Upstox काय आहे? | Upstox Information in Marathi

Upstox Information in Marathi – सध्या अनेकजण शेअर बाजारात मोठ्याप्रमाणात पैसे गुंतवणूक करत आहेत. अनेकांसाठी शेअर बाजार हा साईट बिजनेस आहे, तर अनेकांना साठी उत्पन्नाचे मुख्य साधन. आपल्या देशांतील अनेक युवक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मागील लेखांमध्ये आपण शेअर बाजारा संबंधी अनेक विषय पाहिले आजच्या लेखात आपण अपस्टॉक्स् (Upstox)विषय जाणून घेणार आहोत. अपस्टॉक्स् (Upstox) मध्ये डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट कसे काढायचे तसेच यामधून पैसे कसे काढायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अपस्टॉक्स् (UpStox) काय आहे? (What is UpStox?)

अपस्टॉक्स् (Upstox) हे भारतातील झपाट्याने लोकप्रिय होणारे स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमुळे ट्रेडिंग आणि गुंतवणूकीचे काम अगदी सोप्पे होते. यामुळे हे अ‍ॅप सर्वसामान्य मध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहे. हे अ‍ॅप अगदी सहजपणे उपलब्ध झाले आहे.

अपस्टॉकमध्ये (Upstox) तुम्ही तुमचे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट बनवून शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट किंवा ट्रेडिंग लगेच सुरू करू शकता. अपस्टॉक (Upstox) हे zerodha नंतरचे सर्वात मोठे शेअर मार्केट मधील डिस्काऊंट ब्रोकर आहे. अपस्टॉक हे एक भारतातील खूप प्रसिद्ध गुंतवणूक प्लॅटफॉर्म आहे, सध्या अपस्टॉकचे (Upstox) 50 लाखांहून अधिक स्टॉक ट्रेडर उपलब्ध आहे. अपस्टॉकमध्ये (Upstox) आपण ऑनलाइन पद्धतीने स्टॉक, म्यूचुअल फंड्स, डिजिटल गोल्ड, डेरीव्हेट्स, ईटीएफएस यामध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू शकतो.

अपस्टॉक्सचे (Upstox)अ‍ॅप आणि वेबसाईट- (Upstox’s app and website)

अपस्टॉक (Upstox) वेबसाईट आणि मोबाइल ॲप्लिकेशन वर्जन दोन्हीही खूप अद्यायावत आणि वापरायला सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. इंट्राडे किंवा डिलीव्हरी, F&O ट्रेडिंग सुरू करू शकता. अपस्टॉक्स्चे नवीन अपडेट असलेले अ‍ॅप हे वापरायला आणि गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करायला अतिशय सोप्पे आहे.

अपस्टॉक्सचे (Upstox) डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट काढण्यासाठी कागदपत्रे – (Documents for Upstox Demat and Trading Account )-

जर तुम्हाला डीमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे, डीमॅट अकाऊंट काढण्याची सर्व प्रोसेस ही ऑनलाइन आहे. कागदपत्रे कोणास देखील देण्याची गरज नाही. खालील कागदपत्रे आणि फक्त त्यावरील तपशील तुम्हाला लागतो.
1) आधार कार्ड – तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी संलग्न असायला हवे.
2) पॅन कार्ड
3) बँक अकाऊंट – बँक अकाऊंट मधून तुमच्या डिमॅट खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी आणि आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे काढण्यासाठी.
4) एक सेल्फी फोटो आणि एक सही जर तुमच्याकडे यूपीआय आयडी असेल तर आपण यूपीआयद्वारे लगेच पैसे बँक खात्यातून काढू शकता. किंवा आपल्या डीमॅट खात्यात टाकू शकता.

आपले डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे काढायचे- (How to withdraw your demat and trading account)

वरील सर्व कागदपत्रे आपल्याकडे असतील तर आपण खालील लिंकवर क्लिक करून लगेच तुमचे अकाऊंट काढू शकता. https://upstox.com/open-account/ लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्यावर तुमची माहिती भरायची आहे. आपला फोटो, सही, अपलोड केल्यानंतर शेवटी तुमचे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फॉर्म सबमिट होईल. त्या नंतर तुम्ही भरलेला डीमॅट फॉर्म वेरीफाय झाल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर तुमचा अपस्टॉक आयडी येईल. तो वापरुन तुम्ही लॉगिन करू शकता. त्या नंतर तुम्ही ट्रेडिंग आणि इन्वस्टमेंट देखील करू शकता.

अपस्टॉक्स् (Upstox) मधून पैसे कसे कमावयचे- (How To Make Money From Upstox)

आता आपण अ‍ॅप डाऊनलोड केले, त्या नंतर त्यावर डी- मॅट अकाऊंट देखील उघडले, बँक खाते देखील जोडले , पण आता अपस्टॉक्स् मधून पैसे कसे कमावायचे हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो? तर अपस्टॉक्स् (Upstox) मधील गुंतवणुकीचे अनेक पर्याय तुमच्या समोर खुले होतात. तुम्हाला जी योग्य वाटेल ती गुंतवणूक तुम्ही करू शकता. जसे की म्युच्युअल फंडस,आयपीओ (IPO),F&O ट्रेडिंग करून पैसे कमावू शकतो.

कोणत्याही गुंतवणूक साधनामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा सविस्तर अभ्यास करायला हवा. जसे की आपण ज्यामध्ये गुंतवणूक करणार आहोत ती कंपनी कोणता व्यवसाय करते, त्यांच्या आर्थिक बाबी आणि भविष्यातील संधी, फंडामेंटल आणि टेक्निकल अनॅलिसिस इत्यादी बाबी तसेच तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला देखील घ्यायला हवा. दूसरा एक आणखी उत्तम पर्याय म्हणजे रेफर अँड अर्न यामध्ये तुम्ही कोणतेही पैसे न गुंतवता पैसे मिळवू शकता. तुमच्या ओळखीमध्ये ज्यांचे डीमॅट अकाऊंट नाही अशांना तुम्ही लिंक पाठवून अपस्टॉक्स् (Upstox) खाते उघडण्यासाठी बोलवू शकता. तुम्ही पाठवलेल्या लिंकवर जर जाऊन त्यांनी जर खाते उघडले तर ज्यांनी खाते उघडण्यासाठी बोलावले आहे त्यांना 300 रुपये मिळतील तेही विना खर्च. ज्यांनी खाते उघडले आहे त्यांना देखील आणखी काही फायदे मिळतात.

1) फ्री डिमॅट आणि ट्रेडिंग खाते
2) रुपये 1000 ब्रोकरेज क्रेडिट पहिल्या 30 दिवसांसाठी मिळते.
3) आयपीओ व म्युच्युअल फंड यामध्ये देखील ब्रोकरेज फ्री इन्व्हेस्टमेंट

तुमची लिंक तयार करण्यासाठी तुमच्या Upstox च्या अकाऊंटमध्ये खालील लिंकवर जा https://upstox.com/refer-and-earn/ वरील लिंकवर केल्यानंतर तेथे तुमचा मोबाइल नंबर किंवा Upstox ID टाकून तुमची लिंक तयार करा. तुमच्या विविध सोशल माध्यमांवर शेअर करा. तुम्ही जर रेफर अँड अर्नमधून देखील उत्तम पैसे कमावू शकता.

अपस्टॉक्स् (Upstox)वर ट्रेडिंग कसे करायचे -(How to trade on Upstox )

अपस्टॉक्स् (Upstox) ट्रेडिंग करणे अतिशय सोप्पे आहे. सर्वात आधी क्रिएट वॉच लिस्ट – सर्वात आधी तुमच्या अपस्टॉक्स् (Upstox) अ‍ॅपमध्ये लॉगिन करा. त्या नंतर तुमच्या आवडीच्या स्टॉक पाहण्यासाठी एक स्टॉक वॉच लिस्ट बनवा. यासाठी सर्वात वरती तुम्हाला वॉचलिस्ट हा पर्याय दिसतो.

क्रिएट न्यू वॉचलिस्ट – जेव्हा तुमचे सर्व वॉच लिस्ट पाहून होते तेव्हा तुम्हाला जे शेअर्स योग्य वाटतात त्यांची तुम्ही एक वॉच लिस्ट बनवू शकता. यासाठी क्रिएट न्यू वॉचलिस्ट यावर क्लिक करा. तुम्हाला जे योग्य वाटतात त्यांची नावे अ‍ॅड करा आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. यामुळे तुम्हाला ज्या कंपन्या योग्य वाटतात त्या अ‍ॅड झालेल्या असतात. तिथे + हा पर्याय दिसतो , त्यातून तुम्ही आणखी काही पर्याय अ‍ॅड करू शकता.

बाय स्टॉक – स्टॉक खरेदी करण्यासाठी पोर्टफोलिओ ऑप्शनवर जा, तिथे खाली तुम्हाला बाय हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. स्टॉक खरेदी करताना तुम्हाला फंड असणे गरजेचे आहे. फंडस वर क्लिक करा त्यामध्ये तुम्ही अमाऊंट अ‍ॅड करा. खाली तुम्हाला पेमेंट करण्यासाठी काही पर्याय दिसतील त्यातील पर्याय निवडा. अशा प्रकारे फंडस अ‍ॅड होतील. त्यानंतर ज्या कंपनीचे स्टॉक तुम्हाला खरेदी करायचे आहे ते तुम्ही वॉचलिस्ट मधून अ‍ॅड करून, स्टॉक पर्यायवर जाऊन बायवर क्लिक करा.

सेट ऑर्डर टाइप – त्यानंतर तुम्हाला Quantity, order type,Buy,Price, Product, Option सेट करा. जेवढे शेअर घ्यायचे आहेत तेवढी Quantity टाका. ऑर्डर लिमिटला मार्केट किंवा लिमिट सेट करा. Product मधून Intraday Delivery Day निवडा. शेवटी रिव्यू पर्यायांवर क्लिक करा आणि पुन्हा एकदा तुम्ही किती शेअर घेतले आहे त्यांचे भाव काय आहेत हे एकदा तपासून घ्या. शेवटी बाय पर्यायावर क्लिक करा आणि स्टॉकची खरेदी करा.

सेल स्टॉक – जर तुम्हाला स्टॉक विकायचे असतील तर पोर्टफोलिओ मध्ये जा तिथे स्क्वेर ऑफ मध्ये जाऊन तुम्ही तुमचे स्टॉक सेल करू शकता .जर तुम्ही फंडस पर्यायावर क्लिक केले तर तुम्हाला तुम्ही जे स्टॉक विकले आहेत त्यांची अमाऊंट दिसेल.

विड्रॉ फंडस – जेव्हा तुम्ही स्टॉक विकता तेव्हा त्यातील 80 टक्के अमाऊंट तुम्हाला लगेच मिळते उरलेले पैसे दुसऱ्या दिवशी पर्यत जमा होतात. जर तुम्हाला विकलेली अमाऊंट काढायची असेल तर यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागतो. यासाठी विड्रॉ फंडस पर्यायावर जा तुम्हाला 24 -48 तासामध्ये तुमच्या बचत खात्यात पैसे जमा होतात.

डिजिटल गोल्ड आणि आयपीओ व म्यूचुअल फंड – तुम्हाला अ‍ॅपमध्ये तीन लाईन दिसतात त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजिटल गोल्ड खरेदी हा पर्याय दिसतो. तुम्ही येथे डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. तुम्ही 24 कॅरेट सोने खरेदी करू शकता. तसेच तिथे आयपीओ हा देखील एक पर्याय दिसतो तुम्ही तेथून आयपीओ साठी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला म्यूचुअल फंडसमध्ये रस असेल तर तो देखील पर्याय येथे उपलब्ध आहे. येथून तुम्ही म्यूचुअल फंडस खरेदी करू शकता.

शेअर करा