ELSS Mutual Funds in Marathi | कर बचत करणारा म्युच्युअल फंड


टॅक्स सेव्हिंग म्युचल फंड म्हणजे काय | ELSS Information in Marathi | ELSS meaning in Marathi

ELSS Mutual Funds in Marathi – आपण कमावतो त्यातील एक मोठा हिस्सा आपण टॅक्स भरतो. त्यामुळे टॅक्स कमीत-कमी भरावा लागावा यासाठी आपण वेगवेगळ्या गुंतवणूक करत असतो.टॅक्स वाचविण्यासाठी ELSS ही स्कीम सर्वात प्रसिद्ध आहे. परंतु ELSSविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. आधी लोक म्युचल फंड काय आहे हे जाणून घेतात,त्या नंतर ते tax saving mutual fund यांच्या विषयी जाणून घेतात.

टॅक्स सेव्हिंग म्युचल फंड काय आहे ? -(What is Tax Saving Mutual Fund in Marathi)

 टॅक्स सेव्हिंग म्युचल फंड या नावातच म्युचल फंड हा शब्द आहे, यावरून हे लक्षात येते हा म्युचल फंडाचा प्रकार आहे.पण टॅक्स सेव्हिंग म्युचल फंडाचे अजून एक नाव आहे,Equity Linked Saving Scheme (ELSS) आता तुम्हाला वाटेल हा काय प्रकार आहे एकच योजना असून याला दोन नावे कशी काय? तर Equity Linked Saving Scheme इक्विटी लिंक्ड  सेव्हिंग्ज (ELSS) हे नाव इन्कम टॅक्स विभागासाठी वापरले जाते. म्हणजेच काय इन्कम टॅक्स विभाग या योजनेला इक्विटी लिंक्ड  सेव्हिंग स्कीम म्हणून ओळखतात. सर्वसामान्य नागरिक त्याला टॅक्स सेव्हिंग स्कीम म्हणून ओळखतात, पण या दोन्ही योजना एकच आहेत.

इक्विटि लिंक्ड  सेव्हिंग स्कीममुळे टॅक्स तर वाचतोच पण त्या बरोबरच चांगले पैसे देखील कमावता येतात.म्युचुअल फंड्स सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या या इक्विटि लिंक्ड सेव्हिंग ही कॅटेगिरी देतात. तुम्हाला ज्या कंपनीचा प्लॅन उत्तम वाटतो तो प्लॅन घेऊन तुम्ही इक्विटि लिंक्ड सेव्हिंग यामध्ये पैसे गुंतवणूक करू शकता.
 
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग मध्ये देखील अनेक लोक पैसे लावतात,त्यांचे सर्वांचे पैसे एकत्र करून ते गुंतविले जातात.हे पैसे सरकारी बॉन्ड, काही कंपन्या, फिक्स डिपॉजिट किंवा शेयर मार्केट आणि सोन्या मध्ये देखील गुंतविले जातात.प्रत्येक म्युचुअल फंड स्कीम साठी एक फंड मॅनेजर असतो, तो तुमचे पैसे कोठे गुंतवणूक करायचे हे ठरवितो.केव्हा गुंतवणूक करायचे आणि केव्हा काढायचे हे ठरवितो. जेव्हा कोणत्याही म्युचुअल फंड स्कीममध्ये लावले जातात तेव्हा ते शेयर बाजारात गुंतविले जातात. त्याला  इक्विटी म्युचुअल फंड म्हणतात. इक्विटि म्हणजे शेयर असा त्यांचा अर्थ होतो. अनेक लोक यामध्ये पैसे टाकतात आणि त्या सर्वांचे पैसे मिळून ते बाजरात लावले जातात.टॅक्स सेव्हिंग म्युचुअल फंड अशी इक्किटी म्युचुअल फंड स्कीम आहे की ज्यांच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते.
शेअर बाजरात गुंतवणूक करता करता तुमचा टॅक्स देखील वाचला जातो. असे म्युचुअल फंड्स मोठ्या कंपन्याचे शेयर खरेदी करतात. कारण मोठ्या कंपन्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

टॅक्स सेव्हिंग म्युचल फंड म्हणजे काय | ELSS meaning in Marathi

ELSS म्हणजेच  Equity Linked Saving Scheme हा अर्थतर आपण जाणून घेतला आहे,आता शब्दशा अर्थ जाणून घेऊया. Equity म्हणजे भागीदार Linked जुळलेली Saving Scheme बचत योजना. ELSS मध्ये पैसे तुम्ही गुंतवता पण तुमचे पैसे कसे, केव्हा आणि किती गुंतवणूक करायचे हे तुमचा फंड मॅनेजर ठरवितो.

ELSS का विशेष आहे – (Why ELSS is special)

ELSS मध्ये नेहमीच्या म्युच्युअल फंड पेक्षा दोन गोष्टी वेगळ्या आहेत.यामुळे ELSS  ही एक फायदेशीर स्कीम ठरते. चला तर मग जाणून घेऊया.

१. इन्कम टॅक्स सूट ८० सी
२. लॉक इन पिरीयड – लॉक इन पिरीयड हा तीन वर्षा आहे,ज्यात तुम्ही पैसे काढू शकत नाही.

ELSS कोणासाठी योग्य आहे? | (Who is ELSS suitable for?)

१. ज्या लोकांना इन्कम टॅक्समध्ये सूट हवी आहे. अशासाठी ELSS ही योजना आहे.
२. ज्या लोकांना मार्केटमध्ये होत असलेले चढ- उतार सहन करण्याची तयारी आहे,ज्यांना इतर टॅक्स बचत योजना जसे की एफडी,पीपीएफ पेक्षा थोडा जास्त धोका घ्यायला तयार आहेत, जास्त परतावा मिळवण्याकरिता.

ELSS कोणासाठी योग्य नाही? | (Who is ELSS not suitable for?)

१. ज्या लोकांना इन्कम टॅक्समध्ये सूट नको आहे.
२. ज्यांना मार्केटच्या चढ उतारांचा धोका घ्यायचा नाही आहे.जे कमी परतावा आला तरी समाधानी असतात.

ELSS मध्ये धोका किती ? | (What is the risk in ELSS?)

ELSS हे  Diversified Mutual Fund  सारखेच असतात. ते लहान,मध्यम, आणि छोट्या अशा सर्व प्रकरच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात.ELSS मध्ये हायब्रीड फंड पेक्षा जास्त व सेक्टर फंड पेक्षा कमी धोका असतो.ज्या व्यक्तीला म्युच्युअल फंडच्या धोक्याबद्दल माहिती नाही,त्याने आधी म्युच्युल फंड काय हे समजून घ्यावे.

ELSS मध्ये परतावा किती ? | (How much return in ELSS?)

व्यवसायात निश्चित परतावा नसतो. म्हणून ELSSमध्ये निश्चित परतावा नसतो.मागील काळातील म्युच्युअल फंडचा परतावा पाहून आपण काही अंदाज लावू शकतो.पण मागील परतावा भविष्यात मिळेल का नाही याची शास्वती नसते. परतावा जास्त,कमी किंवा सारखाही असू शकतो. मागील काही दशकांमध्ये ELSS च्या काही फंड ने चांगला परतावा दिला आहे. उदाहरणात SBI चा एखादा प्लॅन हा 22 वर्षात 40 पट झाला तर बिर्लाचा एक प्लॅन हा 20 वर्षात 100 पट

ELSS मध्ये गुंतवणुकीचे पर्याय कोणते (What are the investment options in ELSS?)

१. LUMPSUM  एकाच वेळी गुंतवणूक करणे
२. SIP नियमित गुंतवणूक करणारे प्लॅन
SIP मधून मासिक गुंतवणूक करतात एक गोष्ट लक्षात लॉक इन पिरीयड हा ३ वर्षांचा आहे.म्हणजेच ३ वर्ष पैसे काढता येणार नाहीत.तर SIP मध्ये ३ वर्षांचा काळ खालील प्रकारे पकडण्यात येतो. SIP चा सोप्पा अर्थ असा होतो की गुंतवणूक करतानाच्या तारखेपासून तुम्हाला ३ वर्ष म्हणजेच ३६ महीने वाट पहावी लागते.

ULIP vs ELSS

ULIP चे प्लॅन सुद्धा मार्केट मध्ये गुंतवणूक करतात, पण ते गुंतवणुकी बरोबरच विमा देखील देतात पण तुमची पूर्ण रक्कम गुंतवणूक होत नाही. त्यामुळे सर्वात उत्तम पर्याय म्हणजे गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड आणि विम्या करता टर्म इन्शुरन्स घेणे उपयुक्त ठरते.

ELSSमध्ये टॅक्स सुट किती आहे? (What is the tax relief in ELSS?)

ELSS मध्ये टॅक्स सूटची कमाल मर्यादा ही १.५ लाख इतकी आहे.यांचा अर्थ तुमचा १.५ लाख पर्यत टॅक्स माफ होतो असे नाही तर १.५ लाखांवर जो टॅक्स तुम्हाला भरावा लागणार होता ,तो माफ होईल म्हणजेच समजा तुमचे उत्पन्न ६.५० लाख आहे तुम्ही १.५ लाख ELSS मध्ये गुंतवले तर तुम्हाला ० इनकम टॅक्स भरावा लागेल.

मार्चची वाट पाहू नका

टॅक्स वाचविण्यासाठी मार्च महिन्यांची वाट पाहू नका,आर्थिकवर्षांच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिलमध्ये ठरवा तुम्हाला टॅक्स वाचविण्यासाठी काय करावे लागणार आहे.त्यामुळे तुम्ही घाईत चुकीचे निर्णय घेणार नाही.SIPपद्धतीने तुम्ही ELSS मध्ये गुंतवणूक करू शकता,त्यामुळे तुमचा धोका कमी होईल.

३ वर्षाचा लॉकइन पिरीयड का असतो?(Why is there a lock-in period of 3 years?)    –

तुम्ही जी काही रक्कम गुंतवणूक करता ती विविध व्यवसायात गुंतविली जाते. त्यामुळे व्यवसाय वाढतात या कारणासाठी सरकार देखील तुम्हाला करांमध्ये सूट देते.तुम्ही जी काही गुंतवणूक केली आहे,त्यांचा खरोखर फायदा व्यवसायिकांना व्हावा यासाठी ३ वर्षा लॉकइन पिरीयड आहे.

जर तुम्ही टॅक्स सेविंग साठी गुंतवणूक करू इच्छता तर ELSS हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ELSS मध्ये बरेच फंड उपलब्ध आहेत तर योग्य फंड निवडून गुंतवणूक करा.

शेअर करा