सात बारा(7/12) म्हणजे काय? | 7/12 Information in Marathi

सातबारा म्हणजे काय ? 7/12 information in Marathi | ७-१२ कसा शोधायचा, सातबारा उतारा ऑनलाइन बघणे

7/12 Information In Marathi – भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करताना विविध कागदपत्रांची गरज असते. त्यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे मालमत्तेचा सातबारा. मालमत्तेच्या सातबारा बद्दलची माहिती आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार
आहोत. ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.

अनुक्रमणिका

सातबारा म्हणजे काय? | What is the meaning of 7/12?

सातबारा हे मालमत्तेच्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. यामध्ये मालमत्तेबद्दलची सर्व माहिती ही तपशीलवार दिलेली असते. जसे की, जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ, वर्तमानकाळात असलेला त्या मालमत्तेचा मालक. प्रत्येक गावचा तलाठी हा गावातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो. या नोंदणी वह्यांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आलेले असतात. याला ‘गाव नमुना’ असे संबोधले जाते.

सातबाराचा उद्देश | Purpose of 7/12

सातबारा भारतामधील महाराष्ट्र राज्यामधील सरकारने बनवलेले मालमत्तेच्या संदर्भातील उतारा नमूद करण्यासाठी असलेले एक नोंदणी रजिस्टर आहे. यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, मालमत्तेचा मालक, शेतजमिनीची माहिती, शेतजमिनीचा प्रकार- सिंचित किंवा पावसाने सिंचित झालेली, शेवटी त्या जमिनीवर करण्यात आलेल्या शेतीबद्दलची माहिती. सातबारा उतारामध्ये सरकारी एजन्सीकडून घेण्यात आलेल्या कर्जाबद्दलची माहिती दिलेली असते. ज्यामध्ये बियाणे खरेदी, कीटकनाशक, खते यांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद करण्यात येते. अश्या प्रकारे जमिनीचा सातबारा जमिनीच्या मालकी हक्काच्या संबंधित सर्व कागदपत्रांना तयार करतो.

सातबाऱ्याची गरज केव्हा लागते? | When there is a need of 7/12?

जमिनीच्या मालकी हक्काबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्रामुळे विक्रेत्याच्या पार्श्वभूमी व खरेपणाबद्दल माहिती होते. जेव्हा विक्री पूर्ण होते, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये ह्या कागदपत्राची गरज असते. शिवाय शेतीसाठी कर्ज घेताना देखील बँकमध्ये हे कागदपत्र मागण्यात येते. शिवाय कोणत्याही जमिनीशी निगडीत कोर्ट केसमध्ये आणि इतर अनेक कारणांसाठी या कागदपत्राची गरज असते.

सातबारा उताऱ्याचे स्वरूप | Form of 7/12 Extract

अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारने नक्कल, फसवणूक आणि खोटेपणा टाळण्यासाठी सातबारा उताऱ्याच्या दस्तऐवजाचे स्वरूप बदलले. या कागदपत्रामध्ये आता लँड रेकॉर्ड विभागाचा वॉटरमार्क आणि राज्य सरकारचा लोगो असेल. शिवाय यात गावचे नाव आणि कोड देखील असेल. शेवटच्या जमीन मालकाची या कागदपत्रामध्ये नोंद करण्यात येईल. एकूण १२ नवीन बदल हे या कागदपत्रामध्ये झाले आहेत. जे जमिनीच्या व्यवहारातील खोटेपणा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. या कागदपत्रामध्ये स्थानिक सरकारचा निर्देशिका कोड, त्या सर्वेक्षण क्रमांकाचे एकूण क्षेत्र, प्रलंबित उत्परिवर्तन (Mutation Number) आणि अंतिम उत्परिवर्तन क्रमांक देखील दर्शविण्यात येईल. या कागदपत्रामध्ये जमीन वापराचा हेतू नमूद केल्याने त्या जमिनीचा कोणता वापर आहे हे स्पष्ट होईल.

ऑनलाइन सातबारा कसा मिळवायचा? | How to get 7/12 Online?

७ १२ उतारा Online, ७/१२ चा उतारा ऑनलाईन महाराष्ट्र ऑनलाइन भूमी अभिलेख पाहण्यासाठी काही स्टेप्सची पूर्तता करावी
लागते. त्या खालीलप्रमाणे-
१. सर्वप्रथम महाराष्ट्र भूमी अभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.

२. एकदा वेबसाईट ओपन झाल्यावर तेथे तुम्हाला नकाशा आणि त्यामधील ठिकाणे दिसतील. तेथे तुम्हाला तिथे दिलेल्या ६ जिल्ह्यांमधून एका जिल्ह्याची निवड करायची असेल. ते जिल्हे म्हणजे

१. अमरावती

२. औरंगाबाद

३. कोकण

४ .नागपूर

५. नाशिक

६. पुणे

३ .तुम्ही परस्पर नकाशावरती तुम्हाला ज्या ठिकाणाची माहिती हवी आहे ते ठिकाण निवडू शकता किंवा दिलेल्या पर्यायांपैकी एक एक पर्याय देखील निवडू शकता.

४. एकदा तुम्ही जिल्ह्याची निवड केली की, तुम्हाला तालुका आणि गावाची निवड करावी लागेल. 

५. गावामधील योग्य तो पर्याय निवडल्यावर तुम्हाला काही वेगवेगळे पर्याय किंवा सर्च पॅरामीटर तेथे दिसतील. जसे की, सर्व्हे नंबर, गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, संपूर्ण नाव, इत्यादी.

६. तुम्हाला जी माहिती हवी आहे त्याप्रमाणे योग्य त्या पर्यायाची निवड करावी. समजा तुम्ही सर्व्हे नंबर किंवा गट नंबर ह्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडला, तर तुम्हाला सातबारा ऑनलाइन पाहण्यासाठी त्या नंबरबर क्लिक करावे लागेल. 

७. अशी प्रक्रिया वापरून तुम्ही मालकाचे नाव, मालमत्तेचे स्वरूप, भाड्याने मालमत्ता दिली आहे की नाही?, मालमत्तेसंदर्भात काही स्टे ऑर्डर आहे की नाही? याबद्दल देखील माहिती मिळवू शकता.

७/१२ उतारा महाराष्ट्र राज्य, ७/१२ उतारा पुणे७/१२ उतारा नाशिक

१. प्रत्येक जिल्ह्यातील सातबारा उतारा ऑनलाइन मिळवण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in या  वेबसाईटला भेट द्या.

२. तेथे होम पेजवर तुम्हाला डाव्या बाजूला नकाशा दिसेल आणि उजव्या बाजूला जिल्ह्याचे पर्याय निवडण्यासाठीची काही माहिती दिसेल.

३. तेथील नकाशावर दिलेल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक केल्यावर तुम्ही निवडलेल्या इच्छित जिल्ह्याची लिंक परस्पर ओपन केली जाईल.

४. नकाशाप्रमाणे तुम्ही उजव्या बाजूला दिलेल्या पर्यायांपैकी इच्छित जिल्हा निवडून देखील तुम्हाला हव्या असलेल्या जिल्ह्याची लिंक ही ओपन करू शकता.

५. तेथे असलेले जिल्ह्यांचे पर्याय अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे  हे आहेत.

वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी सातबारा उतारा मिळवण्यासाठीच्या लिंक खालीलप्रमाणे-

१.अमरावती – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Amravati/Home.aspx

२.औरंगाबाद – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Aurangabad/Home.aspx

३.कोकण – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Konkan/Home.aspx

४.नागपूर – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Nagpur/Home.aspx

५.नाशिक – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Nashik/Home.aspx

६.पुणे – https://bhulekh.mahabhumi.gov.in/Pune/Home.aspx

सात बारा कसा वाचायचा? | How to read 7/12 Extract?

ऑनलाइन सातबारा डाऊनलोड केल्यावर तो वाचावा कसा हा एक प्रश्न असतो. तुम्ही ऑनलाइन पर्याय वापरून हवा तो सातबारा निवडल्यावर तुम्हाला PDF स्वरूपात तो सातबारा पाहण्यास मिळेल. त्यामध्ये तुम्हाला जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीबद्दलची माहिती, जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचा भूतकाळ, जमीन कोणत्या कारणासाठी वापरली जाते, ही आणि अशी अनेक माहिती तुम्हाला सातबाऱ्यामध्ये मिळू शकेल. ऑनलाइन पद्धतीमुळे इच्छित जमिनीचा सातबारा मिळवून त्या जमिनीची माहिती घेणे हे सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

सातबारा उताऱ्याचे महत्व | Importance of 7/12 Extract

सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा इतिहास जाणून घेण्यास आपल्याला मदत करतो. त्यामुळे त्या मालमत्तेच्या बाबतीत काही कोर्ट केस चालू आहे का किंवा ती मालमत्ता कोणत्या विवादात अडकली आहे का याबद्दल माहिती समजते. शिवाय ती जमिन कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते आहे त्याबद्दल देखील समजण्यास मदत होते. म्हणजे ती जमीन शेतजमिन आहे की व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येते आहे याबद्दल समजते. ती जमिन जर शेतजमिन असेल तर त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचे पीक लावले आहे याबद्दल देखील समजते. 

सातबारा मधून नाव कसे काढावे? | How to remove name from 7/12?

सातबारामधून नाव काढायचे असल्यास तुम्हाला स्थानिक तहसीलदारासोबत संपर्क करायला लागेल. त्या व्यक्तीचे नाव काढण्यासाठी सांगितलेली योग्य ती कागदपत्रे त्याच्याकडे जमा करावी लागतील.

सातबारा मधून तुमचं नाव फसवणूक करून काढण्यात आलं तर काय करावं लागेल? | If your name has been removed from 7/12 by cheating then what is to be done in these case?

सर्वप्रथम तुम्हाला योग्य त्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागेल. कारण योग्य ती कागदपत्रे जमा केल्याशिवाय सातबारामधून नाव काढता येत नाही. तसेच तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे सातबारा मधून नाव काढल्यानंतर देखील सातबाऱ्याच्या उतारात उत्परिवर्तन नोंद अस्तित्वात असते. उत्परिवर्तन नोंद ही मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो व त्यावरून नाव काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची माहिती समजते. तरीही तुम्ही समाधानी नसाल तर तहसीलदार कार्यालयात प्रमाणित प्रतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्या प्रतीच्या आधारावर तुम्ही कायदेशीर मदत देखील घेऊ शकता.

सातबारा उताऱ्याचे उपयोग | Use of 7/12 Extract 

• सातबारामध्ये दिलेल्या तपशीलवार माहितीनुसार खरेदी करू इच्छित असलेल्या मालमत्तेमध्ये नियमित वापरासाठी प्रवेश रस्ता आहे की नाही याबद्दल समजते.

• सातबारा हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे याबद्दल यावरून माहिती मिळण्यास मदत होते. शिवाय एखादी जमिन खरेदी केल्यावर ती मालमत्ता तुमच्या नावे झाल्यावर सातबारामध्ये ती जमिन तुमच्या नावावर दिसते.

• बँक कर्ज देताना जमिनीच्या या महत्वाच्या कागदपत्राबद्दल विचारणा करते.

• नागरी कायदेशीर विवादांमध्ये या कागदपत्राचा उपयोग करण्यात येतो. 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions

सातबारा उतारा म्हणजे काय?

सातबारा उतारा ही एक जमिन नोंदवही मधील माहिती आहे. जी एका विशिष्ट मालमत्तेची संपूर्ण माहिती देते.

सातबारा उतारा कुठे वापरला जातो?

हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. जमिनी संदर्भात कर्ज देताना बँका ह्या कागदपत्राची कर्जदाराकडे विचारणा करतात.

महाराष्ट्र महाभुलेख सातबाराची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

महाराष्ट्र महाभुलेख सातबाराची अधिकृत वेबसाइटची लिंक- https://bhulekh.mahabhumi.gov.in

शेअर करा