Dividend हे खास बक्षीस आहे जे कंपन्या आपल्या शेअर होल्डर्सला देतात. समजा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी एखादी बेकरी उघडली आणि त्या बेकरी मधून जे काही प्रॉफिट येत आहे त्यातील काही भाग तुम्ही अशा लोकांना दिला ज्यांनी ह्या बेकरीत तुम्हाला हातभार लावला आहे यालाच खऱ्या प्रकारे डिव्हीडंट म्हणतात म्हणजे एक प्रकारे शेअर होल्डर्स ला थँक्यू म्हणण्याचा प्रकार आहे. काही कंपन्या डिव्हीडंट रेग्युलर आपल्या शेअर होल्डरला देतात याप्रकारे काही पैसे कमवण्याची संधी शेअर होल्डर्स ला मिळते. डिव्हीडंट एक प्रकारचा बोनस आहे जो कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला देते.
अनुक्रमणिका
Dividend म्हणजे काय | Dividend Meaning in Marathi
Dividend हा खूप महत्त्वाचा भाग आहे जो प्रत्येक शेअर होल्डर ला माहित असणे गरजेचे आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कंपनी आपल्या प्रॉफिट मधला काही हिस्सा आपल्या शेअर होल्डर्स ला देते यालाच Dividend म्हणतात.
भारतामध्ये Dividend एक महत्त्वाचा भाग आहे जो संपत्ती बनवण्यासाठी मदत करतो. एखादी कंपनी प्रॉफिट मिळवते तेव्हा ती कंपनी काही प्रॉफिटचा हिस्सा आपल्या शेअर होल्डर्स ला Dividend च्या रूपात देते. Dividend तुम्हाला कॅशच्या स्वरूपात मिळतात किंवा जास्तीचे शेअर म्हणून कंपनी देते.
Dividend तुम्हाला एक प्रकारचे नियमित इन्कम देते. असे इन्वेस्टरस ज्यांना नियमित इन्कम मिळवण्यास मदत करते आणि जर दीर्घकालीन विचार केला तर त्याचं कंपाऊंडिंग होत राहतं हे इन्वेस्टर किंवा शेअर होल्डर साठी खूप फायद्याचे ठरते.
इन्वेस्टर साठी अशा कंपन्या शोधणे खूप महत्त्वाचे आहे जे नियमित डिव्हिडंट देतात. अशा कंपन्या ज्या प्रॉफिट मध्ये आहेत नक्कीच इन्व्हेस्टर ला फायदा देतात समजून घेतल्यानंतर इन्वेस्टर आपले इन्वेस्टमेंट पोर्टफोलीओ व्यवस्थित मॅनेज करू शकतो कारण एक प्रकारे तुम्हाला कंपनीच्या फायद्यामध्ये मध्ये सहभाग करण्यास मदत करते. त्यामुळे डिव्हीडंट एक प्रकारे तुम्हाला तुमचे फायनान्शिअल गोल मिळवण्यास मदत करतो.
डिव्हिडंट कसा ठरवला जातो
Dividend एक प्रकारे नियमित इन्कम मिळवण्यास मदत करते तुम्हाला लक्षात घेतले पाहिजे की ते कसे ठरवतात.
Dividend देण्याचे अधिकार हे कंपनी मॅनेजमेंट आणि बोर्ड डायरेक्टर्स कडे असतात आणि ते त्याच्यासाठी मान्यता देतात. डिव्हिडंट देताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो जसं की प्रॉफिट, कॅश फ्लो आणि भविष्यातील कंपनीला होणारा फायदा. सर्वसाधारणपणे कंपनीला नियमित एक प्रकारचे प्रॉफिट येत असेल तर ते Dividend आपल्या शेअर होल्डर्स ला देतात.
Dividend साधारणतः स्टॉक प्राईस च्या काही पर्सेंटेज मध्ये काढले जातात. Dividend हे कंपनीचे परफॉर्मन्स, इंडस्ट्रीचे स्टॅंडर्ड आणि आपल्या देशाच्या इकॉनोमी वर अवलंबून असते.
Dividend कडे पाहून तुम्ही त्या कंपनीच्या फायनान्शिअल हेल्थ बद्दल जाणून घेऊ शकता आणि योग्य असे इन्वेस्टमेंट निर्णय घेऊ शकता.
Dividend चे कॅल्क्युलेशन कसे करतात
Dividend कॅल्क्युलेशन हा खूप महत्त्वाचा इन्व्हेस्टमेंट चा भाग आहे त्यासाठी तुम्हाला खालील काही टर्म्स माहिती असणे गरजेचे आहे
डिव्हिडंट पर शेअर (DPS)- साधारणता आपले डिव्हीडंट शेअर मागे ठरवले ठरवले जातात. उदाहरणता जर डीपीएस पाच असेल तर प्रत्येक शेअर होल्डर्स ला एका शेअर मागे ५ रुपये मिळतात.
शेअर काउंट – तुम्ही त्या कंपनी मध्ये किती शेअर होल्ड करता याला शेअर काउंट म्हणतात
आता तुम्हाला DPS आणि तुमच्याकडे असलेल्या शेअरचा गुणाकार करावा लागेल समजा तुमच्याकडे 100 शेअर असतील आणि DPS ५ असेल तर तुम्हाला मिळणारा डिव्हीडंट हा 500 रुपये असेल
लक्षात घ्या की कंपनी डिव्हिडंट नियमित देतात जसे की तीन महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा आता तुम्हाला डिव्हीडंट कसा कॅल्क्युलेट करतात हे समजले त्या प्रकारे तुम्ही तुमची डिव्हिडंट रक्कम जाणून घेऊ शकता.
Dividend विषयी महत्त्वाच्या तारखा
Dividend विषयी महत्त्वाच्या तारखा जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे मला तर मग पुढे पाहूया.
1. रेकॉर्ड डेट तारखेला कंपनी ठरवते की कोणते स्टॉक होल्डर्स डिव्हिडंट साठी ग्राह्य आहेत. या तारखेच्या आधी शेअर होल्डर्स डिव्हिडंट पे आऊट साठी ग्राह्य धरले जातात
2 एक्स डिव्हिडंट डेट (Ex-Dividend Date) – स्टॉकसाठी एक्स-डिव्हिडंड तारीख सामान्यतः रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी ठरवली जाते. तुम्ही स्टॉक त्याच्या एक्स-डिव्हिडंड DATE किंवा नंतर खरेदी केल्यास, तुम्हाला पुढील डिव्हिडंड पेमेंट मिळणार नाही.
3. डिक्लेरेशन डेट – या तारखेला कंपनी आपला डिव्हिडंड ची घोषणा करते आणि रक्कम सांगतात. यातून कंपनीचे फायनान्शिअल हेल्थ आणि वचनबद्धता शेअर होल्डर च्या प्रति दिसून येते.
4 पेमेंट डेट – या दिवशी शेअर होल्डर्सला डिव्हिडंट रक्कम मिळते ही त्यांच्या DMAT अकाउंटशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होते.
या काही महत्त्वाच्या तारखा आहे ज्या तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन योग्य घ्याल
Dividend चे फायदे
1. नियमित उत्पन्न – Dividend च्या माध्यमातून एक प्रकारचे नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते त्यामुळे आपल्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास एक प्रकारची मदत मिळते.
2. पॅसिव्ह इन्कम – Dividend एक प्रकारचे पॅसिव्ह इन्कम आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे काम करावे लागत नाही
3 पुनर्गुंतवणुकीद्वारे वाढ – तुम्हाला मिळालेला डिव्हीडंट ला तुम्ही परत इन्वेस्टमेंट केला तर तुम्हाला अधिक शेअर्स मिळतात आणि कालांतराने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो तुमची गुंतवणूक वाढ चांगली होते.
4 टॅक्स सेविंगसाठी मदत – डिव्हिडंट काही प्रमाणात टॅक्स बेनिफिटही देतात आणि टॅक्स सेव करायला मदत मिळते.
डिव्हिडंट समजण्यासाठी या ब्लॉग पोस्ट मधून मदत मिळाली असेल. डिव्हिडंट म्हणजे कंपनीच्या प्रॉफिट मधला काही भाग शेअर होल्डर्स ला रेगुलर इन्कम म्हणून दिला जातो आणि या प्रकारे आपले इन्वेस्टमेंट रिटर्न्स वाढतात डिव्हिडन्स हे कंपनीच्या प्रॉफिट आणि मॅनेजमेंट डिसीजन वरती अवलंबून असतात
डिव्हिडंट चा योग्य प्रकारे वापर केल्यास तुम्हाला नियमित उत्पन्न आणि दीर्घकालीन संपत्ती जमा करण्यासाठी फायदा होऊ शकतो
वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न (FAQ)
Dividend का दिला जातो
एक प्रकारे कंपन्या आपल्या प्रॉफिटचा काहीसा शेअर होल्डर्स ला देतात.अशा प्रकारे शेअर होल्डर्स ला त्यांच्या मालकी बद्दल बक्षीस मिळते. कंपनी शेअर होल्डर्स ला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते आणि डिव्हिडंड च्या माध्यमातून कंपनी आणि शेअर होल्डर्स मधील विश्वास वाढवते.
Dividend कुठे जमा होतो
आपल्या डिमॅट खात्याशी जोडलेल्या बँकेच्या खात्यात डिव्हिडंट जमा होतो. त्यामुळे शेअर्स होल्डरला त्यांचे डिव्हीडंट सोयीस्कर मिळतात. डिव्हिडंट जमा झाला की नाही यासाठी तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट पाहून चेक करू शकता.
डिव्हिडंट यील्ड (Dividend Yield) म्हणजे काय?
डिव्हिडंट यील्ड हे कंपनी वर्षाला जेवढा डिव्हिडंट देते आणि स्टॉक प्राईस यांच्या गुणोत्तरावरती ठरते.
Dividend चा शेअर वरती काय परिणाम होतो
Dividend तुम्हाला एक प्रकारचे नियमित इन्कम देते. तुम्ही इन्वेस्ट केलेल्या कंपनीच्या फायनान्शिअल हेल्थ आणि प्रॉफिट बद्दल जाणून घेण्यास मदत करते