NAV काय आहे ? NAV Meaning in Mutual Fund [Marathi]

NAV Meaning in Mutual Fund in Marathi | NAV काय आहे?

सध्या तुम्हाला जर गुंतवणुक करायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, म्यूच्यअल फंडा हा देखील त्यातील एक प्रसिद्ध गुंतवणूक पर्याय आहे. जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंड हा पर्याय समोर येतो तेव्हा त्यामध्ये NAV  हा प्रकार येतो. आधी आपण म्यूच्युअल फंडामध्ये युनिट काय असतात हे जाणून घेऊ.

म्यूच्युअल फंडांमध्ये युनिट काय असतात | What is Units in Mutual Funds

शेअर बाजारात ज्या प्रमाणे कोणतीही कंपनी प्रत्येक शेअर विकते, एक एक शेअरला देखील तितकेच महत्त्व असते, कारण सामान्य नागरिकांना गुंतवणुक करता यावी यासाठी एक – एक शेअर खरेदी केला जातो व विकला जातो. शेअर्स प्रमाणे म्युच्युअल फंडसमध्ये देखील छोटे छोटे युनिट्स आहेत, ज्यामुळे सामान्यांना देखील गुंतवणूक करणे शक्य होईल.

युनिट्स द्वारे म्यूच्युअल फंड्स खरेदी विक्री केले जातात. युनिट्स का महत्वपूर्ण आहेत हे समजून घेण्यासाठी एक उदा. आपण समजून घेऊ.समजा तुम्हाला एका म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवायचे आहेत, याची किंमत १०००० करोड आहे. आता एका सामान्य गुंतवणुकदाराला इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करणे शक्य नाही. पण जर या १०००० करोड च्या म्युच्युअल फंडाचे १००  करोड हिस्से करून वाटले तर प्रत्येक हिस्याची किंमत ही १०० रुपये इतकी होईल. तर तुम्ही हा हिस्सा नक्कीच खरेदी करू शकता. सामान्य गुंतवणूकदार देखील हा हिस्सा खरेदी करू शकतात. अशा प्रकारे म्यूच्युल फंडस यांना छोटे छोटे हिस्से करून विकले जाते.म्हणजेच काय युनिट हा  म्युच्युअल फंडाचा बारीक हिस्सा असतो.

Mutual Funds मध्ये NAV काय आहे | NAV Meaning in Marathi

NAV चा पूर्ण अर्थ हा Net Asset Value हा आहे. Mutual Funds मध्ये NAV चा अर्थ  एक Unit ची पूर्ण किंमत वरील उदाहरणात आपण पाहिले की १००० हजार करोड फंडस ना १० करोड युनिट मध्ये विभागले गेले. यावरून तूम्ही सांगू शकता का ? एका युनिट ची किंमत काय असेल?(इतर सर्व खर्चाना आपण काही काळ शून्य मानू)

– बरोबर तुम्ही योग्य अंदाज लावला एका युनिट ची किंमत ही १०० रुपये इतकी आहे म्हणजेच काय म्यूच्यूअल फंड मध्ये NAV 100 रुपये इतकी झाली.

NAV ला रोज मोजले जाते. शेअर मार्केट ज्या किंमतीवर बंद झाले आहे, त्या किंमतीवर NAV ची किंमत ठरते.

NAV अशा प्रकारे काढला जातो | NAV in Marathi formula

NAV = (Assets – Liabilities) / Total number of units

Liabilities – फंड चालवण्यासाठी लागणारा एक दिवसाचा खर्च तसेच फंड मॅनेजरचे एक दिवसाचे वेतन (एक वर्षात २ टक्के हा खर्च असतो)

Assets – फंडासाठी केलेल्या गुंतवणुकीचे त्या दिवसाचे मूल्य

Total number of units – units ची  संख्या.

आपल्याला किती युनिट मिळाले आहेत हे कसे पाहावे | In Mutual Fund how to calculate Units

सर्व गुंतवणूदारांना आपल्याला किती युनिट मिळाले आहेत हे जाणून घेण्यामध्ये रस असतो.

यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत

त्या फंडाची NAV गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम

तुम्हाला ज्या फंडामध्ये गुंतवणुक करायची आहे.त्यांची  NAV माहित करून घ्या. त्या नंतर तुम्हाला गुंतवणूक करायची जी रक्कम आहे ती त्या प्रमाणे विभाजित करा.

उदाहरण

एखाद्या फंडाची  NAV १०० इतकी आहे आणि तुम्हाला १००० इतके गुंतवणूक करायचे आहेत.

तुम्हाला मिळतील इतके युनिट Units = (गुंतवणूक केलेली रक्कम / (NAV)

= १००० / १० Units = १० म्हणजेच तुम्हाला १० युनिट मिळतील

अशा प्रकारे तुम्हाला युनिट भेटून जातील पण तुमच्या गुंतवणूक केलेल्या रक्कमेची सध्याची किंमत काय आहे हे कसे माहित होईल.

तुम्हाला तोटा होत आहे की नफा?

तुम्ही NAV मध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांचे मूल्य सध्याचे मूल्य काढणे अतिशय सोप्पे आहे…

वरती पाहिल्या प्रमाणे तुम्हाला ज्या फंडांमध्ये गुंतवणूक केली आहे त्याची NAV काढून घ्या. वरती आपण युनिट कसे काढायचे हे देखील पाहिले आहे ते युनिट देखील काढून घ्या आणि नंतर त्या युनिट्स ला गुणिले दोन करा.

उदाहरण

तुम्ही गुंतवणूक केलेले NAV ११० आहेत म्हणजेच तुमच्याकडे त्या फंडाचे १०० युनिट आहेत.म्हणजेच काय तुम्ही गुंतवणूक केलेले १०००० हजार रुपये त्यांचे

११०(NAV) x १००(Number of units) =११००० झाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक केलेल्या NAV माहिती काढू शकता.

NAV चे फायदे | Benefits of NAV in Marathi

तुमचा म्यूचल फंडाचा फोलिओ आणि एकूण क्रेडिट युनिट आणि करंटNAV यांचा गुणाकार  तुमच्या करंट पोर्टफोलिओची किंमत ठरवत असतो.

NAV सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला जर जोखीम उचलण्याची तयारी असेल तर तुम्हाला त्यातून उत्तम रिटर्न येऊ शकतात.

NAV मध्ये तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे गुंतवणुक करता येते. तुम्ही वेगवेगळे NAV करून देखील   बचत करू शकता.

विविधता – NAV मध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असते, ज्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या NAV मध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. त्यामुळे विविधता असल्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होत नाही.

NAV मध्ये जे तज्ञ आहेत, त्यांच्या द्वारे तुम्ही योग्य ती गुंतवणूक करायला हवी. फंड मॅनेजर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात.तुम्ही जे फंड मॅनेजर लावतात ते तुम्हाला तुमच्या फंडस च्या गुंतवणुकीचा एक रिपोर्ट प्रकाशित करतात, ज्यामुळे तुमची गुंतवणूक योग्य मार्गावर आहे का? तुम्हाला त्यातून काही फायदा मिळत आहे का हे तुम्हाला दाखवतात, त्यामूळे जर तुम्ही फंड  मॅनेजर लावला तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

वापरण्यात अतिशय सोप्पे – NAV वापरण्यात अतिशय सोप्पे आहेत, तुम्ही एका छताखाली तुमचे विविध NAVमॅनेज करू शकतात.

NAV काही महत्वाच्या गोष्टी | some important points about NAV in Marathi

म्युच्युल फंड हे NAV च्या आधारावर असतात. यांच्या आधारावर फंडस् खरेदी विक्री केले जातात. NAV यांची किंमत रोज काढली जाते.

सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा की NAV हे तुम्ही किती गुंतवणूक केली आहे त्यावर तुम्हाला युनिट दिले जातात.

सातत्याने विचारले जाणारे प्रश्न

NAV कधी मोजतात

दिवसा संपताच जेव्हा शेअर मार्केट बंद होते तेव्हा NAV मोजला जातो.

NAV चा संपूर्ण अर्थ काय होतो

 नेट एसेट वैल्यू  हा NAV चा संपूर्ण अर्थ होतो.

Mutual Fund Units कसे काढले जातात. त्याचा काही फॉर्म्युला आहे का

Mutual Fund Units = Investment ÷ NAV” हा त्यांचा फॉर्म्युला आहे.

NAV काढण्याचा काय फॉर्म्युला आहे

NAV = (Assets-Liabilities) / Total Number of Units

निष्कर्ष

जेव्हा केव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला त्याविषयी असलेली काही बेसिकपण तितकीच महत्वपूर्ण महिती असेन गरजेचे आहे. तूम्ही जर म्युच्युल फंडात गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला NAV जाणून घेणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण उदाहरणासह सर्व जाणून घेतले आहे. तुम्ही 

म्युच्युल फंडात जर गुंतवणूक स्वतः करता पण त्यासाठी आपण फंड मॅनेजर लावता पण तरी देखील आपल्याला त्यातील उत्तम ज्ञान असावे. 

शेअर करा

Leave a Comment