क्रिप्टो करेंसी म्हणजे काय ? | Cryptocurrency Information In Marathi

Cryptocurrency kay ahe, Cryptocurrency Marathi mahiti, Cryptocurrency in India Marathi , Cryptocurrency Marathi meaning, how to invest in Cryptocurrency in Marathi , Cryptocurrency information in Marathi, Cryptocurrency Information In Marathi

जेव्हा मनुष्य अस्तित्वात आला,त्या नंतर देवाण-घेवाण सुरू झाली. सर्वात आधी वस्तु घेण्यासाठी वस्तूची देवाण-घेवाण केली जात, पुढे काळ बदलत गेला. नोटा आणि शिक्के यांचा शोध लागला. अशा  प्रकारे चलन अस्तित्वात आले.आधी पैसे देवून व्यवहार होत. काही दिवसांनंतर पैसे देखील डिजिटल स्वरूपात आले. पण प्रत्येक देश आणि त्यांचे स्वताचे असे चलन आहे, पण क्रिप्टो करेंसी एक असे डिजिटल चलन आहे जे संपूर्ण जगात चालते. आजच्या लेखात आपण क्रिप्टो करेंसी  काय आहे. हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय?( What is cryptocurrency in Marathi)

आज विचार केला तर प्रत्येक देशांकडे स्वताचे असे चलन आहे.जसे की भारताकडे रुपया, अमेरिकेकडे डॉलर,सौदी अरेबिया कडे रियाल. पण तरी देखील प्रश्न पडतो चलन म्हणजे नेमकं काय? चलन म्हणजे अशी धन प्रणाली जी त्या सरकारतर्फे मान्यताप्राप्त आहे. त्या देशांतील लोक ते मान्यता प्राप्त चलन व्यवहार करण्यासाठी वापरतात. त्या प्रत्येक चलनांची काही ठराविक किंमत आहे. यास चलन म्हणतात.

जेव्हा तुम्ही ते पैसे वापरुन एखादी वस्तु किंवा सेवा खरेदी करता.त्याला चलन म्हणतात. उदा. 50 रुपयांच्या नोटेने तुम्ही फळ खरेदी करता, म्हणजेच तुमच्या देशांने त्या नोटेची किंमत 50 रुपये ठरविली आहे. जर तुम्ही 500 रुपयांची जुनी नोट वापरली तर ती चालणार नाही. कारण तुमच्या सरकारने त्यांची मान्यता काढून घेतली आहे.नोटा आणि शिक्के यांना फीजिकल करन्सी म्हणतात कारण तुम्ही ते हातात घेऊ शकता. परंतु क्रिप्टो करेंसीच्या बाबतीत असे नाही. क्रिप्टो करेंसी हे एक डिजिटल चलन आहे.यांचे सर्व काम डीसेंट्रललाईज सिस्टमद्वारे केले जाते. यामध्ये होणारी देवाण-घेवाण ही डिजिटल सही द्वारे होते. क्रिप्टो करेंसीद्वारे त्यांचे रेकॉर्ड ठेवले जाते.दुसऱ्या शब्दांत क्रिप्टो करेंसी हे एक ब्लॉकचेन टेक्नोलॉजी यावर आधारित एक व्हर्च्युल करन्सी आहे. जे क्रिप्टो करेंसीद्वारे सुरक्षित केले गेले आहे.क्रिप्टो करेंसी कॉपी करने शक्य नाही.

क्रिप्टो करेंसी ही वास्तविक स्वरूपात एक पीर टू पीर कॅश प्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गॉरिथ्मवर बनली आहे. म्हणजेच ही फक्त डिजिटल स्वरूपात वापरली जाऊ शकते. क्रिप्टो करेंसीचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे डीसेंटरलाईज स्वरूपात म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात असते. या चलनावर कोणाचे नियंत्रण नसते. त्यामुळे सुरुवातीला या चलनाला फार विरोध झाला पण बीटकॉईनची लोकप्रियता पाहता अनेक देशांनी यांचा स्वीकार केला. अजून देखील इतर अनेक देशांनमध्ये याविषयी शंका आहेत, त्यामुळे परवानगी मिळालेली नाही.

क्रिप्टो करेंसी चा भाव कसा ठरविला जातो | Cryptocurrency price determination

क्रिप्टो करेंसी  जरी भौतिक स्वरूपात नसली तरी त्यांची स्वताची अशी एक किंमत आहे. म्हणजेच काय तर क्रिप्टो करेंसी  देऊन तुम्ही सामान खरेदी करू शकता.ट्रेड देखील करू शकता. तुम्हाला जर क्रिप्टो करेंसी  विकत घ्यायची असेल तर तसे देखील करू शकता. यामध्ये तुम्ही गुंतवणुक देखील करू शकता क्रिप्टो करेंसीला डिजिटल मनी, व्हरचुव्हल मनी देखील म्हणतात. काही ठिकाणी इलेक्ट्रिकल मनी देखील म्हणतात.आता तुम्ही विचार कराल हे सर्व ठीक आहे पण यांची किंमत कशी असते. तुमच्या देशांच्या चलनापेक्षा यांची किंमत अधिक असते. काही क्रिप्टो करेंसीची किंमत तर डॉलरपेक्षा देखील अधिक आहे. परंतु यांची किंमत कधीच स्थिर राहत नाही. म्हणजेच काय क्रिप्टो करेंसीचे मार्केट कधीच स्थिर नसते,यांमध्ये प्रचंड चढ-उतार येत असतात.त्यामुळे यांची किंमत कमी जास्त होत असते.

क्रिप्टो करेंसीचे काम कसे चालते | How cryptocurrencies work in Marathi

क्रिप्टो करेंसी ही  मागे म्हटल्याप्रमाणे एक ब्लॉक चेन आहे. यांमध्ये देण्या-घेण्याचे रेकॉर्ड ठेवले जातात.तसेच अतिशय शक्तीशाली कम्प्युटरद्वारे यांचे काम चालते.शक्तीशाली कम्प्युटरद्वारे क्रिप्टो करेंसी मायनिग केले जाते.मायनिग म्हणजे लक्ष ठेवले जाते. जे हे काम करतात त्यांना मायनर्स म्हणतात.

जेव्हा क्रिप्टो करेंसी देवाण-घेवाण होते तेव्हा त्यांची सर्व माहिती ब्लॉकचेन मध्ये ठेवली जाते. प्रत्येक देवाण-घेवानीचा एक ब्लॉक असतो. या ब्लॉकची सुरक्षितता आणि एंक्रिप्शन काम मायनर्स करतात.यासाठी क्रीपटोग्राफिक्स करून एक हॅश कोड निर्माण केला जातो. जेव्हा मायनर बरोबर हॅश करून ब्लॉक सुरक्षित करतो तेव्हा ते ब्लॉकचेनमध्ये जोडले जाते.आधीचे जे ब्लॉकचे नेटवर्क असते त्याद्वारे त्याला Nodes द्वारे  व्हेरिफाय केले जाते.यालाच कॉस्यकूवेन्स म्हणतात. जेव्हा कॉस्यकूवेन्स ब्लॉकमध्ये व्हेरिफाय होतो तेव्हा तो सुरक्षित मानला जातो. ही सर्वात योग्य पद्धत मानली जाते .जो मायनर्स सुरक्षित करतो त्याला क्रीपटोकॉइन्स दिले जातात. हा एक रिवॉर्ड असतो.ज्याला प्रूफ ऑफ वर्क म्हणतात.

क्रिप्टो करेंसी मार्केट | Cryptocurrency market

आपण जर भारतीय क्रिप्टो करेंसी  मार्केटचा विचार केला तर भारतात coinswitch,CoinDCX, WazirX असे प्रसिद्ध क्रिप्टो करेंसी एक्सचेंज आहेत. तसेच Monero (XMR), Tether (USDT), Binance Coin (BNB), Dogecoin (DOGE), Stellar (XLM),Bitcoin Cash (BCH),Polkadot (DOT),Cardano (ADA), Litecoin (LTC),Ethereum (ETH) या सारखे शेकडो क्रिप्टो  कॉइन्स तुम्ही खरेदी करू शकता.तुम्ही भारतीय चलनात हे खरेदी करू शकता नंतर ते क्रिप्टो मध्ये रूपांतरीत होतात. भारतात WazirX सारखे प्रसिद्ध आणि विश्वासू  क्रिप्टो एक्सचेंज आहेत.

उत्तम क्रिप्टोकरेंसी | The best cryptocurrency

क्रिप्टो करेंसीचे नाव वाचताच बीटकॉइन डोक्यात येते.परंतु बीटकॉइन काही एकमेव क्रिप्टो करेंसी  नाही.या बरोबरचहजारो इतर देखील क्रिप्टो करेंसी  आहेत, ज्या लोकांना माहीत नाहीत,  अशाच काही प्रसिद्ध क्रिप्टो करेंसी  विषयी जाणून घेऊया.

Bitcoin- Bitcoin ही दुनियेतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी क्रिप्टो करेंसी आहे. 2009 मध्ये संतोषी नकमोटो ने ही करन्सी बनविली. याआधी देखील अनेक डिजिटल करन्सी बनविल्या गेल्या पण त्या इतक्या यशस्वी झाल्या नाहीत. बीटकॉइनला देखील सुरुवातीला प्रचंड त्रास झाला पण आज जगातील सर्वात महाग क्रिप्टो करेंसी   ही बीटकॉइन आहे. बीटकॉइन जगातील सर्वात महाग करन्सी आहे. त्यांच्या किंमती उच्च स्थानावर आहेत.

Ethereum (ETH)- ही एक डीसेंट्रलाईज ओपेन सोर्स ब्लॉकचेन आहे. कॉइनमार्के कॅपच्या अंदाजाने जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो करेंसी  आहे. या करन्सीला 2015 मध्ये लॉन्च केले गेले होते.Ethereum जगातील सर्वाधिक वापरली गेलेली ब्लॉकचेन नेटवर्क आहे. याला ईथर या नावाने ओळखले जाते.

Ripple- रियल टाइम  ग्रोस सेटलमेंट सिस्टम आहे तसेच ब्लॉकचेन नेटवर्क देखील आहे.याला 2012 मध्ये अमेरिकेतील रिपल लेन्स यांनी बनविले आहे. क्रिप्टो करेंसी  बरोबरच ही एक क्रिप्टो करेंसी एक्सचेंज कंपनी देखील आहे.

Tether (USDT)- Tether (USDT) यांची सुरुवात 2014 मध्ये रीयलकॉइन या नावाने झाली होती.काही महिन्यानंतर यांचे नाव बदलून Tether (USDT) केले गेले.आता याला Tether ओळखतात. याला स्टेबल कॉइन नावाने ओळखले जाते. कारण याला नेहमी 1 डॉलर पेक्षा अधिकच्या मूल्यांसाठी डीजाईन केले आहे.

Monero (XMR)- ही एक डीसेंट्रलाईज ओपेन सोर्स क्रिप्टो करेंसी आहे. या कंपनीचे सुरक्षितता आणि डीसेंट्रलाईजेशन यावर अधिक लक्ष आहे. ही कंपनी त्यांच्या सुरक्षितेसाठी अधिक प्रसिद्ध आहे.परंतु यांचा अधिक वापर डार्क वेब करतात.डार्क लीगलकी सर्वात प्रसिद्ध क्रिप्टो करेंसी आहे.

क्रिप्टो करेंसीचे  फायदे | Advantages of Cryptocurrency

क्रिप्टो करेंसी  ही एक डिजिटल करन्सी आहे. यांमध्ये फसवणूक होण्याच्या फार कमी शक्यता आहेत. अतिशय सुरक्षित आहे.क्रिप्टो करेंसीची खरेदी, विक्री आणि यांमध्ये गुंतवणूक करने सोप्पे आहे.कारण हे डिजिटल स्वरूपात आहे.यासाठी बँक खाते लागत नाही.क्रिप्टो करेंसी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे कारण यांच्या किंमती सतत वाढत आहेत.क्रिप्टो करेंसी  राज्य, देश आणि सरकार यांचे नियंत्रण नाही.एक सुरक्षित चलन म्हणजे क्रिप्टो करेंसी  होय.

क्रिप्टो करेंसीचे  तोटे | Disadvantages of Cryptocurrency

प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तसेच तोटे देखील असतात. असच काही क्रिप्टो करेंसी  संदर्भात आहे.क्रिप्टो करेंसीचा सर्वात मोठा तोटा हा आहे की यावर कोणाचे नियंत्रण नाही.म्हणजेच यांच्या किंमतीवर कोणाचे देखील नियंत्रण नाही.अचानक यांच्या किंमती वाढतात आणि कमी होतात. ऑनलाइन असल्यामुळे हे हॅक होण्याची शक्यता आहे. काही क्रिप्टो करेंसी याआधी हॅक झाल्या आहेत.अवैध्य कामांसाठी देखील क्रिप्टो करेंसी चा वापर केला जाऊ शकतो.तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली जाऊ शकते.त्यामुळे धोका निर्माण होतो.क्रिप्टो करेंसी  भौतिक स्वरूपात नाही.

क्रिप्टो करेंसी वैध आहे का? | Is Cryptocurrency legal

जर तुम्ही या विचारात असाल की क्रिप्टो करेंसी वैध आहे का तर त्यांचे उत्तर हो आणि नाही देखील आहे. कारण काही देशांमध्ये याला मान्यता आहे तर काही देशांनी अजून देखील मान्यता दिलेली नाही.काही देशांनी या चलनाला पूर्णता कायदेशीर मान्यता दिलेली आहे. भारताचा विचार केला तर आपल्या देशांत क्रिप्टो करेंसी पूर्णता वैध आहे.

निष्कर्ष

 क्रिप्टो करेंसी ही एक संगणक प्रणालीवर आधारित फाइल आहे. डिजिटल पाकीट देखील म्हणता येईल. क्रिप्टो करेंसी नवीन युगाचे एक नवीन चलन आहे. जे सुरक्षित आणि उत्तम नफा देणार देखील आहे. यामध्ये जोखीम देखील तितकीच आहे.त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी पूर्वक करावी. आधी अभ्यास करावा. मगच गुंतवणूक करावी.

शेअर करा