सागरी विमा म्हणजे काय | Marine Insurance in Marathi

सागरी विमा म्हणजे काय?

जहाजे, नौका, टर्मिनल जहाजे आणि महत्त्वाचे म्हणजे वाहतुकी दरम्यान होणारे मालाचे नुकसान याची जोखीम कमी करण्यासाठी किंवा त्याला संरक्षण देण्यासाठी सागरी विमा अपघातग्रस्ताला प्रधान करण्यात येतो आणि तो कसा प्रदान करण्यात येतो याबद्दल आपण या लेखांमधून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सागरी प्रवासात आपल्या नौका किंवा जहाजाला वेगवेगळ्या धोक्यांनी घेतलेले असते म्हणजेच जहाजाला समुद्री वादळाचा धोका निर्माण होऊ शकतो सुनामी मुळे जहाज अडचणीत येऊ शकतो तसेच जहाज एखाद्या दुसऱ्या जहाजाला धडकून जहाजातील माल समुद्रात बुडू शकतो तसेच समुद्री वादळामुळे सुद्धा जहाजातील मालाचे नुकसान होऊ शकते तसेच तो जहाजा समवेत समुद्रात बोलू शकतो अशा परिस्थितीत झालेले नुकसान भरून निघावे यासाठी लोक सागरी विमा खरेदी करत असतात तसेच सागरी विम्या च्या प्रकारावर विम्याचे फायदे निर्भर असतात.

एखाद्याचे नुकसान झाल्यास विमा कंपनी ( Insurance Company) नुकसानाची रक्कम दाव्याच्या आधारावर आणि नुकसान पाहून भरू शकते किंवा यावर उपाय म्हणून विमाधारक आणि पॉलिसीधारक यासाठी सहमत किंमत धोरण ठरवतात.

सागरी विमा हा प्रामुख्याने सागरी धोक्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा विमा आहे. हा प्रामुख्याने आकाश, समुद्र, रस्ते आणि रेल्वे वाहतूक यामध्ये येणाऱ्या जोखमींसाठी हा विमा उतरवला जातो.

म्हणजेच आकाश (Airways) , समुद्र (Sea), रस्ते (roads) आणि रेल्वे (railway)  या मार्गांनी होणाऱ्या वाहतूक वाहतुकीला व मालाला या विमा प्रकाराखाली संरक्षण केले जाते.

सागरी विमा प्रामुख्याने दोन प्रकारे विभागला गेला आहे

1) मालाचा विमा

2) वाहतूक करणाऱ्या साधनाचा विमा

सागरी विमा म्हणजे काय? (What is marine insurance in Marathi?)

सागरी विमा हा Marine Insurance Act , 1963 अन्वये पॉलिसीधारकास बहाल केला जातो तर तो पॉलिसीधारकाच्या प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्ट यांच्यावर अवलंबून असतो

सागरी विमा हा नावाप्रमाणेच समुद्रामध्ये होणाऱ्या अपघातांना संरक्षण म्हणून देण्यात येतो. म्हणजेच जहाज नौका टर्मिनल्स आणि मालवाहतूक जहाजे यांचे संरक्षण करण्यासाठी सागरी विमा देण्यात येतो. हा सागरी विमा म्हणजे विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यातील एक कायदेशीर करार आहे. ज्यामध्ये पॉलिसीधारक हा एक निश्चित रक्कम विमा कंपनीला बहाल करतो त्या बदलात विमा कंपनी पॉलिसी धारकाला विमा संरक्षण देते.

सागरी विम्याचा कालावधी (Duration)  हा एक वर्षांपर्यंत असतो किंवा हा कालावधी काही वेळा एका प्रवास फेरीचाही असतो. समुद्री विम्याचे फायदे हे पॉलिसी धारकाने जो सागरी विमा खरेदी केला आहे त्या सागरी विम्याच्या प्रकारावर ठरवले जातात.

सागरी विम्याचे महत्व | Importance Of Marine Insurance

जहाजे सी प्लेन बोटी आणि नका अशी साधने खूपच महागडे असतात. हे सहाजिक आहे की यांच्या अपघातीनंतर त्याच्या दुरुस्तीसाठी खूपच खर्च येऊ शकतो किंवा एखाद्या अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जहाज बुडाले तर कंपनीला मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी त्या नुकसानाला संरक्षण देण्यासाठी सागरी विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

जर आपले जहाज दुसऱ्या कंपनीच्या जहाजाला धडकले तर दुसऱ्या कंपनीच्या जहाजाला आपल्याला भरपाई द्यावी लागते. अशा अशा परिस्थितीत सागरी विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

सागरी विमा हा वाहतूकदार आणि शिपिंग कंपन्यांसाठी तारणहार आणि जीवन रक्षक आहे. कारण विविध प्रकारच्या आर्थिक नुकसाना मधून तसेच मालाच्या नुस्कानातून सागरी विमा संरक्षण देत असतो. तर आपण आता सागरी विम्याच्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया.

सागरी विम्याचे प्रकार | Types of Marine Insurance in Marathi

◆ कार्गो विमा | cargo insurance

◆ हल विमा | Hull insurance

◆ माल विमा | Frieght insurance

◆ उघडा कार्गो विमा | open cargo insurance

◆ दायित्व विमा | Liability Insurance

◆ नाविन्यपूर्ण जोखीम संरक्षण | Innovative Risk Insurance

◆ नौका विमा | Yacht Insurance

कार्गो विमा | Cargo Insurance

कार्गो विमा हा एक सागरी विम्याचा प्रकार आहे ज्यामध्ये माल वाहतुकीसाठी सागरी विमा कंपनीकडून संरक्षण दिले जाते. आयात, निर्यात, लोडिंग तसेच अनलोडींग करताना मालाच्या नुकसाना संबंधी गोष्टी या पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत. कार्गो विमा हा प्रामुख्याने दोन प्रकारचा आहे ओपन कव्हर आणि सिंगल कव्हर.

ओपन कव्हर या विमा पॉलिसी चा कालावधी मुदत एक वर्ष असू शकते किंवा त्यापेक्षा कमी, जास्तही होऊ शकते हे धोरण वर्षभर चालू राहणाऱ्या कंपन्यांसाठी अतिशय चांगले आहे.

क्लोज कव्हर पॉलिसी ही पॉलिसी तर जहाजाच्या फक्त एका प्रवासासाठी असते. माल सुरक्षितपणे वितरित झाल्यानंतर किंवा परत केल्यानंतर पॉलिसीचे कव्हर बंद होते.

हल विमा | Hull Insurance

हल विमा पॉलिसी ही जहाजातील यंत्रसामग्री साधने उपकरणे यांसाठी संरक्षण पुरवते. हे कव्हर एका प्रवासासाठी असू शकते किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी सुद्धा असू शकते.

माल विमा | Freight Insurance

जेव्हा एखादी कंपनी आपला माल एका जहाजाने पाठवते तेव्हा शिपिंग कंपनी मर्यादित विमा त्या जहाजाला प्रदान करते. या प्रकारच्या सागरी विमा मध्ये प्रवासादरम्यान जहाजाला झालेल्या प्रत्येक प्रकारच्या नुकसानीला संरक्षण दिले जाते.

ओपन कार्गो विमा | Open Cargo Insurance

या पॉलिसीमध्ये मालाच्या संरक्षणासाठी मालवाहू जहाज शिपर द्वारे खरेदी केली जाते. यदा कदाचित नुकसान झाल्यास भरपाई केली जाते.

दायित्व विमा | Liability Insurance

या प्रकारच्या विमा मध्ये थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानाला कव्हर देण्यात येते. म्हणजेच आपल्या जहाजाकडून दुसऱ्या जहाजाला जेव्हा धडक बसते. तेव्हा समोरच्या जहाजाला संरक्षण पुरवले जाते. अशा परिस्थितीत दुसऱ्या जहाजाला नुकसानाचे रक्कम पुरवली जाते.

नौका विमा | Yacht Insurance

Yacht ही एक लक्झरी मनोरंजक नौका आहे जी खूप महागडे असते तिला नौका विम्या अंतर्गत संरक्षण प्रदान केले जाते.

सागरी विमा कोण खरेदी करू शकतो?

एखाद्या व्यक्तीकडे जर कोणत्याही प्रकारचे सागरी वाहन असेल. तो व्यक्ती सागरी प्रवासादरम्यान आपल्या वस्तूंचे संरक्षण करू इच्छित असेल, तर सागरी विमा खरेदी करू शकतो. वरील कोणत्याही सागरी विमानाचा प्रकार आपल्याला गरजेच्या वेळी विकत घेता येऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रे | Required Documents

● विमा policy कागदपत्रे

● सर्व्हे रिपोर्ट

● claim bill

● original invoice bill

● जहाजाची कागदपत्रे

सागरी विम्याचे फायदे | Benefits of Marine Insurance

★ जहाजामध्ये स्फोट झाला अगर आग लागली तर सागरी विम्याची भरपाई केली जाते.

★ जहाज बुडाले तर पॉलिसी धारकाला भरपाई मिळू शकते

★ पटरी वरून जहाज उतरवणे किंवा जमीन उलटवणे यातही फायदा होतो

★ ऑफशॉअर आणि ऑफशोअर नसलेल्या मालमत्तांना सुद्धा समुद्री विम्याचा फायदा होतो

★ बंदरामध्ये मालवाहतूक होत असताना जर नुकसान झाले तर त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकते

★ दुसऱ्या जहाजाला धडक बसल्यास नुकसान भरपाई तसेच तृतीय पक्षालाही नुकसान भरपाई मिळते

★ एखाद्या परदेशी वस्तूमध्ये पाणी मिसळले गेले तर त्याच्याही नुकसानाची भरपाई मिळते

★ सामान्य आणि किरकोळ नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई मिळते

खालील जोखमीचे समावेशन सागरी विम्यामध्ये केले जात नाही.

◆ मुद्दाम केलेल्या चुकीमुळे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई केली जात नाही

◆ विलंब आणि निहित दुर्गुण यामुळे नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई कंपनी द्वारे केली जात नाही

◆ साधारण गळती चे नुकसान

◆ एखाद्या गोष्टीची पॅकिंग चुकीच्या पद्धतीने केली गेली असल्यास त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी द्वारे केली जात नाही

◆ हेतू परस्पर जहाजाचे किंवा मालाचे नुकसान केल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करत नाही

◆ नुकसान अन्वस्त्र वापरामुळे झाले असेल तर ते भरून काढले जात नाही

या लेखांमधून आपण सागरी विमा या विषयासंबंधी माहिती घेतले आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? हे नक्की आपल्या कमेंट द्वारे कळवा। तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या…

धन्यवाद…!

शेअर करा

Leave a Comment