NEFT विषयी मराठी माहिती | NEFT information in Marathi
मागील काही वर्षात बँकिंग व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी पैसे जर एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पाठवायचे असतील तर बँकेत जावे लागत, पण आता यामध्ये अनेक नवीन सुविधा सुरू झाल्या आहेत. अगदी घरबसल्या तुम्ही एका क्लिकवर तुम्ही पैसे पाठवू शकता. आजच्या लेखात आपण NEFT विषयी जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
NEFT म्हणजे काय? | What is NEFT in Marathi
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मुख्य तीन पर्याय आहेत. ते म्हणजे NEFT, RTGS आणि IMPS. NEFT म्हणजे National Electronics Fund Transfer असा त्यांचा फुल फॉर्म होतो. संपूर्ण देशांत पैसे पाठविण्यासाठी ही पद्धती वापरली जाते. पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पाठविण्यासाठी सर्वात सुरक्षित पद्धती म्हणून एनईएफटीकडे पाहिले जाते.
NEFT long form Marathi | NEFT full form in Marathi
NEFT full form in Marathi – National Electronics Fund Transfer म्हणजे मराठी मध्ये “राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण“
NEFT विषयी महत्वाचे मुद्दे
- जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या बँक खात्यातून दुसऱ्या बँकेच्या बँक खात्यात पैसे पाठवायचे असतील तर NEFT द्वारे पैसे हस्तांतरित केले जातात. NEFTचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणत्याही बँकेतून किंवा बँक शाखेतून पैसे पाठविले जाऊ शकतात.
- NEFT द्वारे पैसे पाठविण्यासाठी एक महत्वाची अट म्हणजे दोन्ही बँक शाखामध्ये NEFT सक्षम असले पाहिजे. आरबीआयने त्यांच्या वेबसाईटवर NEFTसाठी सक्षम असलेल्या बँकेची यादी दिली आहे.या बरोबरच तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला देखील कॉल करून देखील तुमच्या बँकेत NEFT आहे का? यांची चौकशी करू शकता.
- NEFT हे २००५ साली सुरू करण्यात आले. बँकिंग क्षेत्रात विकास व्हावा आणि टेक्नॉलजीचा वापर करून बँकिंग प्रणाली अधिक सक्षम व्हावी यासाठी आयडीबीआरटी कडे यांचे संशोधन सोपविण्यात आले होते.आपल्या देशांतील सर्व बँक ज्या NEFT च्या वापरासाठी सक्षम आहेत, त्या सर्व बँकेचे ग्राहक या सुविधेचा अगदी सहजपणे वापर करू शकतात.
- NEFT मध्ये इलेक्ट्रिक संदेशाचा वापर केला जातो. NEFT हे रियल टाइमवर आधारित केले जाते.
- NEFT हे २३ सेंटलमेंट साप्ताहिक दिवसांमध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ७.३० दरम्यान कार्य करते. दर अर्ध्या तासाच्या बॅचच्या स्वरूपाने निधी हस्तांतरित केला जातो. महिन्याच्या १ ल्या ३ ऱ्यां आणि ५ व्या शनिवारी देखील केले जाते. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवार वगळता सणाच्या दिवशी मनी ट्रान्सफर केले जात नाही.
सर्व बँकांमध्ये NEFT सुविधा आहे का? | Do all banks have NEFT facility?
देशभरातील १०१ बँकामध्ये ८२५०० शाखांपैकी ७४६०० शाखांमध्ये NEFT ही सुविधा उपलब्ध आहे. या बरोबरच ज्या बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे , तेथे ही सुविधा त्या बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन बँकिंगद्वारे काम करते.
NEFT देशभरातील बँकिंग व्यवस्थेत अतिशय लोकप्रिय ठरली आहे कारण यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होते , या बरोबरच पैसे पाठविणे देखील सोप्पे आहे.
NEFT द्वारे कसे पैसे पाठवावे – How to send money through NEFT in Marathi
NEFT ची सुविधा प्रामुख्याने दोन प्रकारात केली जाते. एक ऑनलाइन पद्धतीने आणि एक ऑफलाइन पद्धतीने. ऑफलाइन पद्धतीमध्ये बँकेत जाऊन प्रत्यक्ष ही प्रक्रिया केली जाते.दूसरा ऑनलाइन मोड ज्यामध्ये ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइन बँकिंगद्वारे NEFT करता येते.
NEFT हा थोडासा वेगळा प्रकार पडतो,यामध्ये RTGS आणि IMPS प्रमाणे पैसे जमा केल्याबरोबर समोरच्या खात्यात दिसत नाहीत. NEFTतुमचे पैसे बँकेने सेट केलेल्या वेळापत्रकानुसार बँकेला प्राप्त होतात.
ऑनलाइन NEFT ने पैसे कसे पाठवावे | How to send money through NEFT in Marathi
NEFT द्वारे ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी इंटरनेट बँकिंग आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंगची सुविधा नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करू शकता. एकदा का तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंग सुरू झाले की तुम्ही NEFT करू शकता.
१. ऑनलाइन निधी हस्तांरीत करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर लॉगइन करा.
२. त्यानंतर NEFT पर्यायावर जाऊन अॅड पे हा पर्याय निवडा.
३. त्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे NEFT करायचे आहेत. त्या व्यक्तीचे सर्व डिटेल जोडा.
४. अशा प्रकारे खाते जोडले जाईल. त्यानंतर ३० मिनिटे तुम्हाला थांबावे लागेल. एकदा का खाते जोडले गेले की मग तुम्ही पैसे पाठवू शकता.
५. एखादे बँक खाते जोडण्यासाठी तुम्हाला बँकेचे नाव, खाते क्रमांक, नाव आणि आयएफसी कोड इत्यादी माहिती भरावी लागेल.
६. NEFT पर्याय फंड ट्रान्स्फर निवडल्यानंतर तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे, तो आकडा टाका आणि पे वर क्लिक करा. तुमचे पैसे लाभार्थी व्यक्तीला मिळतील.
ऑफलाइन पद्धतीने NEFT द्वारे कसे पैसे पाठवावे | How to send money through NEFT in offline mode
जर तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंग सेवा उपलब्ध होत नसेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील पैसे पाठवू शकता. ऑफलाइन पद्धतीने पैसे पाठविण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.
बँकेत केल्यानंतर NEFT करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. या फॉर्ममध्ये ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्यांचे नाव अकाऊंट नंबर, आयएफसी कोड इत्यादी माहिती भरावी लागते.
त्या नंतर तुम्हाला किती रक्कम पाठवायची आहे,हे देखील भरले जाते. एकदा का फॉर्म भरून झाला की बँक सही घेऊन NEFT करण्याची परवानगी तुमच्याकडून घेते. अशा प्रकारे तुमच्या खात्यातून रक्कम समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पाठविली जाते.
NEFT कसे काम करते? | NEFT Process in Marathi
१. एकदा का तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरला की लाभार्थीच्या माहितीचा सर्व तपशील घेतला जातो.
२.तुमची बँक एक संदेश जारी करते, हा संदेश NEFT केंद्रावर पाठविला जातो.NEFT चा हा संदेश मग तुमच्या बँकेकडून NEFTक्लिअरिंग सेंटरला फॉरवर्ड करतो. हे क्लिअरिंग सेंटर नॅशनल क्लिअरिंग सेंटरद्वारे चालविले जाते.
३. त्या नंतर NEFTक्लिअरिंग सेंटर सर्व निधी हस्तांतरित व्यवहार बँकाच्या वर्गीकरणानुसार त्यांची नोंद तुम्ही ज्या बँकेत पैसे पाठविले आहे. त्या प्रमाणे क्रमवारी केली जाते.त्या नंतर NEFT केंद्राला संदेश प्राप्त होतो. एकदा का सर्व संदेश प्राप्त झाले की मग ते पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले जातात.
NEFT द्वारे पैसे पाठविण्यासाठी किती शुल्क आकरले जाते? | NEFT Charges in Marathi
- रु १०,००० पर्यत रक्कम – रु २.५० + GST
- १०००० रुपयांपेक्षा जास्त आणि १ लाख रुपयापर्यन्तची रक्कम – रु ५ + GST
- १ लाखापेक्षा अधिक आणि २ लाखा पर्यतची रक्कम- रु १५ + GST
- २ लाखांपेक्षा जास्त आणि ५ लाखांपर्यतची रक्कम – रु २५ + GST
- ५ लाखांपेक्षा जास्त आणि १० लाखांपर्यन्तची रक्कम – रु २५ + GST
NEFT व्यवहाराच्या वेळा | NEFT Timings Marathi
- NEFT हे बॅचमध्ये काम करते. आठवड्याच्या दिवशी सकाळी ८ टे संध्याकाळी ७ आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यत काम करते.
- यासह एकामागून एक काम करण्यासाठी ८ ते ६ बॅच आहेत.
- म्हणुनच सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते संध्याकाळी ६.३० पर्यत पैसे पाठविले जातात.
NEFT Transactions कोण करू शकते?
आरबीआयच्या नियमानुसार NEFT सुविधा देणाऱ्या बँकेतील ग्राहक NEFT सेवेचा लाभ घेऊ शकतात.
NEFT साठी सर्वात महत्वाचा नियम पैसे पाठविणारा आणि पैसे स्वीकारणारा या दोघांकडे NEFT ची सक्षम सुविधा असणे गरजेचे आहे.
NEFT द्वारे निधी कोण मिळवू शकतो?
जर एखादया व्यक्तीचे बँक खाते नसेल पण समोरच्या व्यक्तीचे खाते असेल तर खाते नसलेला व्यक्ती देखील एनईएफटी वापरू शकतो.५० हजारा पर्यतची रक्कम भरू शकतो.
NEFT चे फायदे काय आहेत What are the benefits of NEFT?
१ कमी मूल्य असलेल्या व्यवहारासाठी NEFT अतिशय उपयुक्त आहे.
२ प्राप्तकर्त्या व्यक्तीला कोणतेही शुल्क पडत नाही.
३ तुमचा व्यवहार यशस्वी झाल्याची माहिती तुम्हाला ईमेल किंवा मेसेजद्वारे मिळते.
४ प्रत्येक बॅच ही एक तासाची आहे.NEFT कोणतीही व्यक्ती अगदी सहजपणे पैसे एका बँक खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पाठवू शकते.
५ ऑनलाइन जर तुम्ही पैसे पाठवत असाल तर तुम्हाला बँकेत देखील जाण्याची गरज नाही.
६ NEFT चे चार्जेस खूप कमी आहेत.
७ NEFT अतिशय सुरक्षित आणि जलद आहे.
NEFT ला किती वेळ लागतो | How long does NEFT take?
शक्यतो NEFT केल्यानंतर काही सेंकदात पैसे जाणे अपेक्षित असतं, पण काही वेळेस तसे होत नाही. प्रत्येक बँकांची वेळ देखील वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक बँकाचा कालावधी हा कमी जास्त असतो.
सर्व NEFT व्यवहारांसाठी IFSC कोड असणे अनिवार्य आहे का?
समोरच्या व्यक्तीला पैसे सुरक्षित आणि जलद पाठविण्यासाठी NEFT व्यवहारांसाठी IFSC कोड असणे गरजेचे आहे.