TDS म्हणजे काय? | TDS Meaning In Marathi

TDS म्हणजे काय? , What is TDS? , TDS Information in Marathi, TDS marathi information

टीडीएस (TDS) म्हणजे सरकारद्वारे घेतले जाणारे टॅक्स म्हणजे टीडीएस  (TDS) होय.TDS म्हणजे फक्त टॅक्स नव्हे तर ही एक मोठी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया टीडीएस (TDS) म्हणजे काय.

आपण एखाद्या वस्तूवर टॅक्स भरतो, त्यांचे दोन प्रकार येतात एक म्हणजे थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष टॅक्स आणि दूसरा म्हणजे ईनडायरेक्ट टॅक्स. ईनडायरेक्टला टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स म्हणतात.जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था किंवा कंपनी तुमच्या पगारातून प्रतिमहिना काही ठराविक रक्कम कापून घेते,ही रक्कम सरकारकडे टॅक्स म्हणून जमा केली जाते यास टीडीएस  (TDS)  म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स म्हणतात.सरकारी भाषेत इन्कम देणाऱ्या संस्थेला पेयर म्हणतात तर टीडीएस भरणाऱ्याला डिडक्टर म्हणतात. टीडीएस भरणाऱ्याला डिडक्टी म्हणतात.

अनुक्रमणिका

टीडीएस (TDS) चे  उदाहण |
Explanation of TDS with an Example

शाईन प्राइवेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे.ही कंपनी प्रतिमहिना रुपये ८० हजार इतके कार्यालयाचे भाडे भरते.तर यातून १० टक्के टीडीएस कापने आवश्यक आहे. ८० हजारांच्या १० टक्के म्हणजे ८हजार रुपये टीडीएस कापणे गरजेचे आहे.पैसे कापल्या नंतर ७२ हजार रुपयांची एकूण राशी  राहते. म्हणजेच त्यांचे एकूण भाडे हे ८० हजार असेल.

Deductor आणि  Deductee म्हणजे काय? | What is Deductor and Deductee in Marathi?

जेव्हा एखादी संस्था किंवा कंपनी Deductor च्या पगारातून टीडीएस कापते तेव्हा ती रक्कम सरकारी खात्यात जमा होते.Deductorची कापली गेलेली रक्कम तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरताना देखील दाखवू शकतात.जर Deductor द्वारे वेळीच टीडीएस  (TDS)    जर वेळेवर सरकारकडे जमा केला गेला नाही तर Deductor ला त्यावर दंड देखील इन्कम टॅक्स खाते आकारू शकते.

16 /16 A सर्टिफिकेट काय आहे? What is 16/16 A Certificate in Marathi?

टीडीएस (TDS) कापणारी संस्था टीडीएस कापणाऱ्या व्यक्तीला 16 /16 A सर्टिफिकेट देते. ज्यामध्ये टीडीएस कापलेली सर्व माहिती सविस्तर दिलेली असते.काही नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न अतिशय कमी असते, मर्यादित असते, अशा लोकांना टॅक्स लागू होत नाही. पण कंपनीद्वारे त्यांचा टीडीएस कापला जातो, अशा वेळेस टीडीएस क्लेम देखील करता येतो.
उदा- समजा तुमचे मासिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार आहे, म्हणजेच तुमचे उत्पन्न हे टॅक्स फ्री आहे, पण तरी देखील तुमच्या पगारातून टीडीएस कट झाला असेल तर तुम्ही आयटीआरच्या फाइलद्वारे टीडीआर रिफंडसाठी अप्लाय करू शकता.

टीडीएस (TDS) कशावर कापला जातो? | On what is TDS deducted?

टीडीएस (TDS)  प्रत्येक गोष्टीवर कापला जातो, जसे की पगार,व्याज,लाभांश, कमिशन,प्रोफेशनल फीज,ब्रोकरेज, कॉंट्रॅक्ट पेमेंट आदि.
उदा- तुम्ही एखादी कंपनी चालवत आहात, तुमच्याकडे काही कर्मचारी काम करतात, तर तुम्ही देखील त्यांच्या पगारातून टीडीएस कापू शकता. तुम्हाला तो कापणे गरजेचे आहे.

सरकार टीडीएस (TDS) का कापते? | TDS Deduction in Marathi

टीडीएस कापणे अतिशय गरजेचे आहे. आता हेच पहा भारत हा विशाल लोकसंख्या असलेला देश आहे. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविणे देखील गरजेचे आहे. त्या बरोबरच उपत्नाच्या देखील अनेक अटी आहेत. अशा वेळेस प्रत्येक नागरिकांना योग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी टीडीएस कापला जातो. आपल्या देशांच्या प्रगतीसाठी पैसा अतिशय म्हटवपूर्ण आहे. जर तुमचा टीडीएस कापला गेला तरच देश चालविणे शक्य होईल. नागरिकांना उत्तम सुविधा देता येतील.

टीडीएससाठी (TDS) काही नियम आहेत?| TDS deduction Rules in Marathi

  • सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पेमेंट देय असताना वास्तविक रक्कम भरल्यानंतर त्यापैकी जर आधी असेल त्यावर कऱ् वजा केला जावा.
  • कर कपात होईपर्यत टीडीएस कपात विलंब दरमहा १ टक्का व्याज भरावे लागेल.
  • प्रत्येक व्यक्ती असो किंवा कंपनी पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यन्त सरकारच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
  • टीडीएस रक्कम उशिरा किंवा न भरल्यास कऱ् जमा होई पर्यन्त दरमहा १.५ टक्के व्याज आकरले जाईल.

फॉर्म 26AS काय आहे? | What is Form 26AS in Marathi

जर तुम्हाला हे समजले असेल कि टीडीएस काय आहे? तर तुम्हाला फॉर्म 26AS हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.जर तुमचे पॅन कार्ड तुमच्या टीडीएस खात्याला जोडले गेलेले असेल तर जेव्हा तुमच्या खात्यातून टीडीएस कापला जातो, तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस येतो.त्या नंतर फॉर्म 26AS तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे.हा फॉर्म टॅक्स भरण्याऱ्या सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.यामध्ये तुमच्या प्रत्येक उत्पनातून किती टीडीएस कापला जातो यांची संपूर्ण माहिती असते. पॅन कार्ड यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण तुम्ही किती टीडीएस भरला आहे, यांची संपूर्ण माहिती तुमच्या पॅन कार्डवर जोडली जाते.

एसएमएस अलर्ट-आयकर विभागाने विके- आईटीडीएफएल  करदात्याला आता एसएमएस अलर्ट सेवा सुरू केली आहे.तुमच्या पॅन कार्डच्या आधारे तुमचा संपूर्ण किती टीडीएस कट झाला आहे यांची सविस्तर माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळते.प्रत्येक तीन महिन्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे ही माहिती मिळते. वित्त मंत्रालयाने अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.अनेकदा जास्तीचा किंवा चुकीचा टीडीएस कापला जातो. त्या नंतर करदात्याला अतिशय त्रास सहन करावा लागतो.पण आता एसएमएस सेवेमुळे अशा घटना फार कमी घटत आहेत.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

टीडीएसचा (TDS) फूल फॉर्म काय होतो?
What is the full form of TDS?

टीडीएसचा फूल फॉर्म टॅक्स डिडक्टेड ऐट सोर्स म्हणतात.

टीडीएस (TDS) का कापला जातो | Why is TDS deducted

टीडीएस म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आहे. यामुळे टॅक्सची होणारी चोरी टळते.

टीडीएस (TDS) या कराचा वापर कुठे केला जातो

टीडीएस टॅक्स सरकारकडे जमा झाल्यानंतर त्यांचा वापर देशांच्या विकासाठी केला जातो.

टीडीएस (TDS) किती कापला जातो ?

प्रत्येकाच्या उत्पनाप्रमाणे टीडीएस कापला जातो.जर फिक्स डिपॉजिट असेल तर त्यावर व्याज जर १० हजारापेक्षा अधिक असेल तर १० टक्के टीडीएस कापला जातो.

टीडीएस (TDS) नेमका कसा कापला जातो

जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था किंवा कंपनी तुमच्या पगारातून प्रतिमहिना काही ठराविक रक्कम कापून घेते,ही रक्कम सरकारकडे टॅक्स म्हणून जमा केली जात अशा प्रकारे टीडीएस कापला  जातो.

बँक ठेवीवर कसा टीडीएस (TDS) कापला जातो ? How is TDS Deducted on Bank Deposit?

जर तुमच्या एखाद्या बँकेत काही ठेवी असतील आणि त्या ठेवीवरील व्याज हे दहा हजार रुपयांच्यापेक्षा अधिक असेल तर बँक त्यावर टीडीएस कापते. आधी नागरिक हा टीडीएस चुकविण्यासाठी वेगवेगळ्या बँकेत एफडी करत. पण आता संपूर्ण देशांत एकच सिस्टम झाल्यामुळे टीडीएस चुकविणे अवघड झाले आहे.

घर भाड्यावर किती टीडीएस (TDS)  आकरला जातो?How much TDS is levied on house rent?

तुम्हाला जर घरभाड्यातून  काही उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला तेथे देखील टीडीएस भरावा लागू शकतो. म्हणजे आता हेच पहा जर तुमचे घर भाड्याचे उत्पन्न हे १ लाख ८० हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला टीडीएस भरावा लागतो.पण त्या पेक्षा कमी असेल तर मात्र लागू होणार नाही.

TDS आणि TCS मध्ये फरक काय? TDS and TCS meaning in Marathi

टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स म्हणजे TCS होय. तर TDS म्हणजे त टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स होय.टीडीएस हे शक्यतो नोकरदार व्यक्ती भरतात भरतात. तो त्यांच्या पगारातून थेट कापला जातो. तर TCS हा व्यापारी, वेंडर म्हणजेच सामान खरेदी विक्री करताना आकारला जातो. हा ग्राहकांकडून वसूल केला जातो आणि सरकारला भरला जातो.


शेअर करा

4 thoughts on “TDS म्हणजे काय? | TDS Meaning In Marathi”

Leave a Comment