Health Insurance Information in Marathi – भारतात आरोग्याला नेहमीच दुय्यम स्थान दिले जात होते, कित्येकजण अंगावर दुखणी काढतात. पण 2020 मध्ये कोरोना महामारी आली आणि प्रत्येकाला आरोग्य चांगले असेल तरच सर्व काही होऊ शकते याची खात्री पटली. कोरोनाने माणसाला अनेक गोष्टीची जाणीव करून दिली. या सर्वांमध्ये महत्वाची जाणवी झाली ती म्हणजे आरोग्य विमाची.
आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आपल्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे हे पटवून दिले. आपण 10 -15 लाखांची चार चाकी घेतो तेव्हा त्या गाडीचा आपण 25- 30 हजार रुपयांचा विमा अगदी सहज काढतो पण आपल्या अमूल्य अशा आरोग्याचा विमा काढताना मात्र आपण मागे -पुढे पाहतो. आजच्या लेखात आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे काही प्रकार आहेत का? हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपण जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? (What is health insurance?)
विमा ही संकल्पना भारतीयांच्या मनात रुजवायला अनेकवर्ष गेली आहेत. तरी देखील अजून काही लोक विमा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला जी एखादी रक्कम मिळते त्यास विमा समजतात, पण विमा ही संकल्पना फार मोठी आहे. विम्याचे वेगवेगळे प्रकार येतात. या लेखात आपण आरोग्य विमा याविषयी जाणून घेणार आहोत. आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम् सुद्धा म्हटले जाते. हा एक विम्याचा प्रकार आहे.
जेव्हा एखादा गंभीर आजार होतो किंवा अचानक मोठा अपघात होतो तेव्हा आपत्कालीन परिस्थितिमध्ये खर्चाची चिंता मिटावी यासाठी मेडीक्लेम् अतिशय उपयुक्त आहे. मेडिक्लेमुळे तुमच्या कुटुंबाची देखील चिंता मिटते.संकटे ही अचानक येत असतात, आरोग्य संकट देखील अचानक येते, जसे की कधी अपघात होतो, कधी कोणी आजारी पडतं, किंवा काहीना आपत्कालीन मदत लागते अशा वेळेस स्वताची आणि तुमच्या कुटुंबाची मेडिकेल्म् पॉलिसी असावी. यामध्ये पॉलिसी धारक रुग्णाला घरून आणण्यापासून ते अगदी संपूर्ण ट्रीटमेंट यांचा सर्व खर्च तुमची विमा कंपनी करते. पॉलिसीमुळे तुम्ही योग्य उपचार घेऊन सुखरूप घरी येता. अनेक मेडिकेल्म् पॉलिसी या कॅशलेस असतात.
हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचेच आहे का? (Is it necessary to take health insurance?)
आपण सध्या आपल्या आयुष्यात प्रचंड व्यस्त झाले आहोत, आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो, वेळी अवेळी जेवणं, कामाचा प्रचंड त्रास यामुळे आपल्याला अनेक व्याधी निर्माण होतात. आणि एक दिवस अचानक या व्याधीमुळे एखादे मोठे दुखणे आपल्यावर ओढावण्याची शक्यता असते. अशा वेळेस मेडिकेल्म् खूप कामी येतो. कारण संकट कोणतेही असो, ते सांगून येत नाही.
समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, अशा वेळेस जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती तितकीशी उत्तम नसेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन गोष्टीची चिंता वाटते, एक म्हणजे ज्या व्यक्तीचा अपघात झाला आहे, त्यांची तब्येत कशी असेल, या बरोबरच हॉस्पिटलचे बील किती येईल, पण मेडिकेल्म् असेल तर मात्र एक चिंता कमी होऊन जाते. पैशांसाठी धावपळ न करता, आजारा व्यक्तीची उत्तम काळजी घेता येते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढणे अतिशय गरजेचे आहे.
हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार किंवा भारतातील मेडिक्लेम चे प्रकार (Types of health insurance or types of Mediclaim in India)
मेडिक्लेम मुख्य पाच प्रकार पडतात- आपण आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार मेडिक्लेम काढू शकतो –
१. वैयक्तिक आरोग्य विमा
२. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा
३. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी
४. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा
५. मातृत्व आरोग्य विमा
१. वैयक्तिक आरोग्य विमा (Personal health insurance)
वैयक्तिक आरोग्य विमा ही अशी एक पॉलिसी आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाला विम्याचे कव्हर मिळते. जसे की तुमची पत्नी आणि तुमचे मुले. यामध्ये रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा खर्च,शस्त्रक्रिया खर्च, रूमचे भाडे, यासारख्या गोष्टीचा समावेश असतो. या योजनेचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कव्हर मिळते. म्हणजेच काय जर 3 लाख तुमच्या विम्याची मर्यादा असेल तर प्रत्येक व्यक्तीला तितकाच कव्हर मिळतो. या पॉलिसीचा हप्ता थोडा अधिक असतो. या विम्यामध्ये प्रत्येकाला कव्हर मिळते. ही योजना 18 ते 70 वयोगटतातील व्यक्ती यांना लागू होते.
२. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा (Family Floater Health Insurance)
जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह परवडणारी आरोग्य विमा पॉलिसी पाहत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम प्लॅन आहे. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा अंतर्गत ज्या सदस्यांचा समावेश होतो तेव्हा सम – इन्शुरड फ्लोट्स लागू होतो. फॅमिली फ्लोट्स ही योजना सर्वाधिक फायदेशीर आहे कारण यांचा प्रीमियम हा वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी पेक्षा कमी असतो. ही पॉलिसी तुमच्या जोडीदाराला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या आई -वडिलांना देखील कव्हर करते. जर तुम्ही या पॉलिसीचा विचार करत असाल तर ज्याचे वय 60 पेक्षा अधिक आहे, त्यांना यामध्ये समाविष्ट करू नका शक्यतो. कारण त्यांना अनेक व्याधी सुरू झालेल्या असतात. त्यामुळे तुमच्या प्रीमियम वर त्यांचा परिणाम होऊ शकतो.
३. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ( Group Health Insurance Policy)-
आपण आपल्या कुटुंबाची काळजी तर घेतच असतो पण त्या बरोबरच आपण जेथे काम करतो त्या कंपनीने देखील आपली काळजी घेतली तर आपल्याला किती बरे वाटेल ना? घरा नंतर आपली कोणाला तरी काळजी आहे, ही भावना निर्माण होते. आपले कर्मचारी आपल्या व्यवसायासाठी अतिशय महत्वाचे असतात, त्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ पॉलिसी अतिशय उपयुक्त आहे.
जरी तुमचे स्टार्टअप असेल किंवा ऑफिस तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी ही पॉलिसी ऊतम आहे. ग्रुप पॉलिसीमध्ये कमी किंमतीचा देखील प्रीमियम येतो. अनेक विमा कंपन्या तुमच्या गरजेनुसार देखील पॉलिसी बनवून देतात. या पॉलिसीमध्ये अपघात, आजारपण, गंभीर आजार, मानसिक आजार तसेच प्रसूती यांचा देखील समावेश करता येतो. यामुळे तुमच्या कंपनीची देखील एक चांगली प्रतिमा तयार होते.
४. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा ( Health insurance for senior citizens)
जर तुमचे आई-वडील किंवा अन्य नातेवाईक याचे वय 60 हून अधिक असेल तर त्यांच्यासाठी खास ही ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना तयार केली आहे. यामध्ये औषधांचा खर्च, अपघात आणि आजारांमुळे होणारे सततचे हॉस्पिटलायझेशन तसेच दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या कव्हरेजचा देखील समावेश असतो. ही पॉलिसी काढण्यासाठी काही आरोग्य कंपनी वारिष्ट नागरिकांना आरोग्य तपासणी देखील करायला लावतात, त्या नंतरच ही पॉलिसी लागू होते. यांची प्रवेश मर्यादा 70 वर्ष वयापर्यत आहे. जसे आपल्याला माहीत आहे यामध्ये आजार होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ही पॉलिसी थोडी महाग येते.
५. मातृत्व आरोग्य विमा (Maternal health insurance)
नवविवाहित जोडपी किंवा जे बाळाचा विचार करत आहेत, अशा जोडप्यासाठी ही पॉलिसी उत्तम ठरते. यामध्ये जन्मपूर्व अवस्था , प्रसूती आणि जन्मानंतरचा टप्पा यांचा समावेश असतो. यामध्ये वंध्यत्व खर्च, जन्म झालेल्या बाळाला 90 दिवसांपर्यंत कव्हरेज मिळते. यासाठी किमान 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागते. गंभीर आजार विमा – यामध्ये अनेक मोठ्या आजारासाठी देखील विमा कवच मिळते. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही सर्वात उत्तम पॉलिसी आहे. यामध्ये कर्करोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, अर्धांगवायु, बायपास, पहिला हृदय विकाराचा झटका,उच्च रक्तदाब यासारख्या खर्चीक आणि गंभीर आजारांचा समावेश होतो.
उत्तम आरोग्य विमा योजना कशी निवडावी ( Choosing Best Health Insurance Plan)
जर तुम्ही कोणत्या एजंट द्वारे आरोग्य योजना काढत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. तुमच्या गरजा किती आहेत आणि तुम्ही त्यामध्ये किती पैसे गुंतविणार आहात हे पाहून हेल्थ पॉलिसी काढा. तुमचे स्वताचे आणि कुटुंबाचे किती रक्षण होते यांचा विचार करा.
१. कोणत्या प्रकारचे आरोग्य संरक्षण आहे ते पहा– आरोग्य विमा योजनेचे दोन मुख्य भाग आहेत, नुकसान भरपाई योजना आणि दुसरी परिभाषित लाभ योजना म्हणजेच इंडेमनिटी प्लॅन आणि डिफाइंड प्लॅन. यामध्ये नुकसानभरपाई योजना रुग्णांच्या खर्चाची परतफेड करते तसेच परिभाषित लाभ योजना एकात्मिक रक्कम देते, प्रत्यक्ष हॉस्पिटलायझेशन खर्चाचा विचार न करता.
२. कोणता कव्हर जास्त उपयुक्त आहे – जेव्हा आपण आरोग्य विमा योजनेचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण कोणत्या योजनेचा लाभ घ्यावा. जसे की वैयक्तिक आरोग्य विमा योजना की फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना यापैकी कोणती योग्य आहे. आता तुम्ही विचार कराल की दोन्ही मध्ये काय फरक आहे तर तो असा जेव्हा आपण वैयक्तिक आरोग्य विमा काढतो तेव्हा प्रत्येकला वेगळे कव्हर मिळते मात्र फॅमिली फ्लोटरमध्ये तसे नसते यामध्ये एक व्यक्ती संपूर्ण पॉलिसीचा लाभ घेऊ शकतो.तुमचे बजेट आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटेल ती पॉलिसी काढा.
३. किती रक्कमेचा आरोग्य विमा काढावा – आरोग्य विमा किती रक्कमेचा काढावा यासाठी वेगळे असे काही नियम नाहीत. तुम्ही कोणत्या शहरात, तुमच्या कुटुंबातील आजारपणाचा इतिहास इत्यादी गोष्टीवर अवलंबून आहे.
४. उपमर्यादा तपासा – आजकाल अनेक आरोग्य विमा योजनामध्ये उपमर्यादा असतात म्हणजेच री-इंबर्समेंट मर्यादा निश्चित असते.
५. आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा समावेश आहे ते पहा – सर्व आरोग्य विमा योजना आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा समावेश करतात पण ते केवळ 48 महिन्यानंतर कव्हर केले जातात. काही 36 महिन्यानंतर कव्हर केले जातात. त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला ते देखील पाहणे खूप गरजेचे आहे की कोणते आजार आणि रोग यामध्ये कव्हर केले जातात.
आरोग्य विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात – (What documents do you need to get health insurance?)
१. वयाचा पुरावा – यासाठी तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड,जन्म प्रमाणपत्र वापरू शकता.
२. ओळखीचा पुरावा -मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड
३. पत्याचा पुरावा – वीज बिल,पासपोर्ट किंवा रेशन कार्ड
४. पासपोर्ट आकाराचे फोटो
५. वैद्यकीय अहवाल (जर गरजेचा असेल तर)
आरोग्य विमा घेण्याचे फायदे – (Health Insurance Benefits)
सध्याच्या युगात कधीही कोणावरीती ही काहीही वेळ येऊ शकते. तुम्हाला अचानक मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडू शकते अशा वेळेस तुम्हाला मेडीकक्लेम अतिशय उपयुक्त ठरतो. जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वता जरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असाल तेव्हा जर तुमच्याकडे मेडीकेल्म् असेल तर तुम्हाला आर्थिक चिंता राहत नाही. तुम्ही अगदी माफक मेडीक्लेम प्लॅनमध्ये उत्तम उपचार घेऊ शकता. उत्तम उपचारासाठी तुम्हाला मेडीक्लेम अतिशय गरजेचा आहे.
करोना महामारी नंतर अनेकांना मेडिक्लेम का गरजेचा आहे हे समजले. त्यामुळे आता मेडीकेल्म् काढणाऱ्याची संख्या वाढू लागली आहे. तसेच मेडीकेल्म् संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती देखील केली जात आहे. जर तुम्ही ऑनलाइन मेडीकेल्म् काढत असाल तर सर्व बाबी सविस्तर वाचून घ्या. सर्वगोष्टीची शहानिशा करा आणि त्या नंतरच मेडिकेल्म् काढा. जर तुम्ही दरवर्षी मेडीकेल्म् काढणार असाल तर सुरुवाती पासून एकच कंपनीचा मेडीकेल्म् काढा. कारण मेडीकेल्म् कंपन्या त्यांच्या जुन्या ग्राहकांना बोनस देत असतात.त्यामुळे एकच कंपनी निवडा आणि तोच मेडीकेल्म् रीन्यू करा. तुम्हाला उत्तम फायदे मिळतात.
निष्कर्ष | Conclusion
आरोग्य विमा निवडताना 2 -3 मेडीक्लेम कंपन्या यामध्ये काय समाविष्ट आहे ते पाहणे गरजेचे आहे. दोन – तीन कंपन्यामध्ये तुलना करून मगच तुमची मेडीकेल्म् पॉलिसी अंतिम करा. केवळ प्रीमियम पाहून पॉलिसी घेऊ नका.सर्व अटी -नियम आणि आपली गरज ओळखून पॉलिसी निवडा.