करू शकत नाही.

६. आपल्या बँक खात्यामधून झालेल्या प्रत्येक व्यवहाराची जशी नोंद होते, त्याचप्रमाणे डिमॅट खात्यामधील प्रत्येक खरेदीविक्रीची नोंद केली जाते.

७. डिमॅट खात्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला नामनिर्देशित करू शकतो.

८. डिमॅट खात्यामधील आपले शेअर्स तारण ठेवून कर्ज घेण्याची सुविधा देखील या खात्यामध्ये उपलब्ध आहे.

९. डिमॅट खात्यामध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये अगदी सहजरित्या तुम्ही योग्य तो बदल करू शकता.

१०. डिमॅट खात्यामार्फत आपण फक्त शेअर्समध्येच नाही तर इतर securities मध्ये देखील व्यवहार करू शकतो. जसे की Bonds, सरकारी Securities, Mutual Funds SIP, विमा, इत्यादी.

११. तुम्ही तुमचे डिमॅट खाते हे तुमच्या वेळेप्रमाणे Computer, Mobile, Tab चा वापर करून पाहू शकता आणि त्याद्वारे व्यवहारदेखील करू शकता.

ट्रेडिंग खात्याची भूमिका | Role of Trading Account in Marathi

ट्रेडिंग खाते Equity शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी वापरण्यात येते. सुरुवातीला हाताच्या खाणाखुणांमार्फत आणि तोंडी संभाषणाच्या मार्फत खरेदीविक्रीचे निर्णय सांगण्यात यायचे. त्यानंतर झालेल्या बदलामुळे आता ऑनलाइन पद्धतीमध्ये खरेदीविक्रीच्या व्यवहारासाठी Stock Exchange मध्ये व्यक्तिगत उपस्थित राहणे आवश्यक नसते. त्या बदल्यात तुम्ही Registered Stock Broker कडून ट्रेडिंग खाते open करुन घेऊ शकता. जे तुमच्या वतीने शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणार आहेत.

१. प्रत्येक ट्रेडिंग खात्याला एक Unique ट्रेडिंग ID असतो ज्याचा वापर ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी केला जातो.

२. ट्रेडिंग खाते हे गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते आणि बँक खात्यामधील एका दुव्याचे काम करते. जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराला शेअर्स खरेदी करायचे असतात, तेव्हा तो त्याच्या ट्रेडिंग खात्यामार्फत तशी Order करतो. तो व्यवहार पुढील प्रक्रियेसाठी Stock Exchange मध्ये जातो. त्यानंतर Stock Exchange कडून तो व्यवहार अंमलात आल्यानंतर तुम्हाला हवे असलेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतात आणि त्या शेअर्स समोरची रक्कम तुमच्या बँक खात्यामधून कमी होते. 

३. हीच अश्या प्रकारची प्रक्रिया शेअर्सची विक्री करण्यासाठी देखील केली जाते.

डिमॅट खात्याचे प्रदाता | Demat Account Providers

भारतामध्ये काही प्रसिद्ध असे डिमॅट खात्याचे प्रदाता आहेत. ते प्रदाता डिमॅट खात्यासाठी चांगली सेवा ग्राहकांना देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१. Upstox
२. Zerodha 
३. Angel Broking
४. 5Paisa
५. Shrekhan Demat Account
६. IIFL Demat Account
७. Motilal Oswal Demat Account
८. HDFC Securities Demat Account
९. Kotak Securities Demat Account
१०. ICICI Direct Demat Account
११. Religare Demat Account
१२. SBICAP Securities Demat Account
१३. Axis Direct Demat Account
१४. SAS Online

डिमॅट खाते कसे बंद करावे? | How to close Demat Account?

जर तुमच्या डिमॅट खात्यामध्ये कोणतेही शेअर्स नसतील तर तुम्ही परस्पर डिमॅट खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता आणि जर तुमच्या डिमॅट खात्यामध्ये काही शेअर्स असतील तर ते आधी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या डिमॅट खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावे लागतील आणि मगच तुम्ही तुमचे डिमॅट खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. 

१. डिमॅट खाते बंद करण्याचा फॉर्म तुमच्या Depository Participant (DP) च्या अधिकृत वेबसाईटवरून download करावा किंवा त्यांच्या जवळच्या शाखेमधून घेऊन यावा.

२. तो फॉर्म व्यवस्थितरित्या अचूक अश्या माहितीने भरून, सोबतीला हवी ती कागदपत्रे जोडून Depository Participant च्या जवळच्या शाखेत तो जमा करावा किंवा त्यांच्या मुख्य ऑफिसच्या दिलेल्या registered email id वरती तो फॉर्म व कागदपत्रे mail करावीत.

३. जर तुमचे डिमॅट खाते हे संयुक्त असेल तर त्या form वर Depository Participant च्या ऑफिसरच्या उपस्थितीत प्रत्त्येकाने सही करावी.

४.डिमॅट खाते बंद करण्यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये काही शेअर्स नसण्याची किंवा
negative balance नसण्याची एकदा खात्री करून घ्यावी.

निष्कर्ष | Conclusion

आजकाल शेअर मार्केटवरती दिवसेंदिवस लोकांचा विश्वास बसायला लागल्यामुळे शेअर मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक आणि व्यवहार हा वाढला आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते असणे हे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये व्यवहार करू शकत नाही. तुम्ही जर विविध कंपन्यांच्या शेअर्सचा व्यवस्थितरित्या अभ्यास केलात तर शेअर मार्केट तुम्हाला देखील फायदेशीर ठरू शकते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

मी माझे डिमॅट खाते दुसऱ्या कोणाकडे हस्तांतरित करू शकतो का?

आपण आपले डिमॅट खाते दुसऱ्या कोणाकडे हस्तांतरित करू शकत नाही. आपण आपले शेअर्स इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो. फक्त त्या व्यक्तीकडे त्याचे स्वतःचे डिमॅट खाते असणे हे गरजेचे आहे.

मी एकाच वेळी किती डिमॅट खाती ठेवू शकतो?

आपण बँक खात्यांप्रमाणेच एकापेक्षा जास्त डिमॅट खाती उघडू शकतो. पण एका कंपनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त तीन खाती उघडता येतात.

डिमॅट खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, रेशन कार्ड, दूरध्वनी देयक, वीज देयक, आधार कार्ड, तुमच्या बँक खात्याच्या माहितीसाठी Cancelled Cheque

डिमॅट खाते उघडण्यासाठी किती पैसे लागतात?

आजकालच्या काळात ३०० ते ५०० रुपये या शुल्कात तुम्ही तुमचे डिमॅट खाते सहजरित्या उघडू शकता आणि शेअर्स मध्ये त्या खात्याद्वारे गुंतवणूक करू शकता.

Mutual Fund साठी डिमॅट खाते आवश्यक आहे का?

Mutual Fund कंपन्यांसाठी गुंतवणूकदारांचे डिमॅट खाते असणे आवश्यक नाही आहे. डिमॅट खाते तवणूकदारांना इलेक्ट्रॉनिकरित्या Shares, Securities, Mutual Funds, विमा आणि बाकीच्या प्रकारांमध्ये गुंतवणूक  करण्यास सहाय्य करते.

डिमॅट खाते हे joint असू शकते का?

होय. बँक खात्याप्रमाणेच डिमॅट खातेदेखील तुम्ही joint holders मिळून उघडू शकता.

आम्हाला IPO साठी डिमॅट खाते आवश्यक आहे का?

जरी IPO साठी अर्ज करताना डिमॅट खाते असणे आवश्यक नसले, तरी पण डिमॅट आणि ट्रेडिंग खाते हे तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे बघायला गेलं तर IPO मध्ये गुंतवणूक करताना किंवा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त व्यवहार भविष्यामध्ये करायचा असल्यास तुमचे आधीपासूनच जर डिमॅट
आणि ट्रेडिंग खाते असेल तर तुमचा व्यवहार सहजरित्या पूर्ण करण्यास तुम्हाला मदतच होईल.

मी एकापेक्षा जास्त डिमॅट खाती उघडू शकतो का?

हो. बँक खात्याप्रमाणेच तुम्ही एकापेक्षा जास्त डिमॅट खाती उघडू शकता. पण एका कंपनीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ३ डिमॅट खाती उघडू शकता.

डिमॅट खात्यात किमान किती रक्कम ठेवावी लागते?

डिमॅट खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याबद्दल कोणतीही बंधन किंवा नियम नाही आहेत.

शेअर करा