निफ्टी मराठी माहिती | NIFTY Information in Marathi
Nifty हा शब्द national आणि fifty या दोन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचा निर्देशांक म्हणजेच इंडेक्स यालाच निफ्टी असे म्हणतात जसा सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स आहे त्याप्रमाणेच निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडेक्स मानला जातो निफ्टी ला निफ्टी 50 म्हणून सुद्धा ओळखले जाते निफ्टी मध्ये ज्या कंपन्या समाविष्ट केलेल्या आहेत या कंपन्या विविध क्षेत्रातील असू शकतात.
अनुक्रमणिका
What Is Index Information in Marathi | इंडेक्स म्हणजे काय?
निफ्टी समजून घेण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्ही इंडेक्स म्हणून म्हणजे काय? हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे तुम्हाला माहीतच असेल, इंडेक्स म्हणजे निर्देशांक स्टॉक एक्सचेंज मध्ये हजारो कंपन्या सूचीबद्ध केल्या गेल्या आहेत त्यामुळे आपण मार्केटच्या परफॉर्मन्सचे मूल्यांकन ज्यावेळी आपणाला करायचे आहे. त्यावेळी एकाच वेळी आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे मूल्यांकन करू शकणार नाहीत. त्याला पर्याय म्हणून शेअर मार्केट मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचा एक छोटा नमुना घेण्यात येतो. हा नमुना संपूर्ण मार्केटचा प्रतिनिधी म्हणून ठरवला जातो यालाच इंडेक्स असे म्हणतात. थोडक्यात इंडेक्स हा वेगवेगळ्या उद्योगांमधील सूचीबद्ध केल्या गेलेल्या कंपन्यांचा एक नमुना असतो असे आपण म्हणू शकतो
निफ्टी 50 म्हणजे काय? | What is Nifty 50?
निफ्टी फिफ्टी हा सुद्धा नॅशनल स्टॉक एक्सचेंज एक महत्त्वाचा मार्केट इंडिकेटर आहे. नावानुसारच या इंडेक्स मध्ये वेगवेगळ्या चौदा क्षेत्रांमधील 50 भारतीय कंपन्यांचा समावेश केलेला आहे. यामुळे ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पेक्षा अतिशय वैविध्यपूर्ण आहे असे आपण म्हणू शकतो आहे 50 कंपन्यांचा समावेश केल्यामुळे याला निफ्टी 50 असेही म्हटले जाते.
निफ्टी 50 हे 1996 मध्ये लॉन्च केले गेले होते आणि याला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटललायझेशन च्या आधारावर मोजण्यात येते.
Nifty CE & PE म्हणजे काय? | Nifty CE and PE meaning in Marathi
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये हे दोन प्रकारे येतात त्यात सीई म्हणजे कॉल ऑप्शन आणि पीई म्हणजे पुट ऑप्शन असे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारच्या ऑप्शन चा उपयोग करून आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो ऑप्शन मध्ये काम करत असणाऱ्या ट्रेडर्स नफा किंवा तोटा याचे गणित तो खरीदार आहे की विक्री करणारा व्यक्ती आहे यावरून ठरवले जाते.
CE option/ कॉल ऑप्शन
– जेव्हा एखादा एसेट ची किंमत वरती जाऊ शकते असा अंदाज बांधण्यात येतो त्यासाठी चा ऑप्शन खरेदी केला जातो यालाच कॉल ऑप्शन असे म्हणतात.
– थोडक्यात जेव्हा मार्केट तेजी मध्ये असते तेव्हा कॉल ऑप्शन हा संकेतक वापरला जातो
– कॉल ऑप्शन हा अंडरलाईन असेटच्या सम प्रमाणात असतो थोडक्यात या अंडरलाईन ऍसेट ची किंमत वाढली तर सहाजिकच त्याच प्रमाणामध्ये कॉल ऑप्शन ची किंमत सुद्धा वाढते तसेच अंडरलाईन असेट ची किंमत कमी झाली तर कॉल ऑप्शन ची सुद्धा किंमत कमी होत असते
– कॉल ऑप्शन तेजी दर्शवितो परंतु तरीही कॉल ची विक्री करून मंदीची पोझिशन ही तयार करता येऊ शकते.
PE option/ पुट ऑप्शन
– जेव्हा एखाद्याची किंमत कमी होत असते आणि दुसरीकडे ऑप्शन ची किंमत वाढत जाते अशा डेरिव्हेटिव्ह सारख्या असे म्हणतात.
– पुट ऑप्शन म्हणजे दर्शवणारा ऑप्शन प्रकार आहे
– पुट विक्री करून कोणत्याही असे वाटते तेजीची पोझिशन बनवता ही येऊ शकते.
NIFTY चे कार्य काय आहे? | What exactly NIFTY does in Marathi?
निफ्टी मार्फत आपल्याला त्यामध्ये सूचीबद्ध केलेल्या 50 कंपन्या बद्दल तसेच शेअर मार्केटच्या हालचालींबद्दल माहिती प्राप्त होते.
तसेच आपण ज्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो आणि जाती कंपनी निफ्टी च्या अधिपत्याखाली काम करत असेल तर त्याचे काम कसे होते ते आपल्याला कळू शकते.
मिस्टर कंपनीचा शेअर्स वाढला तर निफ्टी देखील वाढत असतो.
जेव्हा शेअरची किंमत कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा निफ्टी मध्ये सुद्धा घसरण झालेल्या आपल्याला पाहायला मिळते.
NIFTY चे फायदे | Benefits of NIFTY in Marathi
निफ्टी चे अनेक फायदे आहेत परंतु त्यातील काही प्रमुख फायद्याबद्दल आपण आता जाणून घेऊया.
- नॅशनल स्टॉक एक्सचेंज कशाप्रकारे काम करत आहे हे जाणून घेण्यासाठी निफ्टी चा उपयोग होतो.
- शेअर मार्केट मधील चढउतारांची माहिती मिळवणे निफ्टी मुळे सोपे होते कारण जर निफ्टी घसरला तर बाजारात मंदी येऊ शकते.
- निफ्टीच्या माध्यमातून शेअर मार्केट मधल्या नेमक्या चढउतारांचा म्हणजेच हालचालींचा अंदाज येतो.
- देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल ची माहिती निफ्टीमुळे अतिशय सहजपणे आपल्याला मिळू शकते.
- जर शेअर मार्केट मध्ये शेअर्सने त्यांच्या किमतीमध्ये गती घेतली तसेच निफ्टी सुद्धा चढत्या क्रमाने वर सरकत असेल याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था सुद्धा चढत्या क्रमाने वरच्या दिशेला जात आहे असे ठरते.
Bank NIFTY म्हणजे काय? | Bank Nifty meaning in Marathi
बँक निफ्टी बँकिंग सेक्टर चे मार्केट मधील मूल्यांकन दर्शवतो. या मध्ये सर्वात जास्त भांडवल असणाऱ्या बँकांचा समावेश होतो. बँक निफ्टी ची स्थापना सप्टेंबर २००३ मध्ये निफ्टी ने केली. या मध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेन्ट बँकांचा समावेश आहे.
How NIFTY is calculated? | निफ्टी ची गणना कशी करतात?
फ्री फ्लोट मार्केट कॅपिटललायझेशनच्या आधारे करण्यात येते
निफ्टी वॅल्यू = (वर्तमान बाजार मूल्य / बेस बाजार भांडवल) * बेस इंडेक्स मूल्य
बेस बाजार भांडवल = Rs.2.06 ट्रिलियन
बेस इंडेक्स मूल्य =1000
याप्रकारे आपण या लेखांमधून निफ्टी बद्दल जाणून घेतले तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा? आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा भेट द्या.
धन्यवाद…!!