GDP म्हणजे काय? | GDP Meaning in Marathi

जीडीपी विषयी सर्व माहिती | What is GDP meaning in Marathi | जी डी पी मराठी माहिती GDP information in Marathi

एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिति कशी आहे ? हे आपण त्यांच्या उत्पन्नावरून ठरवतो.तसेच एखादा देश किती श्रीमंत आहे किंवा त्यांची आर्थिक स्थिति कशी आहे हे त्या देशांच्या GDP वरुन ठरविले जाते.आजच्या लेखात आपण GDP म्हणजे काय? GDP कसा काढतात. हे जाणून घेणार आहोत.GDP हा शब्द अनेकदा कानांवर पडतो, पण GDP हा देशांसाठी अतिशय महत्वाचा असतो.अनेकदा आपण बातम्या किंवा आर्थिक लेखांमध्ये  GDP हा शब्द वाचत असतो, पण  GDP आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण आहे.  GDP उत्तम असेल तर तुम्हाला अनेक नविन संधी मिळू शकतात. एकूणच काय GDP म्हणजे तुमचा देश किती प्रगती करत आहे, तुमच्या देशांची आर्थिक स्थिति काय आहे हे सांगणारे प्रगती पुस्तक होय.

GDP चा फूल फॉर्म काय आहे- GDP Full Form In Marathi

GDP चा फूल फॉर्म  “Gross Domestic Product” असा आहे. १९३५- ४४  या कालावधीत अमेरिकन अर्थशास्तज्ञ सायमन यांनी वापरला. सायमन ह्या जगातील एकूण बँकिंग व्यवस्था, आर्थिक विकास यांचा अंदाज बांधत होत्या.सायमन यांनी यूएसए कॉंग्रेसमध्ये जीडीपी हा शब्द आधी वापरला,त्या नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.

GDP म्हणजे काय? What is GDP in Marathi

GDP चा शब्दशा अर्थ घेतला तर तो सकल देशानंतर्गत उत्पादन म्हणजे GDP होय.एखाद्या देशांच्या आर्थिक स्थितीचे मोजमाप करण्यासाठी GDP चा वापर होतो.GDPच्या साह्याने आपण समजू शकतो.कोणत्याही देशांच्या सीमारेषेमध्ये किती उत्पादन केले जाते यावर त्या वस्तु आणि सेवांचे बाजार मूल्य ठरविले जाते.समजा एखाद्या उत्पादित वस्तूची किंमत जास्त असेल तर देशात अधिक पैसा अधिक येईल. म्हणजेच देशांचा विकास वेगाने होऊ शकेल.जर उत्पादित वस्तु आणि सेवांचे मूल्य कमी असेल तर त्या देशांची आर्थिक स्थिति बरोबर चालणार नाही.जीडीपीचा वापर कोणत्याही देशांची आर्थिक स्थिती मोजण्यासाठी केला जातो.

देशांची आर्थिक स्थिती दर तीन महिन्यांनी मोजली जाते.कृषि,उद्योग आणि सेवा हे सर्व GDP अंतर्गत येतात.या क्षेत्रांतील उत्पन्न काही वेळा वाढते किंवा काही वेळा कमी होते, अशा वेळेस GDP कमी जास्त होतो.या आधारावर GDP  ठरविला जातो.मागील काही वर्षात शिक्षण,सेवा,आरोग्य, बँकिंग यांचा देखील यामध्ये समावेश केला आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात उत्पादित केलेली कोणतीही गोष्ट GDP मध्ये मोजली जाते. म्हणजेच काय देशांतर्गत ज्या गोष्टीचे उत्पादन केले जाते त्या सर्व गोष्टी GDP  ग्राह्य धरल्या जातात.

कृषि,उद्योग आणि सेवा हे GDP चे मुख्य घटक आहेत. यामधील वाढ आणि घट या आधारे GDP निश्चित केला जातो. एकूणच काय तर सोप्या भाषेत GDP म्हणजे देशांत बनविली गेलेली वस्तु देशांत किंवा परदेशांत विकली जाते, तेव्हा ती देशांच्या एकूण GDP मध्ये पकडली जाते, पण एखादी परदेशी वस्तु आपल्या देशांत विकली जाते तेव्हा ती GDP मध्ये पकडली जात नाही.

GDP चे प्रकार – Types of GDP in Marathi

आता आपण GDP काय आहे ते आपण समजून घेतले आहे. आता आपण GDP चे प्रकार काय आहेत हे जाणून घेणार आहोत. GDP चे मुख्य दोन प्रकार पडतात.

१) उत्पादनांच्या आधार किंमत निश्चित असणाऱ्या वस्तु
२) मालाच्या चालू मूल्यांवर निर्धारित

Real Gross Domestic Products (वास्तविक देशांतर्गत उत्पादनांवर आधारित GDP)

वास्तविक GDP मूल्यांची म्हणजेच रियल  GDP ची गणना करताना महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार काही ठराविक आधार वर्ष निवडते. Real Gross Domestic Products यामध्ये वास्तविक दर वर्षी उत्पादनांच्या वाढणाऱ्या किंमती आणि त्यांच्या उत्पादन यांच्या प्रमाणाचा होणार बदल दर्शविला जातो.वास्तविक  GDP द्वारे देशांची खरी आर्थिक स्थिति लक्षात येते.

Unrealistic Gross Domestic Products (अवास्तव सकल देशांतर्गत किंमतीवर आधारती GDP)

यामध्ये देशांचा जीडीपी हा सध्याच्या उत्पादनांच्या मूल्यांच्या आधारे मोजला जातो.जीडीपीचा दर हा वर्तमान किंमतीवर मोजला जातो.  

GDP कसा काढला जातो ? How is GDP calculated?

GDP काढताना एक महत्वाचे सूत्र वापरले जाते.संपूर्ण जगाचा GDP ला रिअल GDP ने भागले जाते आणि गुणिले शंभर केले जाते.ज्यामध्ये संपूर्ण देशांर्गत उत्पादने येतात.
GDP = खाजगी वापर  + एकूण गुंतवणूक  +सरकारी  गुंतवणूक  + सरकारी खर्च  +( निर्यात – आयात)
GDP ( एकूण देशांतर्गत उत्पादन ) = उपभोग  +एकूण गुंतवणूक

एकूणच काय तर GDP = C + I +  + (X − M) होय. आता आपण सविस्तर जाणून घेऊ वरील प्रत्येक शब्दांचा अर्थ
C चा अर्थ उपभोग होतो.
I म्हणजे देशांची असलेली एकूण गुंतवणूक
G म्हणजे एकूण सरकारी खर्च
X देशांची एकूण निर्यात
M देशांची एकूण आयात वापर आणि उपभोग

जीडीपी आणि जीएनपी यामध्ये काय फरक आहे? Difference between GDP and GNP in Marathi

जीडीपी वरती जेव्हा जेव्हा चर्चा सुरू असते तेव्हा आपण जीएनपी हा शब्द देखील कानावर पडतो पण जीडीपी आणि जीएनपी यामध्ये काय फरक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन तर जीएनपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन. सरळ भाषेत सांगायचे झाले तर जीडीपी हे पाहतो की कोणतेही उत्पादन हे देशांत होत आहे ना? जीडीपी इतर कोणत्याच गोष्टी पाहत नाही. पण जीएनपी मात्र सर्व उत्पादन देशांतर्गत होत आहे ना? आणि ते नागरिकच करत आहे ना? हे पाहतो.देशांतील नागरिकांना अधिक उत्पन्न घ्यावे यासाठी जीएनपी आग्रही असतो.

निष्कर्ष 

एकूणच काय तर जीडीपी हा तुमच्या देशांची आर्थिक स्थिति काय आहे हे, दर्शवितो. संपूर्ण जग तुमच्या देशाबद्दल काय विचार करते हे आपल्याला जीडीपी वरुन समजते. जीडीपी देशांच्या सर्व संधी आणि प्रगतीसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.  

GDP बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जीडीपी म्हणजे काय?

सकल देशांतर्गत उत्पादन हे एका विशिष्ट कालावधीत देशांच्या प्रदेशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तु व सेवा यांचे एकूण आर्थिक बाजार मूल्य आहे. यास जीडीपी म्हणतात.

जीडीपी कसा मोजला जातो?

खाजगी वापर  + एकूण गुंतवणूक  +सरकारी  गुंतवणूक  + सरकारी खर्च  +( निर्यात – आयात) म्हणजेच काय तर  GDP = C + I + G + (X − M).

जीडीपीचे प्रकार कोणते?

जीडीपी चे मुख्य दोन प्रकार वास्तविक जीडीपी आणि आवास्तविक जीडीपी

जीडीपी किती वर्षात मोजला जातो?

प्रत्येक देशांची जीडीपी मोजण्याचा एक विशिष्ट कालावधी आहे. भारतात दर तीन महिन्यांनंतर जीडीपी मोजला जातो.तसेच वार्षिक जीडीपी देखील मोजला जातो

जीडीपी कोण मोजतं

केंद्रीय सांख्यिक कार्यालय जीडीपी मोजते.

जीडीपीचा सर्व सामान्य नागरिकांवर काही परिणाम होतो का?

देशांतील प्रत्येक घटकांवर जीडीपीचा प्रभाव पडतो. जीडीपी म्हणजे काय तर तुमच्या देशांची आर्थिक स्थिति काय आहे? जीडीपी उत्तम असेल तर देशांची आर्थिक स्थिति उत्तम आहे, असे समजले जाते.

 

शेअर करा