SWP in Mutual Funds Marathi mahiti | म्यूच्युअल फंडातील SWP म्हणजे काय (What is SWP in Mutual Funds?)
SWP in Marathi – आजवर आपण अनेकदा ऐकले आहे की म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकाळ पैसे गुंतवणूक करा आणि चांगले रिटर्न मिळवा. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेले पैसे चक्रवाढ पद्धतीने वाढतात, पण हे वाढलेले पैसे योग्य पद्धतीने कसे काढायचे ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकेल हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत, सर्वात आधी SWP म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
SWP म्हणजे काय? | What is SWP?
जर गुंतवणूकदाराला त्यांच्या गुंतवणुकीतून काही ठराविक रक्कम नियमित हवी असेल तर SWP हा उत्तम पर्याय आहे. आता SWP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन होय. म्हणजेच काय तर गुंतवणूकदार ठराविक कालावधी नंतर गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो यास सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणतात. जशी आपण गुंतवणूक करताना मासिक, त्रैमासिक,वार्षिक गुंतवणूक करतो तशीच पैसे काढताना देखील करायला हवी. त्यासाठी बँकेला विनंती करावी लागते. गुंतवणूकदार महिना,तीन महिने, सहा महिने यातील एक दिवस निवडून पैसे काढू शकतो.
एएमसी द्वारे काही ठराविक रक्कम गुंतवणूक दाराच्या खात्यात जमा केली जाते,हा रोख प्रवाह निर्माण करण्यासाठी SWP हा पर्याय योग्य ठरतो. तुम्ही जो प्लॅन निवडला आहे त्या प्रमाणे म्युच्युअल फंडातील काही युनिट विकून पैसे बँक खात्यात जमा केले जातात.ज्या दिवशी एनएव्ही काय आहे त्यावर ते अवलंबून असते. ठराविक युनिट विकून रक्कम जमा केल्यानंतर इतर पैसे म्युच्युअल फंडात पुढे चालू राहतात. जो पर्यंत युनिट शिल्लक आहेत तो पर्यंत तुम्ही SWP चालू ठेवू शकता. म्युच्युअल फंडात गुंतविलेले पैसे योग्य पद्धतीने काढण्याच्या पद्धतीसSWP म्हणतात.
SWP कसे कार्य करते? | How does SWP work ?
उदाहरण – समजा एका गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडांच्या योजनेमध्ये एक रक्कमी दहा लाख रुपये गुंतविले आहेत.जेव्हा त्यांचे खरेदी केली तेव्हा एनएव्ही 20 रुपये आहे. म्हणून 50, 000 युनिटचे वाटप करण्यात आले.अधिकचा होणारा भार टाळण्यासाठी एक वर्षांनंतर लगेच 6000 रुपयांचा मासिक SWP सुरू केला असे असे समजू.
SWP सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यात एनएव्ही 22 रुपये आहे असे समजू 6000 हजार रुपये गुंतवणूकदाराला मिळण्यासाठी AMC 272. 728 युनिट म्हणजेच रु 6000/ 22 NAV रीडीम करतो.आता शिल्लक राहिलेले युनिट 49,727.272 इतके असतील. दुसऱ्या महिन्यात
NAV 22.50 आपण पकडू,त्या नंतर AMC 266.667 युनिट म्हणजेच रु 6000 / 22.50 NAV रीडीम करतो म्हणजेच आता शिल्लक राहिलेले युनिट 49,460 ( 49,727.272 वजा 266.667 ) पर्यन्त कमी होते. तिसऱ्या महिन्यात NAV 23.00 असे समजू म्हणजेच
AMC 260.8696 युनिट ( रु 6000/23.00 NAV) रीडीम करतो आणि आता शिल्लक राहिलेले युनिट 49.199.7354 पर्यन्त कमी होते.गुंतवणूक दाराने निवडलेला SWPकालावधी संपेपर्यत ही प्रक्रिया दर महिन्याला सुरू राहते.
वरील उदाहरणात पाहिल्याप्रमाणे SWP योजनेमध्ये युनिट शिल्लक कालांतराने कमी होते, परंतु योजनेच्या NAV पैसे काढण्याच्या दरापेक्षा जास्त टक्केवारीने वाढल्यास गुंतवणुकीचे मूल्य वाढते.वरील उदाहरणात पहा तिसऱ्या SWP पेमेंट नंतर फंड मूल्य रु 11,31,593
(49,199.7354 युनिट्स x रु 23 NAV) रु. 10.00 लाख गुंतवणुकीच्या मूल्याविरुद्ध रु 131,593.91 ची वाढ होते.योजना एनएव्ही वाढण्यापेक्षा तो घसरला आहे.त्यांचा परिणाम गुंतवणूक मूल्यांवर उलट दिसून येतो.
SWP चे प्रकार -Types of SWP
1. निश्चित नियतकालिक पैसे काढणे
2. Appreciation Withdrawal
1. निश्चित नियतकालिक पैसे काढणे – म्युच्युअल फंडात एकदा पैसे गुंतविले तर त्या नंतर एक वर्षांनंतर तुम्ही SWP सुरू करू शकतो. निश्चित नियतकालिन पैसे काढणे याप्रकारात दर महिन्याला ठराविक पैसे काढले जातात.युनिट विकून हे पैसे जमा केले जातात.
2. Appreciation Withdrawal – यामध्ये देखील दरमहिन्याला ठराविक युनिटच विकले जातात, त्यातून जितकी रक्कम जमा होते,त्यास Appreciation Withdrawal म्हणतात.
SWP वर किती कर लागू होतो? How much tax is applicable on SWP?
गुंतवणुकीच्या तारखेपासून १२, महिन्याच्या आत जर रीडिम केले तर त्यास अल्पकालीन मानले जाते.त्यावर १५ टक्के कर आकारला जातो. १२ महिन्यांनंतर मिळालेला नफा हा दीर्घ कालीन गुंतवणुक मानला जातो. आणि आर्थिक वर्षात तो १ लाखां पर्यंत करमुक्त मानला जातो. १, लाखा पेक्षा अधिक असतो त्यावर किमान १० टक्के कर लावला जातो.
SWP कसे सुरू करावे? | How to start SWP?
जेव्हा SWP द्वारे रक्कम काढण्यासाठी युनिटची पूर्तता केली जाते तेव्हा युनिटच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर भांडवली नफा (विमोचन NAV खरेदी NAV पेक्षा जास्त असल्यास) आकर्षित करते. भांडवली नफा खालील अटीनुसार अल्पकालीन आणि दीर्घ कालीन म्हणून परिभाषित केला जातो.
SWP आणि SIP मध्ये काय फरक आहेत? | What are the differences between SWP and SIP?
SIP मध्ये दर महिन्याला तुमच्या खात्यातून निश्चित रक्कम कापली जाते. दर महिन्याला कापलेले पैसे म्युच्युअल फंडात गुंतविले जाते. SWP मध्ये नमूद केलेली रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. SWP साठी म्युच्युअल फंडांच्या युनिट विक्रीमध्ये केली जाते.
SWP चे फायदे | Advantages of SWP
1. लवचिकता- SWP मध्ये गुंतवणूकदार त्याला हवे तेवढी हव्या त्या कालावधीची SWP करू शकतो. रक्कम किती असावी, युनिट किती असावे, तारीख किती असावी हे सर्व ठरवू शकतो.जेव्हा हवी तेव्हा SWP चालू करू शकतो आणि थांबवू शकतो किंवा त्याला आणखी रक्कम जोडून पुढे चालू देखील ठेवू शकतो.
2. नियमित उत्पन्न regular income – SWP मधून तुम्हाला एका ठराविक कालावधी नंतर उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला नियमीत उत्पन्न मिळाल्यामुळे तुमचे खर्च योग्य पद्धतीने भागू शकतात.कारण नियमित खर्च भागण्यासाठी नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते.
3. भांडवलामध्ये होत जाणारी वाढ -आपण वरती एक उदाहरण पाहिले आहे,त्यामध्ये आपण म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केलेली असेल तर SWP काढण्याचा दर फंड परताव्यापेक्षा कमी असेल तर गुंतवणूकदाराला दीर्घ मुदतीसाठी काही प्रमाणात का होईना भांडवलामध्ये वाढ होते.
4. TDS नाही – निवासी वैयक्तिक गुंतवणूकदारांना SWP रक्कमेवर टीडीएस लागत नाही.
SWP कोण वापरू शकते?
दुय्यम उत्पनाचा नियमित दुसरा स्त्रोत शोधत असलेले
ज्या गुंतवणूक दारांना SWP हे काय आहे हे माहीत असते त्यांना हे नक्की माहित असते की आपण जरी दीर्घकालीन गुंतवणूक केली तरी आपल्याला SWP च्या माध्यमातून उत्तम दुय्यम उत्पन्न मिळू शकते. दिवसेंदिवस वाढते खर्च यासाठी पैशांची भर टाकण्यासाठी SWP उत्तम पर्याय ठरतो. दुय्यम उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी SWP एक उत्तम पर्याय आहे.
जे भांडवल संरक्षण शोधत आहेत
अनेकांना जोखीम घेणे अवघड वाटते जे गुंतवणूकदार मध्यम किंवा कमी गुंतवणुक म्युच्युअल फंडांमध्ये करतात त्यांना देखील SWP माध्यमातून उत्तम नफा मिळू शकतो. भांडवली नफा मिळविण्यासाठी SWP उत्तम पर्याय आहे.
उदा – सर्वात सुरुवातीची गुंतवणुक ही आर्बिट्रेज मध्ये केली आहे. त्या नंतर SWP माध्यमातून भांडवलामध्ये नियमित वाढ होत असेल तर प्रारंभिक गुंतवणुकी मधील जोखीम ही शून्य होते.
ज्यांना स्वताची पेन्शन सुरू करायची आहे | Those who want to start their own pension
अनेकजण स्वतःचा व्यवसाय किंवा इतर काही तरी करत असतात, ज्या मधून त्यांना पेन्शन मिळणार नसते, अशासाठी SWP काही उत्तम प्लॅन्स आहेत ज्या माध्यमांतून ते ठराविक गुंतवणुक करून SWP स्वरूपात उत्तम पेन्शन मिळवू शकतात. निवृत्ती नंतर एक उत्तम SWP सुरू करणे म्हणजे तुम्हाला उत्तम पेन्शन मिळाल्या प्रमाणे आहे.
जे उच्च कराच्या कक्षेत आहेत which are in the higher tax bracket
उच्च कर ब्रॅकेटमधील गुंतवणुकदाराना SWP अतिशय उपयुक्त वाटते. कारण SWP मध्ये भांडवली नफ्यामध्ये टीडीएस नाही.इक्विटी/इक्विटी ओरिएंटेड फंडातून मिळणारा नफा हा भांडवली नफ्यावर माफक कर आकारला जातो. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन परवानगी असल्यामुळे कर्ज भिमुख निधीतून मिळणारा नफा हा मध्यम असतो.
SWP कोण वापरू शकते? | Who can use SWP?
दुय्यम उत्पनाचा नियमित दुसरा स्त्रोत शोधत असलेले – ज्या गुंतवणूक दारांना SWP हे काय आहे हे माहीत असते त्यांना हे नक्की माहित असते की आपण जरी दीर्घकालीन गुंतवणूक केली तरी आपल्याला SWP च्या माध्यमातून उत्तम दुय्यम उत्पन्न मिळू शकते. दिवसेंदिवस वाढते खर्च यासाठी पैशांची भर टाकण्यासाठी SWP उत्तम पर्याय ठरतो. दुय्यम उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी SWP एक उत्तम पर्याय आहे.
SWP मध्ये युनिट्स कसे विकले जातात? |How are units sold in SWP?
जशी आपण गुंतवणूक करताना मासिक, त्रैमासिक,वार्षिक गुंतवणूक करतो तशीच पैसे काढताना देखील करायला हवी. त्यासाठी बँकेला विनंती करावी लागते. गुंतवणूकदार महिना,तीन महिने, सहा महिने यातील एक दिवस निवडून पैसे काढू शकतो. एएमसी द्वारे काही ठराविक रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते,हा रोख प्रवाह निर्माण करण्यासाठी SWP हा पर्याय योग्य ठरतो. तुम्ही जो प्लॅन निवडला आहे त्या प्रमाणे म्युच्युअल फंडातील काही युनिट विकून पैसे बँक खात्यात जमा केले जातात.ज्या दिवशी एनएव्ही काय आहे त्यावर ते अवलंबून असते. ठराविक युनिट विकून रक्कम जमा केल्यानंतर इतर पैसे म्युच्युअल फंडात पुढे चालू राहतात. जो पर्यंत युनिट शिल्लक आहेत तो पर्यंत तुम्ही SWP चालू ठेवू शकता
SWP मध्ये पैसे काढण्याचे पर्याय कोणते आहेत? | What are the withdrawal options in SWP?
SWP मधून पैसे काढण्याचा कालावधी हा स्वता गुंतवणूकदार ठरवू शकतो. हा दररोज, मासिक, तिमाही,सामाही, वार्षिक असा असू शकतो. तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. त्या नंतर तुम्ही निवडलेल्या कालावधीमध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
SWP करताना घ्यायची काळजी |Precautions to be taken while doing SWP
- SWP कधीही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये चालवू नका.
- बाजार घसरल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होतो.
- कधी- कधी ठरलेल्या रक्कमेसाठी जास्त युनिट देखील विकावे लागतात.
- यामुळे तुमची रक्कम लवकर देखील संपू शकते.
- SWP साठी लिक्विड फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
निष्कर्ष
पूर्वी सरकारी कर्मचारी यांना पेन्शन ही एक योजना होती त्यामुळे निवृती नंतरची चिंता नव्हती पण आता सरकारे ते देखील बंद केले आहे. या बरोबरच आरडी व इतर योजनांचे घसरते दर यासर्वानवर SWP हा उत्तम पर्याय ठरतो.