अग्नि विमा मराठी | Fire Insurance in Marathi

वेगवेगळे विम्याचे प्रकार आपण लेखांच्या माध्यमातून पाहत असतो पण त्यामध्ये अग्नि विमा हा महत्त्वाच्या विमा पॉलिसी मध्ये येतो कारण या विमा प्रकारावर एखादी इमारत एखादी कंपनी दुकाने या प्रकारच्या गोष्टी कव्हर केल्या जातात. तुम्हाला माहीतच असेल या गोष्टींची किंमत आणि त्या मध्ये राहणारे लोक किंवा त्या ठिकाणी काम करणारे कामगार यांचे किती मोठे नुकसान होऊ शकते? त्यामुळे अग्नि विमा हा अतिशय महत्त्वाचा विमा प्रकार आहे.
अग्नी विमा कसा असतो त्यासाठी अप्लाय कसे करावे त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि आणखी गोष्टी आपण या आजच्या लेखामधून जाणून घेणार आहोत.

अग्नि विमा म्हणजे काय? | What is Fire Insurance in Marathi

अग्नि विमा म्हणजेच फायर इन्शुरन्स हा प्रामुख्याने विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यामध्ये होणारा एक प्रकारचा करार आहे. ज्यामध्ये विमा कंपनी ठराविक प्रीमियम ठरवून त्याच्या बदल्यात विशिष्ट आणि मर्यादित कालावधीसाठी सदर विमाधारकाच्या मालमत्तेत आग लागली आणि त्या आगीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला विमा कंपनी मार्फत संरक्षण देण्यात येते.

या विमा प्रकारात वेगवेगळ्या योजना सादर केलेल्या असतात. त्या योजनांमध्ये पॉलिसी धारकाच्या गरजेनुसार पॉलिसीधारकासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध करून देत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही विमा योजनांमध्ये मालमत्तेच्या नुकसाना सोबतच त्यामुळे होणाऱ्या नफ्याचे नुकसान असो, किंवा कामगारांचे पगार असो या सर्व गोष्टींना विमा कंपनी मार्फत संरक्षण दिले जाते..

अग्नि विम्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

अग्नि विमा च्या मार्फत ज्या विमा योजना असतात त्याच्या अंतर्गत खालील गोष्टींसाठी संरक्षण मिळवता येते

  • इलेक्ट्रिक फिटिंग
  • इमारत
  • कच्चामाल किंवा प्रक्रिया चालू असणारा महाल किंवा तयार असलेला पक्का माल
  • प्लांट व त्यामधील यंत्रसामग्री
  • इमारतीमधील तसेच इमारतीच्या बाहेरील पाईपलाईन
  • फर्निचर

अग्नि विमा अंतर्गत कव्हर केल्या जाणाऱ्या जोखीम:

  • वीज पडली तर झालेले इमारतीचे नुकसान
  • आगीमुळे होणारे इमारतीचे नुकसान
  • आगीमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान
  • आगीमुळे स्फोट झाला तर त्यामुळे होणारे नुकसान
  • विमानाला आग लागली तर त्यामुळे होणारे नुकसान
  • दंगल, संप यामुळे आग लागली तर त्यामुळे होणारे नुकसान
  • पाण्याची टाकी फुटली तर त्यामुळे होणारे नुकसान

अग्नि विमा मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जात नाहीत

त्या पुढील प्रमाणे:

  • किरणोत्सर्ग तसेच आण्विक कचरा यामुळे झालेले नुकसान
  • एखाद्या ठिकाणी विजगळती झाली किंवा शॉर्टसर्किट झाले तर त्यामुळे होणारे नुकसान
  • युद्ध सदृश स्थिती किंवा युद्धामुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई केली जात नाही.
  • भूकंपामुळे नुकसान झाले तर त्याची भरपाई केली जात नाही.
  • जर नुकसान हेतुपूर्वक किंवा उद्देश्यपूर्वक केले गेले असेल तर त्याची भरपाई केली जात नाही.
  • नैसर्गिक हिटिंग मुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई केली जात नाही.

परंतु कंपनी आणि त्यांच्या योजनांनुसार या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो.

अग्नि विमा पॉलीसी ची प्रकार |Types Of Fire Insurance

1) व्हॅल्यूड पॉलीसी (valued policy)

या प्रकारच्या व्हॅल्यूड अग्नि विमा पॉलिसी मध्ये मालमत्तेचे मूल्यांकन पॉलिसी तयार करताना ठरवले गेलेले असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी ठरवलेल्या पॉलिसी कालावधीत जर विमाधारकाच्या मालमत्तेचे नुकसान झाले , तर अगोदर ठरवलेल्या मूल्यांकनाप्रमाणे पॉलिसी धारकास मिळण्याची मूल्यांकन द्वारे ठरवलेली निश्चित म्हणजे ठोस रक्कम भरपाई म्हणून विमाधारकाच दिली जाते. आणि त्या बदल्यात विमाधारकाच्या मालमत्तेचे किती प्रमाणात नुकसान झाले हे विचारात घेतले जात नाही. किंवा याचा विचार केला जात नाही. याबरोबरच या योजनेच्या माध्यमातून पॉलिसीधारकास मिळणारे रक्कम ही नुकसान झालेल्या गोष्टींचा किंवा मालमत्तेच्या बाजारभावापेक्षा कमी किंवा जास्त सुद्धा असू शकते. ते त्या पॉलिसी वर अवलंबून असते.

2) कॉम्प्रेहेंसिव पॉलिसी (Comprehensive policy)

कॉम्प्रेहेन्सी पॉलिसी ही अग्नि विमा या प्रकारांमधली एक वेगळ्या प्रकारची पॉलिसी आहे. ज्या पॉलिसीमध्ये आगीसोबतच इतर काही नुकसान प्रकारांचा ही ही समावेश केला जातो त्यामध्ये चोरी, युद्ध परिणाम यांसारखे जोखीम यांचा समावेश असू शकतो. परंतु या पॉलिसीसाठी जे प्रीमियम भरावे लागते त्या भराव्या लागणाऱ्या प्रीमियम ची किंमत अधिक असते.

3) व्हॅल्यूएबल पोलिसी ( Valuable policy)

व्हॅल्युएबल पॉलिसी ही पॉलिसी व्हॅल्यू पॉलिसी पेक्षा अतिशय वेगळी पॉलिसी आहे. या पॉलिसी अंतर्गत ज्यावेळी पॉलिसी धारकाच्या मालमत्तेचे नुकसान होते त्यानंतर नुकसान झालेल्या मालाचे किंवा मालमत्तेचे मूल्यांकन विमा कंपनी द्वारे करण्यात येते. व त्यानुसार विमाधारकास विमा कंपनीकडून भरपाई केली जाते. भरपाईसाठी देण्यात येणारी रक्कम ही नुकसान झालेल्या मालमत्तेच्या चालू असलेल्या बाजार भाव यावर अवलंबून असते.

4) Consequential loss पॉलिसी

ही पॉलिसी एखाद्या कंपनी प्लांट यासाठी अतिशय महत्त्वाची पॉलिसी आहे. कारण या पॉलिसीच्या माध्यमातून आगीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई तर केली जाते. परंतु याबरोबरच त्यामुळे होणारे इतर परिणामी नुकसानाची भरपाई सुद्धा विमा कंपनीकडून विमा धारकास केली जाते . यामध्ये सदर विमाधारकाच्या नफ्याचे नुकसान आणि कामगारांचे पगार याचीही नुकसान भरपाई विमाधारकास विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येते.

5) स्पेसिफिक पॉलिसी (Specific policy)

या पॉलिसीमार्फत विमाधारकाला ठराविक रकमेपर्यंत पॉलिसी प्रदान केली जाते. परंतु यासाठी विमाधारकाच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे मूल्यांकन विमा कंपनीच्या मार्फत केले जात नाही. तसेच विमा धारकाला प्रदान करण्यात येणारी रक्कम ही विमाधारकाच्या मालमत्तेपेक्षा कमी असते.

6) रिइस्टेटमेंट पॉलिसी ( Reistatement policy)

या पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी विमाधारकाच्या झालेल्या नुकसान पुन्हा रेडेव्हलप व्हावे यासाठी लागणारा खर्च विमा कंपनी विमा धारकाला प्रधान करतो.

7) एव्हरेज पॉलिसी (Average policy)

जेव्हा पॉलिसीधारक व्यक्ती मालमत्तेच्या संपूर्ण किमती चा विमा उतरवणे ऐवजी कमी विमा उतरवतो. म्हणजेच काही टक्क्यांमध्ये विमा खरेदी करतो . अशावेळी ऍव्हरेज पॉलिसी लागू होते या पॉलिसीच्या अंतर्गत विमाधारकाला प्रदान करण्यात येणारी रक्कम ही नुकसानाच्या टक्केवारीवर अवलंबून असते. म्हणजेच विमाधारकाने एकूण मालमत्तेच्या किती टक्के पॉलिसी खरेदी केली आहे यावर टक्केवारी निर्भर असते.

8) एक्सेस पॉलिसी (Excess policy)

ज्या विमा धारकाच्या मालमत्तेच्या स्टॉक ची किंमत सतत बदलत असते. अशा विमाधारकाला या पॉलिसीचा खूप जास्त उपयोग होतो या विमा पॉलिसीमध्ये विमाधारकाला दोन प्रकारच्या पॉलिसी खरेदी करावे लागतात. पहिले म्हणजे एक पॉलिसी स्टॉकच्या कमीत कमी किमतीत खरेदी करावे लागते तर दुसरी पॉलिसी स्टॉकची बदलत राहणारे किमतीचे मूल्यांकन करून एक विशेष पॉलिसी केली जाते. आणि यामध्ये बदलत राहणारे मूल्य व त्याची माहिती प्रत्येक महिन्याला विमा कंपनीला जमा करून द्यावी लागते.

9) फ्लोटिंग पॉलिसी (Floating policy)

फ्लोटिंग पॉलिसी अंतर्गत विमाधारकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांसाठी एकच विमा योजना खरेदी करायला लागते . म्हणजेच एकाच प्रीमियम मध्ये विमाधारक वेगवेगळ्या मालमत्तांसाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांसाठी विमा खरेदी करू शकतो.

10) डिक्लेरेशन पॉलिसी (Declaration policy)

या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाला स्टॉकच्या अधिकतम रकमे इतका विमा प्रदान करण्यात येतो. परंतु विमाधारकाला विमा खरेदी करताना वार्षिक प्रीमियम च्या 75 टक्के रक्कम सर्वात सुरुवातीला प्रीमियम रक्कम म्हणून भरावी लागते.
त्यानंतर विमा धारकाला विमा कंपनीला प्रत्येक महिन्याला किंवा ठरवलेल्या कालावधी नंतर स्टॉक चे मूल्यांकन करून त्याची तयार केलेली माहिती विमा कंपनीमध्ये जमा करावे लागते. व त्यानंतर या सर्व गोष्टींची सरासरी काढण्यात येते व त्यानुसार विमाधारकाला प्रदान करण्यासाठी एक विशिष्ट रक्कम ठरवली जाते.

11) ऍडजस्टेबल पॉलिसी (Adjustable policy)

जर एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेचे मूल्य सतत बदलत असते .म्हणजे कमी जास्त होत असेल तर अशा व्यक्तीला विमा योजना निवडणे त्यावेळी कठीण होते. त्यामुळे या पॉलिसीच्या अंतर्गत सुरुवातीला संपूर्ण मालमत्तेचे मूल्यांकन करून एक ठराविक रक्कम ठरवली जाते तेव्हा त्यानुसार मूल्यांकन करून प्रीमियम व कव्हर यांची ही रक्कम ठरवण्यात येते. आणि एवढे करूनही मालमत्तेचे मूल्य काही काळानंतर बदलले तर विमा कंपनीकडून विमाधारकाला त्यानुसार विम्याच्या कव्हर मध्ये किंवा प्रीमियम मध्ये बदल करता येतो. परंतु त्यासाठी विमाधारकाला बदलत जाणाऱ्या मालमत्तेच्या मूल्यासंदर्भात सर्व माहिती विमा कंपनीत जमा करावे लागते.

अशाप्रकारे तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा तसेच लेख आवडल्यास अशा नवनवीन माहितीसाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट देण्यास विसरू नका.
धन्यवाद…!

शेअर करा

Leave a Comment