भिशी म्हणजे काय? | Bhishi in Marathi

भारतामध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे,थेंबे -थेंबे तळे साचे. म्हणजेच काय तर थोडी थोडीशी बचत देखील खूप कामी येते. बचत करून आपण एक मोठी रक्कम जमा करतो आणि त्यातून आपण मोठी आर्थिक गुंतवणूक करतो.बचत केलेले हे पैसे अनेकदा कामी येतात. भारतीय गृहिणी तर बचतीसाठी अनेक नव- नवीन मार्ग शोधत असतात. यातूनच भिशी हा एक उत्तम प्रकार समोर आला.आजच्या लेखात आपण भिशी म्हणजे काय ? हे जाणून घेणार आहोत.

भिशी म्हणजे नेमकं काय? | What is Bhishi?

भिशी म्हणजे,एखाद्या ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात.भिशीला हिंदी भाषेमध्ये वीसी किंवा भीसी या बरोबरच कमिटी,पियर टू पियर पद्धत देखील म्हणतात.

जेव्हा एखादा व्यक्ती बिजनेस करतो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करावी लागते. अनेकदा पैशांची गरज पडते.अशावेळी दरवेळी बँकेकडून कर्ज घेणे परवडत नाही.या बरोबरच बँकेकडून कर्ज मिळणे इतके सोप्पे नाही.अशा वेळी भिशी अत्यंत उपयुक्त ठरते.भिशीला अनेक व्यापारी प्राईवेट फंड सिस्टम म्हणतात.

साधारण प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून ,पैसे गोळा करून ते एक सदस्य दिले जातात.हा भिशी प्रकार विशेषत महिला,कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे.भिशी हा प्रकार प्राइवेट बँकेप्रमाणे काम करतो.जसे बँक ग्राहकांनकडून पैसे जमा करते आणि ज्यांना गरज असते त्यांना देते अगदी त्या प्रमाणे.भिशीमध्ये व्याज नसते. भिशी हा काही ठराविक लोकांनी सुरू केलेला समूह असतो.जर एखाद्या भिशीच्या समू हामध्ये १२ सदस्य असतील तर सर्व सदस्यांकडून जमा केलेली रक्कम एका सदस्याला एकावेळेस दिली जाते.

लिलाव भिशी | Lilav Bhishi

लिलाव भिशी हा प्रकार सर्वसामान्य नागरिक आणि महिला कमी प्रमाणात वापरतात पण व्यापारी मात्र लिलाव भिशी प्रकार मोठ्या प्रमाणात करतात.लिलाव भिशीमध्ये एक ठराविक रक्कम जमा केली जाते आणि त्या रक्कमेचा लिलाव केला जातो.जो अधिक बोली लावतो.त्याला ती भिशी दिली जाते.या प्रकारात भिशीच्या रक्कमेवर व्याज घेतले जाते.हा व्याजदर बाजारातल्या व्याजदरापेक्षा अधिक असतो.हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो.मध्यमवर्गीय किंवा लहान समूहातील भिशीमधून जमा होणारी रक्कम भिशीच्या तुल व्यापारी भिशीच्या तुलनेत फार कमी असते. पण उपयुक्त असते.

भिशी प्रकारांमध्ये घरगुती भिशीचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे.यातप्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते.उदा.ग्रुपमध्ये 10 सदस्य आहेत.तर प्रत्येक सदस्याकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 1 हजार रुपये गोळा केले जातात.जमा झालेले हे 10 हजार रुपये चिठ्ठ्या टाकून ज्या सदस्याचे चिठ्ठीत नाव येईल त्याला दिले जातात.ज्याचे नाव चिठ्ठीत येते त्यांच्या नावाची चिठ्ठी पुन्हा बनवली जात नाही.पण प्रत्येक महिन्याला त्याच 1 हजार रुपयांचा वाटा मात्र घ्यावा लागतो.

भिशी काढण्याचे विविध प्रकार | Different types of Bhishi

1) चिठ्ठी काढणे – या पद्धतीत भिशीद्वारे जमा झालेली एकत्रित रक्कम सभासदांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून त्यातील एक चिठ्ठी लकी ड्रॉ प्रमाणे काढली जाते.चिठ्ठीत नाव असलेल्या सदस्याला ती रक्कम दिली जाते.

2) लिलाव पद्धत – सर्व सभासदांकडून जमा झालेल्या एकूण रक्कमेचा लिलाव केला जातो.ज्याची बोली सर्वाधिक असते,त्याला ती रक्कम दिली जाते.बोली जितकी लावलेली असते,तेवढी रक्कम जमा झालेल्यातून वजा करून उरलेली रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाते.वजा करून घेतलेली रक्कम ही नफा म्हणून इतर सदस्यांमध्ये समान प्रमानांमध्ये वाटून घेतली जाते.

3) पोट भिशी – हा प्रकार लिलाव भिशीमधील एक प्रकार आहे.यामध्ये लिलाव पद्धतीतून जी रक्कम मिळते ती वाटून न घेता एका सदस्याला वापरण्यासाठी दिली जाते.

किटी पार्टी म्हणजे काय ?What is kitty party?

महिलांसाठी किटी पार्टी हा अगदी जिव्हाळ्याचा शब्द आहे.भिशीला इंग्लिशमध्ये किटी पार्टी म्हणतात.किटी पार्टीमध्ये ओळखीचे लोक असतात. शक्यतो महिला किटी पार्टी करतात.नातेवाईक , मैत्रिणी,सोसायटीमधील मैत्रिणी एकत्र येऊन किती पार्टी करतात.यामध्ये देखील चिठ्ठी पद्धती वापरली जाते.जमा झालेले पैसे एका सदस्याला दिले जातात. किटी पार्टी थोड्या अधिक खर्चीक असतात. येथे भिशीसाठी सर्वांनी एकत्र येणे अनिवार्य असते.यामध्ये खाणे -पिणे ,चहा -पाणी असं सर्व काही केलं जातं.महिला काही गेम देखील ठेवतात.मनोरंजन हा त्यातील एक महत्वाचा भाग असतो.भिशी असो की किटी पार्टी यांच्यातून बचत आणि त्यातून इतरांना सहकार्य हे सूत्र खूप महत्वाचे आहे.यामुळे आर्थिक बचतीची सवय तर लागतेच पण त्याचबरोबर सामूहिक सहकार्य मोठे भांडवल उभे राहते.

भिशी संकल्पना उदाहरणासह | Bhishi concept with Example

भिशी ही संकल्पना संपूर्णपणे विश्वास व सहकारी तंत्रावर आधारित आहे.परस्पर एकमेकांशी केलेला व्यवहार आहे.भिशीची वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत.भिशी ही एक बिनव्याजी गुंतवणूक आहे.भिशी म्हणजे बिनव्याजी कर्ज आहे.सहकारी पद्धतीने एकमेकांना केलेली मदत म्हणजे भिशी होय.भिशीचे सर्व नियम त्यातील सदस्य बनवतात.वेगवेगळ्या भिशीचे वेगवेगळे नियम असतात.

उदा- भिशीच्या ग्रुपमध्ये 12 सदस्य आहेत.ही भिशी एक वर्ष चालेल.प्रत्येक सदस्याने जर एक हजार रुपये जमा केले तर एकूण रक्कम ही बारा हजार रुपये होती.हे 12 हजार रुपये दर महिन्याच्या एक ठराविक तारखेपर्यन्त जमा केले जातात.त्यानंतर चिठ्ठी काढली जाते.ज्याचे नाव आले आहे,त्या सदस्याला जमा केलेली रक्कम दिली जाते. त्या सदस्यांचे नाव काढून टाकले जाते. पण त्या सदस्याने पुढील भिशीमध्ये त्यांच्या वाट्यांचे 1000 हजार रुपये भरणे अनिवार्य असते.

भिशीचे नंबर कसे काढले जातात

भिशी जेव्हा सुरू केले जाते, तेव्हा सर्व सदस्य किती आहेत. हे पाहिले जाते.जेवढे सदस्य असतील तितक्या महिन्यांची ही भिशी असते.समजा 12 सदस्य आहेत,तर एक वर्ष ही भिशी चालते.वर्षांच्या सुरुवातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि 1 ते 12 असे नंबर असलेल्या चिठ्ठ्या बनवितात.या चिठ्ठ्या सर्व सदस्य निवडतात.त्यात जो नंबर लिहिलेला असतो त्या प्रमाणे वर्षभर नंबर लागतात. अशा प्रकारे देखील अनेक ठिकाणी भिशी काढल्या जातात.

भिशीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? | Do you know the history of Bhishi?

सुमारे १८०० व्या शतकापासून राजा राम वर्मा यांच्या काळापासून म्हणजेच १००० वर्षांपासून भारतात परंपरागत भिशी पद्धती अस्तित्वात आली.त्यात सुधारणा होत- होत मग चिठ्ठी पद्धती आणि आता अलीकडे लिलाव भिशी असे प्रकार सुरू झाले.अगदी गल्ली पासून ते दिल्ली पर्यत भिशीचे हे प्रमाण वाढू लागले.प्रत्येक गावा- गावांमध्ये हे प्रकार वाढू लागले. परंतु जेवढी किफायतशीर तेवढेच धोके देणारी पद्धत म्हणून भिशी ओळखली जाते.खाजगी भिशी फक्त विश्वास या एका तत्वावर चालते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Frequently asked Questions

भिशी चालू करण्यासाठी किती सदस्य लागतात?

भिशी सुरू करण्यासाठी किती सदस्य असावेत असा काही नियम नाही.किमान १० ते १२ सदस्य असावेत.ज्यामुळे उत्तम परतावा येतो.उत्तम रक्कम हाती येते.

भिशी सुरू करण्यासाठी काही नोंदणी करावी लागते का?

भिशीसाठी कोणतीही नोंदणी करावी लागत नाही.भिशी विश्वासावर चालते.

भिशीचे नियम कोण ठरविते?

भिशीचे नियम सदस्य ठरवितात.

भिशी कोण सुरू करू शकतो?

भिशी कोणताही नागरिक सुरू करू शकतात.भिशीसाठी एका व्यक्तीने जबाबदारी घेणे गरजेचे असते.इतर सदस्य त्यांना सहकार्य करतात.

ऑनलाइन भिशी लावता येते का?

आजकाल अनेक नागरिक ऑनलाइन भिशी लावतात.गुगल पे, फोन पे द्वारे पैसे पाठवून भिशी लावली जाते.

शेअर करा

2 thoughts on “भिशी म्हणजे काय? | Bhishi in Marathi”

    • भिशी च्या चिठ्यांचा कलर सर्वस्वी तुमचा चॉईस वर असतो. साधारणतः एकाच कलर मध्ये बनवल्या जातात

      Reply

Leave a Comment