PPF अकाऊंट म्हणजे काय? | PPF Information in Marathi

अनुक्रमणिका

पीपीएफ योजना माहिती PPF scheme Marathi Information

पब्लिक प्रॉव्हीडंट फंड म्हणजेच पीपीएफ होय. सर्वसामान्य माणूस किंवा मध्यवर्गीय माणूस,स्वताची नोकरी करून उदरनिर्वाह करत असतो.यातून तो भविष्यासाठी देखील छोटी बचत करत असतो. या सर्व बचत योजनेपैकी एक योजना म्हणजे पीपीएफ होय. सरकारी बचत योजना म्हणून पीपीएफ ओळखली जाते.पीपीएम एक किंवा अधिक व्यक्तीच्या नावे नामनिदर्शक होते.

PPF अकाऊंट म्हणजे काय? | PPF account in Marathi

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPFही एक दीर्घकालीन योजना आहे. जी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीच्या रक्कमेवर उत्तम परतावा देते.सर्वात महत्वाचे म्हणजे मिळालेला परतावा हा व्याज आणि मिळकत आयकर अंतर्गत यासाठी करपत्र नसते.या योजत एखाद्याने पीपीएफ खाते उघडले पाहिजे आणि वर्षभर रक्कम जमा केली जाते ती कलम 80-सी नुसार इन्कम टॅक्स वजावटी दाव्यात समाविष्ट होते.

पीपीएफ खाते कोण उघडू शकते (पात्रता) |  Eligibility to open a PPF account

पीपीएफ खाते उघडणे अतिशय सोप्पे आहे. यासाठी ज्या व्यक्तीला पीपीएफ खाते उघडायचे आहे, तो व्यक्ती भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.तसेच जे अनिवासी भारतीय आहेत त्यांना 2018 पासून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाथी खाते उघडण्यासाठी परवानजी नाही. सध्या देखील पीपीएममधील नियमांमध्ये बदल केले जावेत यासाठी काही प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.पण अजून ते मंजूर झालेले नाहीत.

पीपीएफ खात्यासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for PPF account in Marathi

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • आधार कार्ड
  • मतदार कार्ड
  • सही केलेला चेक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पीपीफ अकाऊंट कसे उघडावे – How to open a PPF account

पीपीएफ खाते भारतीय पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँक इत्यादी कोणत्याही सरकारी बँकेत उघडले जाऊ शकते.आता अनेक खाजगी बँका देखील पीपीफ खाते उघडून देतात. त्यासाठी योग्य फॉर्म भरणे आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.जसे की केवाईसी असणे गरजेचे आहे.ओळख पत्र,पत्ता पुरावा, स्वाक्षरी पुरावा ही कागदपत्रे सादर केल्यानंतर तुमचे खाते उघडले जाते. व त्या नंतर तुमच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करू शकतात.

पीपीफ खात्यांसाठी व्याजदर किती आहे? What is the interest rate for PPF accounts?

सध्या पीपीफ खात्यांसाठी व्याजदर हा ७.१ ( ३१ मार्च २०२० तो ७.९ टक्के होता) वित्त मंत्रालय दरवर्षी व्याजाचा दर ठरविते. ३१ मार्च रोजी हे दर जाहीर केले जातात.महिन्याच्या पाचव्या दिवसांपासून ते महिन्यांच्या शेवटच्या दिवसातील सर्व कमी शिल्लक रक्कमेवर दिला जातो.

पीपीफ खात्याची वैशिष्‍ठ्‍ये | Features of PPF Account

१.  पीपीएफ चा कार्यकाळ हा १५ वर्षांचा असतो, तो तुमच्या हिशोबाने पाच वर्षाने वाढविता येतो.

२. पीपीएफ प्रत्येक आर्थिक वर्षासाठी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाखांची गुंतवणूक करता येते. एकरक्कमी किंवा जास्तीत जास्त १२ हप्त्यामध्ये गुंतवणूक करता येते.

३. केवळ १०० रुपये भरून तुम्ही हे खाते उघडू शकता.ओपनिंग बॅलेन्स जास्त लागत नाही.१.५ लाखांपेक्षा जर जास्त वार्षिक गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही.

४. पीपीएफ खात्यात १५ वर्षासाठी किमान रक्कम जमा करावी लागते.

५. पीपीएफ खात्यातील रक्कम एकतर रोख चेक,डीमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाइन फंडद्वारे ट्रान्सफर केली जाते.

६. पीपीएफ खाते फक्त एका व्यक्तीच्या नावावर असू शकते. संयुक्त खाते उघडण्याची परवानगी नाही.

७. पीपीएफला  भारत सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे हमीपत्र,जोखीम मुक्त परतावा तसेच भांडवल रक्षण मिळते.पीपीएफ जोखमीचा घटक कमी असतो.

पीपीएफ मधून पैसे काढणे  | Withdrawal from PPF Account

नियमानुसार पीपीएफ खात्यातील शिल्लक केवळ परिपक्कता नंतर अर्थात १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे काढून घेऊ शकता.

१५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीपीएफ खात्यात जमा झालेल्या व्याजासह, खातेधारांच्या जमा झालेल्या रक्कमेची संपूर्ण रक्कम निशुल्कपणे काढून घेतली जाऊ शकते. खाते बंद केले जाऊ शकते.

जर एखाद्या खातेधारक व्यक्तीला पैशांची गरज लागली तर त्यांचे खाते काढल्यापासून तो ६ वर्षांनंतर म्हणजे ७ व्या वर्षांपासून थोडी रक्कम काढू शकतो.

पीपीएफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया | The process of withdrawing money from PPF

जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यातील बाकी,थकबाकी,आणि अर्धवट किंवा पूर्णपणे मागे घेण्याचे ठरविले असेल तर

स्टेप १ – पीपीएफ खात्याची संपूर्ण माहिती तसेच फॉर्म सी वापरुन पूर्ण अर्ज भरा.

स्टेप २ – जेथे तुमचे पीपीएफ खाते आहे अशा बँकेच्या संबंधित शाखेत अर्ज पाठवा.

फॉर्म सी मध्ये काय असते?

फॉर्म सीमध्ये मुख्य तीन भाग आहेत.

१) पहिला भाग हा घोषणापत्र ,जेथे आपण आपला पीपीएफ खाते क्रमांक आणि आपण पैसे काढण्यासाठी प्रस्तावित केले पाहिजे. खाते उघडून किती वर्ष झाले आहेत त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

२) कार्यालयीन वापराचा विभाग असतो ज्यामध्ये

  • पीपीएफ खाते उघडले तेव्हाची तारीख
  • पीपीएफ खात्यात एकूण किती शिल्लक
  • पूर्वी विनंती केलेली पैसे काढण्याची परवानगी होती त्या तारखेस
  • खात्यात पैसे काढण्याची एकूण रक्कम
  • पैसे काढण्यासाठी मंजूर रक्कम
  • प्रभारी व्यक्तीची तारीख आणि स्वाक्षरी

सेक्शन 3 – बँकेचा संपूर्ण तपशील जेथे तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत.पीपीएफ पासबुकची प्रत जोडणे देखील बंधनकारक आहे.

पीपीएफमध्ये कर्ज काढणे शक्य आहे का? Is it possible to take out a loan in PPF?

ग्राहकाला तिसऱ्या आर्थिक वर्षांपासून ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.पीपीएफ खात्यातील ग्राहकांने १२  डिसेंबर २०१९ रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या कर्जावर व्याजदर पीपीएफवरील प्रचलित व्याजदरापेक्षा १ टक्का अधिक असेल.सार्वजनिक भविष्यच्या निर्वाह निधीच्या २०१९ पूर्वीच्या व्याजदरात २ टक्के कपात केली आहे. परंतु मागील वर्षांच्या अखेरीस जास्तीत जास्त २५ टक्के शिल्लक कर्ज म्हणून परवानगी दिली जाईल.अशा रक्कमेची परतफेड ३६ महिन्यात करावी लागेल.तिसऱ्या आणि सहाव्या वर्षापर्यत आपण कर्ज घेऊ शकतो.निष्क्रिय खाती आणि बंद पडलेली खाती कर्जासाठी पात्र नसतात.

पीपीएफ खाते बंद किंवा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया |The process of closing or transferring a PPF account

संपूर्ण वर्षांमध्ये जर किमान रक्कम गुंतविली नाही तर खाते निष्क्रिय केले जाते.जर पुन्हा खाते सक्रिय करायचे असेल तर त्यासाठी खाते धारकांना निष्क्रिय वर्षासाठी ५० रुपये भरणे जरूरी आहे.तसेच प्रत्येक निष्क्रिय वर्षासाठी खात्यात ५०० रुपये भरणे जरूरी आहे. जर खातेधाराचा मृत्यू झाला तर १५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या नामित व्यक्तीला उर्वरित रक्कम दिली जाते.

पीपीएफ बद्दल आणखी काही महत्वाच्या गोष्टी

जर तुमचे पीपीएफ खाते असेल तर तुम्ही त्यांचा हप्ता हा महिन्यांच्या ५ तारखेला किंवा त्याआधी जमा करावा त्यामुळे त्यांना दरमहिन्याला जास्तीत जास्त व्याज मिळते.वर्षातून एकदाच तुम्ही पैसे काढू शकतात.

Frequently asked questions (FAQs)

१५ वर्षानंतर पीपीएफ खात्यातील पैसे काढणे बंधनकारक आहे का?

जर तुमचे १५ वर्षपूर्ण झाल्यानंतर पीपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढणे अनिवार्य नाही.आपण आपले खाते चालू ठेवू शकता.

EPF आणि PPF मधला फरक काय आहे?

EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी  Employees’ Provident Fund (EPF) ही योजना फक्त नोकरदार व्यक्तीसाठी तयार केली गेली आहे.या योजनेमध्ये मालक आणि त्यांचे कर्मचारी दोन्ही देखील आर्थिक योगदान देतात.यांचा लाभ त्यांना नोकरीनंतर सेवानिवृती नंतर होतो.PPFमध्ये मात्र मात्र एकच व्यक्ती योगदान देऊ शकतो.PPFमध्ये फक्त एकच व्यक्ती गुंतवणूक करत असतो.

PPF खात्यातील मॅच्युरिटी कालावधी किती आहे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह PPF खात्याचा मॅच्युरिटी कालावधी  हा १५ वर्षांचा असतो.१५ वर्षांनंतर तो पुढचे ५ वर्ष वाढविता येतो.

शेअर करा

Leave a Comment