सोने तारण कर्ज माहिती मराठी | Gold Loan Information in Marathi

सुवर्ण कर्ज (Gold Loan) – सोने हा प्रत्येक स्त्रीयांचा वीक पॉइंट असतो. सोने घालायला आणि मिरवायला कोणाला नाही आवडतं, पण जेव्हा खूप मोठी अडचण येते किंवा अचानक पैसे लागतात तेव्हा त्या क्षणाला सोने कामाला येते. पण अनेकांना सुवर्ण कर्ज म्हणजे गोल्ड लोन कसे काढले जाते याविषयी माहीत नाही. आजच्या लेखात आपण गोल्ड लोन विषयी जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते पण आपल्याला सोने मोडून पैसे घ्यावे असे वाटतं नाही. अशा वेळेस सुवर्ण कर्ज हा पर्याय उत्तम  ठरतो. जेव्हा सुवर्ण कर्ज घेता तेव्हा तुम्हाला तुमचे सोने गमावल्याचे दुख नसते, या बरोबरच तुमचे सोने सुरक्षित राहते.

अनुक्रमणिका

सुवर्ण कर्ज म्हणजे काय? |  What is a Gold Loan? 

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सोने तारण म्हणजे जेव्हा तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर  कर्ज काढू शकता. यास सुवर्ण कर्ज म्हणतात. सुवर्ण कर्ज हे  बँक किंवा कर्ज देणाऱ्या कंपन्याकडून घेता येते. ज्या प्रमाणे होम लोन किंवा पर्सनल लोन असते तसेच सुवर्ण कर्ज असते.

सुवर्ण कर्ज कसे फेडावे

जेव्हा तुम्ही सुवर्ण कर्ज घेता तेव्हा तुम्हाला एक ठराविक कालावधी दिला जातो. त्या ठराविक कालावधीत तुम्हाला ते कर्ज फेडावे लागते. जेव्हा तुम्ही  कर्जाची परत फेड करता तेव्हा तुम्हाला तुमचे सोने परत दिले जाते.

सुवर्ण कर्ज जर वेळेत फेडले नाही तर? |  What if the gold loan is not repaid on time?

अनेकदा आपण सुवर्ण कर्ज घेतो पण ते कर्ज आपल्याला ठराविक वेळेत फेडता येत नाही. अशा वेळेस बँक तुमचे सोने तुम्हाला परत करत नाही. बँक किंवा सोने तारण कर्ज देणारी कंपनी तुमचे सोने विकून कर्ज वसूल करते. कर्ज वेळेत फेडणे फार गरजेचे आहे, जर कर्ज तुम्ही वेळेत फेडले नाही तर कोणतीही बँक तुम्हाला पुन्हा कर्ज देणार नाही.

सुवर्ण कर्ज उत्तम पर्याय का आहे?

भारतीयांना सोन्याची प्रचंड आवड आहे. सोन्याबद्दल एक वेगळेच आकर्षण त्यामुळे प्रत्येकांच्या घरात थोडे तरी सोने असते. जर कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण कर्ज हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सुवर्ण कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for a Gold loan

बँकेचे कोणतेही काम असतो तुम्हाला कागदपत्रे जरूरी असतात. सुवर्ण कर्ज देखील घेताना तुम्हाला काही कागदपत्रे बँकेला किंवा त्या कंपनीला द्यावी लागतात. कारण सोने दिल्यानंतर कंपनीकडे तुमच्या विषयी काही पुरावे असावे लागतात. सोने घेऊन कर्ज देण्यासाठी पुरावा जरूरी आहे. म्हणून खालील काही कागदपत्रे  तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

कर्ज घेण्यासाठी एक अर्ज करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती असेल.

  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि पत्याचा पुरावा.
  • पॅन कार्ड
  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो असणे बंधनकारक आहे, जेणेकरून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटेल.

या कागदपत्रांच्या मदतीने तुम्हाला सहज सुवर्ण कर्ज मिळू शकते.

सुवर्ण कर्ज कुठे घ्यावे? | Where to take a Gold loan?

सर्वात  महत्वाचा प्रश्न म्हणजे सुवर्ण कर्ज सर्व बँका देतात का? सुवर्ण कर्ज देणाऱ्या अनेक खाजगी कंपनी देखील आहेत. जवळपास सर्व खाजगी आणि सरकारी बँका सुवर्ण कर्ज देतात. जेव्हा तुम्ही सुवर्ण कर्ज घेता तेव्हा त्या बँकेची सर्व माहिती , त्या कंपनीची सर्व माहिती आधी तपासा. बँक किंवा कंपनी विश्वसनीय आणि अधिक विश्वासू आहे का ते पहा. कारण आजकाल फसवणूक आणि भ्रष्टाचार फार पसरला आहे.

खालील काही बँका आणि कंपनी सुवर्ण कर्ज देतात – (The following banks and companies offer gold loans)

  • Axis बँक गोल्ड लोन
  • मन्नपुरम फायनान्स गोल्ड लोन
  • मुथूट फायनान्स गोल्ड लोन
  • एसबीआय  गोल्ड लोन
  • आयसीआय गोल्ड लोन

या काही महत्वाच्या कंपन्या आहेत ज्या सुवर्ण कर्ज देतात.

सुवर्ण कर्ज घेण्याच्या नियम आणि अटी | Terms and conditions of gold borrowing

जेव्हा तुम्ही सुवर्ण कर्जच काय इतर कोणतेही कर्ज घेता तेव्हा त्या सर्व बँका आणि कंपन्या यांचे काही नियम असतात. अटी आणि शर्ती देखील असतात. कर्ज घेताना नेहमी कागदपत्रे नीट वाचायला हवीत. बँकेने दिलेल्या अटी  शर्ती यांचे पालन करा. तुम्ही पैसे घेण्यापूर्वी सर्व खात्री करून घ्या. तुमच्या सर्व शंका दूर करा. सुवर्ण कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकांचे नियम व अटी वेगळ्या असतात. पण एक गोष्ट मात्र समान असते. तुमच्याकडे एक लाख रुपयांचे सोने असावे.जर कंपनीला तुम्ही एक लाख रुपयांचे सोने दिले तर कंपनी तुम्हाला 70-75 हजारांचे कर्ज देते. प्रत्येक बँका आणि त्यांचा व्याज दर वेगळा असतो.

सुवर्ण कर्जावर किती व्याज लागते | Interest on a Gold loan?

कर्ज म्हटलं की व्याज हे येणारच. कारण कोणतीही कंपनी जेव्हा कर्ज देते तेव्हा त्यांना नफा मिळाला तरच ती बँक किंवा कंपनी नीट चालू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोन्यावर कर्ज काढता तेव्हा त्यावर देखील व्याज लागू होते.

काही बँका सुवर्ण कर्जावर आकर्षक व्याज देतात. आपल्याला हे देखील माहीत आहे की सर्व बँकांचे व्याज दर हे वेगळे असतात. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे पर्सनल लोन पेक्षा या कर्जाचा व्याजदर कमी असतो. म्हणून हे कर्ज आपणास सुरक्षित कर्ज असे म्हणू शकतो. सुवर्ण कर्जाचा व्याज दर तुमच्या कर्जाचा कालावधी, कर्जाची रक्कम आणि एलटीव्ही द्वारे निश्चित केला जातो. जेव्हा तुम्ही हे कर्ज घेता, तेव्हा तुमचा व्याज दर त्यात जास्त असू शकतो. ज्या बँकेकडून कंपनी सुवर्ण कर्ज घेत आहे तुम्ही त्या कंपनीच्या वेबसाईटवर किंवा शाखेत जाऊन व्याजदर तपासू शकता. सर्वात कमी सोने कर्ज व्याज दर मिळवण्यासाठी तुम्ही सर्व बँकांचे व्याज दरांची तुलना करा आणि दुसरे काही एक्सट्रा चार्जेस असतील तर ते जाणून घ्या.

सुवर्ण कर्जाचा कालावधी | Gold Loan Tenure

जसे तुम्ही कर्ज घेता तसे तुम्हाला 6 महिन्यांपासून ते 36 महिन्यापर्यत कालावधी तुम्हाला पाहायला मिळतो. बहुतेक कर्ज कंपन्या केवळ तुम्हाला 12 महिन्यांपर्यत कालावधी देतात. भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय तुम्हाला केवळ 12 महिन्यांचा कालावधी देते. तसेच मणप्पुरम फायनान्स आणि मूथूट फायनान्स हे देखील केवळ 12 महीने इतका कालावधी देतात. केवळ  अॅक्सिस बँक 36 महिन्यांचा कालावधी देतात.

सुवर्ण कर्जाचे फायदे | Benefits of Gold Loan

  • सुवर्ण कर्जाचा सर्वात मोठा फायदा हा की  हे कर्ज तुम्हाला आपत्कालिन परिस्थितीत मिळते. तुम्हाला जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्ही कर्ज काढू शकता. अनेक कंपन्या हा देखील दावा करतात की सुवर्ण कर्ज तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत मिळते.
  • हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. या कर्जाचा व्याजदर देखील इतर कर्जा पेक्षा कमी असतो.
  • जरी तुमचा सीबल स्कोर कमी असला तरी तुम्हाला कर्ज मिळते.
  • या कर्जामधून घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही इतर कोणत्याही कारणांसाठी वापरू शकतात.
  • होम लोन असो किंवा पर्सनल लोन जेव्हा तुम्ही इतर कोणतेही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला तुमचा पगार दाखवावा लागतो. पण जेव्हा तुम्ही गोल्ड लोन घेता तेव्हा तुमच्याकडे फक्त सोने असावे लागते.

उत्तम गोल्ड  लोन कोठून घ्यावे | Where to get the best Gold Loan

आज तुम्हाला आम्ही अशा काही बँका आणि कर्ज देणाऱ्या कंपन्या सांगणार आहोत ज्या सुवर्ण कर्ज देतात.

गोल्ड लोन की पर्सनल लोन | Gold Loan or Personal Loan

सुवर्ण कर्ज आणि पर्सनल लोन हे दोन्ही देखील आपत्तीच्या काळात मद्तीस येतात. परंतु पर्सनल लोन पेक्षा गोल्ड लोन कधीही अधिक उत्तम असते. गोल्ड लोन मध्ये सर्वाधिक सुरक्षितता असते. गोल्ड लोनला पर्सनल लोन पेक्षा कमी व्याजदर असतो कारण आपण तेथे आपले सोने हमी म्हणून ठेवलेले असते.

सुवर्ण कर्ज घेताना या गोष्टी लक्षात घ्या | Things to Consider for selecting a Gold Loan

  •  तुमचे वय हे 18 वर्षापेक्षा अधिक असावे .
  • जो व्यक्ती सुवर्ण कर्ज घेणार आहे त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असावेत.
  • जे सोने गहाण ठेवणार आहे त्यांची शुद्धता 18 कॅरेट  पेक्षा अधिक असावी.

सुवर्ण कर्ज योजनेमध्ये प्रीपेमेंट हा पर्याय असतो का? | Is prepayment an option in a Gold Loan scheme?

अनेकदा तुम्हाला फार मोठी अडचण असते अशा वेळेस तुम्ही झटपट सुवर्ण कर्ज घेता पण काही अवधि नंतर तुमच्याकडे पुरेसे पैसे येतात अशा वेळेस तेव्हा तुम्ही विचार करता अरे मी आता सहज कर्ज फेडू शकतो. पण तुम्हाला बँकेने एक ठराविक मुदत दिलेली असते. अशा वेळेस काय करायचे?  उत्तर सोप्पे आहे अनेक बँका तुम्हाला आता कर्जावर प्रीपेमेंट देतात. प्रीपेमेंट म्हणजे वेळेपूर्वी कर्ज भरणे. जर तुम्ही प्रीपेमेंट केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड देखील लागणार नाही. एसबीआय ने तर मागेच हे जाहीर केले होते की त्यांच्या ग्राहकांना अतिशय सोप्या पद्धतीने सुवर्ण कर्ज घेऊ शकता. सुवर्ण कर्जावर कोणतेही छुप्पे चार्जस देखील नाहीत.

शेअर करा